Thursday, 14 March 2024

चालू घडामोडी :- 15 मार्च 2024

◆ ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू हे निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त, पंतप्रधानांच्या समितीने केली निवड.

◆ दरवर्षी 14 मार्च रोजी 'पाय डे' साजरा केला जातो.

◆ भारताच्या नुमालीगढ रिफायनरी लिमिटेडने बांगलादेशची राजधानी ढाका येथे आपले संपर्क कार्यालय उघडले आहे.

◆ भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे हे पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.

◆ भारतीय ऑफस्पिनर 'रविचंद्रन अश्विन' आयसीसी कसोटी क्रमवारीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे.

◆ केंद्र सरकारने दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी ‘हैदराबाद मुक्ती दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा गौरव टांझानियाचे राष्ट्रपती डॉ. सामिया सुलुहू हसन यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.

◆ श्रीनिवासन स्वामी यांना 45व्या IAA जागतिक काँग्रेसमध्ये प्रतिष्ठित ‘IAA गोल्डन कंपास पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

◆ ‘सचिन साळुंखे’ यांना ‘प्रॉमिसिंग इन्व्हेस्टर ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला आहे.

◆ अवजड उद्योग मंत्रालयाने ऑटोमोटिव्ह आणि ईव्ही क्षेत्रातील नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी IIT रुरकीसोबत सामंजस्य करार केला आहे.

◆ रशिया, चीन आणि इराणने ओमानच्या आखातात 'संयुक्त सराव' केला आहे.

◆ चंदीगडमध्ये 'खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन' (KIRTI) कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

◆ अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यातील गेमिथांग येथे ‘गोरसम कोरा महोत्सव’ साजरा करण्यात आला.

◆ ‘ब्रिजेश कुमार सिंग’ यांची इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ भारताने डॉमिनिकन रिपब्लिकसोबत संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती स्थापन करण्यासाठी करार केला आहे.

◆ केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी जनऔषधी केंद्रांसाठी ‘क्रेडिट असिस्टन्स प्रोग्राम’ सुरू केला आहे.

◆ ग्रामीण विकास मंत्रालयाने MGNREGA मालमत्तेच्या देखरेखीसाठी AI आणि भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन IIT दिल्लीसोबत भागीदारी केली आहे.

◆ "एलिस पेरी"(रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) WPL इतिहासात सहा बळी घेणारी पहिली खेळाडू बनली आहे.[मुंबई इंडियन्स विरुद्ध]

◆ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL 2024 पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असे आपले नाव बदलले.[ बंगळुरू :- बेंगळुरू]

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...