Tuesday, 22 August 2023

तलाठी भरती : परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्राचा मालक लॅपटॉप बाहेर घेऊन गेला आणि..

मंगळवारी वर्धा येथील एका परीक्षा केंद्रावर चक्क त्या परीक्षा केंद्राचा मालकच संशयाच्या भूमिकेत आढळून आला आहे.

नागपूर : तलाठी भरतीची परीक्षा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून रोज नवनवीन गोंधळ समोर येत आहेत. सोमवारी अनेक परीक्षा केंद्रांवर सर्व्हर डाऊन असल्याने गोंधळ उडाला होता. तर मंगळवारी वर्धा येथील एका परीक्षा केंद्रावर चक्क त्या परीक्षा केंद्राचा मालकच संशयाच्या भूमिकेत आढळून आला आहे.


या केंद्रावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून तानिया कम्पुटर लॅब या परीक्षा केंद्राचा मालक परीक्षा सुरू असताना त्याचा लॅपटॉप बाहेर घेऊन आला. यावर उमेदवारांनी आक्षेप घेतल्यावर, आत मोबाईल जॅमर असल्याने नेटवर्क नसल्याने मी बाहेर पेपर डाऊनलोड करण्यासाठी गेलो होतो, असे उत्तर त्याने दिले. त्यामुळे त्याच्या भूमिकेवर संशय उपस्थित होत आहे. तो परीक्षार्थी नसल्याने त्याला प्रश्नपत्रिकेची गरज काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सांगितले की, आजवर आम्ही इतके पेपर दिले पण आम्हाला कधी कोणीही लॅपटॉप बाहेर घेऊन जाताना दिसले नाही. पेपर लॉगिनमध्ये उपलब्ध असतो. जर कर्मचाऱ्याने पेपर बाहेर डाऊनलोड केला असेल तर त्याने बाहेरच्या-बाहेर कोणाला पाठविला नसेल कशावरून म्हणता येईल, अशी शंका घेतली.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...