Monday, 3 July 2023

पोलिस भरती-खनिजद्रव्य त्याचे उपयोग व होणारे परिणाम

1. *फॉस्फरस* :   


स्त्रोत : अन्नधान्ये, दुग्धजन्यपदार्थ मेथी, हिरव्या पालेभाज्या.

उपयोग : हाडे व स्नायू यांचे संवर्धन, ए.टी.पीची निर्मिती.

अभावी होणारे परिणाम : चयापचय क्रियेत अडथळे व हाडे ठिसुळ होतात.


2. *पोटॅशियम* :


स्त्रोत : सुकी फळे.

उपयोग : चेतापेशीचे पोषण.

अभावी होणारे परिणाम : चेतापेशीवर परिणाम होतो.


3. *कॅल्शियम* : 


स्त्रोत : तीळ व पालेभाज्या.

उपयोग : हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांचे पोषण.

अभावी होणारे परिणाम : हाडे कामकूवत व नरम होतात. तसेच ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो.


4. *लोह* : 


स्त्रोत : हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी.

उपयोग : रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनचे पोषण, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणणे व प्रतिरोध संस्थेला मदत करणे.

अभावी होणारे परिणाम : हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.  


5. *तांबे* :


स्त्रोत : पालेभाज्या.

उपयोग : हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे.

अभावी होणारे परिणाम : हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही.


6. *सल्फर* :


उपयोग : प्रथिनांची निर्मिती करणे. अस्थी व नखे यांचे आरोग्य राखणे.

अभावी होणारे परिणाम : केस, हाडे कमकूवत होतात.


7. *फ्लोरिन* : 


उपयोग : दातांचे रक्षण करणे.

अभावी होणारे परिणाम : दंतक्षय होतो.


8. *सोडीयम* : 


उपयोग : रक्तामधील आम्ल व अल्क यांचा समतोल साधणे.

अभावी होणारे परिणाम : रक्तदाबावर परिणाम होतो.  


9. *आयोडीन* :   


उपयोग : थायराईड ग्रंथीचे पोषण.

अभावी होणारे परिणाम : गलगंड नावाचा आजार होतो.

आजचे प्रश्नसंच

 १)खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………?

१) सफरचंद

२) गाजर✅

३)केळी

४) संत्रा


२)खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?

१) स्कर्व्ही

२) बेरीबेरी

३) मुडदूस✅

४)राताधळेपण


३)पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे?

१) २००

२) ३५०

३)५००

४)७५०✅


४)जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….?

१)वाढते

२) कमी होते

३) पूर्वीइतकेच राहते

४)शून्य होते✅


५)कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..?

१) दगडी कोळसा

२) कोक

३) चारकोल

४) हिरा✅


६)जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात?

१) जीवाणू (bacteria)

२) विषाणू (virus)✅

३) कवक (fungi)

४) बुरशी


७)लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

१) देवी

२) मधुमेह✅

३) पोलिओ

४) डांग्या खोकल


८)……..या किरणांना वस्तुमान नसते?

१)अल्फा

२)‘क्ष’

३) ग्यामा✅

४)बीटा


९)खालीलपैकी कोणता रोग  'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?

१) रंगाधळेपण

२) स्कर्व्ही

३) बेरीबेरी

४)यापैकी नाही✅


१०)हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..?

१)पेनेसिलीन

२)प्रायमाक्वीन✅

३) सल्फोन

४)टेरामायसीन


११)निष्क्रिय वायू हे………..?

१) पाण्यामध्ये विरघळतात

२) स्थिर नसतात

३)रासायनिक क्रिया करू न शकणारे✅

४) रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील


१२)…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे?

१) प्लुटोनिअम✅

२) U -२३५

३)थोरीअम

४)रेडीअम


१३)खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?

१) युरिया

२)नायट्रेट

३)अमोनिअम सल्फेट

४)कंपोस्ट✅


१४)आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?

१) ‘ब-१’ जीवनसत्त्व

२) ‘ब-४’ जीवनसत्त्व

 ‘ड ‘ जीवनसत्त्व

४)‘के ‘ जीवनसत्त्व✅


१५)जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात?

१) मेंदूचे स्पंदन

२)हृदयाचे स्पंदन

३)डोळ्यांची क्षमता✅

४)हाडांची ठिसूळता


१६)किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?

१).१०० डी.बी.च्या वर✅

२) ११० डी.बी.च्या वर

३)१४० डी.बी.च्या वर

४)१६० डी.बी.च्या वर


१७)डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

१) आयोडीन-१२५✅

२) अल्बम-३०

३) ल्युथिनिअरम-१७७

४)सेसिअम-१३७


१८)आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते?

१) अवअणू

२) अणू

३) रेणू✅

४) पदार्थ


१९)मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते?

१) सेल्युलेज✅

२) पेप्सीन

३) सेल्युलीन

४) सेल्युपेज


२०)इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन……?

१) कमी होते✅

२)वाढते

३) सारखेच राहते

४) शून्य होते


२१)पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते?

१) M

२) N✅

३) A

४) XB


२२)सौरऊर्जा …… स्वरुपात असते?

१) प्रकाश प्रारणांच्या

२) विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅

३) अल्फा प्रारणांच्या

४) गामा प्रारणांच्या


२३)अहरित वनस्पती ……असतात?

१) स्वयंपोषी

२)  परपोषी✅

३) मांसाहारी

४) अभक्ष


२४)किण्वन हा …… चा प्रकार आहे?

१) ऑक्सिश्वसन

२) विनॉक्सिश्वसन✅

३) प्रकाशसंश्लेषण

४) ज्वलन


२५) प्रकाश संश्लेषनात ……प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती?

१) हरितद्रव्यामुळे✅

२) झथोफिलमुळे

३) कॅरोटीनमुळे

४) मग्नेशिंअममुळ

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 1)सामन्यत: सूक्ष्मजीव ______ असतात.

एकपेशी

बहुपेशी

अतिसूक्ष्म

विविध आकारांचे 

A. एकपेशी

-------------------------------------------------------------------

2) प्रकाश संश्लेषनात _______ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.

हरितद्रव्यामुळे

झथोफिलमुळे

कॅरोटीनमुळे

मग्नेशिंअममुळे 

A. हरितद्रव्यामुळे

-----------------------------------------------------------------------------

3) ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात व ते ग्रहण करतात त्या प्रक्रियेस ____ म्हणतात.

पोषण

स्वयंपोषण

परपोषण

अंत:पोषण 

A. पोषण

-----------------------------------------------------------------------------

4) _______ पेशीमुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो.

पेशी - भित्तिका

प्रद्रव्य पटल

पेशीद्रव्य

केंद्रक 

A. पेशी - भित्तिका

-----------------------------------------------------------------------------

5) _________ हे सजीवांच्या रचनेचे व कार्याचे एकक आहे.

पेशी

उती

अवयव

अणु 

A. पेशी

-----------------------------------------------------------------------------

6) ______ संघातील प्राण्यांचे शरीर खंडीभूत व पाय जोडयुक्त असतात.

प्लटिहेल्मिन्थस

पोरीफेरा

आर्थ्रोपोडा

ईकायनोडर्माटा 

C. आर्थ्रोपोडा

-----------------------------------------------------------------------------

7) किण्वन हा _________ चा प्रकार आहे.

ऑक्सिश्वसन

विनॉक्सिश्वसन

प्रकाशसंश्लेषण

ज्वलन 

B. विनॉक्सिश्वसन

-----------------------------------------------------------------------------

8) अहरित वनस्पती ______ असतात.

स्वयंपोषी

परपोषी

मांसाहारी

अभक्षी 

B. परपोषी

-----------------------------------------------------------------------------

9) सौरऊर्जा ___ स्वरुपात असते.

प्रकाश प्रारणांच्या

विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या

अल्फा प्रारणांच्या

गामा प्रारणांच्या 

B. विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या

-----------------------------------------------------------------------------

10) बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर _____ प्रारणांचा मारा करतात.

अल्फा

बिटा

गामा

क्ष-किरण 

C. गामा

-----------------------------------------------------------------------------

11) पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ......... इतकी असते.

M

N

A

X

B. N

-----------------------------------------------------------------------------

12) जीवभूरसायन चक्रात कार्बन प्रमाण.........आहे.

०.०३%

०.३%

३%

०.००३%

A. ०.०३%

-----------------------------------------------------------------------------

13) खालीलपैकी कोणती वनस्पती टेरीडोफायटा या सवंहिनी वनस्पती वर्गात येत नाही.

फिलीसीनी

मुसी

लायकोपोडियम

इक्विसेटीनि 

B. मुसी

-----------------------------------------------------------------------------

14) मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण..........हे विकर त्याच्या जठरात नसते.

सेल्युलेज

पेप्सीन

सेल्युलीन

सेल्युपेज 

A. सेल्युलेज

-----------------------------------------------------------------------------

15) पाण्याची घनता ................ ला उच्चतम असते.

४'C

२५'C

०'C

७३'C

A. ४'C


-----------------------------------------------------------------------------

16) आधुनिक जैवतंत्रज्ञान ............. पातळीवर कार्य करते.

अवअणू

अणू

रेणू

पदार्थ 

C. रेणू

-----------------------------------------------------------------------------

17) डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

आयोडीन-१२५

सामारिअम-१५३

ल्युथिनिअरम-१७७

सेसिअम-१३७ 

A. आयोडीन-१२५

-----------------------------------------------------------------------------

18) किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?

१०० डी.बी.च्या वर

११० डी.बी.च्या वर

१४० डी.बी.च्या वर

१६० डी.बी.च्या वर 

A. १०० डी.बी.च्या वर

-----------------------------------------------------------------------------

19) इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन...

कमी होते

वाढते

सारखेच राहते

शून्य होते 

A. कमी होते

-----------------------------------------------------------------------------

20) 'फ्यूएल सेल' पासून विद्युत तयार करण्यासाठी वापरणाऱ्या हायड्रोजनची निर्मिती कशापासून केली जाते?

पाणी

अल्कोहोल

इथेनॉल

सेंद्रिय पदार्थ 

A. पाणी

-----------------------------------------------------------------------------

21) निष्क्रिय वायू हे...........

पाण्यामध्ये विरघळतात

स्थिर नसतात

रासायनिक क्रिया करू न शकणारे

रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील 

C. रासायनिक क्रिया करू न शकणारे

-----------------------------------------------------------------------------

22) गाईचे दूध पुढीलपैकी कशाचा महत्वाचा स्त्रोत आहे?

' अ ' जीवनसत्त्व

' ब ' जीवनसत्त्व

' क ' जीवनसत्त्व

' ड ' जीवनसत्त्व 

A. ' अ ' जीवनसत्त्व

-----------------------------------------------------------------------------

23) खालीलपैकी कोणते खरे फळ आहे?

सफरचंद

काजू

अननस

नारळ 

D. नारळ

-----------------------------------------------------------------------------

24) ............या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते.

चांदी

पारा

पाणी

लोखंड 

C. पाणी

-----------------------------------------------------------------------------

25) सल्फ्युरिक आम्ल च्या बाबतीत सत्य असणारा संबध ...........

प्रसामान्यता = रेणुता

प्रसामान्यता = २*रेणुता

प्रसामान्यता = आम्लरिधर्मता

प्रसामान्यता = आम्लधर्मता 

B. प्रसामान्यता = २*रेणुता

-----------------------------------------------------------------------------

26) 'खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे' ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?

हिवताप

कावीळ

क्षय

देवी 

C. क्षय

-----------------------------------------------------------------------------

27) जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन..........

वाढते

कमी होते

पूर्वीइतकेच राहते

शून्य होते 

D. शून्य होते

-----------------------------------------------------------------------------

28) खालीलपैकी कोणता रोग 'ड' जीवनसत्त्वाच्या अभावी?

स्कर्व्ही

बेरीबेरी

मुडदूस

राताधळेपणा 

C. मुडदूस

-----------------------------------------------------------------------------

29) 'जी.एस.आर' हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.

मेंदूचे स्पंदन

हृदयाचे स्पंदन

डोळ्यांची क्षमता

हाडांची ठिसूळता

C. डोळ्यांची क्षमता

-----------------------------------------------------------------------------

30) आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?

'ब-१' जीवनसत्त्व

'ब-४' जीवनसत्त्व

'ड ' जीवनसत्त्व

'के ' जीवनसत्त्व 

D. 'के ' जीवनसत्त्व

-----------------------------------------------------------------------------

31) ज्या निरीक्षणात काही घटकांची निरीक्षकाकडून दखलच घेतली जात नाही त्यास काय म्हणतात ?

अपूर्ण निरीक्षण

दुर्निरीक्षण

अनिरीक्षण

यापैकी नाही 

A. अपूर्ण निरीक्षण

-----------------------------------------------------------------------------

32) बरोबर उत्तर निवडा. ३०' से .तापमानाचे पाणी भरलेली सीलबंद बाटली अवकाशयानामधून चंद्रावर नेली. ती चंद्राच्या पृष्ठभागावर ठेउन तिचे झाकण उघडल्याबरोबर आतील पाण्याचे काय होईल?

पाणी उकळेल.

पाणी गोठेल.

ते अतिशीत होईल.

त्याचे H२ व O असे विघटन होईल.

A. पाणी उकळेल.

-----------------------------------------------------------------------------

33) ..........हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.

प्लुटोनिअम

U -२३५

थोरीअम

रेडीअम 

A. प्लुटोनिअम

-----------------------------------------------------------------------------

34) पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ........कि.मी.इतकी आहे.

२००

३५०

५००

७५० 

D. ७५०


35) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी .......

जठर

यकृत

हृदय

मोठे आतडे 

B. यकृत

-----------------------------------------------------------------------------

36) खालीलपैकी भरपूर प्रमाणात 'अ' जीवनसत्वे देणारा पदार्थ.........

सफरचंद

गाजर

केळी

संत्री 

B. गाजर



37) जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ...........मुळे होतात.

जीवाणू (bacteria)

विषाणू (virus)

कवक (fungi)

बुरशी 

B. विषाणू (virus)

-----------------------------------------------------------------------------

38) खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?

युरिया

नायट्रेट

अमोनिअम सल्फेट

कंपोस्ट 

D. कंपोस्ट

-----------------------------------------------------------------------------

39) भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः ......... वापरले जाते.

तुरटी

सोडीअम क्लोराइड

क्लोरीन

पोटॉंशिअम परम्याग्नेट 

C. क्लोरीन

-----------------------------------------------------------------------------

40) खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?

कार्डिओग्राफ

स्टेथोस्कोप

थर्मामीटर

अल्टीमीटर 

B. स्टेथोस्कोप

-----------------------------------------------------------------------------

41) ...........या किरणांना वस्तुमान नसते.

अल्फा

'क्ष'

ग्यामा

बीटा 

C. ग्यामा



42) खालीलपैकी कोणता जीवनसत्त्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते?

'ड' जीवनसत्त्व

'इ' जीवनसत्त्व

'के' जीवनसत्त्व

'ब' जीवनसत्त्व 

C. 'के' जीवनसत्त्व

-----------------------------------------------------------------------------


43) कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप........

दगडी कोळसा

कोक

चारकोल

हिरा 

D. हिरा

-----------------------------------------------------------------------------

44) हिवतापावरील प्रभावी ऑंषध........

पेनेसिलीन

प्रायमाक्वीन

सल्फोन

टेरामायसीन 

B. प्रायमाक्वीन

-----------------------------------------------------------------------------

45) जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो?

कल्शिअम

सोडीअम

कार्बन

क्लोरीन 

A. कल्शिअम

-----------------------------------------------------------------------------

46) माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते?

४० टक्के

४ टक्के

१३ टक्के

३१ टक्के 

B. ४ टक्के

-----------------------------------------------------------------------------

47) खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता ?

हायड्रोजन

हेलिअम

ऑक्सिजन

कार्बन-डाय-ओक्साइड 

A. हायड्रोजन

-----------------------------------------------------------------------------

48) पुढीलपैकी कोणती जीवनसत्त्वे मानवी शरीरात तयार होतात ? १)'ब-६' जीवनसत्त्व २)'ड' जीवनसत्त्व ३)'इ' जीवनसत्त्व ४)'के' जीवनसत्त्व

१ व २

२ व ३

२ व ४

१ व ४ 

C. २ व ४

-----------------------------------------------------------------------------

49) दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्ये महत्त्वाचे ठरते ?

सोडियम

आयोडीन

लोह

फ्लोरीन

D. फ्लोरीन


-----------------------------------------------------------------------------


50) लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

देवी

मधुमेह

पोलिओ

डांग्या खोकला 

B. मधुमेह

थायरॉईड रोग


प्रस्तावना


थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात स्थित असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे (जगण्यासाठी आवश्यक कार्यं पेशी ज्या गतीनं करतात तो दर).


चयापचय नियंत्रणात ठेवण्यासाठी, थायरॉईड संप्रेरकांचं उत्सर्जन करते, जे शरीरातील पेशींना किती ऊर्जा वापरायची ते सांगतात. योग्यप्रकारे काम करणारी थायरॉईड शरीराची चयापचय क्रिया समाधानकारक गतीनं चालू ठेवण्यासाठी आवश्यक प्रमाणात संप्रेरकांचं उत्पादन करते. संप्रेरक हे जसजसे वापरले जातात तशी त्यांची भरपाई थायरॉईड ही करत असते. रक्तातील थायरॉईड संप्रेरकांचं प्रमाण हे पोषग्रंथिव्दारे (पिट्युटरी ग्रंथी) केले जाते. मेंदूच्या खालच्या भागात कवटीच्या मध्यभागी स्थित असलेल्या ह्या पोषग्रंथीला जेव्हा अतिप्रमाणातील किंवा कमी प्रमाणातील थायरॉईड संप्रेरकांची जाणीव होते, तेव्हा ती आपला संप्रेरक (टीएसएच) कमीजास्त करते आणि तो थायरॉईडला पाठवून तिला काय करायचे ते सांगते.


थायरॉईड रोग म्हणजे काय आणि तो कोणाला होतो ?


ज्यावेळी थायरॉईड ही अधिक प्रमाणात संप्रेरक तयार करते, तेव्हा शरीर हे आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात ऊर्जेचा वापर करते. या स्थितीला हायपरथायरॉईडीझम म्हणतात. सर्व प्रकारच्या वयोगटातील लोकांना थायरॉईड रोग होऊ शकतो. तथापि, महिलांना पुरुषांच्या तुलनेत पाच ते आठपट अधिक प्रमाणात थायरॉईड समस्या होऊ शकते.


थायरॉईड रोग कशामुळे होतो ?


थायरॉइड दोन प्रकारे असतो - हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम


खालील स्थितींमुळं हायपोथायरॉईडीझम होऊ शकतो


थायरॉयडीटीस – म्हणजे थायरॉईड ग्रंथीचा दाह. यामुळं, तयार होणा-या संप्रेरकांचे प्रमाण कमी होते.हाशिमोटोज् थायरॉयडीटीस – हा एक प्रतिकार यंत्रणेचा वेदनाविरहित रोग असून तो अनुवांशिक आहे.प्रसवोत्तर थायरॉयडीटीस – हा रोग प्रसुतिनंतर ५ ते ९ टक्के स्त्रियांमधे होतो.  ही सामान्यतः एक तात्पुरती स्थिती असते.आयोडीनची कमतरता – ही समस्या जगातील अंदाजे १०० दशलक्ष लोकांना आहे.  थायरॉईड संप्रेरकांची निर्मिती करण्यासाठी आयोडीनचा वापर करते.कार्य न करणारी थायरॉईड ग्रंथी – ही समस्या प्रत्येक नवजात ४००० बालकांमधे एकाला होते.  ही समस्या ठीक न केल्यास, ते मूल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विकलांग होऊ शकते.


खालील स्थितींमुळं हायपरथायरॉईडीझम होतो


ग्रेव्हज् रोगामुळं, संपूर्ण थायरॉईड ग्रंथी ही अतिक्रियाशील होऊ शकते आणि अति प्रमाणात संप्रेरक उत्पादित करते.थायरॉईडच्या अंतर्गत नोड्यूल्स अतिकार्यशील होतात.थायरॉयडीटीस, ही समस्या वेदनामय किंवा वेदनारहित असू शकते, थायरॉईडमधे साठवून ठेवलेले संप्रेरक मुक्त केले जातात, त्यामुळं काही आठवडे किंवा महिने हायपरथायरॉईडीझम होऊ शकतो. वेदनारहित प्रकार हा अधिक प्रमाणात महिलांमधे प्रसुतिनंतर होतो.अतिरीक्त आयोडीन हे अनेक प्रकारच्या औषधांमधे आढळते आणि त्यामुळं थायरॉईड ही काही व्यक्तींमधे अति प्रमाणात किंवा कमी प्रमाणात संप्रेरक निर्माण करते.


हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझमची लक्षणे


हायपोथायरॉईडीझमची लक्षणे


थकवा येणेवारंवार, मोठ्या प्रमाणात मासिक स्त्राव होणेविसरभोळेपणावजन वाढणेकोरडी, खरखरीत त्वचा आणि केसघोगरा आवाजथंडी सहन न होणे


हायपरथायरॉईडीझमची लक्षणे


चिडचिडेपणा / अस्वस्थतास्नायू कमकुवत होणे / थरथरणेअनियमित, कमी प्रमाणात मासिक स्त्राववजन कमी होणेझोप नीट न लागणेवाढलेली थायरॉईड ग्रंथीदृष्टीदोष किंवा डोळ्यांची जळजळ होणेउष्णता सहन न होणे


ज्यावेळी थायरॉईड रोगाचे लवकर निदान होते, तेव्हा लक्षणे दिसायला लागायच्या आधी ही समस्या नियंत्रणात ठेवता येते.  थायरॉईड रोग ही आयुष्यभराची स्थिती असते.  काळजीपूर्वक नियोजन केल्यास, थायरॉईड रोग असलेले लोक आरोग्यदायी, सामान्य जीवन जगू शकतात.

राज्यसेवा पूर्व परीक्षा

1.स्वच्छता सर्वेक्षण 2020 में राजधानियों की श्रेणी में निम्न में से किस राजधानी को पहला स्थान प्राप्त हुआ है?
a. पटना
b. दिल्ली✔️
c. लखनऊ
d. जयपुर

2.हाल ही में किस देश में सुनहरे खोल के साथ जन्मे एक कछुए की खोज हुई है?
a. भारत
b. चीन
c. नेपाल✔️
d. पाकिस्तान

3.भारतीय कप्तान विराट कोहली अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आईसीसी) की नवीनतम टेस्ट रैंकिंग में बल्लेबाजों की सूची में किस स्थान पर बरकरार हैं?
a. पहले स्थान
b. दूसरे स्थान✔️
c. तीसरे स्थान
d. चौथे स्थान

4.हाल ही में किस देश के राष्ट्रपति इब्राहिम बाउबकर कीता ने अपने पद से इस्तीफा दे दिया है?
a. कांगो
b. घाना
c. केन्या
d. माली✔️

5.सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार के लिए ऑनलाइन नामांकन प्रक्रिया को बढ़ाकर अब कब तक कर दिया गया है?
a. 25 अक्टूबर 2020
b. 31 अक्टूबर 2020✔️
c. 31 दिसंबर 2020
d. 30 नवंबर 2020

6.सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMIE) के मुताबिक कोरोना संकट की वजह से लगभग कितने लोग नौकरियां गंवा चुके हैं?
a. 1.9 करोड़ ✔️
b. 3 करोड़
c. 5 करोड़
d. 7 करोड़

7.डीबीएस बैंक इंडिया लिमिटेड ने किसको राष्ट्रीय वितरण के एमडी और प्रमुख के रूप में नियुक्त किया?
a. राहुल सचदेवा
b. अमित त्यागी
c. प्रशांत जोशी✔️
d. मोहन झा

8.भारत और किस देश ने हाल ही में अपने रणनीतिक द्विपक्षीय संबंधों को नई मजबूती देने हेतु एक सांस्कृतिक समझौते पर हस्ताक्षर किए हैं?
a. इजरायल✔️
b. चीन
c. पाकिस्तान
d. बांग्लादेश

9.भारतीय अक्षय ऊर्जा दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 20 अगस्त✔️
b. 11 मार्च
c. 10 जून
d. 15 मार्च

10.हॉकी इंडिया कोविड महामारी को देखते हुए 61 जरूरतमंद खिलाडियों को कितने हजार रूपये की आर्थिक मदद देगी?
a. बीस हजार रूपये
b. तीस हजार रूपये
c. चालीस हजार रूपये
d. दस हजार रूपये✔️




 पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?

1) बोस – आईनस्टाईन कंडनसेट ☑️
2) फर्मआयोनिक कंडनसेट
3) एरिक – कॅटरले कंडनसेट   
4) कार्नेल टर्मस् कंडनसेट


. धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?

अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.

ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे).

क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.

1) फक्त अ 
2) फक्त ब ☑️
3) फक्त क 
4) वरीलपैकी एकही नाही

  खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात. ?

अ) एडीनीन – A
ब) गुआनीन – G 
क) थायमिन – T 
ड) साइटोसीन – C

1) अ, ब 
2) अ, ब, क ☑️
3) ब, क, ड 
4) अ, ब, क, ड


  वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?

1) चाल 
2) घनता   
3) जडत्व 
4) त्वरण ☑️

 खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता. ?

1) मिथेन ☑️
2) क्लोरीन 
3) फ्लोरीन 
4) आयोडीन

◾️कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्ली येते नेण्यात आली ?

A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड रिपन
C. लॉर्ड कर्झन
D. लॉर्ड हार्डिंग II ☑️


◾️रपया नावाचे नाणे भारतात प्रथम जारी करणारे कोण होते?

A. अकबर
B. अलेक्झांडर लोदी
C. शेरशाह सुरी ☑️
D. बल्बन

◾️मट्टूर धरण - कोणत्या नदीवर बांधले आहे?

A. कृष्णा
B.कावेरी☑️
C. नर्मदा
D. तुंगभद्रा


◾️राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली?

A. 1815
B. 1812
C. 1828 ☑️
D. 1830


 ◾️नॉर्वे ची राजधानी कोठे आहे?

A. ओस्लो ☑️
B. पेरिस
C. वॉर्न
D. लिस्बन

 6 मार्च 2019 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले तर हे कितवे राज्याचे औद्योगिक धोरण आहे?
A 3 रे
B 2 रे
C 4 थे
D 6 वे
उत्तर D

 6 मार्चला महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले त्यानुसार 2025 पर्यन्त राज्याची अर्थव्यवस्था किती ट्रेलियन अमेरिकन डॉलर वाढविणे निश्चित केले आहे?
A 1
B 3
C 4
D यापैकी नाही
उत्तर A

3 शिखर उद्योजकता विकास संस्थेची स्थापना कोणत्या जिल्ह्यात करण्यात येत आहे?
A औरंगाबाद
B पुणे
C नागपूर
D रायगड
उत्तर D

4 क्वॉलिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2019 नुसार भारतातील किती शहरांचा समावेश करण्यात आला आहे?
A 7
B 9
C 5
D 2
उत्तर C
5 लोकशाही निर्देशक 2019 नुसार भारत कितव्या स्थानी आहे?
A 55
B 41
C 39
D 42
उत्तर D

6 भ्रष्टाचार आकलन निर्देशक 2018 नुसार भारत कितव्या स्थानी आहे?
A 80
B 78
C 90
D 81
उत्तर B

7 मंडल धरण प्रकल्प झारखंड राज्यात उत्तर कोयल नदीवर उभारला जात आहे तर या प्रकल्पातुन किती मेगावॅट विद्युत निर्मिती होणार आहे?
A 30
B 24
C 28
D 22
उत्तर C

8 ऑपरेशन क्लीन आर्ट हे कोणत्या प्राण्याच्या रक्षणासाठी सुरू केले आहे?
A गांडूळ
B उंदीर
C बेडूक
D मुंगूस
उत्तर D

9 आशिया आरोग्य परिषद ऑक्टोबर 2019 मध्ये कोणत्या शहरात पार पडली?
A चेन्नई
B सिमला
C पुणे
D दिल्ली
उत्तर D

10 राष्ट्रीय आरोग्य प्रोफाइल 2019 च्या अहवालानुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक जन्मदर आहे?
A उत्तरप्रदेश
B महाराष्ट्र
C बिहार
D मध्यप्रदेश
उत्तर C

11 राष्ट्रीय आरोग्य प्रोफाईल अहवाल प्रथम कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला?
A 2010
B 2008
C 2005
D 2002
उत्तर C

12 घडले कसे हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
A विद्या बाळ
B गिरीश कर्नाड
C राजा ढाले
D नीलम शर्मा
उत्तर B

स्पर्धा परीक्षा उपयोगी पुस्तके


1) मराठी व्याकरण- १) मो. रा. वाळिंबे 

                                २) बाळासाहेब शिंदे


2) इंग्रजी व्याकरण-  १) बाळासाहेब शिंदे

                               २) एम जे शेख


3) अंकगणित -      १) नितीन महाले

                             २)पंढरीनाथ राणे


4) बुद्धीमत्ता चाचणी- १)जी. किरण

                                 २) सतिष वसे


5) इतिहास -            १) ग्रोव्हर, बेल्हेकर

                                २) जयसिंग पवार


6) भूगोल -               १)ए. बी. सवदी

                                  २) खतीब


7) अर्थशास्त्र -       १) रंजन कोळंबे

                              २)किरण देसले 


8) राज्यव्यवस्था  -    १) रंजन कोळंबे

                                  २) किशोर लवटे


9) सामान्य विज्ञान-   १) सचिन भस्के

                                 २) रंजन कोळंबे


10) PSI /STI /ASST- पूर्व परीक्षा गाईड  

                              १) एकनाथ पाटील

                              २) प्रकाश गायकवाड


औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर)

·         औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक नाव काय? - मराठवाडा. 


·         मराठवाडा विभागाचे मुख्यालय कोठे आहे? - औरंगाबाद. 


·         लातूर जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? - उस्मानाबाद. 


·         जालना पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? - औरंगाबाद. 


·         महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत? - मराठवाडा. 


·         गवताळा औटरामघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद-जळगाव. 


·         औरंगाबाद जिल्ह्यातील वनोद्यान कोणते? - अजिंठा. 


·         जायकवाडी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद. 


·         हिमायतबाग उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद. 


·         विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? - नांदेड. 


·         गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? - पैठण-औरंगाबाद. 


·         जायकवाडी जलाशयाचे नाव काय? - नाथसागर. 


·         जायकवाडी योजना स्टेज-1 कोणत्या जिल्हयासाठी आहे? - औरंगाबाद, अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड. 


·         महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्प कोणत्या उद्देशाने हाती घेण्यात आला? - कोरडवाहू जमीन ओलीताखाली आणणे. 


·         बोरांसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? - राहुरी व औरंगाबाद. 


·         महाराष्ट्रातील ज्वारीचे उत्पादन कोणत्या भागात जास्त होते? - मराठवाडा. 


·         महाराष्ट्रातील मराठवाडा भागातून इतर ठिकाणी लोक स्थलांतर होण्याचे कारण काय? - कोरडा दुष्काळ. 


·         जायकवाडी जलविद्युत केंद्र कोठे आहे? - पैठण, औरंगाबाद. 


·         गोदावरी नदीवरील जलविद्युत प्रकल्पास कोणत्या देशाचे साह्य लाभले आहे? - जपान. 


·         हिमरुशाली साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? - औरंगाबाद. 


·         गुजराती फेटे तयार केले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? - पैठण. 


·         महाराष्ट्रातील औद्योगिकदुष्ट्या अविकसित भाग कोणता? - मराठवाडा. 


·         शिखांचे दहावे धर्मगुरु गुरुगोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे? - नांदेड. 


·         दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते? - पैठण. 


·         पैठण हे कोणत्या संताची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते व तेथे कोणत्या संताचा जन्म झाला होता? - संत एकनाथ. 


·         औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? - हिंगोली. 


·         घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद. 


·         शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते? - नांदेड. 


·         परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणता जिल्ह्यात आहे? - बीड. 


·         खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - लातूर. 


·         अंबेजोगाई कोणत्या जिल्ह्यात आहे? - बीड. 


·         तेर कोणत्या जिल्ह्यात आहे? - उस्मानाबाद. 


·         पितळखोरा बौद्ध लेणी कोणत्या आहे? - औरंगाबाद. 


·         धाराशिव ही जैन व हिंदू लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - उस्मानाबाद. 


·         वेरूळची बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद. 


·         अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे? - औरंगाबाद. 


·         वेरूळ अजिंठा कशासाठी प्रसिद्ध आहे? - शिल्पकला. 


·         महाराष्ट्रातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला भाग कोणता? - मराठवाडा. 


·         मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? - 1972. 


·         वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टि. (वाल्मी) कोठे आहे? - औरंगाबाद. 


·         श्री. शिवाजी महाराजाचे कुलदैवत भवानी मातेचे मंदिर कोठे आहे? - तुळजापूर (उस्मानाबाद). 


·         महानुभव पंथाचे महत्वाचे केंद्र कोठे आहे? - नांदेड. 


·         कवि मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? - अंबेजोगाई. 


·         मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख कोठे सापडला? - अक्षी. 


·         दौलताबाद जवळील देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद. 


·         प्रादेशिक वस्तु संग्रहालय कोठे आहे? - उस्मानाबाद.


·         महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक मागासलेला भाग कोणता? - मराठवाडा.


·         भारुडे लोकप्रिय करणारे संत कोण? - एकनाथ. 


·         शिखांच्या ग्रंथ साहित्यामध्ये कोणत्या संताचे वाण्ड्मय समाविष्ठ आहे? - नामदेव. 


·         प्रवारा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? - गोदावरी. 


·         बालाघाट डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? - बीड. 


·         मराठवाड्यातील प्रमुख कापड निर्मिती केंद्र कोणते आहे? - औरंगाबाद. 


·         देवगिरीचा (दौलताबादचा) किल्ला कोणत्या डोंगरात आहे? - अजंठा रांगा. 


·         गोदावरी व भीमा नदीना वेगळे करणारी रांग कोणती? - हरिषचंद्र-बालाघाट. 


·         बालाघाट व अजंठा रांगांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे? - गोदावरी. 


·         महाराष्ट्रात अत्यल्प खनिजे कोणता भागात मिळतात? - मराठवाडा.

तलाठी पदभरतीला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी | Talathi Bharti 2023

गडचिरोली | तलाठी संवर्गातील पदे भरताना 2014 च्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार 158 पैकी पेसा क्षेत्रातून 151 पदे (Talathi Bharti 2023) भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. म्हणून या पदभरती प्रक्रियेला तत्काळ स्थगिती देऊन 28 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार तलाठी पद भरती प्रक्रिया राबवावी व ओबीसीवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दै. सकाळने याबाबत वृत्त दिले आहे.

तलाठी भरती प्रक्रियेमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. याकरिता आपण शासनस्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार डॉ. देवराव होळी यांनी यावेळी निवेदकांना दिले.
निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, कार्याध्यक्ष विनायक बांदूरकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, जिल्हा संघटक सुरेश भांडेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, माजी उपसभापती विलास दशमुखे यांच्यासह ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार डॉ. होळी यांनी निवेदकांचे म्हणणे ऐकून घेत भरती प्रक्रियेला तातडीने स्थगिती देऊन 28 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार पद भरतीची प्रक्रिया राबविण्यासंदर्भात आश्वासन दिले.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...