Monday, 26 February 2024
स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी
Q.1) प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थलापती यांनी कोणत्या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला?
उत्तर - तमिझगा वेत्री कळघम (TVK)
Q.2) नुकतेच वित्त आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - डॉ राजाध्यक्ष
Q.3) सलग सहा वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या अर्थमंत्री कोण ठरल्या आहेत?
उत्तर – निर्मला सीतारामन
Q.4) खेलो इंडिया विंटर गेम 2024 च्या शुभंनकराला काय नाव देण्यात आले आहे?
उत्तर – शीन-ए-शी
Q.5) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलद्वारे प्रकाशित करप्शन परप्शन इंडेक्स 2023 मध्ये भारत किती वाजता आली आहे?
उत्तर – 93 व्या
Q.6) अलीकडेच प्रकाशित भारतातील हिमबिट्या स्थितीबाबतच्या अहवालानुसार भारतातील हिम बिबट्यांची संख्या किती आहे?
उत्तर – 718
Q.7) भारत ऊर्जा सप्ताहाची दुसरी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे?
उत्तर – गोवा
Q.8) अलीकडेच राष्ट्रपती द्रोपती मर्मु यांनी राज्यसभा सदस्य म्हणून कोणाला नामनिर्देशित केले आहे?
उत्तर – सतनाम सिंग संधू
Q.9) महाराष्ट्राचे उदय विश्वनाथ देशपांडे यांना 2024 चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
उत्तर – मल्लखांब
Q.10) मेघालय खेळांच्या 5व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
उत्तर – द्रोपती मुर्मु
Q.11) सुलतान इब्राहिम इस्कंदर हे कोणत्या देशाची 17वे राजा बनले आहेत?
उत्तर – मलेशिया
Q.12) नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या ‘एक समंदर, मेरे अंदर’ या कवितासंग्रहाचे लेखक कोण आहेत?
उत्तर – संजीव कुमार जोशी
Q.13) जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा करण्यात येतो?
उत्तर – 2 फेब्रुवारी
Q.14) भारतीय तटरक्षक दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर – 1 फेब्रुवारी
Q.15) अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डावरील बंदी उठवली आहे?
उत्तर – श्रीलंका
Saturday, 24 February 2024
महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा.
🔶 देशाचा पश्चिम व मध्य भाग व्यापलेल्या राज्यास अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. पश्चिमेकडील सह्याद्री पर्वताच्या रांगा राज्याचा प्राकृतिक कणा असून उत्तरेस असलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगा व पूर्वेस असलेल्या भामरागड-चिरोली-गायखुरी या डोंगररांगा राज्याच्या नैसर्गिक सीमा आहेत. राज्याच्या वायव्येस गुजरात उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगढ, आग्नेयेस आंध्रप्रदेश, दक्षिणेस कर्नाटक व नैऋृत्येस गोवा ही राज्ये आहेत.
🔶राज्यात उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्चपासून सुरु होणारा, अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा जूनच्या सुरुवातीला पाऊस घेऊन येतो. पावसाळ्यातील हिरवळीत लपेटलेले आल्हाददायी वातावरण, ऑक्टोबरच्या त्रासदायक वातावरणानंतर येणार्या हिवाळ्यात टिकून राहते.
🔶पश्चिम समुद्र तटावरून येणार्या पावसाळी ढगांमुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर 400 सेंमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. समुद्र किनारपट्टीवरील कोकणात मुसळधार पाऊस पडतो व तो उत्तरेकडे सकरताना कमी होत जातो. सह्याद्रीच्या पूर्वेला पश्चिम पठारावरील जिल्ह्यात 70सेंमी एवढा अत्यल्प पाऊस पडत असून सोलापूर व अहमदनगर हे सर्वाधिक कोरडे जिल्हे आहेत. पूर्वेस विदर्भ व मराठवाड्याकडे सरकताना पावसाचे प्रमाण काहीसे वाढते.
🔶लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात दुसर्या क्रमांकाचे राज्य असून राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 3.08 लक्ष चौ.कि.मी. आहे. जनगणना, 2011 नुसार राज्याची लोकसंख्या सुमारे 11.24 कोटी असून ती देशातील एकूण लोकसंख्येच्या 9.3 टक्के आहे.
🔶राज्याचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून 45.2 टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते. राज्यात 36 जिल्हे असून प्रशासकीय सुविधेसाठी ते कोकण, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा महसुली विभागातविभागले आहेत.
🔶जिल्हा स्तरावरील नियोजनासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत आहेत. स्थानिक प्रशासनासाठी राज्याच्या ग्रामीण भागात 34 जिल्हा परिषदा, 351 पंचायत समित्या व 27,920 ग्रामपंचायती आहेत, तर नागरी भागात 26 महानगरपालिका, 230 नगरपरिषदा, 110 नगरपंचायती व सात कटक मंडळे आहेत.
🔶 मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी असून बहुतांशी प्रमुख खाजगी कंपन्या व वित्तीय संस्थांची मुख्यालये या शहरात आहेत. देशातील प्रमुख वायदे व भांडवली बाजार आणि विक्रेय वस्तू व्यापार विनिमय केंद्रे मुंबईत आहेत.
🔶राज्यातील 234 लाख हेक्टर जमीन लागवडीखाली तर 52.1 लाख हेक्टर वनांखाली आहे. सिंचनात वाढ व्हावी यासाठी अनेक सिंचन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. बिगर सिंचन क्षेत्रात मृद व जलसंधारणाची कामे गतीने होण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
🔶महाराष्ट्राला ‘2019 पर्यंत पाणी टंचाई मुक्त राज्य’ करण्याकरिता जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले असून याद्वारे दरवर्षी 5,000 गावे पाणी टंचाई मुक्त करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.
🔶पशुसंवर्धन हे कृषि क्षेत्राशी संबंधीत महत्त्वाचे क्षेत्र आहे. देशातील पशुधन व कुक्कुट पक्ष्यांच्या संख्येमध्ये राज्याचा हिस्सा अनुक्रमे 6.3 टक्के व 10.7 टक्के आहे.
🔶 महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेल्या राज्यांपैकी एक राज्य आहे. लघु उद्योगात हे अग्रेसर असून देशांतर्गत तसेच विदेशी संस्थांकडून औद्योगि क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्याने सातत्य राखले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे हे प्रमुख केंद्र आहे.
🔶जनगणना 2011 नुसार अखिल भारतीय स्तरावरील 73 टक्के साक्षरता दराच्या तुलनेत राज्याचा साक्षरता 82.3 टक्के आहे. बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण दिले जात असून राज्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या उत्कृष्ट संस्था आहेत.
🔶भारताच्या मानव विकास अहवाल 2011 नुसारदेशाचा मानव विकास निर्देशांक 0.467 आहे तर राज्यासाठी तो 0.572 आहे. मानव विकास निर्देशांकात भारताचा सध्या 130 वा क्रमांकआहे.
🔶महिला धोरण राबविणारे तसेच महिलांच्या विकासासाठी ‘महिला व बालकल्याण’ या स्वतंत्र विभागाची स्थापना करुन अर्थसंकल्पीय तरतूद करणारे हे पहिले राज्य आहे. रोजगार हमी योजना राबविणारे हे आद्यप्रवर्तक राज्य असून केंद्र शासनाने ही येाजना अंगिकारली आहे.
🔶महाराष्ट्र हे केवळ भौगोलिक सीमांनी रेखांकित केलेले राज्य नसून येथील जनतेने संघटितरित्या परिश्रमपूर्वक घटविलेले राज्य आहे. या राज्याची वैशिष्ट्यपूर्ण मराठी संस्कृती विकसित होण्यास नैसर्गिक तसेच सांस्कृतिक विविधता सहाय्यभूत झाली आहे. स्वतःची अध्यात्मिक बैठक असलेले हे राज्य ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखले जाते.
🔶 राज्याने देशाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
Latest post
BIS Recruitment 2024
BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...
-
१】"खसखस पिकणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ? ~मोठ्याने हसणे . २】"गंगेत घोडे न्हाने "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी . न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखि...