Friday, 17 November 2023

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे



प्रश्न १ : जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने ............. या चवीचे ज्ञान होते ? 

       1)  कडू 

       2)  खारट 

       3)  गोड ✔️ 

       4)  आंबट 

 

प्रश्न २ : मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून करणार्‍याचे श्रेय ........... शास्त्रज्ञास जाते ? 

      1)  कार्ल लँडस्टेनर ✔️ 

      2)  विल्यम हार्वे 

      3)  जॉर्ज लिनॅक 

      4)  प्रफुल्ल सोहनी 

 

प्रश्न ३ : एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी सुमारे किती महिन्यांचा कालावधी ग्राह्य धरला जातो ? 

      1)  दोन महीने 

      2)  तीन महीने ✔️ 

      3)  चार महीने 

      4)  सहा महीने 

 

प्रश्न ४  : सती बंदीची चळवळ मध्ये ........... यांनी मुख्य भूमिका बजावली होती ? 

      1)  महात्मा गांधी 

      2)  बाबासाहेब आंबेडकर 

      3)  विनोबा भावे 

      4)  राजा राममोहन रॉय ✔️ 

 

प्रश्न ५ : महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ म्हणून कोणाला ओळखले जाते ? 

      1)  महात्मा फुले ✔️ 

      2)  कर्मवीर भाऊराव पाटील 

      3)  शाहू महाराज 

      4)  वि.रा. शिंदे 

 

प्रश्न ६ : भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास म्हटले जाते ? 

      1)  लॉर्ड लिटन 

      2)  लॉर्ड रिपन ✔️ 

      3)  लॉर्ड कर्झन 

      4)  लॉर्ड मेयो 

 

प्रश्न ७ : पूर्व घाट व पश्चिम घाट जेथे मिळतात तिथे खालीलपैकी कोणते शिखर आहे ? 

      1)  अन्नामलाई 

      2)  कोरोमंडल 

      3)  निलगिरी ✔️ 

      4)  वरीलपैकी नाही 

   

प्रश्न ८  : राजस्थानच्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त आहे ? 

      1)  काटेरी वन 

      2)  इस्त्रायली लाकूड 

      3)  खैर 

      4)  जोंजोबा ✔️ 

 

प्रश्न ९  : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ? 

      1)  नांदेड 

      2)  औरंगाबाद ✔️ 

      3)  उस्मानाबाद 

      4)  परभणी 

 

प्रश्न १०  : खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही ? 

      1)  कोकणी  

      2)  कोरकू 

      3)  कोरबा ✔️ 

      4)  मावची 

 

प्रश्न ११ : म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही ? 

      1)  अरुणाचलप्रदेश ✔️ 

      2)  नागालँड 

      3)  मणीपुर 

      4)  आसाम 

 

प्रश्न १२ : ‘लोकांची योजना’ चे जनक म्हणून कोणास ओळखले जाते  ? 

      1)  बाबासाहेब आंबेडकर 

      2)  श्रीमान नारायण 

      3)  पंडित नेहरू 

      4)  एम.एन रॉय ✔️ 

 

प्रश्न १३ : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती ? 

      1)  पंजाब नॅशनल बँक v 

      2)  देना बँक 

      3)  कॅनरा बँक 

      4)  सिंडीकेट बँक 

 

प्रश्न १४ : जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणून कोणत्या बँकेचा निर्देश करता येतो ? 

      1)  जागतिक बँक 

      2)  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 

      3)  स्टेट बँक ऑफ इंडिया ✔️ 

      4)  बँक ऑफ स्वित्झर्लंड 

 

प्रश्न १५ : ........... घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कामधून वगळण्यात आले ? 

  1) 42 

  2) 44 ✔️ 

  3) 45 

  4) 46 

 

प्रश्न १६ : राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो ? 

      1)  लोकसभा सदस्य 

      2)  राज्यसभा सदस्य 

      3)  विधानसभा सदस्य 

      4)  विधान परिषद सदस्य ✔️ 

 

प्रश्न १७ : ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती ? 

      1)  पाच 

      2)  नऊ 

      3)  सात ✔️ 

      4)  अकरा 

 

प्रश्न १८ : संविधानातील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणाची आहे ? 

      1)  केंद्रशासन 

      2)  राज्यशासन 

      3)  राज्य निवडणूक आयोग ✔️ 

      4)  जिल्हाधिकारी 

 

प्रश्न १९ : देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी महिला अध्यक्ष म्हणून प्रथमच ............ या महिलेची निवड केली आहे . 

      1)  निशी वासुदेव 

      2)  उषा अनंत सुब्रमन्यम 

      3)  आशादेवी रावल 

      4)  अरुंधती भट्टाचार्य ✔️ 

 

प्रश्न २० : ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस आले ? 

      1)  मेंढा लेखा ✔️ 

      2)  कोसबाड 

      3)  किकवी 

      4)  हेमलकसा 

 

प्रश्न २१ : ‘स्टँड अप इंडिया योजना’ खालीलपैकी कोणत्या समाजघटकासाठी आहे ? 

      1)  अनुसूचीत जाती 

      2)  अनुसूचीत महिला 

      3)  महिला 

      4)  वरील सर्व ✔️ 

परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे

◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी


◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण


◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय


◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना


◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक


◆ लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट  - भारतीय शस्र कायदा


◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक - प्रथम फॅक्टरी कायदा


◆ लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा

इंग्रज अधिकारी व कामगिरी


▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था 


◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट* 


◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत


◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज


◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त


◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा


◾️ चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता


◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी


◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण


◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय


◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना


◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक


◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट


◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक.

राज्यघटना प्रश्नसंच

१) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम 360 ✅✅✅

ड) कलम 365


२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता✅✅✅

ड) वरीलसर्व


३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने✅✅✅

ड) सहा महिने


४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली✅✅✅

ड) महाराष्ट्र


५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय✅✅✅

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 


६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६✅✅✅

ड) यापैकी नाही


७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग✅✅✅

ड) व्ही. के. सिंग


८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०✅✅✅

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४


९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२✅✅✅

क) कलम २६३

ड) कलम २६४


१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४✅✅✅

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७


११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती ✅✅✅

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 


१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे✅✅✅

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे


१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश✅✅✅


१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग✅✅✅


१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य✅✅✅

क) दोन्ही

ड) यापैकी नाही


1.संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?

१.322

२.324

३.326✅

४.329



2. SC-ST करिता विशेष तरतुदी संदर्भात असणाऱ्या यादीत कोणत्या जातीला समाविष्ट करायचे हा अंतिम अधिकार कोणाचा आहे?

१. संसद✅

२.राज्याचे राज्यपाल

३.राष्ट्रपती

४. सर्वोच्च न्यायालय



3.खालील विधानांचा विचार करा.

अ. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते.

ब. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ आहे.

क. भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला दिसतो.

ड. 1991 च्या 'उखाजा' धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे.

वरील विधानांतून योग्य विधाने ओळखा.

१.अ,ब,क,ड

२.अ,ब,ड✅

३.अ,क,ड

४.ब,क,ड


4.भारतीय राज्यघटना सरनाम्यातील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श नमूद केले आहेत. 

या तिन्ही प्रकारांचे मूळ स्रोत कोणते?

१.फ्रेंच राज्यक्रांती 1789

२.रशियन राज्यक्रांती 1917✅

३.जर्मनी (वायमर संविधान)

४.जपान संविधान


5. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?

१.डॉ नागेन्द्र सिंह✅

२.जी. वी. माळवणकर

३.जगदीश चंद्र बसु

४.आर. के. नारायण


6. नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेला आहे?

१.कलम 11✅

२.कलम 10

३.कलम 9

४.कलम 8


7. परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक(OCI) व्यक्तीस भारतीय नागरिकत्व प्राप्तीसाठी अर्ज नोंदणीपूर्वी किती दिवस भारतीय वास्तव्य आवश्यक आहे?

१.12 महिने

२.3 वर्ष

३.5 वर्ष✅

४.7 वर्ष


8. भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?

१.राष्ट्रपती

२.पंतप्रधान

३.सर्वोच्च न्यायालय

४.संसद✅


9. मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?

१.केंद्रीय मंत्रिमंडळ

२.संसद✅

३.राज्य विधिमंडळ

४.संसद आणि राज्य विधिमंडळ


10. खालील विधानांचा विचार करा.

अ. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क राज्यांच्या कारवाईपासून संरक्षित आहेत.

ब. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क खासगी व्यक्तीपासून संरक्षित नाहीत.

क. कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कम्पनी भागधारकांना लागू आहेत.

ड. कलम 19 मधील हक्क परकीय नागरिक किंवा निगम/कम्पनी यांना लागू नाहीत.

पर्याय

१.अ,ब,क,ड✅

२.अ,ब,क

३.ब,क,ड

४.अ,ब,ड


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

१.19 ते 22✅✅✅

२.31 ते 35

३.22 ते 24

४.31 ते 51


2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.

१.राष्ट्रपती✅✅✅

२.उपराष्ट्रपती

३.पंतप्रधान

४.राज्यपाल


3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?

१.राष्ट्रपती

२ राज्यपाल

३.पंतप्रधान

४.सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती✅✅✅



4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?


१.11 डिसेंबर 1946✅✅✅

२.29 ऑगस्ट 1947

३.10 जानेवारी 1947

४.9 डिसेंबर 1946



5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

१.परिशिष्ट-1

२.परिशिष्ट-2

३.परिशिष्ट-3✅✅✅

४.परिशिष्ट-4


6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

१.47✅✅✅

२.48

३.52

४.यापैकी नाही



7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?


१.डॉ. आंबेडकर

२.डॉ. राजेंद्रप्रसाद✅✅✅

३.पंडित नेहरू

४.लॉर्ड माऊंटबॅटन



8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

१.डॉ. राजेंद्रप्रसाद

२.डॉ. आंबेडकर✅✅✅

३.महात्मा गांधी

४.पंडित नेहरू



9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

१.लोकसभा

२.विधानसभा

३.राज्यसभा✅✅✅

४.विधानपरिषद


10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

१. लोकसभा सदस्य✅✅✅

२.मंत्रीमंडळ

३. राज्यसभा सदस्य

४. राष्ट्रपती

भारतीय राष्ट्रध्वजाचा विकास.

●पहिला राष्ट्रध्वज : १९०४ रोजी ʼस्वामी विवेकानंदʼ आणि ʼभगिनी निवेदिताʼ यांनी भारताचा पहिला राष्ट्रध्वज तयार केला. 


●हा राष्ट्रध्वज स्वदेशी चळवळ अंतर्गत दिनांक ७ ऑगस्ट १९०६ रोजी कॉंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात तत्कालीन अध्यक्ष दादाभाई नवरोजी द्वारा पारसी बाग चौक (ग्रीन पार्क) येथे फडकविला गेला.


● हिरवा, पिवळा, लाल रंगाच्या या राष्ट्रध्वजात वरच्या पट्ट्यात एकूण ८ कमळ व खालच्या पट्ट्यात ʼसूर्यʼ आणि ʼचंद्रʼ यांचे चित्र आहे. तर मधल्या पट्ट्यात 'वंदे मातरम' हे स्वदेशी चळवळीतील घोषवाक्य आहे.


●द्वितीय ध्वज : १९०७  रोजी जर्मनी येथील 'स्टटगार्ट' शहरात झालेल्या ७ व्या 'आंतरराष्ट्रीय समाजवादी संमेलनात' भारताचे क्रांतिकारी 'मॅडम भिकाजी कामा' यांनी सहभाग घेतला होता.


● या संमेलनात दिनांक २२ऑगस्ट १९०७ रोजी 'मॅडम भिकाजी कामा' द्वारा भारताचा राष्ट्र ध्वज फडकावण्यात आला.


● हा राष्ट्रध्वज भगवा,पिवळा आणि हिरवा रंगाचा असून वरच्या पट्ट्यात ८ चांदण्या असून खालच्या पट्ट्यात 'चंद्र' व 'सूर्य'चे चित्र आहे.


● यातील भगवा, पिवळा आणि हिरवा रंग म्हणजे अनुक्रमे बौद्ध, हिंदू, मुस्लिम यांचे प्रतीक आहे.


●वरच्या पट्ट्यातील ८ चांदण्या म्हणजे ब्रिटिशांचे भारतातील आठ विभाग होय.


● खालच्या पट्ट्यात सूर्य व चंद्र यांचे चित्र असून हे हिंदू व मुस्लिम यांचे सन्मानचिन्ह आहे.


●मधल्या पट्ट्यात क्रांतिकारी चळवळीचे घोषवाक्य 'वंदे मातरम' लिहिलेले आहे.


●तृतीय ध्वज : १९१६ रोजी झालेल्या 'लखनऊ करारा'न्वये काँग्रेस व मुस्लिम लीग यांचे ऐक्य झाले.


● या पार्श्वभूमीवर १९१७ रोजी कॉंग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉ. ऍनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी 'होमरूल लीग चळवळीत' भारताचा तिसरा राष्ट्रीय ध्वज तयार केला व फडकविला.


● या राष्ट्रध्वजात ५ लाल पट्ट्या व ४ हिरव्या रंगाच्या पट्ट्या आहेत. लाल व हिरवा रंग हिंदू व मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानला गेला.


● झेंड्याच्या एका कोपऱ्यात युनियन जॅक तर दुसऱ्या कोपऱ्यात चंद्र व चांदणी आहे.


● या झेंड्यात एकूण ७ चांदण्या असून या चांदण्या म्हणजे सप्तऋषींचे प्रतीक आहे.


●चौथा ध्वज:  १९२१ रोजी काँग्रेसचे अधिवेशन 'विजयवाडा' येथे भरले असता आंध्र प्रदेशातील युवक 'पिंगली वेंकय्या' यांनी बनवलेला झेंडा महात्मा गांधीजींना दिला.


● या झेंड्यात सुरुवातीस हिरवा व लाल रंग होता. हा रंग म्हणजे  हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानले गेले. या झेंड्यामध्ये गांधीजींनी बदल करून त्यात पांढऱ्या रंगाचा पट्टा अन्य समुदायाचे प्रतीक म्हणून जोडला तसेच स्वदेशी चळवळीचे प्रतीक म्हणून चरख्याचा पहिल्यांदाच समावेश केला गेला.


● पाचवा ध्वज : १९३१ रोजी भारतीय राष्ट्रध्वज साठी काँग्रेसच्या अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष सरदार वल्लभाई पटेल होते.


● या ठरावानुसार पहिल्यांदाच तिरंगी झेंडा चा स्वीकार करून केशरी,पांढरा, हिरवा अशा रंगातील झेंड्याचा स्विकार करुन चरख्याचाही त्यात समावेश केला. 


●१९३१ रोजी ठराव झालेल्या ध्वजाचे एक वैशिष्ट्य म्हणजे "ध्वज हा कोणत्याही धर्माचा प्रतीक नाही तर संपूर्ण देशातील समुदायांचं प्रतिनिधित्व करणारा आहे." असा ठराव पहिल्यांदाच येथे मंजुर करण्यात आला.


● सहावा ध्वज : भारतीय संविधान सभेत 'राष्ट्रध्वज तदर्थ समिति' गठन करण्यात आली या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते.


● दिनांक २२ जुलै १९४७ रोजी भारताच्या संविधान सभेने वर्तमान राष्ट्र ध्वजाचा स्वीकार केला.


● राष्ट्रध्वजाची लांबी रुंदी ३:२ असुन यावर मधोमध पांढऱ्या पट्ट्यावर चरख्या ऐवजी सारनाथ स्थित अशोक चक्राचा समावेश करण्यात आला.


● अशोक चक्रा मध्ये एकूण चोवीस आर्‍या असून दिवसातील २४ तास प्रगतीच्या मार्गावर चालणे हा यामागे मुख्य उद्देश आहे.


● राष्ट्रध्वज हा खादी कापडापासून बनवावा तसेच सुती,रेशीम, वुल कापडाचा ध्वज बनवण्यास हरकत नाही.


● मात्र हा ध्वज चरख्यावर तयार करावा किंवा ध्वजाची शिलाई करताना खादीचा धागा वापरावा.


● राष्ट्रध्वज संहिता 2002 नुसार, भारताच्या नागरिकास वर्षभर (३६५ दिवस) राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार प्राप्त झाला.

मात्र सूर्यास्त झाल्यानंतर झेंडा उतरविणे अनिवार्य आहे.


● "झेंडा उंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा." हे गीत श्यामलाल गुप्ता यांनी लिहिले.


● हे गीत सर्वप्रथम १३एप्रिल १९२४ रोजी 'जालियनवाला बाग शोक दिवसा' निमित्त फुलबाग चौक कलकत्ता येथे गायले गेले.

या कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते.


●१९३८ रोजी हरीपुरा अधिवेशनात सरोजिनी नायडू द्वारा हे गाणे पुन्हा गायले.


● १९४८ रोजी 'आजादी की राह पर' या चित्रपटात सरोजनी नायडू यांनी हे गीत गायले.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...