Monday, 11 March 2024

चालू घडामोडी :- 10 मार्च 2024

◆ 10 मार्च रोजी भारतात ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल स्थापना दिवस’ साजरा केला जाणार आहे.

◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 12 मार्च रोजी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

◆ ‘देवेंद्र झझारिया’ भारतीय पॅरालिम्पिक समितीचे (PCI) नवे अध्यक्ष बनले आहेत.

◆ इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

◆ रमेश सिंग अरोरा हे पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील पहिले शीख मंत्री बनले आहेत.

◆ केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेंगळुरूमध्ये भारतातील सर्वात वेगवान 'मल्टीप्रोटोकॉल लेबल स्विचिंग राउटर' लाँच केले आहे.

◆ भारत आणि बांगलादेश दरम्यान 54 वी महासंचालक स्तरावरील परिषद झाली.

◆ हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी 'शहीद राजा हसन खान मेवाती' यांच्या 15 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले.

◆ पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष असिफ अली झरदारी यांची पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी(14वे राष्ट्राध्यक्ष) निवड करण्यात आली.

◆ असिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे दोनवेळा राष्ट्राध्यक्ष होणारे ते बिगर लष्करी नेते आहेत.

◆ 2020-21 साठी देण्यात येणारा शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक पुण्यातील जनसेवा फाउंडेशनला जाहीर करण्यात आला आहे.

◆ सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ या पक्षाला सत्ता स्थापन करता आली नाही.

◆ जगभरातील 112 देशांतील सौंदर्यवतींनी हजेरी लावलेल्या व मुंबईत रंगलेल्या 'मिस वर्ल्ड 2024' स्पर्धेत चेक रिपब्लिकच्या 'क्रिस्तिना पिझकोव्हा' ठरली 'मिस वर्ल्ड'ची मानकरी.

◆ 71व्या 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत लेबनॉनच्या यास्मिना झेतौन हिने द्वितीय स्थान पटकावले.

◆ 28 वर्षांनी भारतात झालेल्या या स्पर्धेत भारताच्या सिन्नी शेट्टी हिने भारताचे प्रतिनिधित्व केले.

◆ भारताने आतापर्यंत सहा वेळा 'मिस वर्ल्ड' ही स्पर्धा जिंकलेली आहे.

◆ 13 हजार फूट उंचीवरील जागतील सर्वाधिक लांबीच्या "सेला" बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मार्च 2024 रोजी अरुणाचल प्रदेशात केले.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...