Wednesday, 10 April 2024

पश्चिमी वारे (Westerlies) (ग्रहीय वारे)




◼️ दोन्ही गोलार्धात मध्य अक्षांशीय जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून (25° ते 35° उ. व द.) दोन्ही गोलार्धात 60° अक्षवृत्ताजवळील कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात.


◻️वैशिष्ट्ये : पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असल्याने या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात.


◼️पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमी वारे दक्षिण गोलार्धात वायव्येकडून आग्नेयेकडे, तर उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात.


◻️म्हणजेच पूर्वीय वाऱ्यांच्या विरुद्ध दिशेत पश्चिमी वारे वाहतात.


◼️अश्व अक्षांश (Horse Latitude) : दोन्ही गोलार्धात 25° ते 35° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यानचा जास्त दाबाचा पट्टा शांत असतो, त्यास अश्व अक्षांश म्हणतात.


◻️गर्जणारे चाळीस (Roaring Forties) : वायव्य प्रतिव्यापारी वारे. दक्षिण गोलार्धात जलभाग (पाणी) सर्वाधिक तर भूभाग सर्वांत कमी आढळतो. कमी भूभागामुळे पश्चिमी वाऱ्यांना वाहताना कमी अडथळा उत्पन्न होतो, म्हणून 40° दक्षिण अक्षवृनापलीकडे पश्चिमी वारे घोंगावत-रोरावत व वेगाने वाहतात, म्हणून त्यांना 'गर्जणारे चाळीस' असे म्हणतात.

No comments:

Post a Comment