## मुख्य प्रकार दोन :
अ) अबीजपत्री (Cryptogamae)
ब) बीजपत्री ( Phanerogame)
--------------=========---------------
अ) अबीजपत्री (Cryptogamae)::
- हे अपुष्प वनस्पती असून यांना बिया येत नाहीत.
- यांचे तीन विभागात विभाजन करण्यात येते..
1) थॅलोफायटा ( Thalophyta ) ::
- 'शैवाळाचा विभाग'
- मूळ, खोड, पाने नसतात.
- पाण्यात वाढतात.
* उदाहरण :=
- शैवाळ :: स्पायरोगायरा, कारा, युलोथ्रीक्स,जेलेडीयम, क्लोरेल्ला, कोंड्रस, बट्राकोस्पर्मम.
---------------------------------------------------
2) ब्रायोफायटा ( Bryophyta ) ::
- मुळांऐवजी मुलाभ (Rhuzoid ) असतात. जे वनस्पतींना आधार देतात व अवशोषण करतात.
- उभयचर वनस्पती म्हणून ओळख.
* वर्गीकरण 2 गट ::
i) लिव्हरवार्टस ( हिपॅटेसी )::
- साधे ब्रायोफायटा
* उदाहरण ::
रिक्सीया, मर्केन्शीया, पेलीया, लेज्यूनिआ.
ii)माँसेस (मुस्सी ) ::
- प्रगत ब्रायोफायटा
* उदाहरण ::
फ्युनारिया, पॉलीट्रायकम
--------------------------------------------------
3) टेरिडोफायटा ( Pteridophyta) ::
- अबीजपत्री वर्गातील सर्वात प्रगत व पहिली संवहनी संस्था.
- खरी मुळे, पाने व खोड असलेल्या वनस्पती.
- विकसित वनस्पती
* उदाहरण ::
सिलोटम, इकवीसॅटम, मारसेलिया, नेरीस, ऑडिएन्टम, नेचे, लायकोपोडीअम,
सिलॅजिनेला.
----------------==--------==-----------------
ब) बीजपत्री ( Phanerogamae ) ::
- या बिया येणाऱ्या वनस्पती.
* 2 गटात वर्गीकरण ::
i) अनावृत्तबीजी (Gymnosperms) ::
- बीयांची निर्मिती होते पण त्या फळामध्ये बंदिस्त नसतात.
- म्हणजे यांना फळे येत नाहीत.
* उदाहरणे ::
पायनस (देवदर), सायकस,पिसिया (ख्रिसमस ट्री ), गिन्कगो बायलोबा.
ii)आवृत्तबीजी वनस्पती ( Angiosperms) ::
- बिया फळामंध्ये बंदिस्त असतात यांना फळे येतात.
** 2 प्रकार ::
a) एकबीजपत्री ( monocotyledonous ) ::
- एकाच दलाचे बीज.
* उदाहरणे ::
कांदा, केळी, बांबू, लसूण, तांदूळ, मका, ज्वारी, गहू.
b) द्विबीजपत्री (Dicotyledonous ) ::
- दोन दलाचे बीज.
* उदाहरणे ::
आंबा, पिंपळ, मोहरी,सूर्यफूल, शेंगदाणा.
------<<<<<<<<>>>>>>>>>>>>>----
No comments:
Post a Comment