Friday, 16 June 2023

विविध क्षेत्रांचे जनक


राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी


आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय


भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु


राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर


आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे


आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग


विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा


अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई


मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम



कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै


भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल


सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके


शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा


पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी


निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी


हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन


श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन


पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र


नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा


हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी


सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया


सर्जरीचे जनक - सुश्रुत


मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक


मॉर्डन अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस


न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड


कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग


वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस


उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन


आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन


क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस


जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल


इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ


वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता


विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन


इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे


टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ


न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन


नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव


भूमितीचा पिता ⟶ युक्लिड


आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी


आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स


कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज


खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस


अर्थशास्त्रातील जनक - अ‍ॅडम स्मिथ


जीवशास्त्रातील जनक - अ‍ॅरिस्टॉटल


इतिहास पिता ⟶ हेरोडोटस


होमिओपॅथी फादर - हेनेमॅन


प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता


रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर


रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे


बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर


परार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान


🖌दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.


🖌परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.


🖌सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.


🖌परार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.


🖌परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.


🖌मर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.


🖌सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.


📚परार्थना समाजाचे कार्य📚


🖌परार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.


🖌नया. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.


🖌ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.


🖌दशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.


🖌अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.


🖌परार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.


🖌मलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.


🖌४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.


🖌मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.


🖌इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.


🖌इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.


🖌परार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.


📚परार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन📚


🖌परार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.

महत्त्वाचे 10 प्रश्न उत्तरे


        

1) कोणाच्या शिफारशी शिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही.

A) मुख्यमंत्री

B) राज्यपाल✔️✔️

C) राष्ट्रपती

D) विधानसभा अध्यक्ष



2) भारतीय रेल्वे संदर्भात कोणते विधान सत्य आहे.

अ) रेल्वे वाहतुकीचा बाजार हिस्सा  थोडाच वाढला आहे

ब) अपुरे  क्षमता जाळे आणि पायाभूत सुविधा या समस्यांचा रेल्वे सामना करावा लागतो.


पर्याय:-


A) अ, ब दोन्ही बरोबर

B) अ , ब दोन्हीं चुक

C) अ बरोबर

D) ब बरोबर✔️✔️


3) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते.

A) केंद्र शासन

B) राज्य शासन

C) केंद्र आणि राज्य शासन दोन्ही✔️✔️

D) वरीलपैकी नाही.


4 ) सन 2011 मध्ये साक्षरता दरासंदर्भात खालील राज्यांची घटत्या  क्रमाने मांडणी करा.

अ) पश्चिम बंगाल

ब) महाराष्ट्र

क) हिमाचल प्रदेश


A) अ, ब,क

B) क, ब, अ✔️✔️

C) ब, क, अ

D) ब , अ, क


5) कोणते विधान बरोबर आहे.

अ) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिम 2015 मध्ये सुरू करण्यात आली.

ब) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेचा हेतू आणि कुटुंबकल्याण कार्यक्रमाना बळकटी देणे हा आहे.

A) अ बरोबर

B) ब बरोबर ✔️✔️6

C) अ ,ब दोन्ही बरोबर

D) अ, ब दोन्ही चूक


6) पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे.

अ) भारतातील सर्व खेडी सर्व हवामान रस्त्यांनी जोडण्याचे उद्दिष्ट दहाव्या पंचवार्षिक योजनेत होते.

ब) राष्ट्रीय व राज्य रस्ते किमान दुमार्गी श्रेणीचे करायचे हे 12 व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे.

A) अ

B) ब

C) अ , ब दोन्ही बरोबर✔️✔️

D) एक ही नाही


7) भारत निर्माण कार्यक्रम 2005 या ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कोणत्या  आहेत.

अ) जलसिंचन व ग्रामीण रस्ते

ब) ग्रामीण निवारा

क) ग्रामीण पाणीपुरवठा

ड) ग्रामीण विद्युतीकरण

इ) ग्रामीण दूरध्वनी


A) ब ,क, ड

B) अ, ब, क, ड

C) अ, क, ड, इ

D) अ, ब, क, ड, इ✔️✔️


8) सन 2009 साठी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट परिषदे ने 5-15  दशलक्ष प्रवासी वाहतूक हाताळणाऱ्या  विमानतळा मध्ये कोणत्या विमानतळा जगातील उत्कृष्ट म्हणून गौरविले आहे.


A) एअरपोर्ट नवी दिल्ली

B) एअरपोर्ट मुंबई

C) एअरपोर्ट शमशाबाद हैदराबाद

D) एअरपोर्ट बेंगलोर


9 ) सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मितीत खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वीजनिर्मितीचा वाटत सर्वाधिक आहे.

अ) जलविद्युत

ब) औण्विक विद्युत

क) अनुउर्जा

ड) पवन ऊर्जा


A) फक्त अ

B) फक्त ब✔️

C) अ आणि ब

D) अ, ब, ड, क


10) ग्रामीण भागात शहरी सुखसोयी चे प्रावधान हे पुढील पैकी कोणाचे ग्रामीण भारताच्या प्रवक्ता त्यांचे स्वप्न आहे.

A) डॉ. मनमोहन सिंग

B) डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम✔️

C) सी रंगराजन

D) डॉ. अमर्त्य सेन

लोकअंदाज समिती (Estimates Committees)

√ या समितीला प्राक्कलन समिती  असेही म्हणतात. 


√ या समितीचा उगम १९२१ मध्ये स्थापन  करण्यात आलेल्या स्थायी वित्तीय  समितीच्या स्वरूपात झाला. 


√ स्वातंत्र्यानंतर तत्कालीन वित्त मंत्री  जॉन मथाई यांच्या शिफारसीनुसार  १९५० मध्ये लोकअंदाज समिती  स्थापन करण्यात आली.


√ सुरूवातीला या समितीमध्ये २५ सदस्य असत, १९५६ मध्ये सदस्यसंख्या ३०   इतकी वाढविण्यात आली.


●रचना :


√ लोकअंदाज समितीमध्ये एकूण ३० सदस्य असतात.


√ ते सर्व लोकसभेकडून आपल्या  सदस्यांमधून निवडून दिले जातात.


√ राज्यसभेच्या सदस्यांना या समितीवर    प्रतिनिधीत्व दिले जात नाही. 


√ सदस्यांची निवडणूक एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधीत्व  पद्धतीद्वारे केली जाते, ज्यामुळे लोकसभेतील सर्व पक्षांना प्रतिनिधीत्व  मिळू शकते.


√ मंत्री समितीचा सदस्य बनू शकत नाही.


√ लोकसभेचे अध्यक्ष सदस्यांमधून  एकाची नेमणूक समितीचा अध्यक्ष  म्हणून करतात. 


√ तो नेहमी सरकारी पक्षातीलच असतो.


●कार्ये :


√ लोकअंदाज समितीचे प्रमुख कार्य  अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजांची तपासणी करून सार्वजनिक खर्चात मितव्ययिता सुचविणे हे असते. 


√ त्यामुळे या समितीला सतत मितव्ययिता समिती (Continuous Economy Committee) असे  म्हणतात.


●समितीची कार्ये पुढीलप्रमाणे सांगता  येतील:


१) अर्थसंकल्पीय अंदाजांच्या मुळाशी  असलेल्या रकमेची तरतूद या धोरणांच्या मर्यादेतच राहून धोरणाला अनुरूप कोणती काटकसर, संस्थात्मक सुधारणा, कार्यक्षमता व  प्रशासकीय सुधारणा करता येतील, यासंबंधी अहवाल देणे.


२) प्रशासनात कार्यक्षमता व मितव्ययिता आणण्यासाठी पर्यायी धोरणे सुचविणे.रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे  की नाही याचे परीक्षण करणे.


४) अर्थसंकल्पीय अंदाज संसदेला  कोणत्या स्वरूपात सादर करावे,  याबाबत सल्ला देणे.

 

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था


🔹 जमीनदारांची संघटना


१८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय हक्क मिळविणे व त्याद्वारे आपल्या अडचणी दुर करुन घेणे ही या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यासाठी या जमीनदारांनी सनदशीर मार्गाचा अवलंब केला. ज्या इंग्रजांना भारतीयांबदल सहानुभूती वाटत होती. त्यांचीही मदत या कामासाठी घेण्यात आली होती. तसेच इंग्लंडमधील ब्रिटिश इंडिया सोयायटीशीही सहकार्य करण्यात आले.


"इंडियन असोसिएशन ऑफ बंगाल' १८५१ मध्ये डॉ. राजेंद्रलाल मित्र, रामगोपाल घोष इत्यादिकांनी स्थापली. तिचे कार्य काही काळ चालून ती बंद पडली. तिचे पुनरुज्जीवन इंडियन असोसिएशन ऑफ बेंगॉल प्रेसिडेन्सी या नावाने १८७६ साली सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे झाले.


🔺 बरिटिश इंडियन असोसिएशन


०१. या संस्थेची स्थापना १८५१ मध्ये झाली. यासाठी लॅंड ओनर्स असोसिएशन या नव्या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे सुरुवातीचे सदस्य फक्त जमीनदार असले तरी नंतर यात व्यापारी उद्योगपती डॉक्टर, वकील, वृत्तपत्रकार यांचाही समावेश या संघटनेत झाला. या संघटनेचा दृष्टिकोन राष्ट्रीय स्वरुपाचा होता. बंगालमधील इतर संस्थांची तिचे चांगले संबंध होते. मद्रासमध्येही या संघटनेची शाखा काढण्यात आली होती.


🔸ईस्ट इंंडिया असोसिएशन


१८६५ साली लंडनमध्ये दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी 'लंडन इंडियन सोसायटी'ची स्थापना केली. एक वर्षानंतर या सोसायटीचे रुपांतर 'ईस्ट इंडिया असोसिएशन' मध्ये झाले. ही संस्था लवकरच ब्रिटिशांमध्ये लोकप्रिय झाली. या संस्थेत सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी होते. मुबई, मद्रास, कलकत्ता येथे या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. त्या १८८४ पर्यत जोमाने कार्य करीत होत्या. पुढे ब्रिटिशांची सहानूभूती कमी झाली आणि या संस्थेचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत गेली.


🔷* पुणे सार्वजनिक सभा


०१. न्यायमूर्ती रानडे यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी पुण्यात १८७० साली सार्वजनिक सभेची स्थापना केली. १८७१ मध्ये न्या. रानडे यांनी या संस्थेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. लॉर्ड लिटन या व्हाईसरॉयने १८७७ च्या जानेवारीत दिल्लीला एक मोठा दरबार भरवून इंग्लंडंच्या राणीला भारताची साम्राज्ञी अशी पदवी अर्पण केली.


०२. या प्रसंगी सार्वजनिक सभेने सम्राज्ञीला एक मानपत्र समर्पण केले. मानपत्रात हिंदी जनतेचे हक्क आणि हिंदी राष्ट्राच्या अंतकरणातील राजकीय आकांक्षा स्पष्टपणे नमुद केल्या होत्या. तसेच या निमित्ताने जमलेल्या सर्व प्रांतातील लोकप्रतिनिधीपूढे व राजेराजवाडयांपुढे अखिल भारतीय ऐक्याची, हिंदी पार्लमेंटची कल्पना आणि निरनिराळया प्रांतांतून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याना राष्ट्रीय सभेची कल्पना सुचविली.


🔹* मद्रास महाजन सभा


मद्रासमध्ये १८८४ साली हिंदू या वृत्तपत्राचे संपादक जी सुब्रम्हण्य अय्यर यांनी माहजन सभा नावाची संस्था केली होती. स्थानिक संस्थांच्या जानेवारी १८८५ मध्ये झालेल्या अधिवेशात कायदेमंडळाचा विस्तार करण्याची त्यात भारतीयांना प्रतिनिधीत्व देण्याची न्यायपालिका व राजस्वकार्य स्वतंत्र असण्याची मागणी करण्यात आली होती.


🔷* इंडियन असोसिएशन


०१. २६ जुलै १८७५ रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 'इंडियन असोसिएशन' नावाची संस्था स्थापन केली. मध्यम वर्गातील लोकांच्या विचारांचे प्रतिनिधीत्व करणे आणि सार्वजनिक कार्यात भाग घेणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता व त्यासाठी ही संस्था कार्य करीत होती. या संस्थेच्या वतीने डिसेंबर १८८३ मध्ये कलकत्यास इंडियन नॅशनल कॉन्फरन्स चे पहिले अधिवेशन बोलविण्यात आले.


०२. या अधिवेशात सनदी परीक्षा उच्च शिक्षण, कायदेमंडळातील प्रतिनिधित्च इ. प्रश्नांवर चर्चा झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी विविध प्रांतांचे दौरे काढून जाहीर व्याख्यानांमधून सरकारी धोरणावर टीका केली. त्यामुळे ठिकठिकाणी नवीन संस्था निघू लागल्या.


🔸* इंडियन नॅशनल युनियन


१८८४ च्या शेवटी 'इंडियन नॅशनल युनियनची' स्थापना हयूम यांनी केली. भारताचे संघटन करणे. नैतिक सामाजिक व राजकीय दृष्टिने भारताचा विकास साधणे. सरकार व जनता यांच्यात प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणे इ. या संघटनेची उदिष्टे होती. त्यातूनच राष्ट्रीय सभेचा उदय झाला.


२६ ऑगस्ट १८५२ रोजी बॉम्बे असोसिएशनची जगन्नाथ शंकरशेठ, डॉ. भाऊ दाजी इत्यादिकांनी स्थापना केली. तिचे कार्य काही वर्षांनी बंद पडले. तिचे पुनरुज्जीवन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये ३१ जून १८८५ साली झाले. या स्थानिक प्रयत्नांना अखिल भारतव्यापी रूप १८८५ साली आले.

महत्वाचे प्रश्नसंच

 🔹रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- स्वामी विवेकानंद११४२


 🔹आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती११४३


🔹परार्थना समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- आत्माराम पांडुरंग११४४


🔹सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर----------महात्मा फुले११४५


🔹दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?

उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर११४६


🔹इदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?उत्तर----------- न्या. रानडे११४७


🔹मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर ----------- दादोबा पांडुरंग११४८


 🔹निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?

उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे११४९


🔹महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?

उत्तर ------------- लोकमान्य टिळक११५०


🔹आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?

उत्तर ------------- पंडिता रमाबाई११५१


🔹हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?

उत्तर-------------- महात्मा गांधी११५२ 


🔹भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?

उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले११५३


 🔹गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर -------------- विनोबा भावे११५४


🔹सवासदन ची स्थापना कोणी केली?

उत्तर-------------- रमाबाई रानडे११५५


🔹एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर-------------- न्या. रानडे११५६


🔹परमहंस सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर------------- दादोबा पांडुरंग११५७


 🔹दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर११५८


🔹सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर-------------- ग. वा. जोशी११५९


 🔹शतपत्रे कोणी लिहली?

उत्तर------------ गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)११६०


🔹 गरामगीता कोणी लिहली?

उत्तर------------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

__________________________