Tuesday, 9 April 2024

ऑपरेशन 'नन्हे फरिश्ते' अंतर्गत 1064 जणांची सुटका.

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयातून 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्‍थानके, फलाटावरील 1064 मुलांची सुटका करण्‍यात आली आहे.

RPF च्या इतर उल्लेखनीय ऑपरेशन्स👇👇
1] मेरी सहेली पथके :- रेल्वेतील महिला प्रवाशांना, विशेषतः एकट्या प्रवास करणाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने मेरी सहेली पथके तैनात करण्यात आली आहेत.

2] ऑपरेशन मातृशक्ती :- ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत, महिला आरपीएफ जवानांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रसूती झालेल्या गर्भवती महिलांना मदत केली.

3] मिशन जीवन रक्षा :- मिशन जीवन रक्षा अंतर्गत, आरपीएफ जवानांनी रेल्वेचा अपघात किंवा रेल्वे-खाली आत्महत्त्या करण्यापासून अनेक जणांचे प्राण वाचवले.

4] ऑपरेशन महिला सुरक्षा :- महिला आणि मुलींना मानवी तस्करी करणाऱ्या सिंडिकेटच्या जाळ्यात अडकण्यापासून 150 जणांना रेल्वे संरक्षण दलाने (RPF) ऑपरेशन महिला सुरक्षा अंतर्गत वाचवले होते.

5] ‘मेरी सहेली' नावाचा कार्यक्रमही रेल्वेकडून राबविण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment