MPSC vs विद्यार्थी
मागच्या वर्षी जानेवारी (२०२३) मध्ये फॉर्म्स भरून झाले,
३० एप्रिल २०२३ ला पूर्व परीक्षा पार पडली...
ऑक्टोबर २०२३ च्या जवळपास पूर्व चा निकाल लागला,
१७ डिसेंबर २०२३ ला मुख्य परीक्षा पार पडली,
मार्च २०२४मध्ये अंतिम उत्तर पत्रिका आली,
आता २०२४ चा एप्रिल आला , काही दिवसात ३० एप्रिल २०२४ उजाडेल म्हणजे पूर्व परीक्षा देऊनच १ वर्ष पूर्ण होणार,
मग पुन्हा टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क साठी स्कील टेस्ट बाकी आहेत,
४-५ महिने किमान त्याच्यात जातीलच,
तिथून पुढे कधी नियुक्त्या कधी निकाल अन कधी काय....
काही सुधारणा व्हाव्यात असं कोणालाच वाटत नाही का ??
२ वर्ष जर एक परीक्षेत जात आहे ,
तर मग आयुष्याचा किती भाग एकूण परीक्षांमध्ये जात असेल ??? (जर आयुष्य ६० वर्ष पकडल तरी आयुष्याचा किमान १०% भाग तयारी मध्ये जात आहे पदवी घेतल्या नंतर, २२-२३ वर्ष आधीच गेले आहेत मग आपला एकूण ३५-४०% भाग वाया जात नाहीये का ?)
माननीय आयोगाने थोडी गती वाढवावी असं त्यांनाही वाटल पाहिजे...
कारण या काळात आर्थिक , मानसिक , शारीरिक सर्वच नुकसान विद्यार्थ्यांचं होत राहतं,
मग कितीक जण तर परीक्षांचा निकाल पाहायला पण जशे फॉर्म भरताना होते तसे राहत नाहीत...
तसाही आपल्या देशात सामान्यांचा विचार करणारे आता जन्माला येत नाहीयेत,
पण एक विचार काहीही बदल घडवू शकतो...
एका परीक्षेला १ वर्षाच्या आत मार्गी लावलेलं खूप बरं राहील...(हे पण कमी नाहीये)
बँकिंग च्या परीक्षांचे निकाल ३ महिन्यात जिकडे तिकडे होतात,
आता २१००० पोरं निकालाच्या प्रतिक्षेत आहे (क्लर्क),
७००० जण क्लर्क होतील,
बाकीचे १४००० जण पुन्हा पुढच्या २ वर्ष बरबादी कडे वाटचाल करतील...
मग याच्यात त्या भोळ्या विद्यार्थ्यांचा दोष आहे की दुसऱ्या कोणाचा ???
१४० कोटी जनता आहे त्यात जर ८३% तरुण जनता बेरोजगार असेल,
तर भारत चीन ला कधीही मागे टाकू शकत नाही ( स्वप्नात पण नाही),
सर्व दोष जनतेचा नसतो , काही दोष सिस्टीम मध्ये असतो... आणि तो बऱ्याच काळानंतर कळतो,
तरुण पिढ्या आयुष्याचा मौल्यवान काळ वाया घालवत आहे, कारण नोकऱ्याच नाही,
आमच्याकडे डॉक्टर , इंजिनियर पासून पी एच डी पर्यंत सध्या सगळेच बेरोजगार आहेत...
यामध्ये दोष त्या सर्व जनतेचा आहे का ?
No comments:
Post a Comment