Saturday, 27 April 2024

चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो.

◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ Fintech कंपनी 'BharatPe' ने देशातील पहिले ऑल-इन-वन-पेमेंट डिव्हाइस लाँच केले आहे.

◆ भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने कोटक महिंद्रा बँकेचे नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर बंदी घातली आहे.

◆ दीपांशू शर्माने आशियाई अंडर 20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 70.29 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले आहे.

◆ ऑस्ट्रेलियन फर्म कंपेअर द मार्केट एयूने जारी केलेल्या अभ्यासानुसार, जगातील दुसरा सर्वात स्वस्त पासपोर्ट 'भारत'ने बनवला आहे.

◆ भारतीय टेनिसपटू युकी भंवरी आणि तिचा फ्रेंच जोडीदार अल्बानो ऑलिवेट्टी यांनी 2024 BMW ओपन टेनिस स्पर्धेचे दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

◆ 5G नेटवर्कची कार्यक्षमता वाढवण्यासाठी C-DOT ने IIT जोधपूरसोबत करार केला आहे.

◆ चीनमधील शांघाय येथे ‘तिरंदाजी विश्वचषक 2024’ चे आयोजन करण्यात येणार आहे.

◆ JEE मेन्स परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकवाणारा नीलकृष्णा गजरे हा महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी आहे.

◆ हिमाचल प्रदेश राज्यात देशातील पहिल्या 1500MW क्षमतेच्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

◆ 26 वी जागतिक ऊर्जा काँग्रेस ची मंत्रीस्तरीय परीषद नेदरलँड या देशात आयोजित करण्यात आली होती.

◆ अमेरिका देशाचे नागरिकत्व मिळवणारा भारत जगातील दुसऱ्या सर्वात मोठा देश ठरला आहे.

◆ अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारा पहिला सर्वात मोठा देश मेक्सिको ठरला आहे.

◆ अमेरिकेचे व्हायजर-1 हे  अंतराळात सर्वात दूर गेलेले पाहिले मानवनिर्मित अंतराळयान आहे.

◆ Heavenly island of Goa हे पुस्तक श्रीधरन पिल्लई यांनी लिहिले आहे.

◆ 77 व्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये "Sunflowers were the first once to know" या भारतीय चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

◆ फ्रान्स देशात 15 ते 24 मे 2024 या कालावधीत 77 वा कान्स चित्रपट महोत्सव पार पडणार आहे.

◆ एशियन अंडर-20 एथेलेटिक्स चॅम्पियनशिप चे आयोजन दुबई येथे करण्यात आले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...