Wednesday, 6 September 2023

येणाऱ्या सर्व सरळसेवा भरतीसाठी इंग्रजी व्याकरण विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे आणि तयारीचा रोडमॅप

 नमस्कार विद्यार्थी मित्रानो,

सध्या अनेक सरळसेवा परीक्षा नियोजित असून काही परीक्षा पूर्ण झाल्या आहे.या सर्व परीक्षांमध्ये अतिशय महत्वाचा असा इंग्रजी विषय..या विषयावर आज आपण बोलणार आहोत. मागील काही दिवसात TCS ने वनरक्षक आणि इतर विविध पदांसाठी परीक्षा घेतली .या सर्व पेपर चे विश्लेषण करून इंग्रजी विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे मी आपल्यासमोर मांडत आहे..

♦️इंग्रजी व्याकरणातील एक एक उपघटक समजून घेऊया..

1) PARTS OF SPEECH : (शब्दांच्या जाती )
          मराठीप्रमाणेच इंग्रजी मध्ये या उपघटकाचे महत्त्व अधिक आहे .यामध्ये विशेषतः Noun या घटकावर जास्त भर द्यायला हवा.. 2 ते 3 प्रश्न यावर दिसून येतात. Common noun , collective noun यावर प्रश्न विचारले गेले आहे..बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातील noun टॉपिक व्यवस्थित अभ्यासायला हवा.यामध्ये  प्राण्यांचे आवाज , कळप त्यांचे पिल्ले ह्यावर प्रश्न दिसून येत आहे .त्यामुळे हे घटक व्यवस्थित अभ्यासायला हवे.

2)Active voice and passive voice
        यावर Tcs ने घेतलेल्या पेपर मध्ये 2  प्रश्न साधारणपणे दिसून येतात. हा घटक अभ्यासताना to be + v3 यावर लक्ष असायला हवे कारण elimination पद्धतीने आपण सहज उत्तरापर्यंत पोहचत असतो.

3)Tense : काळ
        मराठी व्याकरणापेक्षा इंग्रजी व्याकरणात काळाचे महत्व खूप जास्त आहे.यामध्ये साधारणता 2 प्रश्न दिसून येतात.या घटकातील core अभ्यासावर लक्ष द्यावे.विविध नियम तसेच अपवाद देखील व्यवस्थित करून ठेवावे .

4)Direct & Indirect Speech-
        यामध्ये TCS ने विद्यार्थ्यांना फसवण्याचं काम केलेले आहे .त्यामुळे इथे key word वर भर देणे क्रमप्राप्त ठरते .म्हणजे शेवटी जे शब्द बदलत असतात त्यावर लक्ष असू द्यावे .उदा .now - then , before - after

5)Types of Sentence-
    या उपघटकात वाक्यरूपांतराचे प्रश्न दिसून येतात. positive वाक्य negative करणे यासारखे सोप्पे प्रश्न दिसून येत आहे.

6)Spelling Mistake
        TCS ने यावर सर्व पेपर मध्ये भर दिलेला आहे.एका वाक्यात अनेक शब्द देऊन चुकीची spelling विचारली जाते .या घटकाच्या तयारीसाठी pal & suri या पुस्तकातील spelling error चा घटक व्यवस्थित  अभ्यासायला हवा.

7)Parajumbles-
         हा अतिशय किचकट व अवघड वाटणारा विषय आहे.वाक्यांचा अर्थपूर्ण क्रम लावणे यामध्ये अपेक्षित असते .यामध्ये दिलेल्या 4 वाक्यामध्ये कोणत्याही दोन वाक्यांचा क्रम जर समजून घेतला तर elimination करून उत्तरापर्यंत पोहचता येऊ शकते. पहिलेच वाक्य कोणते आहे हे शोधायचा अट्टहास करून वेळ वाया घालवू नये.

♦️Vocabulary-
      Mpsc च्या विविध परीक्षामधील vocab TCS च्या पेपर मध्ये दिसून येत आहे.त्यासाठी अगोदरचे सर्व pyq त्यांच्या पर्यायासह व्यवस्थित अभ्यासले पाहिजे.
Synonyms  व antonyms  या घटकांवर प्रत्येकी 2 प्रश्न दिसून येतात .यासाठी pyq वरती जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे.
याप्रमाणेच TCS ने Idiom phrases व one word substitution यावर देखील प्रश्न विचारत आहे .तो घटक देखील व्यवस्थित अभ्यासायला हवा.

♦️ Books -
1)बाळासाहेब शिंदे सर
किंवा तुम्ही वापरात असलेल्या कोणत्याही क्लास नोट्स

2) कोणताही एक प्रश्नसंच
   
      वरील सर्व विश्लेषण बघता TCS ने घेतलेले पेपर फार सोप्पे नाही आणि फार अवघड देखील नाही .दोन्हीचा मेळ इथे दिसून येतो. त्यामुळे प्रश्नांचे स्वरूप समजून अभ्यास केल्यास निश्चित तुम्ही सर्वजण यशस्वी व्हाल हीच अपेक्षा..