Tuesday, 23 April 2024

चालू घडामोडी :- 23 एप्रिल 2024

◆ युनायटेड स्टेट्स 2023 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश बनला आहे.

◆ केरळमध्ये सर्वात मोठा मंदिर उत्सव ‘थ्रिसूर पूरम 2024’ साजरा करण्यात आला.

◆ फ्रेंच ऑटोमेकर सिट्रोएनने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची सिट्रोएन इंडियाचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ भारतीय वंशाचे प्राध्यापक कौशिक राजशेखर यांना जपानच्या अभियांत्रिकी अकादमीने आंतरराष्ट्रीय फेलोशिप प्रदान केली आहे.

◆ भारतीय दूध ब्रँड नंदिनी आगामी T20 विश्वचषक स्पर्धेतील स्कॉटलंड आणि आयर्लंड संघाची प्रायोजक बनली आहे.

◆ कुवेतमध्ये पहिल्यांदाच हिंदी रेडिओचे प्रसारण सुरू झाले आहे.

◆ ब्राझीलच्या घनदाट जंगलात वाघाची नवीन प्रजाती (क्लाउडेड टायगर कॅट) सापडली आहे.

◆ कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा ग्रँडमास्टर "डी. गुकेश" ठरला आहे

◆ कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा डी. गुकेश हा दुसरा भारतीय बुद्धीबळ पटू ठरला आहे.

◆ कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा कॅनडा या देशात आयोजित करण्यात आली होती.

◆ कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा मध्ये महिला गटात चीन देशाच्या टॅन झोंगिने विजेतेपद पटकावले आहे.

◆ कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणाऱ्या डी. गुकेश ची विश्विजेतेपदा साठी चीन देशाच्या डिंग लिरेन शी होणार आहे.

◆ नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड या कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त झाला असून कंपनीची  स्थापना 1974 साली झाली आहे.

◆ जागतिक पुस्तक दिवस 23 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.

◆ जागतिक पुस्तक दिन 2024 ची थीम "read your way" ही आहे.

◆ संरक्षण खर्चाच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

◆ संरक्षण खर्चाच्या बाबतीत जगात अमेरिका हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

◆ नेपाळमध्ये पहिली इंद्रधनुष्य पर्यटन परिषद आयोजित करण्यात आली आहे.

◆ प्रज्ञा मिश्रा यांची OpenAI ची भारतातील पहिली कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...