Wednesday, 20 December 2023

चालू घडामोडी :- 20 डिसेंबर[Part 01] 2023

◆ मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार 'रिंगाण' कादंबरीला जाहीर झाला आहे.

◆ भारताने 'बॅराकुडा' लाँच केली, देशाची सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट.

◆ अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात बांगलादेश संघाने युएई चा पराभव केला आहे.

◆ झिंक फुटबॉल अकादमीने AIFF चे एलिट 3-स्टार रेटिंग मिळवले.

◆ अफगाण एनजीओला फिनलंडकडून आंतरराष्ट्रीय लैंगिक समानतेचा सन्मान मिळाला.

◆ PM मोदींनी वाराणसीच्या स्वरवद्ध महामंदिराचे अनावरण केले, जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र.

◆ भारतीय सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्यांना DSCSC श्रीलंका येथे 'गोल्डन आऊल' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

◆ श्रीलंकेतील G20 शिखर परिषदेत डॉ. श्रीनिवास नाईक धारावथ यांना ग्लोबल आयकॉन पुरस्कार मिळाला.

◆ IIT कानपूरने तंत्रज्ञान विकासाला चालना देण्यासाठी भारतीय नौदलासोबत सहकार्य केले.

◆ NSDC आणि सौदी अरेबिया सरकारने भारतीय मजुरांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी हातमिळवणी केली.

◆ स्विफ्ट आपत्कालीन प्रतिसादासाठी NHAI ने ERS मोबाईल ॲप लाँच केले.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

चालू घडामोडी :- 20 डिसेंबर 2023

◆ नवीन शैक्षणिक धोरणात 'एआय'चा समावेश करणार अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

◆ नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र अपघातात तिसऱ्या क्रमांकावर आहे तर उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.

◆ ई-रक्तकोष पोर्टल :- ई-रक्तकोष पोर्टलच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील रक्त केंद्र आणि रक्ताची उपलब्धता याची माहिती या व्यासपीठावर मिळणार आहे.

◆ नोव्हेंबर 2022 मध्ये आधार अपडेटची मोहीम केंद्र सरकारच्या आदेशावरून जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली.

◆ ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते सामाजिक उद्योजिका मधुलिका रामटेके यांना अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

◆ मधुलिका यांना राष्ट्रपतींनी 2021 मध्ये प्रतिष्ठित नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले आहे.

◆ छत्तीसगडमधील सामाजिक उद्योजिका असलेल्या रामटेके दोन दशकाहून अधिक काळ 'मॉ बमलेश्वरी बँक'च्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा राजमार्ग प्रशस्त करत आहेत.

◆ कोलकाता नाइट रायडर्सने तब्बा 24 कोटी 75 लाखात मिचेल स्टार्कला आपल्या संघात सामावून घेतले.

◆ हैदराबादने तब्बल 20 कोटी 50 लाखात पॅट कमिन्सला संघात सामावून घेतले आहे.

◆ "ऊर्जा संवर्धन सप्ताह 14 डिसेंबर[“राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस"] ते 20 डिसेंबर" दरम्यान साजरा होत आहे.

◆ 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये होत असलेल्या 2024 IPL लिलावादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला पंजाब किंग्जने 11.75 कोटी रु. मध्ये आपल्या संघात सामावून घेतले आहे.

2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार

🌸 2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार

1. ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी)
2. अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी)
3. श्रीशंकर एम (अथलेटिक्स)
4. पारुल चौधरी (अथलेटिक्स)
5. मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग)
6. आर वैशाली (बुद्धिबळ)
7. मोहम्मद शमी (क्रिकेट)
8. अनुष अग्रवाला (अश्वस्वार)
9. दिव्यकृती सिंग (अश्वस्वार ड्रेसेज)
10. दिक्षा डागर (गोल्फ)
11. कृष्ण बहादूर पाठक (हॉकी)
12. पुक्रंबम सुशीला चानू (हॉकी)
13. पवन कुमार (कब्बडी)
14. रितू नेगी (कब्बडी)
15. नसरीन (खो-खो)
16. सुश्री पिंकी (लॉन बाऊल्स)
17. ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (शूटिंग)
18. सुश्री ईशा सिंग (नेमबाजी)
19. हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश)
20. अहिका मुखर्जी (टेबल टेनिस)
21. सुनील कुमार (कुस्ती)
22. सुश्री अँटिम (कुस्ती)
23. नौरेम रोशिबिना देवी (वुशू)
24. शीतल देवी (पॅरा तिरंदाजी)
25. इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट)
26. प्राची यादव (पॅरा कॅनोइंग)

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023
1. चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन
2. रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन)

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार
1. ललित कुमार (कुस्ती)
2. आर.बी. रमेश (बुद्धिबळ)
3. महावीर प्रसाद सैनी (पॅरा ॲथलेटिक्स)
4. शिवेंद्र सिंग (हॉकी)
5. गणेश प्रभाकर देवरुखकर (मल्लखांब)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शाश्वत विकास ध्येय

- संयुक्त राष्ट्र संघाचा शाश्वत विकास अजेंडा 2030
- सर्व देशांनी हा अजेंडा 25 सप्टेंबर 2015 रोजी स्वीकारला आहे.
- कालावधी: 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2030
- सामाजिक, आर्थिक, पर्यावरण व शांतता ही शाश्वत विकासाची आयाम आहेत.
- या अजेंडा अंतर्गत 17 शाश्वत विकास ध्येये व 169 लक्ष्य निर्धारित केली आहेत.
- ही ध्येये सार्वत्रिक सर्वसमावेशक आणि एकमेकांशी निगडीत आहेत.

● शाश्वत विकासाची ध्येये: 17

ध्येय 1 - दारिद्रय निर्मूलन

ध्येय 2 - उपासमारीचे समूळ उच्चाटन

ध्येय 3 - निरोगीपणा व क्षेमकुशलता

ध्येय 4 - गुणवत्तापूर्ण शिक्षण

ध्येय 5 - लिंग समभाव

ध्येय 6 - स्वच्छ पाणी व स्वच्छता

ध्येय 7 - किफायतशीर दरात स्वच्छ उर्जा

ध्येय 8 - चांगल्या दर्जाचे काम व आर्थिक वृध्दि/वाढ

ध्येय 9 - उद्योग, नाविन्यपूर्णता आणि पायाभूत सुविधा

ध्येय 10 - विषमता कमी करणे

ध्येय 11 - शाश्वत शहरे व समुदाय

ध्येय 13 - विवेकी उपभोग व उत्पादन

ध्येय 14 - हवामान बदलासंबंधी कृती

ध्येय 15 - भूतलावरील जीवन

ध्येय 16 - शांतता, न्याय व सशक्त संस्था एकत्रित

ध्येय 17 - अंमलबजावणीसाठी जागतिक भागीदारी