Thursday, 18 April 2024

जागतिक वारसा दिन : 18 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 18 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळांचा दिवस (International Day For Mounments And Sites) म्हणून साजरा केला जातो. याला ''जागतिक वारसा दिवस'' म्हणूनही ओळखले जाते.

◆ 2024 ची थीम :-'विविधता शोधा आणि अनुभवा.' (''Discover and Experience Diversity.'')

◆ 2023 ची थीम :- 'वारसा बदल' ("Heritage Changes")

➢ उद्देश :- मानवी वारसा जतन करणे आणि संबंधित संस्थांच्या सर्व प्रयत्नांना मान्यता देणे.

➢ या दिनाचा इतिहास :-

युनेस्कोने 1982 मध्ये झालेल्या सभेत 18 एप्रिल हा जागतिक वारसा स्थळ दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव आयसीओएसओएसने (ICOMOS) दिला होता. त्यामुळे युनेस्कोने 18 एप्रिल हा दिन जागतिक वारसा स्थळ दिन म्हणून साजरा करण्यास 1983 मध्ये सहमती दर्शवली होती. त्यामुळे 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा स्थळ दिन म्हणून साजरा केल्या जातो.

➢ युनेस्को जागतिक वारसा स्थळे 2024 :-

सध्या जगभरात एकूण 1199 जागतिक वारसा स्थळे असून, त्यापैकी 933 सांस्कृतिक स्थळे, 227 नैसर्गिक स्थळे आणि 39 मिश्र स्थळे आहेत. आणि 56 वारसा स्थळांचा धोक्याच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

➢ युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा प्राप्त सर्वाधिक स्थळे 2024 :-

• इटली - 59
• चीन - 57
• जर्मनी व फ्रान्स - प्रत्येकी - 52
• स्पेन - 50
• भारत - 42

➢ भारतातील जागतिक वारसा स्थळे 2024 :-

जागतिक वारसा स्थळांच्या संख्येमध्ये भारत जगात सहाव्या स्थानी असून, भारतात सध्या 42 जागतिक वारसा स्थळे आहेत. यापैकी 34 सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक स्थळे, तर 1 संमिश्र स्थळ आहे.

➢ महाराष्ट्रतील जागतिक वारसा स्थळे 2024 :-

➢ भारतातील सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे महाराष्ट्रमध्ये असून यात,

(1) अजिंठा लेणी - (छत्रपती संभाजीनगर)
(2) वेरूळ लेणी - (छत्रपती संभाजीनगर)
(3) घारापुरी लेणी किंवा एलिफंटा लेणी - (मुंबई)
(4) छत्रपती शिवाजी टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) - (मुंबई)
(5) पश्चिम घाट (कासचे पठार) - (सातारा)
(6) व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स - (मुंबई)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...