Sunday, 14 April 2024

पंचतीर्थ

पंचतीर्थ (Panchteerth)

- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील पाच महत्त्वाच्या स्थळांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देणारा हा उपक्रम.
- 2014 - 2015 मध्ये घोषित केलेल्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत 15 सर्किट घोषित करण्यात आली आहेत, त्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सर्किट अंतर्गत या पाच स्थळांचा विकास करण्यात येत आहे.

1⃣ जन्मभूमी

- महू (मध्य प्रदेश) येथे 14 एप्रिल 1891 रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.
- 2019 मध्ये महू रेल्वे स्थानकाचे नाव बदलून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक असा केले.

2⃣ दीक्षाभूमी

- नागपूर (महाराष्ट्र) येथे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
- 2014 मध्ये या ठिकाणाला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला.

3⃣ शिक्षण भूमी

- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी लंडन येथे असताना 10, किंग हेन्री मार्ग येथे राहिले होते.
- महाराष्ट्र सरकारने ही जागा खरेदी केली आणि 14 नोव्हेंबर 2015 रोजी नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.

4⃣ महापरिनिर्वाण भूमी

- दिल्लीत 26, अलीपूर रोड याठिकाणी बाबासाहेबांचे निवासस्थान होतो. येथेच त्यांचे निधन झाले.
- या घराचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याचा निर्णय 2 डिसेंबर 2003 रोजी झाला.
- स्मारकाचे 21 मार्च 2016 रोजी भूमीपूजन तर 13 एप्रिल 2018 रोजी मोदींच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले.

5⃣ चैत्यभूमी

- दादर, मुंबई (महाराष्ट्र) येथे बाबासाहेबांची समाधी आहे.
- येथे (इंदू मिल) भव्य स्मारक नियोजित आहे, त्याचे 2015 मध्ये भूमीपूजन झाले आहे.

No comments:

Post a Comment