Wednesday, 10 April 2024

चालू घडामोडी :- 10 एप्रिल 2024

◆ महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील 'मिरज' या शहरात बनवलेल्या सतार आणि तानपुरा यांना भौगोलिक संकेत (GI) टॅग देण्यात आला आहे.

◆ एअर इंडियाच्या वैश्विक विमानतळ परिचालन प्रमुखपदी जयराज षण्मुगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ अमेरिकन सोसायटी फॉर कॅटरॅक्ट आणि रिक्रॅक्टिव्ह सर्जरीच्या (ASCRS) वार्षिक सभेत डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलच्या रिसर्च टीमला बेस्ट सायंटिफिक पोस्टर अवॉर्ड 2024' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

◆ सुमित नागल, मास्टर्स 1000 सामना जिंकणारा पहिला पुरुष भारतीय एकेरी खेळाडू ठरला आहे.

◆ कॅनडातील टोरंटो येथे सुरू असलेल्या 2024 च्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत विदित गुजराथीने जागतिक क्रमवारीत तिसन्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या हिकारू नाकामुराचा पराभव केला.

◆ सॅम पित्रोदा यांच्या 'द आयडिया ऑफ डेमोक्रसी' या नव्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

◆ नवी दिल्ली येथे 'परिवर्तन चिंतन' त्रिसेवा परिषद होणार आहे.

◆ धरमशाला येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या सौम्या स्वामिनाथन आणि तेजस्विनी सागर यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे.

◆ मनोज पांडा यांची 16 व्या वित्त आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांनी "निरंजन राजाध्यक्ष" यांची जागा घेतली आहे.

◆ टेनिस एकेरी स्पर्धेच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला नोव्हाक जोकोविच हा खेळाडू सर्वात वयस्कर पुरूष टेनिसपटू ठरला आहे.

◆ टेनिस पटू नोव्हाक जोकोविच यांच्या नावावर सध्या 24 ग्रँडस्लॅम जेतेपद आहेत.

◆ 10 एप्रिल हा दिवस "सॅम्युअल हॅनेमल" यांच्या सन्मानार्थ जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

◆ होमिओपॅथीचे संस्थापक सॅम्युअल हॅनेमल  यांच्या सन्मानार्थ 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथिक दिवस साजरा करण्यात येतो. ते "फाल्कन" या देशाचे रहिवाशी होते.

◆ माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धा "फ्रान्स" या देशात आयोजित केली जाते.

◆ इग्ला-एस हवाई संरक्षण प्रणाली भारताने रशिया या देशाकडून खरेदी केली आहे.

◆ ZIG नावाचे नवीन चलन "झिबॉम्बे" या देशाने लाँच केले आहे.

◆ भारताच्या वरीष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी "हरेंद्र सिंग" यांची निवड करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment