Tuesday, 16 January 2024

चालू घडामोडी :- 13 जानेवारी 2024

◆ पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञांसाठी जगातील पहिले 'डिजिटल थेरॅप्युटिक्स' सहभाग प्रमाणपत्राची सुरुवात केल्याची घोषणा झाली.

◆ आकाश-एनजी' क्षेपणास्त्राची ओदिशात यशस्वी चाचणी करण्यात आली असून आकाश शस्त्र प्रणाली DRDO द्वारे स्वदेशी डिझाइन आणि विकसित केली गेली आहे.

◆ केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून "भारतासाठी हरित संक्रमणाचे मार्ग " या संकल्पनेवर आधारित हवामान परिषद, 2024 आयोजीत करण्यात आली.

◆ ट्युनिशिया प्रजासत्ताक देशाने "नंदकिशोर कागलीवाल" यांची मानद वाणिज्य दुत म्हणून मुंबई येथे नियुक्ती केली आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा या सागरी सेतू पुलाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा सागरी सेतू पूलाची लांबी 22 किलोमीटर आहे.

◆ टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला टीम साऊदी न्यूझीलंड  या देशाचा क्रिकेट खेळाडू आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

◆ ओडिशा येथील चांदीपूर किनाऱ्यावरून DRDO ने यशस्वी चाचणी घेतलेल्या आकाश एन जी क्षेपणास्त्राचा पल्ला 80 किलोमीटर आहे.

◆ CNN News 18 तर्फे उल्लेखनीय कामगिरीसाठी यंदाचा इंडीया ऑफ दि एअर पुरस्कार ISRO ला प्रदान करण्यात आला आहे.

◆ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्दारे  तिसरी अंतरराष्ट्रीय साखर परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

◆ पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला आहे.

◆ केंद्र सरकारने गार्भाशय व मुखाचा कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी 9 ते 14 वर्षाच्या वयोगटातील मुलीसाठी HPV ही लसीकरण [वर्षात 8 कोटी] मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ गर्भाशय व मुखाचा कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण आढळणाऱ्या जगातील देशात भारत 5व्या क्रमांकावर आहे.

◆ जपान या देशाने H2A या रॉकेटचे प्रक्षेपण केले आहे.

◆ शेरिंग तोबगे यांची भूतान देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

◆ भारतात 1989 वर्षापासून दरवर्षी 11 ते 17 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो.

◆ Microsoft हि कंपनी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरली आहे.

◆ टाईम मासिकाच्या 2023 च्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादित इन्फोसिस या कंपनीला स्थान मिळाले आहे.

◆ अलीप्त चळवळीची 2024 मध्ये 19वी शिखर परिषद युगांडा(यजमान पद) मध्ये आयोजित करण्यात आली आहे.

◆ इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक अरविंद नरेन हे आहेत.

◆ भारताचा युवा नेमबाज अखिल शेरॉन ने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...