Wednesday, 23 August 2023

सराव प्रश्न संच

Q1. खालीलपैकी कोणत्या राज्यात तांब्याचा साठा सर्वात जास्त आहे?
(a) बिहार
(b) झारखंड
(c) कर्नाटकक
(d) राजस्थान✅

Q2. स्टॉक फार्मिंग म्हणजे काय?
(a) एकाच वेळी 2-3 पिकांची वाढ
(b) प्राण्यांची पैदास✅
(c) पीक फेरपालट
(d) वरीलपैकी कोणतेही नाही

Q3. हवेतून नायट्रोजन सोडविण्यास सक्षम असलेल्या पिकाचा प्रकार कोणता आहे?
(a) गहू
(b) शेंगा✅
(c) कॉफी
(d) रबर

Q4. ‘हरिजन सेवक संघ’ कोणी स्थापन केला होता?
(a) महात्मा गांधी✅
(b) डॉ. बी.आर. आंबेडकर
(c) जी डी बिर्ला
(d) स्वामी विवेकानंद

Q5. खालीलपैकी कोणते बेट लक्षद्वीप समूहातील नाही?
(a) कावरत्ती
(b) अमिनी
(c) मिनिकॉय
(d) नील✅

Q6. खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार जम्मू आणि काश्मीर राज्याचा आहे?
(a)बिडेसिया
(b) कर्म
(c) रौफ✅
(d) स्वांग

Q7. ‘पुसा, सिंधू, गंगा’ या कशाच्या जाती आहेत?
(a) गहू✅
(b) भात
(c) मसूर
(d) हरभरा

Q8. माजुली नदीचे बेट जे “भारतातील पहिले आणि एकमेव बेट जिल्हा” बनले आहे ते कोणत्या राज्यात आहे?
(a) हिमाचल प्रदेश
(b) जम्मू आणि काश्मीर
(c) कर्नाटक
(d) आसाम✅

Q9. मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनाचे (1940) अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
(a) लियाकत अली खान
(b) चौधरी खालिक-उझ-जमान
(c) मोहम्मद अली जिना✅
(d) फातिमा जिना

Q10. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले खेळाडू कोण आहेत?
(a) ध्यानचंद
(b) लिएंडर पेस
(c) सचिन तेंडुलकर✅
(d) अभिनव बिंद्रा

Q.1) ब्रिक्स शिखर परिषद 2023 कोठे होणार आहे?
✅ - दक्षिण आफ्रिका 

Q.2) सिंगापूर मॅथ ऑलिम्पियाडमध्येराजा अनिरुद्ध श्रीराम या विद्यार्थ्याने कोणते पदक मिळवले आहे?
✅ – रौप्य

Q.3) भारतातील पहिली हायड्रोजनवर चालवणारी बस कोठे सूरू झाली आहे?
✅ - लडाख 

Q.4) UIDAI चे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ - नीलकंठ मिश्रा

Q.5) दक्षिण पूर्व आशियातील सर्वात मोठ्या डिसॅलिनेशन प्रकल्पाची पायाभरणी कोठे करण्यात आली 
✅ –  तामिळनाडू 

Q.6) ‘डिजी यात्रा’ सुविधा मिळवणारे ईशान्येतील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे?
✅ - गुवाहाटी विमानतळ

Q.7) निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
✅ - सचिन तेंडुलकर 

Q.8) जागतिक जल साप्ताह 2023 केव्हां साजरा केला जात आहे?
✅ - 20 ते 24 ऑगस्ट 

Q.9) 20 ते 31 ऑगस्ट या कालावधीत ओणम हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणार आहे?
✅ – केरळ 

Q.10) दरवर्षी कोणत्या दिवशी धर्म किंवा श्रद्धेवर आधारित हिंसाचाराच्या बळींचे स्मरण करणारा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो?
✅ - 22 ऑगस्ट

1. सम्राट अशोकाचे शिलालेख वाचणारे पहिले इंग्रज कोण होते?
उत्तर:- जेम्स प्रिन्सेप

2. महावीर स्वामींनी 'जैन संघ' कोठे स्थापन केला?
उत्तर :- पावपुरी

3. कोणत्या परदेशी राजदूताने स्वतःला 'भागवत' घोषित केले?
उत्तर :- हेलिओडोरस

4. वैदिक काळातील लोकांनी प्रथम कोणता धातू वापरला?
उत्तर :- तांबे

5. कोणता वेद गद्य आणि पद्य या दोन्हीमध्ये रचला आहे?
उत्तर :- यजुर्वेद

6. कोणत्या व्यक्तीला 'मुकुटाशिवाय राजा' म्हणतात?
उत्तर :- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

7. हडप्पा काळात तांब्याचा रथ कोणत्या ठिकाणाहून सापडला?
उत्तर :- दायमाबाद (महाराष्ट्र)

8. महावीर स्वामींना 'यति' केव्हा म्हटले गेले?
उत्तरः घर सोडल्यानंतर

9. मोहेंजोदारोच्या स्नानगृहाच्या पश्चिमेला असलेला स्तूप कोणत्या काळात बांधला गेला?
उत्तर :- कुशाण काळ

10. हडप्पा संस्कृतीच्या कोणत्या प्राचीन स्थळाला 'सिंधचा बाग' किंवा 'मृतांचा टिळा' असे संबोधले जाते?
उत्तर :- मोहेंजोदारो

11. पहिला सूफी संत कोण होता, ज्याने स्वतःला अनहलाक घोषित केले?
उत्तर:- मन्सूर हलाज

12. “तलवारीच्या जोरावर हिंदुस्थान जिंकला” हे विधान कोणाचे आहे?
उत्तर :- लॉर्ड एल्गिन II

13. विष्णूच्या दहा अवतारांची माहिती कोणत्या पुराणात आहे?
उत्तर :- मत्स्य पुराण

14. बौद्ध धर्माच्या कोणत्या शाखेत मंत्र, हठयोग आणि तांत्रिक पद्धतींना महत्त्व दिले गेले आहे?
उत्तर :- वज्रयान

15. प्रसिद्ध 'विजयविठ्ठल मंदिर' कोठे आहे, ज्याचे 56 तक्षीत स्तंभ संगीतमय नोट्स उत्सर्जित करतात?
उत्तर:- हम्पी (कर्नाटक)

16. चित्तोडचा 'कीर्तीस्तंभ' कोणत्या शासकाने बांधला?
उत्तर :- राणा कुंभा

17. 'इंडिया डिवाइडेड' या पुस्तकाचे लेखक कोण होते?
उत्तर:- डॉ. राजेंद्र प्रसाद

18. शेरशाह नंतर आणि अकबराच्या आधी दिल्लीवर राज्य करणाऱ्या हिंदू राजाचे नाव काय होते?
उत्तर :- हेमू

19. 'आर्य' या शब्दाचा शाब्दिक अर्थ काय?
उत्तर :- सर्वोत्तम किंवा अभिजात

20. 'चरक संहिता' नावाचा ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
उत्तर: चिकित्सा

मूलभूत कर्तव्य


■पार्श्वभूमी :

◆ समाजाचा घटक या नात्याने व्यक्तीला जसे हक्क प्राप्त होतात त्याच प्रमाणे त्या व्यक्तीने समाजासाठी काही जबाबदारया पार पाडणे अपेक्षित असते.

◆कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्याने अधिकराची प्राप्ती होते,म्हणून आर्य चाणक्य ने कर्तव्याला ' स्वधर्म' म्हटलं आहे.

◆ कर्तव्य म्हणजे नीतिमत्ता व कायदा यांच्याद्वारे व्यक्तीवर एखादी कृती करणे वा न करणे ह्या संबंधी टाकलेले बंधन होय.

◆प्रथमतः मूळ संविधानात मु.कर्तव्यांचा समावेश नव्हता.

◆ घटनादूरूस्थी ४२ वी (१९७६) नूसार भाग-४,कलम-५१ (क) मध्ये १० मूलभूत करव्ये समवीष्ट करण्यात आली. 

◆८६ वी घटना दूरस्ती (२००२)-११ वे करव्ये समाविष्ट 

◆मूलभूत कर्तव्ये - स्वीकार - सोव्हिएत रशिया

◆ यु.एस. ए,कँनडा,जर्मनी, ऑस्ट्रेलिया यासारख्या प्रमुख देशाच्या घटनेमध्ये मु. कर्तव्ये नाहीत.(जपान याला अपवाद)

◆ समाजवादी देशांनी नागरिकांच्या मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्यांना सारखेच महत्व प्रदान केले आहे. 

■सरदार स्वर्ण सिंह समिति-१८

◆आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या गरजेमुळे भारत सरकारने ही समिती स्थापन 

◆ शिफारस-मूलभूत करवव्याचे एक स्वतंत्र प्रकरण समाविष्ट करणे.

◆ त्यांनी १० मूलभूत कर्तव्यांची यादी दिली मात्र ८ च कर्तव्यांची शिफारस केली.

★मूलभूत कर्तव्यांची यादी:-

१) संविधांनाचे पालन करणे आणि संविधानातील आदर्श व संस्था ,राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

२) राष्ट्रीय लढ्यात ज्या उदात्त आद

आदर्शामुळे स्फूर्ती मिळाली. त्या आदर्श तत्वांची जोपासना व अनुकरण करणे.

३) भारताचे सार्वभौमत्व ,एकता ,व एकात्मता  यांचा सन्मान करून त्यांचे रक्षण करणे.

४) देशाचे संरक्षण व राष्ट्रीय सेवा करण्यास तयार राहणे.

५) धर्म ,भाषा ,प्रदेश ,वर्गभेद विसरून अखिल भारतीय जनतेत एकोपा व बंधुभाव वाढीस लावणे,स्त्रीयांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा सोडून देणें.

६) आपल्या संमिश्र संस्कृती च्या वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.

७) नैसर्गिक पर्यावरण ज्यात अरण्य,सरोवरे, नद्या व वन्यजीव सृष्टी यांचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, सजीव प्राण्यांबाबत भूतदया बाळगणे.

८) विज्ञाननीष्ठ दृष्टीकोण ,मानवतावाद,शोकबुद्धि व सुधारणावाद यांचा विकास करणे.

९) सार्वजनिक संपत्ती चे रक्षण करणे, हिंसाचार चा निग्रहपूवक त्याग करणे.

१०) आपले राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल ,अश्या प्रकारे सर्व व्यतिगत व सामुदायिक क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी प्रयत्न शील राहणे.

११) 6 ते 14 वरश्यापर्यंत मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देणे.(२००२ च्या ८६ व्या घटनादुरीस्ती ने जोडण्यात आले)

★मूलभूत कर्तव्यवरील टीका:-

१) संविधानाविषयी दुराग्रह 

२) सर्व समावेशक नाहीत.

३)मोघम तरतुदी 

४) नैतीकतेची जंत्री

५) नागरिकांच्या गुलामीची सनद

६) व्याहरिक गोंधळ

७) चुकीच्या ठिकाणी समावेश- ही कर्तव्य भाग-४ ला जोडण्या ऐवजी भान-३ ला जोडून त्यांना मु.हक्कच्या बरोबरिचा दर्जा देने आवश्यक 

★मूलभूत कर्तव्याचे महत्व:-

●आपल्या ला देश,समाज व इतर नागरिकांप्रति आपली काही कर्तव्य आहेत याची जाणीव करून देण्याचे कार्य ही कर्तव्य करतात.

● राष्ट्रविरोधी व समाजविरोधी कृत्य करण्याविरुद्ध ही कर्तव्य ताकीद देतात.

● कर्तव्यामुळे शिस्त व जबाबदारी च्या भावनेशी प्रोत्साहन मिळते.

● एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्या साठी न्यायालयास मु.कर्तव्याचा आधार घेत येतो.उदा: 1992-सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात निर्णय दिला की,मु.कर्तव्याची अमलबजावणी करणारा कायदा कलम-१४(कायद्यासमोर समानता)व कलम-१९(सहा स्वतंत्र)च्या संदर्भात 'पर्याप्त 'असल्याचे मान्य केले जाऊ शकते.

★इंदिरा गांधींच्या मते:-"मूलभूत कर्तव्याचे नैतीक मूल्य....लोकांना आपल्या हक्काबरोबरच आपल्या कर्तव्याची जाणीव निर्माण करून लोकशाही संतुलन प्रस्थापित करेल".

★ मोरारजी देसाई यांच्या जनता पार्टी सरकारने ४३ व्या,४४व्या घटनादुरुस्थि अन्वेये ४२ व्या घटनांदूरस्थिने समवीष्ट केलेल्या अनेक तरतुदी काढून टाकण्याची प्रयत्न केला ,मात्र मूलभूत कर्तव्यांना त्यांनी स्पर्श केला नाही.

★वर्मा समिती (१९९९):-

मु.कर्तव्याच्या अमलबजावणी साठी करण्यात आलेल्या कायद्याच्या तरतुदी ची ओळख केली होती.

प्रश्न मंजुषा


🔴 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे? 


१) ३ वेळा

२) ४ वेळा ✔️✔️

३) २ वेळा

४) ५ वेळा

________________________________

🟤 घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?


१) अमेरिका 

२) ऑस्ट्रेलिया

३) चीन

४) ब्रिटेन  ✔️✔️

________________________________

⚫️ भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?


१) मुंबई 

२) दिल्ली 

३) अलाहाबाद  ✔️✔️

४) कलकत्ता

________________________________

🔵 विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?


१) ४ थे 

२) ५ वे 

३) ६ वे 

४) ७ वे ✔️✔️

________________________________

🟢 महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?


१) रंजना सोनवणे 

२) प्रज्ञा पासून 

३) राहीबाई पोपरे ✔️✔️

४) स्मिता कोल्हे

________________________________

🟡 संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला? 


१) २४ जानेवारी १९५०  ✔️✔️

२) २५ जानेवारी१९५०

३) १४ ऑगस्ट १९४७

४) १५ ऑगस्ट १९४७

________________________________

🟠 ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ?  


१) पुष्पा भावे

२) राम लक्ष्मण

३) फ्रान्सिस दिब्रिटो ✔️✔️

४) शरद पवार

________________________________

🔴 बुद्धचरित पुस्तकाचे लेखक कोण होते ? 


१) अश्वघोष 🚔

२) नागार्जुन 

३) वलुनिय

४) नागसेन


🟠 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान .....येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभेची मागणी झाली.?  

  

      A) दिल्ली

      B) पाटणा ✅✅

      C) मुंबई

      D) मद्रास

________________________________

🟡....... रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले?


     A) 15 ऑगस्ट 1947

     B) 22 जुलै 1947

     C) 24 जानेवारी 1950✅✅

     D) 25 डिसेंबर 1952

________________________________

🟢 संविधान सभेने घटना निर्मितीसाठी वेगवेगळ्या समित्या तयार केल्या त्यापैकी सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते ?


     A) जवाहरलाल नेहरू

     B) वल्लभाई पटेल 

    C) डॉ.के.एम. मुन्शी✅✅

    D) एच. सी .मुखर्जी

________________________________


🔵 आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे या तरतुदींचा स्त्रोत कोणत्या देशाची घटना आहे ?


     A) जपान

     B) जर्मनी ✅✅

     C) फ्रान्स

     D) दक्षिण आफ्रिका

________________________________


⚫️ घटना दुरुस्तीची पद्धत कलम......... मध्ये देण्यात आली.*


       A)368 ✅✅

      B)365

      C)360

      D)352

________________________________

⚪️ मतदानाचे किमान वय........ व्या घटना दुरुस्तीनुसार 21 होऊन 18 वर्षे असे कमी करण्यात आले.?


      A) 42 व्या

      B) 61 व्या ✅✅

      C) 86 व्या

      D) 92 व्या

________________________________


🟤 बलवंतराय मेहता समिती......  मध्ये भारत सरकारने बलवंतराय जी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली  स्थापना केली.?


     A)1962

     B)1957✅✅

     C)1960

     D)1966

________________________________

🔴 ......... मध्ये आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे 29 वे राज्य निर्माण करण्यात आले.?


     A) 2 जून 2013

     B) 2 जून 2014 ✅✅

     C) 13 डिसेंबर 2016

     D)10 मार्च 2011

________________________________


🟠स्वातंत्र्याचा हक्क कलम .......ते.......मध्ये देण्यात आला.?


     A)14 ते 18

     B)19 ते 22✅✅

     C)25 ते 28

     D)23 व 24

________________________________


🔴 अमेरिकेच्या घटनेमध्ये किती कलमे आहेत?

     A)21

     B)15

     C)7 ✅✅

     D)14


🟣 देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ................... होय.


1) राज्य विधिमंडळ  

2) कार्यकारी मंडळ    

3) संसद ✔️✔️    

4) न्यायमंडळ


___________________________________

🔵 सनदी सेवकांना ........................ बनण्याची परवानगी नाही.


1) संसद सदस्य     ✔️✔️

2) मुख्य निर्वाचन आयुक्त    

3) विद्यापीठाचे कुलगुरू    

4) चौकशी आयोगाचे प्रमुख


___________________________________

🟡 घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर होऊ शकते ?


1) 2016    

2) 2021      

3) 2026  ✔️✔️    

4) 2031


___________________________________

🟠 विधान अ : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.

 कारण ब : राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.


1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही✔️✔️.

3) अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे.

4) अ हे चूक आहे पण ब हे बरोबर आहे.


___________________________________

🔴 राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?


1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा ✔️✔️

2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा

3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला

4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा

अन्नपचन प्रक्रिया


🔶सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्‍या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.

🔶अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात.

🔶या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते.

🔶या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.

🔶खाल्लेले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो. अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.  


🔴 अंग पदार्थ – मुख व गुहा

स्त्राव – लाळ  

विकर – टायलिन

माध्यम – अल्पांशाने

मूळ अन्न पदार्थ – पिष्टमय पदार्थ  

क्रिया आणि अंतिम – शर्करा (माल्टोज)


🔴 अंग पदार्थ – जठर

स्त्राव – हायड्रोक्लोरिक

माध्यम – आम्ल, अॅसिड  

मूळ अन्न पदार्थ – प्रथिने  

क्रिया आणि अंतिम – जंतुनाशक


🔴 अंग पदार्थ – जठररस  

स्त्राव – पेप्सीन,रेनीन

माध्यम – आम्ल

मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, दूध

क्रिया आणि अंतिम – सरल प्रथिने (पेप्टोन), व्हे मध्ये रूपांतर  


🔴 अंग पदार्थ – लहान आतडे

स्त्राव – पित्तरस

माध्यम – अल्कली

मूळ अन्न पदार्थ – प्रथिने व मेद

क्रिया आणि अंतिम – मेदाचे विघटन व अन्न जंतूनाशक करणे.


🔴 अंग पदार्थ – स्वादुपिंडरस  

विकर – ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ

माध्यम – अल्कली, अल्कली

मूळ अन्न पदार्थ – प्रथिने(पेप्टोन), पिष्टमय पदार्थ, मेद

क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, शर्करा व ग्लुकोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल


🔴 अंग पदार्थ – आंत्ररस

विकर – इरेप्सीन, इनव्हरटेझ, लायपेझ

माध्यम – अल्कली

मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, शर्करा, मेद  

क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, ग्लुकोज, फ्रूटोज व माल्तैझ, मेदाम्ल व ग्लिसरॉल.

प्रश्नमंजुषा

  

1) कोणाच्या शिफारशी शिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही.

A) मुख्यमंत्री

B) राज्यपाल✔️✔️

C) राष्ट्रपती

D) विधानसभा अध्यक्ष




2) भारतीय रेल्वे संदर्भात कोणते विधान सत्य आहे.

अ) रेल्वे वाहतुकीचा बाजार हिस्सा  थोडाच वाढला आहे

ब) अपुरे  क्षमता जाळे आणि पायाभूत सुविधा या समस्यांचा रेल्वे सामना करावा लागतो.


पर्याय:-

A) अ, ब दोन्ही बरोबर

B) अ , ब दोन्हीं चुक

C) अ बरोबर

D) ब बरोबर✔️✔️




3) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते.

A) केंद्र शासन

B) राज्य शासन

C) केंद्र आणि राज्य शासन दोन्ही✔️✔️

D) वरीलपैकी नाही.




4 ) सन 2011 मध्ये साक्षरता दरासंदर्भात खालील राज्यांची घटत्या  क्रमाने मांडणी करा.

अ) पश्चिम बंगाल

ब) महाराष्ट्र

क) हिमाचल प्रदेश


A) अ, ब,क

B) क, ब, अ✔️✔️

C) ब, क, अ

D) ब , अ, क




5) कोणते विधान बरोबर आहे.

अ) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिम 2015 मध्ये सुरू करण्यात आली.

ब) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेचा हेतू आणि कुटुंबकल्याण कार्यक्रमाना बळकटी देणे हा आहे.


A) अ बरोबर

B) ब बरोबर ✔️✔️

C) अ ,ब दोन्ही बरोबर

D) अ, ब दोन्ही चूक




6) पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे.

अ) भारतातील सर्व खेडी सर्व हवामान रस्त्यांनी जोडण्याचे उद्दिष्ट दहाव्या पंचवार्षिक योजनेत होते.

ब) राष्ट्रीय व राज्य रस्ते किमान दुमार्गी श्रेणीचे करायचे हे 12 व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे.


A) अ

B) ब

C) अ , ब दोन्ही बरोबर✔️✔️

D) एक ही नाही





7) भारत निर्माण कार्यक्रम 2005 या ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कोणत्या  आहेत.

अ) जलसिंचन व ग्रामीण रस्ते

ब) ग्रामीण निवारा

क) ग्रामीण पाणीपुरवठा

ड) ग्रामीण विद्युतीकरण

इ) ग्रामीण दूरध्वनी


A) ब ,क, ड

B) अ, ब, क, ड

C) अ, क, ड, इ

D) अ, ब, क, ड, इ✔️✔️





8) सन 2009 साठी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट परिषदे ने 5-15  दशलक्ष प्रवासी वाहतूक हाताळणाऱ्या  विमानतळा मध्ये कोणत्या विमानतळा जगातील उत्कृष्ट म्हणून गौरविले आहे.

A) एअरपोर्ट नवी दिल्ली

B) एअरपोर्ट मुंबई

C) एअरपोर्ट शमशाबाद हैदराबाद

D) एअरपोर्ट बेंगलोर



9 ) सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मितीत खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वीजनिर्मितीचा वाटत सर्वाधिक आहे.

अ) जलविद्युत

ब) औण्विक विद्युत

क) अनुउर्जा

ड) पवन ऊर्जा


A) फक्त अ

B) फक्त ब✔️

C) अ आणि ब

D) अ, ब, ड, क





10) ग्रामीण भागात शहरी सुखसोयी चे प्रावधान हे पुढील पैकी कोणाचे ग्रामीण भारताच्या प्रवक्ता त्यांचे स्वप्न आहे.

A) डॉ. मनमोहन सिंग

B) डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम✔️

C) सी रंगराजन

D) डॉ. अमर्त्य सेन


Q 1️⃣

सुपरसॉनिक विमाने आकाशात उडताना फारसा आवाज करत नाहीत कारण............. 

A. त्यांचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असतो

B. त्यांची कंपने कमी असतात

C. ती फार उंची वरून प्रवास करतात✅✅

D. ती वजनाने फार हलकी असतात


Q 2️⃣

हायड्रोमीटर हे उपकरण खालीलपैकी काय मोजण्यासाठी वापरले जाते ? 

A. द्रव पदार्थाचे विशिष्ट गुरूत्व ✅✅

B. द्रव पदार्थाची घनता

C. द्रव पदार्थाची तरलता

D. हवेतील हायड्रोजनचे प्रमाण


Q 3️⃣

क्षरण प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणत्या पध्दती वापरतात ? 

अ) गॅल्व्हानायझेशन 

ब) कथीलीकरण 

क) विद्युत विलेपन 

ड) धनाग्रीकरण 


A. फक्त अ आणि ब

B. फक्त अ, ब आणि क

C. फक्त अ, ब आणि ड

D. वरील सर्व ✅✅


Q 4️⃣

C-C या बंधाची सर्वात कमी लांबी कोणत्या संयुगामध्ये असते ? 


A. इथेन

B. इथिलीन

C. बेन्झीन

D. एसटीलीन ✅✅



Q 5️⃣

दुर्बिणीसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय साकारले जाते ? 

A. वस्तूभिंग

B. संयुक्त नेत्रभिंग ✅✅

C. विशालक

D. वरीलपैकी एकही नाही


Q 6️⃣

ऑक्सीश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भुमिका बजावतो ? 


A. इलेक्ट्रॉन दाता

*B. इलेक्ट्रॉन ग्राही* ✅✅

C. प्रोटॉन दाता

D. प्रोटॉन ग्राही


Q 7️⃣

खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ? 


A. गर्द पिवळे मुत्र- मेलॅन्युरीया

B. रंगहीन मुत्र-निर्जलीकरण

C. रक्तरंग मुत्र -हीमॅच्युरीया ✅✅

D. हिरवट रंगाचे मुत्र - बीट खाल्यामुळ


Q 8️⃣

खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रीयंट कोणते आहे ? 

A. मॅग्नेशिअम✅✅

B. मॉलीबडेनिअम

C. बोरॉन

D. झिंक


Q 9️⃣

सामान्यतः अमोनिया वायू औद्योगिक पातळीवर तयार करतात कारण त्याचा उपयोग ..................... 

A. प्रथिने तयार करण्यासाठी होतो

B. साबण तयार करण्यासाठी होतो

C. रसायनिक खते तयार करण्यासाठी होतो ✅✅

D. कृत्रिम खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी होतो


Q 🔟

 अटल पेन्शन योजनेबाबत खालीलपैकी काय चुकीचे आहे? 


A. सहभागी होण्याचे किमान वय 18 वर्ष

B. सहभागी होण्याचे कमाल वय 40 वर्ष

C. वर्गणीदारने आपला हिस्सा भरण्याचा किमान कालावधी 20 वर्ष किंवा अधिक

D. सुरवात 1 जानेवारी 2016 पासून ✅

डीएनए





50 एस राइबोसोमल सब्यूनिटचे त्रिमितीय प्रतिनिधित्व . रिबोसोमल आरएनए ब्लूमध्ये प्रथिने जेरो मध्ये आहेत. सक्रिय साइट लाल रंगात दर्शविलेल्या आरआरएनएचा एक छोटा विभाग आहे.

🍁आरएनएची रासायनिक रचना डीएनए प्रमाणेच आहे , परंतु तीन प्राथमिक मार्गांनी ती भिन्न आहेः

🍁दहेरी अडकलेल्या डीएनए विपरीत, आरएनए त्याच्या अनेक जैविक भूमिकांमधील एकल-अडकलेला रेणू आहे
🍁आणि त्यात न्यूक्लियोटाइड्सच्या लहान साखळ्या असतात.
🍁तथापि, एकल आरएनए रेणू, टीआरएनए प्रमाणे पूरक बेस जोड्याद्वारे इंट्रास्ट्रॅन्ड डबल हेलिक्स बनवू शकतो.

डीएनएच्या साखर-फॉस्फेट "बॅकबोन" मध्ये डीऑक्सिरीबोज असते , तर आरएनएऐवजी राईबोज असते. []] रिबोजचा पेंटोज रिंगला हायड्रॉक्सिल ग्रुप जोडलेला असतो जो २ मध्ये स्थित असतो . राइबोस पाठीचा कणा मध्ये hydroxyl गट आरएनए अधिक रासायनिक करा जी रासायनिक द्रव्ये उष्णतेने त्वरित बदलतात अशांना ही संज्ञा लावली जाते कमी डीएनए पेक्षा सक्रियन ऊर्जा च्या पाण्याबरोबर संयोग होऊन लहान कणात पृथ : क्करण होणे .

डीएनएमध्ये enडेनिनचा पूरक आधार थाईमाइन असतो , तर आरएनएमध्ये तो युरेसिल असतो , जो थायमाइनचा एक अखंड प्रकार आहे.


❇️Deoxyribonucleic❇️

🍂 आम्ल ( डीएनए ) एक परमाणू दोन साखळ्या की गुंडाळी बनलेला आहे एकमेकांना सुमारे एक तयार करण्यासाठी दुहेरी Helix घेऊन अनुवांशिक , विकासाच्या सुचना कार्य, वाढ आणि पुनरुत्पादन सर्व ज्ञात organismsअनेक आणि व्हायरस . डीएनए आणि रिबोन्यूक्लिक acidसिड (आरएनए) न्यूक्लिक idsसिड असतात ; हळूच प्रथिने , lipids आणि गुंतागुंतीच्या कर्बोदकांमधे ( polysaccharides ), nucleic ऍसिडस् चार मुख्य प्रकार आहेत macromolecules सर्व ज्ञात
 फॉर्म आवश्यक असलेल्या जीवन .




गोवर



गोवर हा विषाणुजन्य आजार आहे. या आजारात एक्झॅन्थम या नावाने ओळखले जाणारे पुरळ त्वचेवर येतात. गोवर हा रुबेला, पाच दिवसाचा गोवर किंवा हार्ड मीझल्स या नावानेसुद्धा ओळखला जातो.
वर्णन : गोवर हा जगभर आढळणारा आजार आहे. सध्याच्या गोवर लसीकरणाच्या प्रथेआधी दर दोन किंवा तीन वर्षानी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात गोवराची साथ येत असे. एक वर्षाआड येणारी लहान गोवराची साथ ही सामान्य बाब होती. तान्ह्या मुलापासून ते आठ महिन्यापर्यंतच्या मुलामध्ये गोवराविरुद्ध नैसर्गिक प्रतिकार शक्ती असते. ही प्रतिकारशक्ती मातेच्या गर्भाशयातील पेशींमधून मुलास मिळालेली असते.

माणसाला कोणत्याही वयात एकदा गोवर होऊन गेला की त्याला तो पुढच्या आयुष्यात परत होत नाही.

◾️कारण आणि लक्षणे

गोवराचे कारण पॅरामिक्झोव्हायरस नावचा विषाणू. अति संसर्गजन्य प्रकारातील हा विषाणू आहे. ज्यास गोवर झाला आहे त्याचा खोकला, शिंका यातून विषाणू पसरतो. ८५% गोवर या प्रकारे पसरतो. एकदा गोवराच्या विषाणूचा संसर्ग झाला की आठ ते पंधरा दिवसात विषाणूचा संसर्ग झालेल्या ९५% व्यक्तींना गोवर होतो. गोवराची लक्षणे दिसण्यापूर्वी तीन ते पाच दिवस गोवर विषाणूचा संसर्ग झालेला असतो. नंतरच्या चार दिवसात गोवराचे पुरळ अंगावर येण्यास प्रारंभ होतो.

गोवराचे पहिले लक्षण म्हणजे ताप, नाक वाहणे , डोळे तांबडे होऊन डोळ्यातून पाणी येणे आणि खोकला. काहीं दिवसात तोंडामध्ये गालाच्या आतील बाजूस पुरळ उठतात. ते वाळूच्या आकाराचे पांढरे पुरळ तांबूस उंचवट्यावर असतात. या पुरळांस कॉप्लिक पुरळ असे म्हणतात. हे गोवराचे नेमके लक्षण आहे. घसा सुजतो, तांबडा होतो आणि खवखवतो.

◾️उपचार

गोवरावर नेमके उपचार नाहीत. उपचार रुग्णास आराम वाटावा यासाठी केले जातात. इतर जीवाणू संसर्ग झाल्यास प्रतिजैविके देण्यात येतात. ताप उतरण्यासाठी असिटॅमिनोफेन देण्यात येते. गोवर झालेल्या लहान मुलाना कधीही अ‍ॅस्पिरिन देऊ नये

◾️परतिबंध

गोवराचा प्रतिबंध लसीने उत्तम प्रकारे करता येतो. गोवराची लस गोवराच्या विषाणूपासून बनवलेली आहे. गोवराच्या विषाणूवरील सर्व प्रथिने शिल्लक असल्याने लस दिल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. भविष्यकाळात गोवराच्या विषाणूबरोबर संपर्क आल्यास शरीर विषाणूचा त्वरित प्रतिकार करते.. वयाच्या १५ महिन्यापूर्वी बालकाची प्रतिकारशक्ती पुरेशी निर्माण न झाल्याने गोवराची लस १५ महिन्यानंतर देण्यात येते. या वयात लस टोचल्यास तयार होणारी प्रतिकार शक्ती दीर्घकाळ टिकते.

गर्भवती महिलाना गोवराची लस देऊ नये. याचे कारण गर्भारपणात गोवराची लस दिल्यास जन्मलेल्या बळास गोवर होण्याची शक्यता असते.

प्रथिने (Proteins)-

√ प्रथिने ही अमिनो आम्लापासून बनलेली असतात.
√ शरीराला २४ अमिनो आम्लाची गरज असते.
√ त्यापैकी नऊ (९) अमिनो आम्ले शरीरात निर्माण होऊ शकत नाही.
√ त्यामुळे ती आहारात पुरवावी लागतात, म्हणून अशा अमिनो आम्लांना "आवश्यक अमिनो आम्ल'' असे म्हणतात.

√ आवश्यक अमिनो आम्ल पुढील प्रमाने आहे.

१) लायसिन
२) ल्यूसिन
३) आयसोल्युसिन
४) व्हलिन
५) हिस्ट्रीटीन
६) थ्रिओनिन
७) टिष्ट्रोफॅन
८) मितिओनिन
९) फिनाईल अॅलनिन

√ अमिनो आम्ले ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर व कधीकधी फॉस्फरस व लोह यांपासून बनलेली असतात.

● प्रथिनांचे कार्य-

√१)शरीरांची वाढ व विकास करणे.
√२) उतींचे प्रमाण वाढविण्यासाठी.
√३) प्रति पिंडे (Anti bodies), विकरे, संप्रेरके, हार्मोन्स यांच्या निर्मितीसाठी.
√४) रक्त निर्मितीतील व ऊर्जा निर्मितीसाठी प्रथिने कार्य करतात.

● प्रथिनांचे स्त्रोत-

√१) प्राणीज स्त्रोत : दुध, अंडी, मासे, मांस
√२) वनस्पतीज स्त्रोत :
i) दाळी- तुर, मुंग, हरभरा, उडीद, मसूर
ii) धान्य-ज्वारी, बाजरी, नाचणी, गहु
iii) तेलबिया - तीळ, कडई, शेंगदाणे, सोयाबिन, बदाम

● प्रथिनांचे प्रमाण-

१. डाळीमध्ये: २० ते २५ टक्के
२. सोयाबिनमध्ये: ४३.२ टक्के (सर्वाधिक)
३. दुधामध्ये: ३.२ ते ४.३ टक्के
४. अंडी: १३टक्के
५. मासे: १५ ते २३ टक्के
६. मांस: १८ ते २६ टक्के

√ प्राणिज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा अधिक महत्वाची असतात, कारण त्यामध्ये सर्वाधिक अमिनो आम्ल' असतात.

★★★★★★★★★★★★★★★★★★

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...