◆ अभिनेते अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे.
◆ ACC पुरुष प्रीमिअर चषकामध्ये नेपाळच्या दीपेंद्र सिंगने एका षटकात 6 षटकार ठोकून इतिहास रचला.
◆ जगातील सर्वाधिक वयाच्या जुळ्या लोरी आणि जॉर्ज शेपेल यांचे वयाच्या 62 व्या वर्षी पेन्सिल्व्हेनिया येथे निधन झाले आहे.
◆ दरवर्षी 16 एप्रिल रोजी जगभरात जागतिक आवाज दिन साजरा केला जातो.
◆ लॉरेन्स वोंग हे सिंगापूरचे नवे पंतप्रधान होणार आहेत.
◆ युनायटेड किंग्डमने पाकिस्तानचा समावेश पर्यटकांसाठी अत्यंत धोकादायक देशांच्या यादीत केला आहे.
◆ इंडोनेशियन बॅडमिंटनपटू 'जोनाथन क्रिस्टी'ने आशिया बॅडमिंटनचे विजेतेपद पटकावले आहे.
◆ केंद्र सरकारने 'आशिष कुमार चौहान' आणि 'श्रीधर वेंबू' यांची विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) सदस्य म्हणून नियुक्ती करणारी अधिसूचना जारी केली आहे.
◆ ज्येष्ठ अभिनेते राम चरण यांना चेन्नई वेल्स विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.
◆ आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबाद या संघाने एका डावात सर्वाधिक 22 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.
◆ पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकारने "डिजिटल पीक सर्वेक्षण" हा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
◆ बजरनी बेनेडिक्टसन यांची आइसलँड या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.
◆ युरोप आणि जपान देशाच्या Bepicolombo या मिशन व्दारे बुध या ग्रहाचा अभ्यास करण्यात येणार आहे.
◆ Knife: Mediations After An Attempted Murder या पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी हे आहेत.
◆ क्रिस्टलीना जॉर्जिया यांची IMF च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुन्हा 5 वर्षसाठी निवड करण्यात आली आहे.
◆ 41 वी एशियन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2024 चीन या देशात आयोजित करण्यात आली होती.
◆ IPL 2024 मध्ये दोन शतक झळकावणारा जॉस बटलर[इंग्लंड] पहिला फलंदाज ठरला आहे.[RR]
◆ IPL 2024 मध्ये पाचवे शतक झळकावणारा फलंदाज सुनील फिलिप नरेन[वेस्ट इंडिज] ठरला आहे.[KKR]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
No comments:
Post a Comment