Monday, 18 March 2024

चालू घडामोडी :- 18 मार्च 2024



◆ दिव्यांग तिरंदाज व अर्जुन पुरस्कार मिळवणारी शीतल देवी यांची भारतीय निवडणुक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून निवड केली.


◆ 'रॉयल चॅलेंजर्स बंगलोर'ने महिला प्रीमियर लीगच्या (WPL) दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले आहे.


◆ भारतातील पहिले 'आयुर्वेदिक कॅफे' नवी दिल्लीत सुरू झाले.


◆ भारतीय सैन्य दल सेशेल्सला संयुक्त लष्करी सराव ‘एक्सरसाइज लिमिट-2024’ मध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहे.


◆ केंद्रीय आदिवासी व्यवहार आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी E-NAM (National Agriculture Market) मोबाईल ॲप लाँच केले आहे.


◆ हैदराबादमध्ये नुकताच ‘वर्ल्ड स्पिरिच्युअली फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.


◆ केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी PB-SHABD आणि अपडेटेड न्यूज ऑन एअर मोबाईल ॲप लाँच केले आहे.


◆ प्रसार भारती च्या अध्यक्ष पदी "नवनीत कुमार सहगल" यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ देशातील बंगळुरू या ठिकाणी 75 शेफनी एकत्रितपणे जगातील सर्वात लांब डोसा तयार केला असून त्याची नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे.


◆ केंद्रिय पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंग पूरी यांनी 'इथेनॉल-100' या इंधनाचा प्रारंभ केला आहे.


◆ लोकसभा निवडणुकीत आचार संहिता भंगाच्या तक्रारी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रिय निवडणुक आयोगाने "C vigil" हे ॲप विकसित केले आहे. 


◆ प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB च्या मुख्य महासंचालकपदी 'शेफाली सरन' यांची निवड झाली आहे.


◆ लमीतीए-2024 हा संयुक्त युद्धसराव सेशेल्स या देशात होत आहे.


◆ सेशेल्स या देशात लमीतीए हा युद्ध सराव 2001 वर्षा पासून होत आहे.


◆ अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी नितीन सारंग यांची निवड झाली आहे.


◆ WPL 2024 क्रिकेट स्पर्धेचा विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू या संघाने पटकावले आहे.


◆ महीला आयपीएल 2024 चे उप विजेतेपद "दिल्ली कॅपिटल" या संघाने पटकावले आहे.


◆ महीला आयपीएल 2024 स्पर्धेमध्ये एलिस पेरी ही खेळाडू ऑरेंज कॅप ची वेजेती ठरली आहे.


◆ WPL 2024 स्पर्धेत श्रेयंका पाटील ही खेळाडू पर्पल कॅप ची विजेती ठरली आहे.


◆ WPL 2024 क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.


◆ भारतात केरळ या राज्यात "Lyame Disease" चा पहिला रुग्ण आढळला आहे.


◆ राज्यपाल रमेशबैस यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व रंगभूमीचे अभ्यासक गिरीजा शंकर लिखित 'रंग मंच' या पुस्तकाचे राजभवन, मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...