Friday, 12 January 2024

चालू घडामोडी :- 12 जानेवारी 2024

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 च्या पुरस्कारात देशात महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये मध्यप्रदेश राज्याचा देशात दुसरा क्रमांक आहे.

◆ स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारात 1 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबई चा देशात तिसरा क्रमांक आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये एक लाखा पेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरामध्ये महाराष्ट्र राज्यातील सासवड हे शहर देशात प्रथम क्रमांकावर आहे.

◆ भारत सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय स्तरावर एकून सहा पुरस्कार मिळाले आहेत.

◆ महाराष्ट्र राज्यातील पिंपरी चिंचवड या महानगर पालिकेला स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये वॉटर प्लस दर्जा प्राप्त झाला आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये इंदोर आणि सुरत शहरे देशात सर्वाधिक स्वच्छ ठरली आहेत.

◆ मध्यप्रदेश राज्यातील इंदोर शहर सतव्यांदा देशात सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील पुणे शहराचा सर्वाधिक स्वच्छ शहराच्या यादीत देशात 10वा क्रमांक आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये गंगा किनाऱ्यावरील स्वच्छ शहराच्या यादीत वाराणसी हे शहर प्रथम स्थानावर आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सफाई मिञ सेफ सिटी पुरस्कार चंदीगड या शहराला मिळाला आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारात महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळाला आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट स्वच्छ राजधानी चा पुरस्कार "भोपाळ" ला मिळाला आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये पणजी या शहराला Fast Mover City award मिळाला आहे.

◆ पैठण येथे आयोजित पाहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुरेश सावंत हे आहेत.

◆ जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024 च्या यादीत सहा(फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर, स्पेन) देशांनी सर्वोच्च स्थान पटकावले आहे.

◆ जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024 च्या यादीत भारत देशाचा 80वा क्रमांक आहे.

◆ जगातील सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट 2023 च्या यादीत भारताचा 83वा क्रमांक होता.

◆ जगातील सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट 2024 च्या यादीनुसार भारतीय नागरिक 62 देशांत व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.

◆ जगात सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट 2024 यादी नुसार अफगाणिस्थान या देशाचा क्रमांक सर्वात खाली आहे.

◆ 18 व्या आशियाई चसक फुटबॉल स्पर्धा कतार येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

◆ कतार येथे आयोजित आशियाई चसक फुटबॉल स्पर्धेत 24 देशांचा सहभाग आहे.

◆ अयोध्या या ठिकाणच्या हनुमान गडी बेसन लाडू ला GI टॅग प्राप्त झाले आहे.

◆ केंद्र सरकारच्या पी एम घरकुल योजनेत शहरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घरे बांधण्यात महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक आहे.

◆ केंद्र सरकारच्या पी एम घरकुल योजनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आंध्रप्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे.

◆ भारतात 12 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो.

◆ भारत देशात 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करतात येतो.

◆ भारतात 1985 या वर्षापासून दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करतात येतो.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2024 पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक 21 शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळाला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...