Tuesday, 16 January 2024

चालू घडामोडी :- 15 जानेवारी 2024

◆ राजस्थानमधील बिकानेर या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्ह्यात तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला.

◆ महाराष्ट्र शासनाने नुकतेच सांगली जिल्ह्यातील आटपाडी विभागात 'आटपाडी संवर्धन राखीव' नावाने नवीन संवर्धन अभयारण्य स्थापन केल्याची घोषणा केली आहे.

◆ भारतीय सैन्य 2024 हे तंत्रज्ञान अवशोषणाचे वर्ष म्हणून पाळणार आहे.

◆ भारतीय आणि जपानी तटरक्षक दलांनी चेन्नईच्या किनारपट्टीवर 'सहयोग केजिन' नावाचा यशस्वी संयुक्त सराव केला आहे.

◆ तैवान देशाच्या राष्ट्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लाई चिंग ते विजयी झाले आहेत.

◆ तैवान देशातील राष्ट्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाने विजय मिळवला आहे.

◆ तैवान देशाच्या राष्ट्रअध्यक्षपदाच्या निवडणूकीत डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष तिसऱ्यांदा विजयी झाला आहे.

◆ डॉ. प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले. त्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक होत्या.

◆ हिंदुस्थान शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना भारत सरकारने 2022 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

◆ ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांच्या नावावर एकाच मंचावरून 11 संगितावरील पुस्तके प्रकाशीत करण्याचा जागतिक विक्रम आहे.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांना 2002 वर्षी भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना मध्यप्रदेश राज्य सरकारने कालिदास सन्मान पुरस्काराने सन्मानित केले होते.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना 2023 मध्ये "अटल संस्कृती पुरस्कार" प्रदान करण्यात आला होता.

◆ जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ 102व्या स्थानावर आहे.

◆ 2023 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा कोलकाता येथे पार पडला.

◆ राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळासाठी मॉरिशस देशाच्या सरकारने तेथील हिंदू धर्माच्या अधिकाऱ्यांना 2 तासाची रजा मंजूर केली आहे.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सरकारने पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.

◆ 18 वे विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात अमळनेर येथे होणार आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील अमळनेर येथे 3 ते 4 फेब्रुवारी 2024 कालावधी दरम्यान विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.

◆ अमळनेर येथे होणाऱ्या 18 विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वासुदेव मुलाटे यांची निवड झाली आहे.

◆ भारतीय सेना दिवस 15 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो.

◆ भारतीय क्रिकेपटू रोहित शर्मा हा 150 आंतरराष्ट्रिय टी 20 क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे.

◆ ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्मदिन, दरवर्षी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...