◆ लुईस ब्रेल ह्यांच्या जयंतीनिमित्त 4 जानेवारी या दिवशी जागतिक ब्रेल दिन साजरा केला जातो.
◆ ब्रेल दिन 2024 ची थीम "Empowering Through Inclusion and Diversity" आहे.
◆ गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार राज्यात मोठ्या प्रमाणावर बालगुन्हेगारी वाढत असून, यात महाराष्ट्र संपूर्ण देशात पहिला आला आहे.
◆ महाराष्ट्रातील 1] मुंबई(363), 2] पुणे(278) आणि 3] नागपूर(210) हे पहिले 3 शहर आहेत ज्यात जास्त बालगुन्हेगार आहेत.
◆ ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी आणि ग्राहकांची सुरक्षा वाढवण्यासाठी बेंगळूरु मध्ये कॅनरा बँक एक समर्पित सायबर सुरक्षा शाखा तयार करणार आहे.
◆ उपराष्ट्रपती जगदीप धनखर कठुआ येथे एका स्टार्टअप एक्स्पोचे उद्घाटन केले आहे. इव्हेंटची थीम "इमर्जिंग स्टार्टअप ट्रेंड्स इन नॉर्थ इंडिया" आहे.
◆ पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारे जम्मू- काश्मीर हे पहिले केंद्रशासित प्रदेश बनले.
◆ ओला इलेक्ट्रिक PLI(उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह PLI) मान्यता मिळवणारी पहिली ईव्ही कंपनी बनली आहे.
◆ अरिंदम बागची यांची संयुक्त राष्ट्र आणि जिनिव्हामधील इतर संस्थांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
◆ अर्जेटिना, चिली आणि बोलिव्हिया हे जगाचे 'लिथियम ट्रॅगल' बनवतात, ज्यात जगातील 30-35% पुरवठ्याचा वाटा आहे.
◆ लिथियमला इलेक्ट्रिक वाहनांसाठी "पांढरे सोने" असे संबोधले जाते.
◆ लिथियमचे प्राथमिक उत्पादक ऑस्ट्रेलिया, चिली आणि चीन आहेत.
2019 च्या आकडेवारीनुसार कर्करोगाच्या बळींच्या बाबतीत भारत आशियात दुसऱ्या तर चीन पहिल्या आणि जपान तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
◆ जागतिक बँक आणि वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स नुसार नायजर या देशात 1000 स्त्री- पुरुषांमागे दरवर्षी सरासरी 45.29 इतकी मुले जन्माला येतात. तर हाँगकाँगमध्ये हेच प्रमाण फक्त पाच मुले इतके आहे. [भारताचे प्रमाण :- 16.42]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
No comments:
Post a Comment