Thursday, 18 April 2024

जनसांख्यिकीय संक्रमण सिद्धांत

👉प्रतिपादन-- डब्ल्यू एम थामसन
👉मांडला-- फ्रेक नाॅटेस्टीन 1945

👉नुसार, आर्थिक विकासाच्या वेगवेगळ्या स्तरात जन्म-मृत्यूच्या प्रवृत्ती वेगवेगळ्या असतात, त्यामुळे लोकसंख्या वृद्धि दरही वेगवेगळा असतो.

👉मते,
सामान्यतः प्रत्येक अर्थव्यवस्थांची लोकसंख्या वृद्धि 5 अवस्थांमधून जाते.

👉प्रथम-- जन्म किंवा मृत्युदर दोन्ही उच्च असतात. उदाहरणार्थ 1921 पूर्वीचा भारत

👉द्वितीय-- लोकसंख्या विस्फोट
ही अवस्था आर्थिक विकास बाधक असते. 1921 ते 1991 भारतातील अवस्था.

👉तृतीय--आर्थिक विकासाचा वेग तीव्र होतो; तसेच कुटुंब नियोजन मुळे जन्मदर व मृत्युदर दोन्ही घटतात.
या अवस्थेत देश विकसित अवस्थेत पोहोचतो

👉चतुर्थ-- सुख सुविधांच्या वाढीने प्रजोत्पादनाची इच्छा कमी होते, त्यामुळे जन्मदर व मृत्युदर दोन्ही उतरून एका निश्चित पातळीवर स्थिर होतात. यात लोकसंख्येत निव्वळ वृद्धि नगण्य ठरते. उदाहरणार्थ- युरोपातील विकसित देश

👉पंचम-- जन्मदर मृत्युदरापेक्षा कमी होतो, याने लोकसंख्येचा आकार घटतो व वृद्धांची संख्या वाढते. या अवस्थेत स्त्रिया घराच्या बाहेर पडून उत्पादक कार्य करतात त्यांचा दृष्टिकोन बदलतो उदाहरणार्थ- फ्रान्स

🇮🇳भारत हा सध्या तृतीय अवस्थेतून जात आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...