Thursday, 11 April 2024

शेकडेवारी

1) "कोणत्याही संख्येचे दिलेले टक्के काढताना प्रथम 1% (टक्का) अथवा 10% काढा. त्यानंतर पट पद्धतीने दिलेले टक्के तोंडी काढता येतात.

उदा. 500 चे 10% = 50 (10 टक्के काढताना एक शून्य कमी करा.)
125 चे 10% = 12.5 अथवा एकक स्थानी शून्य नसल्यास एका स्थळानंतर डावीकडे दशांश चिन्ह द्या.

500 चे 30% = 150     
500 चे 10% = 50   
30% = 10%×3
= 50×3 = 150
500 चे 8% = 40 (संख्येच्या 1%काढताना शेवटचे दोन शून्य कमी करा अथवा शून्य नसल्यास डावीकडे दोन दशांश स्थळांवर दशांश चिन्ह धा.)
500 ची 1% = 5
:: 500 चे 8% = 40

2) दिलेल्या संख्येचे 12.5% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/8 ने गुणा.

उदा. 368 चे 12.5% = ?
368×12.5/100
= 368×1/8= 46

3) दिलेल्या संख्येचे 20% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/5 (0.2) ने गुणा.

उदा. 465 चे 20% = 93   
 
465×20/100
= 465×1/5 ने गुणा = 93

4) दिलेल्या संख्येचे 25% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¼ (0.25) ने गुणा.

उदा. 232 चे 25% = 58
232×25/100
= 232×1/4= 58

5) दिलेल्या संख्येचे 37 1/2% (37.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 3/8 ने गुणा.

उदा. 672 चे 37.5% = 252   
 
672×37.5/100
= 672×3/8
= 252

6) दिलेल्या संख्येचे 50% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ½ (0.5) ने गुणा.

उदा. 70 चे 50% = 35   
 
70×50/100
= 70×1/2
= 35

7) दिलेल्या संख्येचे 62 ½% (62.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 5/8 ने गुणा.

उदा. 400 चे 62.5% = 250  
   
400×62.5/100
= 400×5/8
= 250

8) दिलेल्या संख्येचे 75% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¾ ने गुणा.

उदा. 188 चे 75% = 141  
   
188×3/4
= 141

9) दिलेल्या संख्येचे 87 ½% (87.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 7/8 ने गुणा.

उदा. 888 चे 87.5% = 777  
   
888 × 87.5/100
= 888×7/8
= 777

10) दिलेल्या संख्येचे त्या संख्येएवढेच टक्के काढावयाचे असल्यास, त्या संख्येचा वर्ग काढून डावीकडे दोन दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह द्या.

उदा. 25 चे 25% = 6.25
25 × 25/100
= 625/100
= 6.25"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...