Monday, 29 April 2024

चालू घडामोडी :- 29 एप्रिल 2024

◆ गुलाबी साडी'ला मिळाला न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर झळकणा-या पहिल्या मराठी गाण्याचा मान मिळाला.

◆ आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस दरवर्षी 29 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

◆ 'अरुण अलगप्पन' यांनी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे.

◆ इराकच्या संसदेने समलैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरवणारे विधेयक मंजूर केले आहे.

◆ हर्षित कुमारने  21 व्या अंडर-20 आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

◆ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी (NIPFP) ने 2024-2025 या आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर '7.1%' असण्याचा अंदाज वर्तवला आहे.

◆ दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज गॅरी कर्स्टन पाकिस्तानच्या वनडे आणि टी-20 संघाचे प्रशिक्षक बनले आहेत.

◆ तिरंदाजी विश्वचसक स्पर्धा 2024  शांघाय येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

◆ ज्योती सुरेखा वेन्नम या एका विश्वचसकात 3 सुवर्ण पदक जिंकणाऱ्या दुसऱ्या भारतीय तिरंदाज ठरल्या आहेत.

◆ भारताच्या पुरूष संघाने शांघाय तिरंदाजी विश्वचसक स्पर्धेत 14 वर्षांनी सुवर्ण पदक जिंकले आहे.

◆ भारताच्या पुरूष संघाने शांघाय तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत अंतिम सामन्यात दक्षिण कोरिया या देशाच्या संघाचा पराभव केला.

◆ तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारी ने रौप्य पदक जिंकले आहे.

◆ तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत भारताने 5 सुवर्ण पदके जिंकली आहेत.

◆ वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,आंध्रप्रदेश या युनिव्हर्सिटी ला 2024 चा CSR आऊटस्टँडिंग युनिव्हर्सिटी इन एज्युकेशन एक्सलन्स अवार्ड प्रदान करण्यात आला आहे.

◆ जगातील सर्वात मोठे विमानतळ दुबई येथे साकरण्यात येणार आहे.

◆ IPL मध्ये 150 विजयी सामन्यांत सहभागी असणारा एम. एस. धोनी हा पहिला क्रिकेट पटू ठरला आहे.

◆ इसाक दार यांची पाकिस्तान या देशाच्या उप पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ शांघाय कॉऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO च्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कजाकिस्तान येथे आयोजित करण्यात आली होती.

◆ केंब्रिज टीचर अवॉर्ड 2024 साठी जीना जस्टस या भारतीय व्यक्तीला नामांकित करण्यात आले आहे.

◆ केंब्रिज टीचर अवॉर्ड 2024 साठी नामांकन मिळालेल्या जीना जस्टस या केरळ राज्याशी संबंधित आहेत.

◆ चीन ने शेनझोउ-18 मिशन द्वारे तीन अंतराळवीरांना अंतराळात पाठवले आहे.

◆ आंतरराष्ट्रीय थिएटर इन्स्टिट्यूट (ITI) च्या नृत्य समितीने आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाची संकल्पना सर्वप्रथम 1982 साली मांडली.

◆ इराक च्या संसदेने पारित केलेल्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरविणाऱ्या विधेयकानुसार 10 ते 15 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...