Monday, 31 July 2023

1935 चा कायदा.

▪️ त्यात 321 कलम, 14 भाग व 10 परिशिष्ट होती.

▪️अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती पण अस्तित्वात आले नाही कारण संस्थानिकांना संघराज्यात सामील होणे ऐच्छिक होते ते सामील न झाल्याने संघराज्य या कायद्यानुसार कधीच अस्तित्वात आले नाही.

▪️ तीन सूची होत्या: संघ सूची, प्रांतिक सूची, समवर्ती सूची.

▪️ या कायद्यानुसार शेषाधिकार गव्हर्नर जनरल कडे होते 1919 च्या कायद्यानुसार मात्र केंद्र सरकारला होते.

 ▪️1919 च्या कायद्यानुसार  प्रांतिक स्तरावर dyarchy व्यवस्था निर्माण करण्यात आली होती ती आता केंद्र पातळीवर निर्माण करण्यात आली.

▪️ प्रांतिक स्तरावर 1935 च्या कायद्यानुसार प्रांतिक स्वायत्तता लागू करण्यात आली ते 1937 ते 1939 पर्यंत होती.

▪️ संघराज्य कायदेमंडळ द्विग्रहीच ठेवण्यात आलं जे की 1919 च्या कायद्यामध्ये प्रथमतः निर्माण करण्यात आले होते.

▪️ सहा प्रांतात द्विगृही कायदेमंडळ निर्माण करण्यात आलं: बंगाल, बॉम्बे, मद्रास, संयुक्त प्रांत, बिहार, आसाम.

 ▪️ फेडरल कोर्टाची स्थापना  1 आक्टोंबर 1937 रोजी 1935 च्या कायद्यानुसारच करण्यात आली पुढे 26 जानेवारी 1950 ला सुप्रीम कोर्टात त्याचे रूपांतरण झाले.

 ▪️फेडरल रेल्वे ऑथोरिटी निर्माण करण्यात आली.

 ▪️केंद्राकडून राज्यांना निर्देशाची कल्पनाही याच कायद्यानुसार घेण्यात आली.

 ▪️केंद्र व राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध 1935 च्या कायद्यातून घेण्यात आलेले आहेत.

▪️ आणीबाणी विषयक तरतुदी

 ▪️Advocate General हे पद गव्हर्नर जनरलच्या मदतीसाठी स्थापन.

 ▪️रिझर्व बँक स्थापनेची तरतूद होती पण स्थापना RBI ACT 1934 नुसार 1935 ला RBI ची स्थापना झाली. 

▪️या कायद्याने भारत मंत्र्याची इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आली.

 ▪️या कायद्यावरील मत :

 पंडित नेहरू. : एक प्रबळ ब्रेक्स असलेले मात्र इंजिनच नसलेले मशीन असे म्हणाले.

 बॅरिस्टर जिना म्हणाले: संपूर्णपणे कुजलेला मूलभूतरित्या आयोग्य आणि पूर्णपणे अस्विकाराह्य असे ते म्हणाले.

 श्री राजगोपालचारी म्हणाले: द्विशासनापेक्षा खराब कायदा होता.

 पंडित मदन मोहन मालवी म्हणाले: हा नवीन कायदा आपल्यावर लादला जात आहे तो वर्करणी काहीसा लोकशाहीवादी वाटत असला तरी आतून पूर्णपणे पोकळ आहे.

           

Latest post

महत्वाचे इतिहास प्रश्न

१. इबादत खाना का बांधण्यात आला?  अ. धर्मांवर चर्चा करणे ब. राज्याच्या चर्चेसाठी C. लोकांशी संवाद साधण्यासाठी D. यापैकी काहीही नाही  उत्तर: अ...