१९ जुलै २०२३

19 जुलै; चालू घडामोडी


1) नुकतेच पृथ्वीराज तोंडैमनने शॉटगन वर्ल्ड कपमध्ये ट्रॅपमध्ये कोणते जिंकले?
✅ कांस्यपदक

2) अजित सिंगने पॅरिसमध्ये पॅरा अँथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले?
✅ सुवर्णपदक

3) जम्मू-काश्मीरने लपलेल्या दहशतवाद्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू आहे?
✅ ऑपरेशन त्रिनेत्र-2

4) NITI आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांकात कोणते राज्य अव्वल आहे?
✅ तामिळनाडू

5) 2047 पर्यंत विकसित होण्यासाठी भारताला सरासरी किती वार्षिक GDP वाढीची आवश्यकता आहे?
✅ 7.6% GDP

6) नुकतेच कोणत्या देशाने त्याची नवीनतम आंतरखंडीय क्षेपणास्त्र Hwasong-18 चाचणी केली?
✅ उत्तर कोरिया

7) 5 वर्षात किती भारतीय बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडले?
✅ 13.5 कोटी

8) पोर्ट ब्लेअर विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन हस्ते झाले आहे?
✅ पंतप्रधान नरेंद्र मोदीं

9) नेल्सन मंडेला दिवस दरवर्षी केव्हां साजरा केला जातो?
✅ 18 जुलै

10) ओमन चंडी यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते?
✅ केरळ

━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
    

पोस्टमन, MTS, मेलगार्ड व पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे..


● महाराष्ट्राविषयी माहिती ●


▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.


▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई उपराजधानी  - नागपूर.


▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.


▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.


▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे. विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


▪️पढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


▪️  परवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


▪️  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


▪️पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


▪️सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


▪️बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.


▪️पणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


▪️ मबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


▪️नशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


▪️ जञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

परीक्षेत विचारली जाणारी important पुस्तके


 पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव


*प्लेईंग टू विन - सायना नेहवाल


*हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे


*टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख


*हाफ गर्लफ्रेंड- चेतन भगत


*प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर


*आय डेअर - किरण बेदी


*ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा


*इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद


*सनी डेज - सुनिल गावस्कर


*द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग


*झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील


*छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत


*श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई


*वाट तुडविताना - उत्तम कांबळे


*अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे


*एकच प्याला - राम गणेश गडकरी


*कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे


*यमुना पर्यटन - बाबा पद्मजी 


*पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे 


*सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर


*गिताई - विनोबा भावे


चल्या - लक्ष्मण गायकवाड


*उपरा - लक्ष्मण माने


*एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर


*भिजली वही - अरूण कोल्हटकर


*नटसम्राट -  जन्मठेप - वि.दा.सावरकर


*श्यामची आई - साने गुरूजी


*धग - उध्दव शेळके


*ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर


*एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर


*गोतावळा, झोंबी - आनंद यादव


*जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर


&ज्वाला आणि फुले - बाबा आमटे


*बलूतं - दया पवार


*बारोमास - सदानंद देशमुख


*आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे


*शाळा - मिलींद बोकील


*चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके


*बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर


गोलपीठा - नामदेव ढसाळ


जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल


*मी कसा झालो - प्र.के.अत्रे


*मी कसा घडलो - आर.आर.पाटील


*सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर


*ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील


*उनिकी - सी. विद्यासागर राव


*मुकुंदराज - विवेक सिंधू


*दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास


*बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर -सावित्रीबाई फुले


*गीतारहस्य - लोकमान्य टिळक


*बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे


माझे विद्यापीठ, सनद, जाहिरनामा - नारायण सुर्वे


*फकिरा - अण्णाभाऊ साठे


*रामायण - वाल्मीकी


*मेघदूत - कालीदास


*पंचतंत्र - विष्णू शर्मा


*मालगुडी डेज - आर.के.नारायण


*माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी


*महाभारत - महर्षी व्यास


*अर्थशास्त्र - कौटील्य


*अन् हॅपी इंडीया  - लाला लजपतराय


*माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी


*रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद


*प्रकाशवाटा - प्रकाश आमटे


*आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव


*दास कॅपीटल - कार्ल मार्क्स


*एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दालद.


*गाईड - आर.के.नारायण


*हॅम्लेट - शेक्सपिअर


*कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे


*कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण


*ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी


*शतपत्रे - भाऊ महाजन


*प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण


*माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर


*निबंधमाला - विष्णुशास्त्री चिपळूणकर


*दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम


*स्पीड पोस्ट - शोभा डे


*पितृऋण - सुधा मूर्ती


*माझे गाव माझे तीर्थ - अण्णा हजारे


*एक गाव एक पानवटा - बाबा आढाव


*लज्जा - तस्लीमा नसरीन


*मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग


*कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ


*गोल्डन गर्ल - पी.टी.उषा


*राघव वेळ - नामदेव कांबळे


*आकाशासी जुळले नाते - जयंत नारळीकर


*गोईन - राणी बंग


*सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग

महत्वाचे प्रश्नसंच

 ...........................रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.

A. 1 ऑगस्ट 1920✅✅✅ 

B. 1 ऑगस्ट 1925 

C. 1 ऑगस्ट 1929 

D. 1 ऑगस्ट 1935


'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?

A. आगा खान 

B. खान अब्दुल गफार खान✅✅✅

C. महात्मा गांधी 

D. मोहम्मद अली जीना



 साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.

A. सन 1930 

B. सन 1933✅✅✅ 

C. सन 1936 

D. सन 1939


जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?

A. सायमन कमिशन 

B. हंटर कमिशन✅✅✅

C. रिपन कमिशन 

D. वूड कमिशन


कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?

A. सन 1916 

B. सन 1918✅✅✅

C. सन 1919 

D. सन 1920



महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?

A. दिल्ली 

B. मुंबई 

C. अहमदाबाद 

D. चंपारण्य✅✅✅


दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?

A. साबरमती आश्रम 

B. सेवाग्राम आश्रम 

C. फिनिक्स आश्रम✅✅✅

D. इंडियन आश्रम


महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?

A. आफ्रिकन ओपिनियन 

B. इंडियन ओपिनियन ✅✅✅

C. नाताळ काँग्रेस 

D. ब्लॅक सॅल्यु


गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?

A. 1890 

B. 1893✅✅✅ 

C. 1896 

D. 1899


1869 साली महात्मा गांधींचा जन्म _ ह्या ठिकाणी झाला.

A. सुरत 

B. बडोदा 

C. पोरबंदर ✅✅✅

D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)

ग्रामप्रशासन



· भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते.


· लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला. 


· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार -2 ऑक्टोंबर 1959 


· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य - आंध्रप्रदेश स्विकार -1 नोव्हेंबर 1959 


· पंचायतराज स्विकारणारे नववे राज्य - महाराष्ट्र


· स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले.

बलवंतराय मेहता समिती


· भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली.


· या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली. तर समितीने आपला अहवाल शासनास 1958 मध्ये सादर केला. 


· या समितीमधील इतर सदस्य - ठाकुर फुलसिंग, डी.पी. सिंग, बी.जी. राव. 

यासमितीने केलेल्या शिफारशी 


· लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे.


· पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी.


· ज्या गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.



· ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी.



· ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात. तसेच अनुसूचीत जाती-जमतीच्या लोकांना प्रत्येकी एक जागा राखीव असावी. 


· जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्यत्व असावे. 


· जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा. 


· पंचायतराजच्या तिन्ही संस्थामध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावेत (सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे.)


· अशोक महेता समिती नियुक्ती - 1977. शासनास अहवाल सादर - 1978.

सपर्धा परीक्षा तयारी-प्रश्न सराव

💥 महाराष्ट्रात पहिला लोह - पोलाद प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला?
1) मुंबई
2) चंद्रपूर
3) नागपूर
4) ठाणे

उत्तर :- 2
चंद्रपूर


💥 भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात एकवटली आहे ?
1) 9.36%
2) 9.48%
3) 9.27%
4) 9.28%

उत्तर :- 4
 9.28 टक्के


💥 बांग्लादेशातून वाहणारा गंगेचा प्रवाह
' मेघना ' या नावाबरोबर ........ या नावानेही ओळखला जातो.
1) शारदा
2) बियास
3) काली
4) पद्मा

उत्तर - 4

पद्मा


💥 उडणारी खार व भुंकणारे हरीण यांसारखे प्राणी असलेले ' भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान ' कोणत्या राज्यात आहे ?
1) महाराष्ट्र
2) गोवा
3) आसाम
4) हिमाचल प्रदेश


उत्तर :- 2
         गोवा राज्यात आहे.

💥 सर्यफूलाच्या उत्पादनात कोणत्या राज्याचा देशात पहिला क्रमांक लागतो?
1) मध्यप्रदेश
2) गुजरात
3) कर्नाटक
4) उत्तरप्रदेश


उत्तर - 3

 कर्नाटक

💥 ' नलसरोवर ' हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात वसले आहे ?
1) महाराष्ट्र
2) गुजरात
3) राजस्थान
4) ओरिसा

उत्तर :- 2
           गुजरात

( आलेला प्रश्न राज्यसेवा परीक्षा )

 💥 1909 चा ' मोर्ले - मिंटो सुधारणा कायदा ' पास होण्यासाठी भारत सेवक समाजाच्या वतीने इंग्लंड ला गेलेली व्यक्ती कोण होती ?
:-
1) न्या. रानडे
2) दादाभाई नौरोजी
3) फिरोजशहा मेहता
4) गोपाळ कृष्ण गोखले


उत्तर :- 4
        गोपाळ कृष्ण गोखले

💥 आपल्या मृत्युनंतर केशवपन करणार नाही अशी आपल्या पत्नीकडून शपथ घेणारे समाज सुधारक कोण ?
1) गोपाळ गणेश आगरकर
2) लोकहितवादी
3) न्यायमूर्ती रानडे
4) गोपाळ कृष्ण गोखले

उत्तर :- 1
         गोपाळ गणेश आगरकर


💥 ' शिमगा ' ह्या सणाला देशातील बीभत्स सणांच्या यादीत प्रथम क्रमांक देऊन त्यावर प्रखर टीका करणारे निर्भिड समाज सुधारक कोण  ?
1) गोपाळ गणेश आगरकर
2) लोकहितवादी
3) न्यायमूर्ती रानडे
4) गोपाळ कृष्ण गोखले


उत्तर :- 1
         गोपाळ गणेश आगरकर


💥 पढील पैकी कोणत्या समाज सुधारकांनी ईश्वराचे अस्तित्व मान्य केले नाही. परंतु त्यांचा उल्लेख " देव न मानणारा देवमाणूस " असा केला जातो.?
1) लोकहितवादी
2) महात्मा फुले
3) सुधारक
4) गोपाळ कृष्ण गोखले


उत्तर :- 3
           सुधारक
        ( गोपाळ गणेश आगरकर )

💥 महर्षी कर्वे यांनी 3 जून 1916 मधे स्थापन केलेल्या पहिल्या महिला विद्यापीठासाठी त्यांना कोठून प्रेरणा मिळाली होती ?
1) इंग्लंड विमेन्स युनिव्हर्सिटी
2) कॅनडा  विमेन्स युनिव्हर्सिटी
3) ऑस्ट्रेलिया विमेन्स युनिव्हर्सिटी
4) जपान विमेन्स युनिव्हर्सिटी


उत्तर :- 4
         जपान विमेन्स युनिव्हर्सिटी वर आधारित पुस्तक त्यांनी वाचले होते व याच प्रकारची स्त्रियांसाठी स्वतंत्र असे विद्यापीठ भारतात देखील असावे ह्या विचारातून पुढे भारतातील पहिले स्वतंत्र महिला विद्यापीठ पुणे येथे स्थापन झाले.

ह्या विद्यापीठाचे सुरुवातीचे नाव:-
" भारतवर्षीय महिला विद्यापीठ " असे होते.
पुढे ते ( SNDT महिला विद्यापीठ ) ह्या नावाने ओळखले जाऊ लागले......
आता ह्याचे मुख्यालय हे मुंबई ला आहे हेही येथे लक्षात ठेवावे....

💥( ISRO - इस्रो ) ची स्थापना केव्हा करण्यात आली.?
( Indian Space Research Organization )
1) 26 August 1961
2) 15 August 1969
3) 14 August 1979
4) 14 October 1969

उत्तर :- 2
        मुख्यालय - बंगळूरू


💥 ( DRDO - संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली.?
1) 1969
2) 1980
3) 1958
4) 1979

उत्तर :- 3
        1958 मध्ये झाली

💥 पढील पैकी कोणत्या व्हायरस चा शोध सर्वप्रथम लागला ?
1) पोलिओ
2) HIV
3) TMV
4) HTLV

उत्तर :- 3
         ( TMV )


💥 पक्षांद्वारे होणाऱ्या ' परागणाला '
 ( Pollination ) काय म्हणतात ?
1) हाइड्रोफिली
2) एन्टोमोफिली
3) एम्ब्रिओफिली
4) ऑर्निथोफिली

उत्तर :- 4
         ऑर्निथोफिली



प्रश्नमंजुषा


१.  "स्वच्छ रेल स्वच्छ भारत २०१९" अंतर्गत देशातील सर्वांत स्वच्छ रेल्वे स्थानक कोणते ठरले आहे? 

१. जयपूर ✍️✍️

२. जोधपूर 

३. दुर्गापूर 

४. अहमदाबाद


२.  एक्स ईस्टर्न ब्रिज-५ संबंधित खालील विधानांचा विचार करा : 

अ. भारत आणि ओमान दरम्यान हा द्विपक्षीय संयुक्त वायुसेना लष्करी अभ्यास आहे. 

ब. हा लष्करी सराव ओमानच्या हवाई दलाच्या बेस मासिराह येथे आयोजित करण्यात आला. 

वरील कोणती विधाने अचूक आहेत. 


१. केवळ अ

२. केवळ ब 

३. अ आणि ब दोन्हीही ✍️✍️

४. अ आणि ब दोन्ही नाही


३.  मानव विकास निर्देशांक संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत.

अ) या निर्देशांकात भारताचा क्रमांक १२२ आहे. 

ब) निर्देशांकाची गणना ४ प्रमुख निर्देशांकांनुसार केली जाते. 

क) यूएनडीपी दरवर्षी ही क्रमवारी प्रसिद्ध करते. 


१. केवळ अ आणि ब 

२. केवळ ब आणि क ✍️✍️

३. केवळ अ आणि क 

४. सर्व


४.  युनोकडुन कोणता दिवस 'जागतिक आनंदी दिवस' म्हणून साजरा केला जातो? 

१. २१ मार्च 

२. २४ एप्रिल 

३. २३ मार्च 

४. २० मार्च ✍️✍️


५.  'गोल्डमँन पर्यावरण पुरस्कार' च्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? 

अ. आतापर्यंत चार भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे. 

ब. प्रफुल्ल सामंतारा यांना वर्ष २०१९ मध्ये आशिया प्रदेशासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

१. केवळ अ 

२. केवळ ब 

३. अ आणि ब दोन्ही 

४. अ आणि ब दोन्ही नाही✍️✍️


६.  आयसीसी च्या आंतरराष्ट्रीय पँनल आँफ मँच रेफ्री म्हणून नियुक्त होणा-या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत?

१. दीप्ती शर्मा 

२. जी. एस. लक्ष्मी ✍️✍️

३. अंजुम चोप्रा 

४. रूमेली धर


७.  जादूटोणाविरोधी कायद्याचा समावेश अभ्यासक्रमात करणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? 

१. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली ✍️

२. संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर 

३. संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती 

४. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक


८. १९४२ च्या 'चलेजाव' आंदोलनाच्या वेळी खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी 'भुमीगत चळवळीत' भाग घेतला? 

अ. डॉ. राम मनोहर लोहिया 

ब. जयप्रकाश नारायण 

क. पंडित जवाहरलाल नेहरू 

ड. एस. एम. जोशी 

१. फक्त अ, ब, क 

२. फक्त अ, ब, ड ✍️✍️

३. फक्त ब, क, ड 

४. अ, ब, क, ड


९.  खालीलपैकी कोणी "हिंदू सेवा संघ" ची स्थापना करून शैक्षणिक कार्य सुरू केले?

१. दामू आण्णा टोकेकर ✍️✍️

२. काँ. रेवजी पांडुरंग चौधरी 

३. काँ. देवजीभाई 

४. बाळासाहेब खेर


१०.  खालील विधान कोणाचे आहे ते ओळखा :

अ. " आम्ही गुलामांप्रमाणे नांदणार नाहीत. "

ब. " राजकीय सुधारणा मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चळवळ. "

१. विधान अ: दादाभाई नौरोजी,  विधान ब: लोकमान्य टिळक 

२. विधान अ: लोकमान्य टिळक,  विधान ब: दादाभाई नौरोजी 

३. विधान अ, ब: दादाभाई नौरोजी ✍️✍️

४. विधान अ, ब: लोकमान्य टिळक


११.  खालीलपैकी योग्य विधान ओळखा. 

अ. २६ आँगस्ट १८५२ रोजी बाँम्बे असोसिएशनची स्थापना झाली तेव्हा, बबनजी होरमसजी आणि खरसेटजी जमशेटजी उपाध्यक्ष होते.

ब. या संस्थेचे चिटणीस होते भाऊ दाजी आणि विनायकराव जगन्नाथजी 

१. केवळ अ 

२. केवळ ब 

३. अ आणि ब दोन्ही ✍️✍️

४. अ आणि ब दोन्ही नाही


१२. एलफिस्टन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एक इंग्रज प्राध्यापकाने "भारताची आशा" असे कोणत्या समाजसुधारकाला म्हटले आहे? 

१. गोपाळ कृष्ण गोखले 

२. गोपाळ गणेश आगरकर 

३. दादाभाई नौरोजी✍️✍️ 

४. स्वामी दयानंद सरस्वती


१३.  खालीलपैकी कोण पंतप्रधानांचे डोळे व कान आहेत असे श्री. एस. एस. खेरा  यांनी म्हटले आहे?

१. मंत्रिमंडळ 

२. मंत्रिमंडळ सचिवालय ✍️✍️

३. लोकसभा व राज्यसभा 

४. वरील सर्व


१४.  अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट मर्यादित प्रमाणात शिथिल करण्याबाबतची तरतुद  राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केलेली आहे?

१. कलम ३३५✍️✍️

२. कलम १७

३. कलम ३४०

४. कलम ३३८


१५.  प्राण्यांचे वर्गीकरण जलचर, उभयचर, खेचर व भूचर अशा गटात कोणी केले?

 उत्तर : अँरिस्टाँटल✍️✍️

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...