Tuesday, 25 July 2023

थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाचे



1 ) भारतात पहिली विजेवर धावणारी बस कुठून कुठे सुरू होणार आहे ?

उत्तर :- दिल्ली ते जयपूर 


2 ) ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

उत्तर :- महाराष्ट्र


3 ) पद्म पुरस्कार विजेता व्यक्तीसाठी हरियाणा सरकार किती रुपयांची पेन्शन देणार आहे ?

उत्तर :- दहा हजार


4 ) अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळास बिपरजॉय हे नाव कोणत्या देशाने दिले आहे ?

उत्तर :- बांगलादेश 


5 ) लंडनमध्ये गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले ?

उत्तर :- शक्तीकांत दास


6 ) कोणत्या लेखिकेला युरोपियन निबंध पुरस्काराने संबंधित करण्यात आले ?

उत्तर :- अरुंधती रॉय


7 ) मुरली श्रीशंकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर :- लांब उडी


8 ) मुरली श्रीशंकरने पॅरिसमध्ये झालेल्या डायमंड लीग मध्ये किती मीटर लांब उडी मारली ?

उत्तर :- 8.09 मीटर 


9 ) महाराष्ट्र राज्याचा स्वच्छ मुख अभियानाचा स्माईल ॲम्बेसिडर कोण आहे ?

उत्तर :- सचिन तेंडुलकर


10 ) भारताच्या नवीन संसदेत लोकसभेचे आसन संख्या किती आहे ?

उत्तर :- 888


11 ) भारताच्या नवीन संसदेत राज्यसभेचे आसन संख्या किती आहे ?

उत्तर :- 384


12 ) भारताच्या नवीन संसदेत लोकसभा व राज्यसभा मिळून एकूण आसन किती आहे ?

उत्तर :- 1272


13 ) भारतीय गुप्तचर संस्था रॉ चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली ?

उत्तर :- रवी सिन्हा


14 ) यावर्षीचे आदिवासी साहित्य संमेलन कोठे पार पडले ?

उत्तर :- पुणे


15 ) कोणाचा जन्मदिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा करतात ?

उत्तर :- वसंतराव नाईक


16 ) भारतातील पहिले खाजगी रेल्वे स्थानक कोठे सुरू होणार आहे ?

उत्तर :- हबीबगंज ( राणी कामलापती )


17 ) महाराष्ट्रात प्रत्येक एसटी डेपो किती आसणे चित्रपटगृह होणार आहे ?

उत्तर :- 100


🌀कोणत्या लेखिकेला युरोपियन निबंध पुरस्काराने संबंधित करण्यात आले ?

उत्तर :- अरुंधती रॉय


🌀मुरली श्रीशंकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर :- लांब उडी


🌀मुरली श्रीशंकरने पॅरिसमध्ये झालेल्या डायमंड लीग मध्ये किती मीटर लांब उडी मारली ?

उत्तर :- 8.09 मीटर 


🌀महाराष्ट्र राज्याचा स्वच्छ मुख अभियानाचा स्माईल ॲम्बेसिडर कोण आहे ?

उत्तर :- सचिन तेंडुलकर


🌀 भारताच्या नवीन संसदेत लोकसभेचे आसन संख्या किती आहे ?

उत्तर :- 888


🌀भारताच्या नवीन संसदेत राज्यसभेचे आसन संख्या किती आहे ?

उत्तर :- 384


🌀भारताच्या नवीन संसदेत लोकसभा व राज्यसभा मिळून एकूण आसन किती आहे ?

उत्तर :- 1272

सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच


Q1. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये शतक ठोकणारा खालीलपैकी पहिला भारतीय खेळाडू कोण आहे?

उत्तर :-  मनीष पांडे


Q2. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे?

उत्तर :- 22


Q3. “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजु-ए-कातील में है” ही घोषणा कोणी दिली?

उत्तर :- बिस्मिल


Q4. पिवळ्या रंगाच्या भाज्या ----------- चा स्रोत असतात.

उत्तर :- व्हिटॅमिन सी


Q5. ज्या चलनात झटपट स्थलांतराची प्रवृत्ती असते ते चलन -------------- म्हणून ओळखले जाते.

उत्तर :- गतिमान चलन


Q6. खालीलपैकी कोणता घटक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात समाविष्ट नाही?

उत्तर :- तेलबिया


Q7. कृषी उत्पादन (प्रतवारी आणि विपणन) कायदा 1937 हा ------------- म्हणूनही ओळखला जातो.

उत्तर :- ऍगमार्क कायदा


Q8. सरकारी खर्चाचे नियंत्रक प्राधिकरण ---------------- आहे.

उत्तर :- अर्थ मंत्रालय


Q9. स्टोरेज चेंबरमधून इथिलीन शोषण्यासाठी कोणता बॅक्टेरिया वापरला जातो?

उत्तर :- मायकोबॅक्टेरियम


Q10. नेहरू अहवालाचा मसुदा ----------- यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला होता आणि विषय होता .

उत्तर :- मोतीलाल नेहरू; भारतातील घटनात्मक व्यवस्था


०१) मनुष्याला हसविणारा वायू कोणता ? 

- नायट्रस ऑक्साईड. 

 

०२) भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार कोण ? 

- सी.के.नायडू. 

 

०३) गुप्तकालीन जगप्रसिद्ध बौद्धविद्यापीठ कोणते ? 

- नालंदा. 

 

०४) महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो ? 

- नाशिक 

 

०५) अंतराळ संशोधन करणारी अमेरीकेची संस्था कोणती ? 

- नासा. 

 

०६) मार्को पोलो याचे वडील कोण ? 

- निकोलो पोलो. 

 

०७)  प्रसारभारतीचे पहिले अध्यक्ष कोण ? 

- निखील चक्रवर्ती. 

 

०८) जहांगीर बादशहाच्या राणीचे नाव काय आहे ? 

- नूरजहान. 

 

०९) जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे. 

- नेपाळ. 

 

१०) अरुणाचल प्रदेशचे जुने नाव काय होते ? 

- नेफा.


अतिमहत्त्वाची माहिती


🔑भारतीय अवकाश संशोधन संस्था🔑

(Indian space research organisation ISRO)

स्थापना : 15 ऑगस्ट 1969

इस्रोचे मुख्यालय :  बंग‌ळूरू

श्रीहरीकोटा आंध्र प्रदेश अंतरिक्षित उपग्रह प्रक्षेपित केंद्र

भारताने 1975 मध्ये  सोवियत युनियन च्या मदतीने पहिला "आर्यभट्ट "उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले

भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट आहे प्रक्षेपण 1975 मध्ये करण्यात आला..

थूबा इक्विटोरियल लाँच सेंटर केरळ राज्यामध्ये आहे...

नाग रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे


🔑संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ)🔑

स्थापना:  1958

उद्देश भारताला संरक्षणाची साधने उपकरणे बनवण्याबाबतीत स्वावलंबी बनवणे.

भारतीय क्षेपणास्त्राचे व ""मिसाईल मॅनचे जनक""  डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना म्हटले जाते.


🔑ONGC 🔑

ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन

स्थापना 1956

उद्देश:  खनिज तेल व नैसर्गिक वायू याचा शोध घेणे

दिग्गोई खनिज तेल केंद्र आसाम राज्यात आहे.

अंकलेश्वर खनिज तेल केंद्र गुजरात येथे आहे.



🔑कोकण रेल्वे🔑

स्थापना :1998

कोकण रेल्वे महाराष्ट्र ,गोवा ,कर्नाटक, केरळ (चार) राज्यातून प्रवास करते..

कोकण रेल्वे वरील सर्वात मोठा बोगदा (कारबुडे) हा असून लांबी (6.5 किमी) आहे..

कोकण रेल्वे वरील सर्वात उंच पूल (पानवल) हा असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे .



🔑भारतीय अणुऊर्जा आयोग🔑

स्थापना: 10 डिसेंबर 1948

तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू हे होते.

अनुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा हे होते

अणुऊर्जा आयोगाने 1956 मध्ये भारतातील पहिली अणुभट्टी ""अप्सरा"" कार्यान्वित केली.

महाराष्ट्रातील GI मानांकन मिळालेली पिके


🔥 जळगाव - केळी

🔥 जळगाव - जळगाव वांगी

🔥 नागपूर - संत्री

🔥 जालना - मोसंबी

🔥 लासलगाव - कांदा


🔥 महाबळेश्वर - स्ट्राबेरी

🔥 सोलापूर - डाळींब

🔥 वेंगुर्ला - काजू

🔥 डहाणू - चिकू

🔥 वायगाव - हळद


🔥 नवापूर - तूरडाळ

🔥 मराठवाडा - केशर आंबा

🔥 मंगळवेढा - ज्वारी

🔥 कोरेगाव - घेवडा

🔥 नाशिक - द्राक्षे


⭐️ बीड - सीताफळ

⭐️ भिवापूर - मिरची

⭐️ कोल्हापूर - गुळ

⭐️ आजरा - घनसाळी तांदूळ

⭐️ सांगली - हळद


✅ सांगली - बेदाणे

✅ पुरंदर - अंजीर

✅ सिंधुदुर्ग, रत्नागिरी - कोकम

✅ रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर, ठाणे,        

✅ रायगड -  हापुस आंबा

सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे


1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?

उत्तर:- malic ऍसिड✅


२) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?

उत्तर:- टार्टारिक आम्ल✅


3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?

उत्तर:-  लैक्टिक ऍसिड✅


4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?

उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅


5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?

उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅


6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?

उत्तर:- सायट्रिक आम्ल✅


7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?

उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅


8) किडनी स्टोनला काय म्हणतात?

उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅


9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?

उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅


10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?

उत्तर:-  केरळ✅


11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:-  गुरुग्राम (हरियाणा)


12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?

उत्तर :- तिरुवनंतपुरम


13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?

उत्तर:- श्री हरिकोटा✅


14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?

उत्तर:-  नवी दिल्ली✅


15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?

उत्तर:- कटक (ओडिशा)✅


16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?

उत्तर :- भारत✅


17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?

उत्तर:- मेजर ध्यानचंद✅


18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?

उत्तर:- हरितगृह वायू✅


19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?

उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅


20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?

उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅


21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?

उत्तर:-  1912 मध्ये✅


22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅


23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?

उत्तर :- मनिला✅


24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर :- नैरोबी, केनिया✅


25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- जिनिव्हा.✅


26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- पॅरिस✅


27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- लंडन✅


28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- व्हिएन्ना✅


29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- पॅरिस✅


30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?

उत्तर :- जिनिव्हा✅


31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?

उत्तर:- space-x✅


32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?

उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅


33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?

उत्तर:- PSLV C37✅


34) शिपकिला पास कोठे आहे?

उत्तर:- हिमाचल प्रदेश✅


35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?

उत्तर :-शिपकिला पास✅


36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?

उत्तर :- सिक्किम✅


37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?

उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅


38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:- मणिपूर✅


39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?

उत्तर:- मध्य प्रदेश✅


40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?

उत्तर:- ओडिशा✅


41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:- कर्नाटक✅


42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:- झारखंड✅


43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:- महाराष्ट्र✅


44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?

उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅


45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?

उत्तर:- पंचायत शैली✅


46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?

उत्तर:- चारबाग शैली✅


47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?

उत्तर:- हुमायूनची कबर✅


48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?

उत्तर:- द्रविड शैली✅


49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?

उत्तर:- चोल शासक✅


५०) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?

उत्तर:- तंजोर.✅


मुंबई जिल्हा विशेष माहिती


✅ द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? 

👉 1 नोव्हेंबर 1956 


✅ द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? 

👉 यशवंतराव चव्हाण 


✅ महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? 

👉मुंबई शहर 


✅ मुंबई शहराचे क्षेत्रफळ किती आहे?👉157 चौ. किमी 


✅ बृहमुंबई मधून कोणत्या वर्षी मुंबई शहरा व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली? 

👉 सन 1990


✅ बॉम्बे या शहराचे मुंबई असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? 

👉 सन 1995


✅ महाराष्ट्रातील सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? 

👉 मुंबई शहर 


✅ महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता ? 

👉 मुंबई उपनगर 


✅ मुंबई शहरात एकूण किती तालुके व जिल्हा परिषद आहेत? 

👉 एकही नाही 


✅ मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? 

👉 नाशिक 


✅ महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानीचा दर्जा असलेले शहर कोणते ? 

👉 मुंबई 


✅ भारताचे पॅरिस म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? 

👉 मुंबई


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Imp इन्फॉर्मशन


◾️  भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ?

➖️ दादासाहेब फाळके.


◾️  डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

➖️ रूडाल्फ डिझेल.


◾️  'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

➖️ अनंत भवानीबाबा घोलप.


◾️  व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

➖️ २७० ते २८० ग्रॅम.


◾️ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

➖️ ४ सप्टेंबर १९२७


◾️ भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?

➖️वड.


◾️विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?

➖️थाॅमस अल्वा एडिसन.


◾️ कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?

➖️ विंबलडन.


◾️भारतीय संविधानाचा सरनामा कोणी तयार केला ?

➖️ जवाहरलाल नेहरू.


◾️  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?

➖️ २० मार्च १९२७


📌 पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत - पुल्लमपारा, केरळ


📌 पहिली सॅनिटरी नॅपकिन मोफत पंचायत - कुंबलांगी, केरळ


📌 सर्व ग्रामपंचायतींमध्ये सामुदायिक ग्रंथालये आहेत- जामतारा, झारखंड


📌 100% साक्षर आदिवासी जिल्हा - मंडळा, मध्यप्रदेश


📌 5G तंत्रज्ञान लागू करणारा पहिला महत्त्वाकांक्षी जिल्हा - विदिशा MP


📌 ग्रीन बॉड लाँच करणारी देशातील पहिली नागरी संस्था - इंदोर


📌 10,000 नवीन MSME ची नोंदणी करणारा पहिला जिल्हा - एर्नाकुलम


📌 सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी स्वराज करंडक - कोल्लम


📌 भारतातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी पर्यटन बोट- केरळ

अर्थशास्त्र समित्या


1) रंगराजन समिती ➖️ निर्गुंतवणूक


2) नरसिंहम समिती ➖️ आर्थिक क्षेत्रातील सुधारणा


3) केळकर समिती ➖️ कर सुधारणा


4) मल्होत्रा समिती ➖️  विमा सुधारणा


5) आबिद हुसेन समिती ➖️ लघुउद्योग


6) बेसल समिती ➖️ बँकिंग पर्यवेक्षण


7) चक्रवर्ती समिती ➖️ आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी चलनविषयक धोरणाची परिणामकारकता सुधारण्यासाठी आर्थिक व्यवस्थेवर काम करणे आणि उपाय सुचवणे.


8) दीपक पारेख समिती ➖️  UTI पुनरुज्जीवित करण्यासाठी


9) हनुमंत राव समिती ➖️  खत

पारिख समिती पायाभूत सुविधा वित्तपुरवठा


10) राजा चेल्ल्या समिती कर सुधारणा

रेखी समिती अप्रत्यक्ष कर


11) टंडन समिती ➖️  बँकांद्वारे कार्यरत भांडवल वित्तपुरवठा प्रणाली


12) तारापूर समिती ➖️  भांडवली खाते परिवर्तनीयता


13) वाघुल समिती ➖️  भारतातील मुद्रा बाजार


14) वायव्ही रेड्डी ➖️  आयकर सवलतींचा आढावा


15) अभिजित सेन समिती ➖️   दीर्घकालीन अन्न धोरण


16) अत्रेय समिती ➖️ आयडीबीआयची पुनर्रचना


17) भुरेलाल समिती ➖️ मोटार वाहन करात वाढ


18) बिमल जुल्का समिती ➖️ ATCOs च्या कामकाजाची स्थिती

क्रिकेट विश्वचषक विजेता संघ


 1. वेस्ट इंडिज - 1975 विश्वचषक - 23 मार्च 1975


 2. वेस्ट इंडिज - 1979 विश्वचषक - 23 जून 1979


 3. भारत - 1983 विश्वचषक - 25 जून 1983


 4. ऑस्ट्रेलिया - 1987 विश्वचषक - 8 नोव्हेंबर 1987


 5. पाकिस्तान - 1992 विश्वचषक - 25 मार्च 1992


 6. श्रीलंका - 1996 विश्वचषक - 17 मार्च 1996


 7. ऑस्ट्रेलिया - 1999 विश्वचषक - 20 जून 1999


 8. ऑस्ट्रेलिया - 2003 विश्वचषक - 23 मार्च 2003


 9. ऑस्ट्रेलिया - 2007 विश्वचषक - 28 एप्रिल 2007


 10. भारत - 2011 विश्वचषक - 2 एप्रिल 2011


 11. ऑस्ट्रेलिया - 2015 विश्वचषक - 29 मार्च 2015


 12. इंग्लंड - 2019 विश्वचषक - 14 जुलै 2019


 धन्यवाद........😊🙏

"( मराठी सामान्य ज्ञान )"

परीक्षेसाठी महत्वाचे


◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक


◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच


◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक


◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच


◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच


◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती


◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी


◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO


◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष


◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी


◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष 


◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी


◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त


◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर


◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त

गोदावरी नदी


१) महाराष्ट्रातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे. 


२) गोदावरी नदी खोरे राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे (४९ %) क्षेत्र व्यापलेले आहे. 


३) गोदावरी नदीला ‘दक्षिणेतील गंगा’, ‘संतांची भूमी’, ‘वृद्धगंगा’ या नावाने ओळखतात. 


४) नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे झाला. 


५) नदीची एकूण लांबी = १४५० कि.मी. 


६) महाराष्ट्रातील प्रवाहाची लांबी = ६६८ कि.मी. 


७) नदीचा प्रवास = महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश 


८) प्रवाहाची दिशा = पश्चिमेकडून पूर्वेकडे 


९) नदीच्या उपनद्या = मांजरा, दारणा, मुळा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, सिंधफणा, प्रवरा, इंद्रावती, इरई, प्राणहिता, कादवा, दुधना, दक्षिणपूर्णा, कुंडलिका 


१०) गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा व दक्षिण विदर्भातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते. 


११) गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण (पहिले मातीचे धरण), औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण (राज्यातील सर्वात मोठे बहुउद्देशीय धरण), नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण, धर्माबाद (जिल्हा नांदेड) येथील बाभळी धरण आहेत. 


१२) जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला “नाथसागर” असे म्हणतात.

 

१३) नाथसागरातील जलाशयापासून पैठण येथे “म्हैसूरच्या वृंदावन गार्डन” च्या धर्तीवर ज्ञानेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात आली. 


१४) प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे ह्या नद्यांचा संगम होतो. 


१५) गोदावरी नदी आंध्रप्रदेश राज्यातील राजमहेंद्री ह्या शहराजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.

_____________________________

Important Lakes in India



🔹डल झील :- जम्मू-कश्मीर

🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर

🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर

🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर

🔹नागिन झील :- जम्मू-कश्मीर

🔹शेषनाग झील :- जम्मू-कश्मीर

🔹अनंतनाग झील :- जम्मू-कश्मीर

🔹राजसमंद झील :- राजस्थान

🔹पिछौला झील :- राजस्थान

🔹सांभर झील :- राजस्थान

🔹जयसमंद झील :- राजस्थान

🔹फतेहसागर झील :- राजस्थान

🔹डीडवाना झील :- राजस्थान

🔹लूनकरनसर झील :- राजस्थान


🔹सातताल झील :- उत्तराखंड

🔹नैनीताल झील :- उत्तराखंड

🔹राकसताल झील :- उत्तराखंड

🔹मालाताल झील :- उत्तराखंड

🔹देवताल झील :- उत्तराखंड

🔹नौकुछियाताल झील :- उत्तराखंड

🔹खुरपताल झील :- उत्तराखंड

🔹हुसैनसागर झील :- आंध्रप्रदेश

🔹कोलेरू झील :- आंध्रप्रदेश

🔹बेम्बनाड झील :- केरल

🔹अष्टमुदी झील :- केरल

🔹पेरियार झील :- केरल

🔹लोनार झील :- महाराष्ट्र

🔹पुलीकट झील :- तमिलनाडु एवं आँध्रप्रदेश

🔹लोकटक झील :- मणिपुर

🔹चिल्का झील :- उड़ीसा

ब्राह्मो समाजाची उद्दिष्टे


🌿  हिंदू धर्माचे शुद्धीकरण करुन भारतीय लोकांना खऱ्या धर्माच्या तत्त्वाची ओळख करुन देणे.


🌷  समाजातील अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा, चालीरीती नाहीशा करणे.


🌿  ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या हिंदू धर्मावरील टीकेला व धर्मांतरास विरोध करणे आणि त्यांच्या धर्म प्रसार कार्यास शह देणे.


🌷  हिंदू धर्मात आणि समाजात सुधारणा घडवून आणणे.


🦋🦋  ब्राह्मो समाजाचे तत्त्वज्ञान  🦋🦋


🌷  एकेश्वरवाद   : ईश्वर हा एकच असून तो निर्गुण, निराकार आहे. ईश्वर हा या अनंत जगाचा निर्माता व नियत्ता आहे. त्या निराकार अशा ईश्वराची उपासना करावी. ईश्वराच्या उपासनेसाठी कोणत्याही कर्मकांडाची जरुरी नाही.


🌿  मूर्तीपूजेस विरोध  : मूर्तीपूजेला विरोध केला. ईश्वराचे अस्तित्त्व मूर्तीत अथवा वस्तूत नसल्यामुळे मूर्तीपूजा करू नये.


🌷  बंधुत्त्वाची भावना : ईश्वर हा आपणा सर्वांचा पिता आहे. म्हणून आपण सर्वजण एकमेकांचे बंधू आहोत.


🌿  अवतारवादास विरोध : ईश्वर हा निराकार असल्यामुळे तो साकार होऊ शकत नाही. त्यामुळे अवतारवादाची कल्पना भ्रामक व चुकीची आहे.


🌷  आत्म्याचे अमरत्त्व : आत्मा हा अमर असून तो आपल्या कृत्याबद्दल फक्त ईश्वरालाच जबाबदार असतो.


🌿  सर्व धर्मातील ऐक्य  : नीतीमत्ता, सदाचार, मानवाबद्दलचे प्रेम, भूतदया यामुळे विविध धर्मात ऐक्य निर्माण होते.


🌷  विश्वबंधुत्त्वावर श्रद्धा : ब्राह्मो समाज सर्व धर्मातील तत्त्वज्ञानाचा आदर करतो. त्याची निंदा करत नाही. त्यामुळे विश्वबंधुत्वावर श्रद्धा आहे.


🌿  प्रेम, परोपकार, सेवा : धर्माचा खरा अर्थ प्रेम, परोपकार, सेवा असा आहे, हे गृहीत धरुन एकमेकांशी व्यवहार करावेत.


  ब्राह्मो समाजात फूट 🦋🦋


देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यात तात्त्विक मतभेद निर्माण झाले. 

केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजातून इ. स. १८६६ मध्ये बाहेर पडले व त्यांनी भारतीय ब्राह्मो समाज स्थापन करुन समाज कार्य सुरू केले.


               🌿🌿🌿🌷🌷🌿🌿🌿


देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्त्वाखाली असणारा समाज आदि ब्राह्मो समाज  या नावाने कार्य करू लागला.


इ. स. १८७८ मध्ये केशवचंद्र सेन यांच्या भारतीय ब्राह्मो समाजात फूट पडली. केशवचंद्र सेन यांनी आपल्या १३ वर्षे वय असणाऱ्या मुलीचा विवाह कुचबिहारच्या राजाबरोबर वैदिक पद्धतीने लावून दिला. त्यांनी स्वत:च सिव्हिल मॅरेज ॲक्टचा भंग केल्याने शिवनाथ शास्त्री, आनंद मोहन बोस, शिवचंद्र दत्त, उमेशचंद्र दत्त यासारखे जहाल तरुण ब्राह्मो समाजात फूट पडली .


             🌿🌿🌷🌷🌷🌿🌿🌿


देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यात तात्त्विक मतभेद निर्माण झाले. केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजातून इ. स. १८६६ मध्ये बाहेर पडले व त्यांनी ‘भारतीय ब्राह्मो समाज’ स्थापन करुन समाज कार्य सुरू केले.


देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्त्वाखाली असणारा समाज आदि ब्राह्मो समाज या नावाने कार्य करू लागला.


            🌿🌿🌷🌷🌷🌿🌿🌿


इ. स. १८७८ मध्ये केशवचंद्र सेन यांच्या भारतीय ब्राह्मो समाजात फूट पडली. केशवचंद्र सेन यांनी आपल्या १३ वर्षे वय असणाऱ्या मुलीचा विवाह कुचबिहारच्या राजाबरोबर वैदिक पद्धतीने लावून दिला. त्यांनी स्वत:च सिव्हिल मॅरेज ॲक्टचा भंग केल्याने शिवनाथ शास्त्री, आनंद मोहन बोस, शिवचंद्र दत्त, उमेशचंद्र दत्त यासारखे जहाल तरुण भारतीय ब्राह्मो समाजातून बाहेर पडले व त्यांनी १८७८ मध्ये ‘साधारण ब्राह्मो समाज स्थापना केला.


राज्यसभा बद्दल संपूर्ण माहिती


राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून ते व्दितीय सभागृह आहे असे म्हटले जाते तर लोकसभा कनिष्ठ सभागृह असून प्रथम सभागृह मानले जाते.


सभासदांची संख्या :

घटनेच्या 80 व्या कलमामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, राज्यसभेची सभासद संख्या 250 इतकी असेल त्यातील 238 निर्वाचित असतील तर 12 सदस्य भारताच्या राष्ट्रपतींकडून नियुक्त केलेले असतील यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ असतील.

उदा. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक इ.


उमेदवारांची पात्रता :

घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे:

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.


निवडणूक पद्धत :

राज्यसभेच्या सदस्यांची निवड भारतीय नागरिकांकडून न करता प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांकडून केली जाते व ही निवडणूक पद्धत प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्ष आहे.


राज्यसभेचा कार्यकाल :

राज्यसभा हे स्थायी सभागृह असून दर दोन वर्षानी 1/3 सभासद निवृत्त होतात. तेवढेच त्याच्या जागी नव्याने निवडतात.


सभासदांचा कार्यकाल :

प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 6 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी तो आपला राजीनामा राज्यसभेच्या अध्यक्षाकडे देऊ शकतो.


पदमुक्तता :

कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)


बैठक किंवा आधिवेशन :

घटनेच्या 85/1 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची योग्य वाटेल त्यावेळी अधिवेशन बोलवितो परंतु या अधिवेशनामध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे.


गणसंख्या :

कोणतेही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.


राज्यसभेचा सभापती :

घटनेच्या 89व्या कलमानुसार भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तो राज्यसभेचा सभासद नसल्यामुळे त्याला सभागृहात मतदान करण्याचा अधिकार नाही परंतु 100 व्या कलमानुसार समान मते पडल्यास तो आपले निर्णायक मत देऊ शकतो.


उपाध्यक्ष :

राज्यसभेतील निवडून आलेल्या एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते.

लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती:


लोकसभेची निर्मिती ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवर करण्यात आली आहे.


सभासदांची संख्या :

घटनेच्या 81 व्या कलमामध्ये लोकसभेच्या सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. 1974 च्या 31 व्या घटनादुरुस्तीनुसार घटकराज्यांच्या सभासदांची संख्या 525 तर केंद्रशासीत प्रदेशांची सभासद संख्या 20 इतकी करण्यात आली आहे. परंतु लोकसभेत जास्तीत जास्त 552 इतके सभासद सांगितले आहेत. त्यामध्ये 530 घटकराज्य. 20 केंद्रशासीत प्रदेश आणि जर अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेत प्रतिनिधीत्व मिळाले नाही तर दोन सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. भारतीयलोकप्रतींनिधी कायदा 1951 नुसार पाच ते साडेसात लाख मतदारांमागे एक लोकसभेचा उमेदवार निवडला जातो.


मतदारसंघ निर्धारण आयोग :

या आयोगाची निर्मिती 1972 साली करण्यात आली. त्या आयोगाचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश असतो.


उमेदवारांची पात्रता :

घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.


निवडणूक पद्धत :

लोकसभेची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते. ती निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली होते.


लोकसभेचा कार्यकाल :

पाच वर्ष इतका आहे परंतु तो कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. आणीबाणीच्या कालखंडात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच एका वर्षासाठी 83/2 कलमानुसार वाढवू शकतो.


सभासदांचा कार्यकाल :

प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 5 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतींकडे देऊ शकतो.


बैठक किंवा अधिवेशन :

घटनेच्या 85 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची वाटेल त्या वेळी अधिवेशन बोलवितो परंतु दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


गणसंख्या :

कोणत्याही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.


पदमुक्तता :

कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)


लोकसभेचा सभापती कार्य आणि अधिकार :

लोकसभेत निवडून आलेल्या एका सदस्याची सभापती म्हणून व दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून लोकसभेतील सदस्यांकडून निवड केली जाते.


कार्य :

1. धनविधेयक आहे की नाही हे ठरविणे.

2. प्रश्न आणि उपप्रश्न विचारण्यास परवानगी देणे.

3. प्रवर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे.

4. कमरोको प्रस्ताव आणण्यासाठी सभापतींची परवानगी आवश्यक आहे.

5. सभागृहात शांतता व सुव्यवस्था राखणे.

6. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यासाठी पुरेशी गणसंख्या नसेल तर कामकाज थांबविणे.

7. राष्ट्रपतीने दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलविल्यास अध्यक्षपद भूषविणे.

8. सामान्य उद्देश समिती, नियम समिती व कार्यवाही समितीचा सभापती पदसिद्ध अध्यक्ष असतो.

__________________________________

विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती



घटकराज्यांमध्ये व्दिगृही विधिमंडळ असावे की नसावे याबाबद निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे. सध्या देशामध्ये सात घटकराज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश,जम्मू काश्मीर आणि कर्नाटक , तेलंगणा , आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे.


विधानपरिषदेची रचना :

1956 च्या 7 व्या घटनादुरूस्तीनुसार असे निर्धारित करण्यात आले आहे की, विधानपरिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी आणि 40 पेक्षा कमी नसावी. सध्या महाराष्ट्रात 78 इतकी सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. 171/2 नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे 5/6 सदस्य निर्वाचित असतात तर 1/6 सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले सदस्य नसतात त्यांची रचना पुढीलप्रमाणे आहे.


विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी :

1. 1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.


2. 1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.


3. 1/12 शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.


4. 1/12 पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.


5. 1/6 राज्यपालाकडून सदस्य निवडले जातात यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.


सदस्यांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.


सदस्यांचा कार्यकाल : 

सदस्यांचा कार्यकाल सहा वर्ष इतका असतो.


विधानपरिषदेचा कार्यकाल :

विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.


गणसंख्या : 1/10

अधिवेशन : 

दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


सभापती व उपसभापती :

विधानपरिषदेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा


१) मध्य प्रदेश 🐯 :-

 नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया..


२) कर्नाटक 🌮 :-

 कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड..


३) आंध्र प्रदेश 🍂 :-

 गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड..


४) गुजरात 🌾 :- 

ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे..


५) दादरा, नगर-हवेली 🏄🏼 :-

 ठाणे, नाशिक..


६) छत्तीसगड ⛰:-

 गोंदिया, गडचिरोली..


७) गोवा 🌴:-

 सिंधुदुर्ग.. 

मराठी व्याकरण

    शब्दाच्या जाती


1)नाम -

जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.

उदाहरण - घर, आकाश, गोड


2)सर्वनाम-


 जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.

उदाहरण - मी, तू, आम्ही


3) विशेषण-

 जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.

उदाहरण - गोड, उंच


4)क्रियापद- 

जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.

उदाहरण - बसणे, पळणे


5)क्रियाविशेषण- 

जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.

उदाहरण - इथे, उद्या


6) शब्दयोगी अव्यय- 

जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी



7) उभयान्वयी अव्यय-

 जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - व, आणि, किंवा


8) केवलप्रयोगी अव्यय-

 जे शब्द आपल्या मनातील वृत्तीकिंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - अरेरे, अबब

"विषाणु द्वारे होणारे रोग(Trick)"


TRICK-"रेखा हमे हिट करके पोएचे (पीछे) छोड़ गई"


रे-रेबीज

खा-खसरा


ह-हर्पीस

में-मेनिनजाईटिस


हि-हिपेटाइटीस

ट-ट्रेकोमा  


"करके-silent"


पो-पोलियो

ए-एड्स

चे-चेचक (बड़ी माता)


छो-छोटी माता

ड-डेंगू ज्वर (पित्त ज्वर)


ग-गलसोध (mumps)

ई-इन्फ्लुन्ज़ा (स्वाइन फ्लू N1H1)



1) देवी (Small Pox): 

हा रोग variola व्हायरस या विषाणूंमुळे होतो.

या रोगामुळे मज्जासंस्थेला प्रादुर्भाव होतो.

या रोगाचा प्रसार खोकल्यापासून उडणाऱ्या दूषित थेंबांमुळे होतो.

लक्षणे: ताप, संसर्गानंतर ३/४ दिवशी अंगावर पुळ्या, पुढील टप्प्यात आंधळेपणा

लस: देवीची लस

1975 पासून भारतात देवीची लास देण्यात येत आहे.


2) कांजण्या (Chicken Pox)

हा रोग Vericella -zoster या विषाणूमुळे होतो.

हा रोग मुख्यतः लहान मुलांचा आहे. मात्र, तो तरुणांना सुद्धा होऊ शकतो.

हा रोग धोकादायक नाही.

लक्षणे: ताप, डोकेदुखी, संसर्गाच्या पहिल्या दिवशीच पुरळ

लस: उपलब्ध नाही. मात्र, एकदा होऊन गेल्यावर आयुष्यभर संरक्षण.


3) गोवर (Measles)

हा रोग Myxovirus या विषाणूंमुळे होतो.

हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.

लक्षणे: ताप, कोरडा घसा, तिसऱ्या दिवशी तोंडांत पांढरा ठिपका, चौथ्या दिवशी पुरळ

लस: गोवर विरोधी लस – आयुष्यभर संरक्षण

भारतात गोवर हे बालमृत्यूचे प्रमुख कारण आहे.



4) रुबेला (Rubella किंवा Gernman measles)

हा रोग Myxovirus या विषाणूमुळे होतो.

हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.

या रोगांमुळे मानेतील ग्रंथींना प्रादुर्भाव होतो.

लक्षणे: ताप, मानेतील ग्रंथींचा दाह, संसर्गाच्या पहिल्या दिवशी पुरळ,

गर्भारपणाच्या पहिल्या चार महिन्यात आईला झाल्यास मूल मतिमंद तसेच बहिरे होण्याची शक्यता असते.

लस: रुबेला -विरोधी लस. जीवनभर संरक्षण.


5) गालफुगी (Mums)

हा रोग Paramyxo Virus या विषाणूंमुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव लाळेच्या ग्रंथींना होतो. लाळेच्या ग्रंथींना सूज आल्याने गाळ फुगल्यासारखा दिसतो.

लक्षणे: ताप, लाळेच्या ग्रंथींना सूज, अन्न-पाणी गिळण्यास त्रास.

हा मुख्यतः लहान मुलांना होतो, मात्र तरुण माणसास झाल्यास तो वांझ होऊ शकतो.

लस: गालफुगीविरोधी लस. 



6) पोलिओ (Poliomycetis):

हा रोग Entero virus या विषाणूमुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती मज्जासंस्थेला होतो.

या रोगामुळे हात – पाय लुळें होऊ शकतात व असा प्रादुर्भाव मुख्यतः लहानपणीच होत असतो.


लस: पोलिओच्या विरोधी दोन लसींचा वापर केला जातो.

१) Salf  V – शरीरात इंजेकशनद्वारे दिली जाते.

२) सेबीने – तोंडाद्वारे दिली जाते.


WHO ने भारतासाठी Sebine या लसीची शिफारस केली आहे.

November 1995 पासून भारताने प्लस पोलिओ इम्युनायझेशन कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत पाच वर्षाखालील मुलांना OPV (Oral Polio Vaccine) दिले जाते.


भारतातील विविध घटनांची पहिली सुरुवात :


पहिले वर्तमान पत्र - द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)

 पहिली टपाल कचेरी - कोलकत्ता (1727)

 पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन - मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)  

 पहिले संग्रहालय - इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)

 पहिले क्षेपणास्त्र - पृथ्वी (1988)

 पहिले रेल्वेस्थानक - बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)

 पहिले रेल्वेस्थानक - जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)

 पहिले राष्ट्रीय उद्यान - सिंद्री (झारखंड) - 1951

 पहिला खत प्रकल्प - मेट्रो रेल्वे कोलकत्ता

 पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे दिल्ली

 पहिले व्यापारी विमानोड्डापण - कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)

 पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)

 पहिले पंचतारांकित हॉटेल - ताजमहाल, मुंबई (1903)

 पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)

 पहिला बोलपट - आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)

 पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा

 पहिले जलविद्युत केंद्र - दार्जिलिंग (1898)

 पहिला तेलशुद्धीकरण कारखाना - दिग्बोई (1901, आसाम)

 पहिला आधुनिक पोलाद कारखाना - कुल्टी, प.बंगाल

 पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली (1959)

 पहिली अनुभट्टी - अप्सरा, तारापूर (1956)

 पहिले अंटार्क्टिका मोहीम - डिसेंबर 1981, मोहीम प्रमुख प्रा. कासीम

 पहिले विद्यापीठ - कोलकत्ता (1957)

 पहिला स्कायबस प्रकल्प - मडगाव, गोवा

 पहिले रासायनिक बंदर - दाहेज, गुजरात

 भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा - विजयंता

 पहिले टेलिफोन एक्सचेंज - कोलकत्ता (1881)

 भारताचे पहिले लढाऊ विमान - नॅट

 पहिला उपग्रह - आर्यभट्ट (1975)

 भारतीय बनावटीची पहिलीपाणबुडी - शाल्की  

 पहिला अणुस्फोट - पोखरण (18 मे, 1974 राजस्थान)

 भारताचे अंटार्क्टिकावरील पहिले स्थानक - दक्षिण गंगोत्री (दुसरे-मैत्री)  

 पहिला सहकारी साखर कारखाना - प्रवरानगर (1949) अहमदनगर  

 भारताची पहिली आण्विक पाणबुडी - आय.एन.एस.चक्र

 पहिली सहकारी सुतगिरणी - कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर

 भारतीय बनावटीची पहिली युद्ध नौका - आय.एन.एस.दिल्ली

 पंचायतराज पद्धतीचा स्विकार करणारे पहिले राज्य - राजस्थान

 भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा - एर्नाकुलम (केरळ)  

 भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर - कोट्टायम (केरळ)

 भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना - कोइंबतुर (1920)

_____________________________________

Daily Top 10 News : 25 JULY 2023


1) ढाका-टोंगी-जॉयदेबपूर रेल्वे मार्गाच्या सिग्नलिंग प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी भारताने बांगलादेशशी करार केला.


2) बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांना १२ कोटी रुपयांचा कर भरण्याचे आदेश दिले आहेत


3) अमित शहा यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भगवान श्रीरामाच्या 108 फूट उंच पुतळ्याची पायाभरणी


4) देशात रेडिओचा प्रसार वाढवण्यासाठी सरकार 284 शहरांमधील 808 चॅनेलचा ई-लिलाव करणार आहे.


5) न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी हैदराबाद येथे तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली


6) सोमवारी मणिपूरमधील खोंगसांग रेल्वे स्थानकावर अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी मालवाहू ट्रेन येण्याची अपेक्षा आहे


7) सात्विकसाईराज रँकीरेड्डी-चिराग शेट्टीने कोरिया ओपन बॅडमिंटन पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले


8) अल-नासरमध्ये सामील होण्यासाठी मॅन युनायटेड सोडताना अॅलेक्स टेल्स रोनाल्डोसोबत पुन्हा एकत्र आला


9) बेन कॅपिटल अदानी कॅपिटल, अदानी हाऊसिंगमधील 90% हिस्सा घेणार


10) एक्सप्रेसचे संस्थापक RNG चे सहकारी नोरतन मल दुगर यांचे निधन.

महत्वाच्या जागतिक संघटना व त्यांचे प्रमुख


◆  संयुक्त राष्ट्रसंघ  —  एंटोनियो गुटेरेस


◆ आंतरराष्ट्रीय न्यायालय — जोआन  दोनोग


◆ जागतिक व्यापार संघटना — न्गोज़ी ओकोंजो-इवेला


◆  जागतिक कामगार संघटना — गिल्बर्ट होंगबो


◆ जागतिक आरोग्य संघटना — टेड्रोस अधानोम गेब्रेयसस


◆ जागतिक बँक — डेव्हिड मालपास


◆ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी — क्रिस्टालिना जॉर्जिव्हा


◆ ओपेक संघटना — हैथम अल-घैसी


◆ आशियाई विकास बँक - मासात्सुगु असाकावा


◆ युरोपियन युनियन — उर्सुला वॉन डेर लेयेन


◆ आशियान संघटना — लिम जॉक होई


◆ सार्क संघटना — एसाला रुवान वीराकून


◆ युनेस्को — ऑड्रे अज़ोले


◆ युनिसेफ — कैथरीन रसेल


◆ आयसीसी — ज्योफ ॲलार्डिस


◆ ऑलिम्पिक समिती  — थॉमस बक


◆ इंटरपोल — अहमद नासर अल-रईसी

एमपीएससी 2024 कम्बाईन आणि राज्यसेवा अंदाजे जागा

दुय्यम निबंधक:- 42

PSI :- 605

STI :- 420 

ASO :- 110

Clerk :- 2200

Tax asst :- 450

Excise :- 32

AMVI :- 182

Industrial :- 41

Technical asst :-12

राज्यसेवा संयुक्त पुर्व परीक्षा 2024... ( एकुण जागा 745 )

चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचे


➡️ महाराष्ट्र राज्याचा स्वच्छ मुख अभियानाचा स्माईल ॲम्बेसिडर कोण आहे ?

👉 सचिन तेंडुलकर


➡️ भारताच्या नवीन संसदेत लोकसभेचे आसन संख्या किती आहे ?

👉 888


➡️ भारताच्या नवीन संसदेत राज्यसभेचे आसन संख्या किती आहे ?

👉 384


➡️ भारताच्या नवीन संसदेत लोकसभा व राज्यसभा मिळून एकूण आसन किती आहे ?

👉 1272


➡️ समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा कोणता सुरू करण्यात आला आहे ?

 👉 शिर्डी ते भरवीर


➡️ जी - 20 अंतर्गत आपत्ती धोका निवारण कार्य गटाची बैठक कोठे पार पडले ?

👉 मुंबई


➡️ जागतिक अथलेटिक्स क्रमवारीत पहिले स्थान पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?

👉 नीरज चोप्रा


➡️ कर्नाटक या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत ?

👉 सिद्धरामय्या

सरळसेवा भरती 2023 उपयुक्त महत्वाचे शोध व संशोधक

◆ सापेक्षता सिद्धांत ➖ आईन्स्टाईन

◆  गुरुत्वाकर्षण ➖  न्यूटन

◆  क्ष-किरण ➖  विल्यम रॉटजेन

◆ डायनामाईट  ➖ अल्फ्रेड नोबेल

◆ अणुबॉम्ब ➖ ऑटो हान

◆ रेडिअम ➖ मेरी क्युरी व पेरी क्यूरी

◆ न्युट्रॉन  ➖ जेम्स चॅड्विक

◆ इलेक्ट्रॉन ➖ जे जे थॉम्पसन

◆  प्रोटॉन ➖  रुदरफोर्ड

◆ ऑक्सीजन ➖ लॅव्हासिए

◆ नायट्रोजन  ➖ डॅनियल रुदरफोर्ड

◆ कार्बनडाय ऑक्साइड ➖ रॉन हेलमॉड

◆ हायड्रोजन ➖ हेन्री कॅव्हेंडिश

◆ विमान ➖ राईट बंधू

◆ रेडिओ ➖ जी.मार्कोनी

◆ टेलिव्हिजन ➖ जॉन बेअर्ड

◆ विजेचा दिवा,ग्रामोफोन ➖ थॉमस एडिसन

◆ डायनामो ➖ मायकेल फॅराडे

◆ वाफेचे इंजिन ➖ जेम्स वॅट

◆ टेलिफोन ➖ अलेक्झांडर ग्राहम बेल

◆ थर्मामीटर ➖ गॅलिलिओ

◆ सायकल ➖ मॅक मिलन

◆ अणू भट्टी ➖  एन्रीको फर्मी

◆ अनुवंशिकता सिद्धांत ➖ ग्रेगल मेंडेल

◆ पेनिसिलीन ➖ अलेक्झांडर फ्लेमिंग

◆ पोलिओची लस ➖ साल्क

◆  देवीची लस ➖ एडवर्ड जेन्नर

◆ अँटीरॅबिज लस ➖ लुई पाश्चर

◆ जीवाणू ➖ लिवेनहाँक

◆ रक्तगट ➖ कार्ल लँन्डस्टँनर

◆  मलेरियाचे जंतू ➖ रोनाल्ड रॉस

◆ क्षयाचे जंतू ➖ रॉबर्ट कॉक

◆  रक्ताभिसरण ➖ विल्यम हार्वे

◆ हृदयरोपण ➖ डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड

◆ डी.एन.ए.जीवनसत्वे ➖ वॅटसन व क्रीक

महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट


◆ राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

◆ अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

◆ फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 

◆ हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ 

◆ करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग 

◆ बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण 

◆ आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी 

◆ उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी 

◆ कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी 

◆ हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी 

◆ पार घाट - सातारा - रत्नागिरी 

◆ केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी 

◆ पसरणीचा घाट - सातारा - वाई 

◆ फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग 

◆ पांचगणी घाट - पोलादपुर - वाई 

◆ बोरघाट - पुणे - कुलाबा

◆ खंडाळा घाट - पुणे - पनवेल 

◆ कुसुर घाट - पुणे - पनवेल 

◆ वरंधा घाट - पुणे - महाड 

◆ रूपत्या घाट - पुणे - महाड 

◆ भीमाशंकर घाट - पुणे - महाड 

◆ कसारा घाट - नाशिक - ठाणे 

◆ नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

◆ थळ घाट - नाशिक - ठाणे 

◆ माळशेज घाट - ठाणे- पुणे  

◆ सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर 

७४ वी घटना दुरुस्ती ( १९९२-९३ )



             नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरवात ब्रिटिश कालखंडामध्ये झाली. ( १६८७ ) नागरी स्थानिक संस्थांना पंचायतराज संस्थेप्रमाणेच घटनात्मक दर्जा देण्यात यावा हि मागणी समोर आली. या दृष्टीकोनातून सर्वप्रथम १९८९ ला राजीव गांधी यांनी नगरपालिका संबंधी ६५ वे घटनादुरुस्ती विधेयक तयार केले होते.  परंतु त्यांना अपयश आले. त्यानंतर व्ही. पी. सिंग व चनशेखर यांनी प्रयत्न केले. परंतु अपयश आले. १९९१ ला पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना नागरी स्थानिक संस्थाना घटनात्मक दर्जा देण्यासाठी त्यांनी १९९२ ला ७४ वे घटनादुरुस्ती विध्येयक तयार केले.


– २२ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर लोकसभेत बहुमत सिद्ध.


– २३ डिसेंबर १९९२ ला या विधयेकावर राज्यसभेत बहुमत सिद्ध


– २० एप्रिल १९९३ रोजी ७४ व्या घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.


– ३१ मे १९९४ पर्यंत ह्या शिफारशी सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारक करण्यात आले.


– राज्य घटनेच्या कलम २४३ ( P ) ते २४३ ( ZG ) मध्ये तरतूद करण्यात आली. व भारतीय राज्य घटनेला १२ वे परिशिष्ट जोडण्यात आले. व त्या मध्ये एकूण १८ विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

डोळे या शब्दावरून वाक्प्रचार, म्हणी व अर्थ



१) डोळा लागणे - झोप लागणे


२) डोळा मारणे - इशारा करणे


३) डोळा चुकवणे - गुपचूप जाणे


४) डोळे येणे - नेत्रविकार होणे


५) डोळे जाणे - दृष्टी गमावणे


६) डोळे उघडणे - सत्य उलगडणे


७) डोळे मिटणे - मृत्यू पावणे


८) डोळे खिळणे - एकटक पाहणे


९) डोळे फिरणे - बुद्धी भ्रष्ट होणे


१०) डोळे दिपणे - थक्क होणे


११) डोळे वटारणे - नजरेने धाक दाखवणे


१२) डोळे विस्फारणे - आश्चर्याने पाहणे


१३) डोळे पांढरे होणे - भयभीत होणे


१४) डोळे भरून येणे - रडू येणे


१५) डोळे भरून पाहणे - समाधान होईपर्यंत पाहणे


१६) डोळे फाडून पाहणे - आश्चर्याने निरखून पाहणे


१७) डोळे लावून बसणे - वाट पाहात राहणे


१८) डोळेझाक करणे - दुर्लक्ष करणे


१९) डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे


२०) डोळ्यात प्राण आणणे - आतुरतेने वाट पाहणे


२१) डोळ्यात धूळ फेकणे - फसवणूक करणे


२२) डोळ्यात तेल घालून बघणे - लक्षपूर्वक पाहणे


२३) डोळ्यात डोळे घालून पाहणे - एकमेकांकडे प्रेमाने बघणे


२४) डोळ्यात सलणे/खुपणे -  दुसऱ्याचं चांगलं न बघवणे 


२५) डोळ्यात अंजन घालणे - दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे


२६) डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे


२७) डोळ्याला डोळा नसणे - काळजीमुळे झोप न लागणे


२८) डोळ्याला डोळा भिडवणे - नजरेतून राग व्यक्त करणे 


२९) डोळ्याला डोळा न देणे - अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे


३०) दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे - दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे. 

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...