Tuesday, 13 June 2023

बॉम्बे असोसिएशनबद्दल न वाचलेली अशी माहिती:



मुंबई प्रांतात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना म्हणून बॉम्बे असोसिएशनचा उल्लेख केला जातो. २६ ऑगस्ट १८५२ रोजी Bombay Assocation ही संघटना स्थापन केली. इ.स. १८५२ मध्ये मुंबईत पारसी आणि मुसलमान जमातीत दंगली भडकल्या. त्यामुळे वातावरण संतप्त झाले. या परिस्थितीचा विचार करण्यासाठी मुंबईतील प्रतिष्ठित व्यक्ती नाना शंकरशेठ यांनी १८ ऑगस्ट १८५२ रोजी आपल्या निवासस्थानी प्रतिष्ठित मुंबईकर नागरिकांची एक बैठक घेतली. ही सभा खासगी व गुप्त स्वरूपाची होती. हिंदी जनता आणि ब्रिटिश अधिकारी यांचा या सभेविषयी चुकीचा गृह होऊ नये म्हणून त्यांनी या सभेला प्रसिद्धी दिली नव्हती. सभेला केवळ भारतीयांनाच आमंत्रित केले होते. त्यामुळे इंग्रज अधिकारी संतापले. त्यांनी सरकारविरुद्ध एक मोठा कट शिजतो आहे, अशी अफवा उठविली. २६ ऑगस्ट १८५२ रोजी जाहीर सभा आमंत्रित केली. एल्फिन्स्टन विद्यालयात ही सभा भरली. सभेचे अध्यक्ष जगन्नाथ शंकरशेठ हे होते.

 सभेची उद्दिष्टे 'Telegraph and Courier' मध्ये स्पष्ट करण्यात आली. त्यात म्हटले की, १) डच, जर्मन व इतर युरोपियनांच्या तुलनेत इंग्रज हे चांगले राज्यकर्ते आहेत. २) इंग्रजांनी भारत जिंकला नसता तर इतर कोणत्यातरी परकियांनी तो जिंकून घेतला असता. अशा शब्दांत इंग्रजांची स्तुती करण्यात आली. या सभेला हिंदू, मुस्लिम, ज्यू, पारसी समाजातील नेते उपस्थित होते. बेम्मनजी होरमसजी यांनी प्रास्ताविक केले. या सभेत 'बॉम्बे असोसिएशन' ही संघटना स्थापन झाली.

बॉम्बे असोसिएसनचे पदाधिकारी खालीलप्रमाणे निवडले गेले. 

१) सन्माननीय अध्यक्ष- सर जमशेटजी जीजीभाई,

२) कार्यकारी अध्यक्ष - जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ..

३) उपाध्यक्ष- बोम्मनजी होरमसजी व खंशेंदजी जमशेठजी.

४) सचिव- भाऊ दाजी लाड आणि विनायकराव जगन्नाथजी.

सराव प्रश्न



[प्र.१] 'नेटिव्ह इंप्रूव्मेंट सोसायटी'ची स्थापना कोणी केली?

अ] बाबा पदमनजी

ब] ना. म. जोशी

क] बाळशास्त्री जांभेकर

ड] गोपाळ हरी देशमुख


उत्तर

क] बाळशास्त्री जांभेकर 

-------------------

[प्र.२] 'लक्ष्मीज्ञान' हा ग्रंथ कोणी लिहिला?

अ] गोपाळ कृष्ण गोखले

ब] आचार्य अत्रे

क] गोपाळ हरी देशमुख

ड] साने गुरुजी


उत्तर

क] गोपाळ हरी देशमुख 

-------------------

[प्र.३] १९२१ च्या राष्ट्रीय सभेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास हे तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या ऐवजी ______________ यांनी प्रभारी अध्यक्षपद भूषवीले.

अ] मौलाना महमद अली

ब] हाकीम अजमल खान

क] बॅ. हसन इमाम

ड] मदन मोहन मालवीय


उत्तर

ब] हाकीम अजमल खान 

{हाकीम अजमल खान हे चित्तरंजन दास यांचे जवळचे मित्र होते. १९२२ च्या गया अधिवेशनाचे अध्यक्षपद चित्तरंजन दास यानी भूषवीले.} 

-------------------

[प्र.४] 'देशप्रेमाने ओथम्बलेला हिमालायासारखा उत्तुंग महापुरुष' असे वासुदेव बळवंत फडके यांचे वर्णन कोणत्या वृत्तपत्राने केले?

अ] केसरी

ब] मराठा

क] अमृतबझार पत्रिका

ड] तरुण मराठा


उत्तर

क] अमृतबझार पत्रिका 

{१८७९ साली फडकेंच्या आटकेनंतर हा लेख छापून आला होता.} 

-------------------

[प्र.५] २३ मार्च १९१८ रोजी मुंबई येथे भरविण्यात आलेल्या 'अस्पृश्यता निवारक परिषदेचे' अध्यक्ष कोण होते?

अ] शाहू महाराज

ब] वि. रा. शिंदे

क] सयाजीराव गायकवाड

ड] बाबासाहेब आंबेडकर


उत्तर

क] सयाजीराव गायकवाड 

{अस्पृश्यता निवारणाची पहिली परिषद.} 

-------------------

[प्र.६] १९४१ साली ___________ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे 'संयुक्त महाराष्ट्र सभा' स्थापन झाली.

अ] रामराव देशमुख

ब] टी. जे. केदार

क] शंकरराव देव

ड] स. का. पाटील


उत्तर

अ] रामराव देशमुख 

रामराव देशमुख-१९४१-संयुक्त महाराष्ट्र सभा 

टी. जे. केदार-१९४२-महाराष्ट्र एकीकरण परिषद 

शंकरराव देव-१९४६-संयुक्त महाराष्ट्र समिती[बेळगाव] 

-------------------

[प्र.७] १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यात ____ प्रमुख विभाग व ______ जिल्हे होते.

अ] ४ प्रमुख विभाग व २४ जिल्हे

ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे

क] ५ प्रमुख विभाग व २४ जिल्हे

ड] ५ प्रमुख विभाग व २६ जिल्हे


उत्तर

ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे 

{विभाग- मुंबई , पुणे , नागपूर, औरंगाबाद} 

{जिल्हे २६ होते. नंतर ९ जिल्ह्यांचे विभाजन होऊन आता ३५ जिल्हे आहेत.} 

-------------------

 [प्र.८] ११ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे झालेल्या घटना समितीच्या बैठकीत _ _ _ _ _ _ यांची संविधान समितीचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.

अ] पंडित नेहरू

ब] वल्लभभाई पटेल

क] जे. बी. क्रपलनी

ड] एच. सी. मुखर्जी


उत्तर

ड] एच. सी. मुखर्जी 

{त्याआधी फ्रँक अँथोनी हे हंगामी उपाध्यक्ष होते} 

-------------------

[प्र.९] घटना समितीच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते?

अ] पंडित नेहरू

ब] जे. बी. क्रपलनी

क] वल्लभभाई पटेल

ड] डॉ. राजेन्द्रप्रसाद


उत्तर

ब] जे. बी. क्रपलनी 

-------------------

[प्र.१०] ९२वी घटना दुरुस्ती कोणत्या परिशिष्टाशी संबधित आहे?

अ] सातव्या

ब] आठव्या

क] नवव्या

ड] दहाव्या


उत्तर

ब] आठव्या 

{९२वी घटना दुरुस्ती(२००३)- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी या चार भाषांचा आठव्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला.}

इतिहास : सराव प्रश्नसंच


*१) भारतात सती प्रथा बंद आंदोलन कोणी सुरु केले?*

A. जगन्नाथ शंकरशेठ✅

B. राजा राममोहन रॉय 

C. ईश्वरचंद्र विघासागर

D. केशवचंद्र सेन


*२) इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते?*

A. शिवराज परांजपे 

B. सेनापती बापट

C. महंमद इकबाल

D. महात्मा गांधी✅


*३) ज्ञानेश्रर महाराजांनी भगवदगीतेवर कोणता ग्रंथ लिहिला?*

A. भावार्थदिपिका 

B. अमॄतानुभव

C. ज्ञानेश्वरी✅

D. हरिपाठ


*४) इ.स १३५० मध्ये संत नामदेवांनी कोठे समाधी घेतली?*

A. देहू 

B. आळंदी

C. पैठण

D. पंढरपूर✅


*५) दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?*

A. रामदास स्वामी✅ 

B. चांगदेव

C. संत तुकाराम

D. संत सावता माळी


*६) शाळेत शिक्षण घेत असतानाच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिणारे?*

A. विष्णूशास्त्री पंडित 

B. लोकहितवादी

C. दादोबा पांडुरंग तर्खडकर✅

D. बाळशास्त्री जांभेकर


*७) महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठाने एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?*

A. बनारस विद्यापीठ 

B. पुणे विद्यापीठ

C. श्रीमती ना.दा.ठाकरसी महिला विद्यापीठ

D. मुंबर्इ विद्यापीठ✅


*८) १९५० मध्ये जगदंब कुष्ठ निवासाची स्थापना कोणी केली?*

A. डॉ. शिवाजीराव पटवर्धन✅ 

B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

C. बाबा आमटे

D. छत्रपती शाहू महाराज


*९) ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत कोण होते?*

A. संत रामदास 

B. संत नामदेव✅

C. संत तुकाराम

D. संत एकनाथ


*१०) स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोणी केला?*

A. रिपन✅

B. लिटन

C. डफरीन 

D. कॉर्नवॉलिस.


आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर

जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंबर्ले  येथे इ.स. ६ जानेवारी १८१२ रोजी झाला.

🌷  बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स.१८२५  साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले.

☘  मुंबईत येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले.

🌷  ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’मध्ये डेप्युटी सेक्रेटरी या महत्त्वाच्या पदावर रुजू झाले.

🌷   इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते (असिस्टंट प्रोफेसर) म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली 

☘  यानंतर शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक म्हणून काम केले. मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली होती. 

🌷  आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आद्य मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारवाद्यांचे प्रवर्तक, शिक्षकतज्ञ, जेष्ट पत्रकार, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक म्हणून ओळखले जाते

☘   ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने ६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. 
इ.स. १७ मे १८४६ रोजी बनेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला

✨🍃✨🍃✨🍃✨🍃✨🍃✨🍃✨

📕  सामाजिक कार्य   📕

🖍  सार्वजनिक गंथालयांचे महत्त्व ओळखून बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी  या ग्रंथालयाची जांभेकरांनी स्थापना केली.

🖍  जांभेकर यांना ज्ञानेश्‍वरीची पहिली मुद्रित आवृत्ती इ.स. १८४५ साली काढली

🖍  त्यांच्या प्रकाशित साहित्यकृतींमध्ये नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा प्राचीन, इतिहास, शून्यलब्धी, सार संग्रह, या ग्रंथांचा समावेश आहे.

🖍  १८३२ मध्ये ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरु केले. ‘दिग्दर्शन’ हे मासिकसुद्धा त्यांनी सुरु केले

🖍  बाळशास्त्रींनी साधारणपणे इ.स. १८३० ते इ.स. १८४६ या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले

सराव प्रश्नमालिका


1. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?

सिंगापूर

टोकिओ

रंगून 

बर्लिन


● उत्तर - सिंगापूर


2. इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?

सुभाषचंद्र बोस 

रासबिहारी बोस

जगन्नाथराव भोसले

कॅप्टन मोहन सिंग


● उत्तर - रासबिहारी बोस


3. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?

संत ज्ञानेश्वर

संत एकनाथ

संत तुकाराम

संत नामदेव


● उत्तर - संत एकनाथ


4. ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कोणता?

ज्ञानेश्ररीची शुध्द प्रत

भावार्थ रामायण

मनाचे श्लोक

ज्ञानेश्वरी

● उत्तर - ज्ञानेश्वरी


5. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?

तात्या टोपे

राणी लक्ष्मीबाई 

शिवाजी महाराज 

नानासाहेब पेशवे


● उत्तर - तात्या टोपे


6. भारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?

बाडोंली

खेडा

चंपारण्य

चौरीचौरा


● उत्तर - चंपारण्य


7. पुणे समाचार हे दैनिक कोणी सुरू केले?

बाबा पद्मजी

गो.ग. आगरकर

शि.म. परांजपे

श्रीधर व्यंकटेश केतकर


● उत्तर - श्रीधर व्यंकटेश केतकर


8. अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली हाती?

नाना जगन्नाथ शंकरशेठ

बाळशास्त्री जांभेकर

विष्णूशास्त्री पंडित

विष्णूबुवा ब्रह्मचारी


● उत्तर - बाळशास्त्री जांभेकर


9. खालीलपैकी योग्य जोडी कोणती?

बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल 

असहकार चळवळ - लोकमान्य टिळक

चंपारण्य सत्याग्रह - गो. कृ. गोखले

रामकृष्ण मिशन - दयानंद सरस्वती


● उत्तर - बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल


10. र्इष्ट असेल ते बोलणार,  साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?

केसरी

मराठा

ज्ञानोदय

सुधारक (गो.ग आगरकर)


● उत्तर - सुधारक (गो.ग आगरकर)

स्वतंत्रता संघर्ष प्रश्नोतर

1. महात्मा गांधी कांग्रेस के अध्यक्ष किस अधिवेशन में चुने गए ?

►-बेलगांव अधिवेशन (1924 ई.)


2. गदर पार्टी की स्थापना कब और कहां हुई ?

►-1 नवंबर 1913 ई. में सैनफ्रांसिस्को ( अमेरिका).


3. गदर पार्टी किसके नेतृत्व में बनी ?

►-लाला हरदयाल.


4. गदर पार्टी के पहले अध्यक्ष कौन बने ?

►-सोहन सिंह भक्खाना


5. महात्मा गांधी को कैसर-ए-हिंद की उपाधि से कब नावाजा गया ?

►-सन् 1915 में ।.


6. किस अधिवेशन में कांग्रेस के नरम दल और गरम दल में एकता हो गई?

►-लखनऊ अधिवेशन (1916 ई.)


7. मुस्लिम लीग और कांग्रेस ने मिलकर किस अधिवेशन में एक संयुक्त समिति की स्थापना की ?

►-लखनऊ अधिवेशन


8. स्वशासन के लिए बाल गंगाधर तिलक ने किस संस्था की स्थापना की ?

►-होमरूल लीग (मार्च 1916 ई. में पूना में)


9. ऐनी बेसेन्ट ने होमरूल लीग की स्थापना कब और कहां की ?

►-सितंबर 1916 ई. में मद्रास में ।


10. ऐनी बेसेंट के नेतृत्व में स्थापित होमरुल लीग के प्रथम सचिव कौन थे ?

►-जार्ज अरुण्डेल



11. भर्ती करने वाला सार्जेंट किसे कहा जाने लगा ?

►-महात्मा गांधी । क्योंकि प्रथम विश्वयुद्ध के दौरान गांधीजी ने लोगों को सेना में भर्ती होने के लिए प्रोत्साहित किया था ।


12. साबरमती आश्रम की स्थापना किसने की ?

►-महात्मा गांधी


13. महात्मा गांधी ने साबरमती आश्रम की स्थापना कब और कहां की ?

►-1916 ई. में अहमदाबाद में ।


14. चंपारण आने के लिए गांधी को किसने प्रेरित किया था ?

►-बिहार के किसान नेता राजकुमार ने ।


15. सत्याग्रह का सर्वप्रथम प्रयोग गांधी जी ने कहां किया ?

►-दक्षिण अफ्रिका


16. भारत में सत्याग्रह का सबसे पहले प्रयोग गांधी ने कहां किया ?

►-चंपारण (बिहार)


17. चंपारण का आंदोलन कब हुआ था ?

►-सन् 1917 में ।


18. चंपारण विद्रोह के कारण अंग्रेजों को कौन सी प्रथा समाप्त करनी पड़ी ?

►-तीनकठिया प्रथा


19. महात्मा गांधी ने पहली बार भूख हड़ताल किसके समर्थन में किया था ?

►-1918 ई. में अहमदाबाद मिल मजदूरों के हड़ताल के समर्थन में ।


20. 1918 ई. में महात्मा गांधी ने गुजरात के खेड़ा जिले में कौन सा आंदोलन चलाया ?

►-कर नहीं आंदोलन



21. रौलट एक्ट कब लागू किया ?

►-19 मार्च 1919 ई.


22. रौलट एक्ट क्या था ?

►-ऐसा कानून जिसके तहत किसी भी संदेहास्पद व्यक्ति को बिना मुकदमा चलाए गिरफ्तार किया जा सकता था । उसके खिलाफ ने तो कोई अपील, न कोई दलील और न कोई वकील किया जा सकता था।


23. गांधी जी ने रौलेट एक्ट के विरोध में देश व्यापी हड़ताल कब शुरु की ?

►-6 अप्रैल 1919 ई.


24. जालियांवाला बाग हत्याकांड कब हुआ ?

►-13 अप्रैल 1919 ई.


25. जालियांवाला बाग हत्याकांड कहां हुआ ?

►-अमृतसर


26. जालियांवाला बाग हत्याकांड का नेतृत्व किसने किया ?

►-जनरल डायर

*

27. जालियांबाला बाग हत्याकांड के पीछे वजह क्या थी ?

►-डॉ सतपाल और सैफुद्दीन किचलू की गिरफ्तारी के विरोध में हो रही जनसभा पर जनरल डायर ने अंधाधुंध गोली चलाई ।


28. जालियांवाला बाग हत्याकांड में कितने लोगों की मौत हुई ?

►-सरकारी रिपोर्ट के अनुसार 379 और कांग्रेस समिति के अनुसार 1000 लोग मारे हुए ।


29. जालियांवाला बाग हत्याकांड में किस भारतीय ने जनरल डायर का सहयोग किया था ?

►-हंसराज


30. किसने जालियांवाला बाग हत्याकांड के विरोध में वायसराय की कार्यकारिणी परिषद् की सदस्यता से इस्तीफा दे दिया ?

►-शंकरन नायर


31. किसकी अध्यक्षता में ब्रिटिश सरकार ने जालियांवाला बाग हत्याकांड की आठ सदस्यीय जांच समिति गठित की ?

►-लॉर्ड हंटर.


32. जिस जांच समिति का गठन ब्रिटश सरकार ने किया उसके सदस्यों में कितने भारतीय थे ?

►-तीन


33. कांग्रेस ने किसके नेतृत्व में जालियांवाला बाग हत्याकांड की जांच के लिए आयोग गठित की ?

►-मदन मोहन मालवीय । इस आयोग के अन्य सदस्यों में मोतीलाल नेहरू और गांधीजी भी थे ।


34. जालियांवाला बाग किस व्यक्ति की संपत्ति थी ?

►-जल्ली नाम के व्यक्ति ।


35. खिलाफत आंदोलन किसके खिलाफ शुरू किया किया ?

►-मित्र राष्ट्रों के खिलाफ । विशेषकर ब्रिटेन के खिलाफ


36. खिलाफत आंदोलन किसके समर्थन में किया गया था ?

►-टर्की के खलीफा के समर्थन में भारतीय मुसलमान ने आंदोलन शुरु किया।


37. पूरे देश में खिलाफत दिवस कब मनाया गया ?

►-19 अक्टूबर 1919 ई.


38. हिंदू और मुसलमानों की संयुक्त कांफ्रेंस की अध्यक्षता महात्मा गांधी ने कब की ?

►-23 नवंबर 1919 ई.


39. असहयोग आंदोलन कब शुरु हुआ ?

►-1 अगस्त, 1920 ई.

गांधी युगाचा उदय

सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला. 


आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. 


जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले. 


जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.


1. भारतातील चळवळी :

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या. 


चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) -


चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली. 


साराबंधी चळवळ (सन 1918) -


1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत. 


गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली. 


शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला. 


हा गांधीजीचा दूसरा विजय होता. 


रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) -


भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला. 


या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता. 


या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. 


हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय. 


13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली. 


या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.


2. असहकार आंदोलन :

डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.


सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले. 


फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली. 


या आगीत पोलिस अधिकार्‍यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.


या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.


3. स्वराज्य पक्षाची स्थापना :

सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या. 


असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 


काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.


4. सायमन कमिशन (1928) :

 


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले. 


या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते. 


या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते. 


या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.


5. नेहरू रिपोर्ट (1928) :


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले. 


राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. 


नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.


6. सविनय कायदेभंग आंदोलन :


1229 चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षतेखाली लाहोर येथे भरले होते. 


या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना पंडित नेहरु यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखालील सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

7. दांडी येथील मिठाचा सत्याग्रह :

सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाअंतर्गत गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडण्याचा निर्णय घेतला. 


12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून गुजरातमधील दांडी येथे जाण्याकरिता आपल्या 78 अनुयायासह प्रवासाला सुरुवात केली. 


385 किलोमीटर अंतर पार करून गांधीजी 6 एप्रिल रोजी दांडी येथे पोहचले. तेथे गांधीजी व त्यांच्या अनुसायांनी मिठाचा कायदा मोडला. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली. 


यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले. 


महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादि ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली.


सविनय कायदेभंग आंदोलनात खालील ठिकाणे प्रसिद्धीला आली. 


6 मे रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍याने लोकांना आवर घालण्यासाठी बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले. 


आंदोलन चिरडून टाकण्याकरिता शासनाने लष्कराला पाचारण केले व सोलापूर शहरात लष्करी कायदा लागू केला.

8. वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन :

सन 1940 मध्ये मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली रामगढ येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. 


महात्मा गांधीजींनी वैयक्तिक आंदोलनाचे आपले पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. 


विनोभा भावेनंतर जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांची सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली होती.

9. भारत छोडो आंदोलन (1942) :

क्रिप्स योजनेनंतर स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार राष्ट्रीय सभेने केला. 


14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत चलेजाव आंदोलन ठराव पास करण्यात आला. 


8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे गवालिया टॅक मैदानावर गांधीजींनी आपल्या भाषणात बोलतांना इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिला. त्याच बरोबर भारतीयांनी या क्षणापासून स्वत:ला स्वतंत्र समजावे आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यानंतर भारतात चलेजाव आंदोलनाला सुरुवात झाली. 


प्रति सरकारे -


इंग्रज राजवट उलथून पडण्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय नेत्यांनी प्रतिसरकार स्थापन केले. 


प्रतिसरकार म्हणजे इंग्रज शासनाचा कारभार बंद पाडून लोकांनी निवडलेल्या पंचायतीमार्फत गावगाड्याचा कारभार चालविणे होय.

चलेजाव आंदोलन काळामध्ये सातारा येथे नाना पाटील यांनी स्थापन केलेले प्रतिसरकार देशभर खूपच गाजले. 


महाराष्ट्राखेरीज उत्तरप्रदेशमधील (बलिया), बिहारमधील (भागलपूर), बंगालमधील (मिदानपूर) येथील प्रतिसरकारे खूपच गाजली. 


सशस्त्र प्रतिकाराची चळवळ -


सन 1934 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी आचार्य नरेंद्र देव, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांच्या सहकार्याने राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केला होती.


या संघटनेच्या अरुणा असफअली, उषा मेहता, एस.एम.जोशी, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांनी गुप्तपणे रेडिओ केंद्रे चालवून सरकारी अत्याचाराच्या बातम्या प्रसारीत करणे, पत्रके छापणे व ती वाटणे इत्यादी कार्य भूमिगत राहून केले. 


भारतीय सैनिकाचा उठाव -


चलेजाव आंदोलनाच्या काळात 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील तलवार युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड उभारले. बी.सी. दत्त या उठावाचे प्रमुख होते.

या पाठोपाठ कराची व मद्रास येथील नाविक दलात उठाव झाला. 


नौसेनेच्या उठावाला पाठींबा देण्याकरिता कराची, अंबाला व दिल्ली येथील विमानदलातील सैनिकांनी उठाव केला. 


सरदार वल्लभभाई पटेलांनी उठावात मध्यस्ती केल्यामुळे सैनिकांचा हा उठाव शमला.

10. भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल :

सन 1945 मध्ये इंग्लंडमध्ये सत्ताबदल होऊन मेजर अॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्ष सत्तेत आला. हा पक्ष सुरुवातीपासून स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने होता. 


मार्च 1946 मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अॅटली यांनी इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्याविषयी वाटाघाटी करण्याकरिता भारतात एक कमिशन पाठविण्याची घोषणा केली. 


त्रिमंत्री योजना (सन 1946) -


या घोषनेनुसार मेजर अॅटली 24 मार्च 1946 रोजी स्टफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व ए.व्ही. अलेक्झांडर हे तीन सभासदांचे कमिशन भारतात पाठविले. 


या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी मान्य करून एक योजना भारतीयांपुढे  मांडली. ही योजना त्रिमंत्री योजना म्हणून प्रसिद्ध आहे. 


हंगामी सरकार -


त्रिमंत्री कामिशनच्या योजनेनुसार त्यावेळचे व्हॉईसरॉय वेव्हेलने 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. 


माऊंट बॅटन योजना -


24 मार्च 1947 रोजी माऊंट बॅटन भारतात आले. 


भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांशी भेटी घेऊन फाळणीची योजना तयार केली. 


3 जून 1947 रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. 


मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला.

___________________________________

हायड्रोजन



🅾️उदजन म्हणजेच हायड्रोजन (अणुक्रमांक: १) हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे. रसायनशास्त्रात उदजन H ह्‍या चिन्हाने दर्शवितात.

सामान्य तापमानाला आणि दाबाला उदजन वायुरूपात असतो. उदजन हा रंगहीन, गंधहीन, चवरहित व अतिशय ज्वलनशील वायू आहे. स्थिर स्वरूपात असताना उदजनचे रेणू प्रत्येकी २ अणूंनी बनलेले असतात.


🅾️ह सर्वांत हलके मूलद्रव्य आहे. उदजन हे विश्वात सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य आहे. विश्वात आढळणाऱ्या सर्व पदार्थांच्या वजनापैकी ७५ टक्के वजन उदजनचे आहे.विश्वातील बहुतेक ताऱ्यांमध्ये मुख्यत्वे उदजन हेच मूलद्रव्य प्लाज्मा ह्‍या स्वरूपात सापडते. पृथ्वीवर उदजन क्वचित मूलद्रव्य स्वरूपात आढळतो. उदजनचे औद्योगिकरीत्या 

उत्पादन मिथेनसारख्या कर्बोदकपासून केले जाते. बहूतकरून या मूलद्रव्य स्वरूपात तयार केलेल्या उदजनचा वापर संरक्षित पद्धतीने उत्पादनाच्या स्थळीच केला जातो. अशा उदजनचा वापर मुख्यत्वे खनिज-इंधनांच्या श्रेणीवाढीसाठी  व अमोनियाच्या उत्पादनासाठी केला जातो. 


🧩H2 चा शोध


🅾️H2 स्वरूपातील उदजन वायू पॅरासेल्सस (इ.स. १४९३ - इ.स. १५४१) ह्या स्विस अल्केमिस्टने प्रथम तयार केला. 


🅾️तयाने धातू आणि तीव्र आम्ल ह्यांच्या प्रक्रयेमधून हा ज्वलनशील वायू तयार केला. त्याला त्या वेळेस उदजन हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे ह्याची कल्पना नव्हती. इ.स. १६७१ मध्ये रॉबर्ट बॉइल ह्या आयरिश रसायनशास्त्रज्ञाने उदजनचा पुन्हा शोध लावला व सौम्य आम्ल आणि लोखंडाच्या चूर्णाच्या प्रक्रियेतून उदजन वायूच्या उत्पादनाचा तपशील दिला. इ.स. १७६६ मध्ये हेन्री कॅव्हेंडिश ह्या ब्रिटिश शास्त्रज्ञाने उदजनला एक स्वतंत्र पदार्थ म्हणून मान्यता दिली. धातू आणि आम्ल यांच्या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या या वायूस त्याने "ज्वलनशील हवा" असे नाव दिले आणि ह्या वायूच्या ज्वलनातून पाणी तयार होते हे त्याने शोधले. अर्थात त्याने उदजन हा आम्लामधून मुक्त झालेला नसून पाऱ्यामधून मुक्त झालेला घटक आहे असा चुकीचा निष्कर्ष काढला. पण उदजनच्या अनेक कळीच्या गुणधर्मांचे त्याने अचूक वर्णन दिले. असे असले तरी, मूलद्रव्य म्हणून उदजनचा शोध लावण्याचे श्रेय सर्वसाधारणपणे त्यालाच दिले जाते. इ.स. १७८३ मध्ये आंत्वॉन लवॉसिए ह्या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाने या वायूच्या ज्वलनामुळे पाणी तयार होते, म्हणून त्या वायूला उदजन असे नाव दिले.


🅾️सरुवातीस उदजनचा उपयोग मुख्यत्वे फुगे आणि हवाई जहाजे बनवण्यासाठी होत असे. H2 हा वायू सल्फ्यूरिक आम्ल आणि लोह ह्यांच्या प्रक्रियेतून मिळवला जात असे. हिंडेनबर्ग हवाईजहाजातही H2 वायूच होता, त्यास हवेमध्येच आग लागून त्याचा नाश झाला. नंतर H2च्या ऐवजी हवाई जहाजांमध्ये आणि फुग्यांमध्ये हळूहळू हेलियम हा उदासीन वायू वापरण्यास सुरुवात झाली.


🧩उपयोग


🅾️उदजन हे खनिज तेलापेक्षा ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत सर्वात कार्यक्षम इंधन ठरते. पेट्रोल दर लिटरमध्ये ४२००० बी. टी. यु.(ब्रिटिश थर्मल युनिट) तर द्रव उदजन दर लिटरला १,३४,५०० बी. टी. यु. एवढी उष्णता निर्माण करतो. परंतु याच्या निर्मितीचा खर्च परवडत नसल्यामुळे उदजन हे प्रचलित साधन होण्यात अडचण येत आहे.


🧩नामकरण


🅾️हायड्रोजनच्या नावाची उत्पत्ती प्राचीन ग्रीक भाषेतील हायडॉर (ग्रीक: ὕδωρ (हीद्र)) म्हणजे पाणी, तर जेनेस म्हणजे तयार करणे या शब्दांच्या संयोगातून झाली आहे. हायड्रोजनच्या ज्वलनातून पाणी तयार होते म्हणून 'पाणी तयार करणारा' अर्थात 'हायड्रोजन' असे त्याचे नामकरण 'आंत्वॉन लवॉसिए' ह्या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाने केले.

पोलीस भरती साठी महत्त्वाचे 30 प्रश्न


🔶 ----------- यांनी  'सेंट्रल हिंदू कॉलेज' ची स्थापना  केली.

     - ॲनी बेझंट

       

🔶 ------ हा देशातील भारतरत्‍न नंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.

  - पद्‍म विभूषण


🔶 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद ------ ह्यांनी भूषविले. 

    - राजर्षी शाहू महाराज


🔶 इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका 1972 साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत❓ 

    - सेवा

 

🔶  शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

   - औरंगाबाद


🔶  जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक  नियम लागू होतो❓

     - तिसरा


🔶  दुधात  -------  ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते.

   - शर्करा


🔶 अति प्रचंड खजिन्या मुळे चर्चेत आलेले पद्‍मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे❓

    - केरळ


🔶 राज्य घटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे❓

      - 368


🔶 गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते❓

    - लोकसंख्या


🔶 गोपाळ गणेश आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या ------  ह्या संस्थेचे शुभचिंतक होते. 

    - शारदा सदन

 

🔶 अतिरिक्त मद्यपानाने  ------- ची कमतरता जाणवते.

   - थायामिन


🔶 हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे❓

    - रांची


🔶 फेकरी कोणत्या हा औष्णिक विद्युतप्रकल्प जिल्ह्यात आहे? 

     - जळगाव


🔶 ------ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे.

     - संगमरवर


🔶 1917 व 1934 च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत? 

    - मणि भवन

 

🔶 भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते?

    - आयएनएस गरुड


🔶 कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे❓

    - सिंक्रोनस डायनॅमिक रॅम

 

🔶 मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत❓

     - लक्षद्वीप


🔶 कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप) चा विस्तार काय आहे❓

    - सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल

 

🔶 भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे❓

      - १२ लाख चौ.कि.मी.


🔶 नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार -----

      - दख्खनचे पठार


🔶 महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे❓

     - मध्य प्रदेश


🔶 महाराष्ट्राच्या ------  कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत.

   - उत्तरे

 

🔶 परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात. 

    - निर्मळ रांग

 

🔶  'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते? 

     - नदीचे अपघर्षण


🔶  लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत❓

    - किन्हाळा


🔶 दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे❓

   - Lignite


🔶 बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते❓

    - औरंगाबाद

 

🔶 Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो❓

   - पाचगणी


जञानेंद्रिये (Sensory Organs)

प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात- डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ.


डोळे (Eyes):


८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होते.


पापणीची सतत उघडझाप चालू असते. त्याद्वारे अश्रू डोळ्यावर समप्रमाणात पसरविले जाऊन डोळा ओलसर राहतो.


अश्रू हे सोडियम क्लोराईड व सोडियम बाय कार्बोनेटचे मिश्रण असते. त्यामध्ये लायसोझाइम (Lysozyme) नावाचे विकर असते. जे ऍन्टीसेप्टीक म्हणून काम करते.


बुबुळ (Cornea):


नेत्रदानामध्ये डोळ्याचा हा भाग काढला जातो. मृत्यूनंतर तो चार तासाच्या आत काढणे गरजेचे असते.


बुबुळ रोपणास Keratoplasty असे म्हणतात. मानवी अवयवाचे पहिले यशस्वी रोपण (Transplantation) बुबुळाचे करण्यात आले होते. ते एक्वर्ड कौराड झिर्म (Edward Kourad Zirm) या शास्त्रज्ञाने 7 डिसेंबर 1905 रोजी केले होते.


दृष्टिपटल (Retina):


हा डोळ्याचा पडदा असून वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते. वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर उलटी (inverted & Reversed) पडत असते. मात्र, मेंदूमार्फत तिचे आकलन सुलट केले जाते.


दृष्टीसातत्य :


वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर १/१६ सेकंदासाठी राहत असते. त्याच्या आतच त्याच वस्तूची प्रतिमा पुन्हा पडल्यास त्या दोन प्रतिमांमधील फरक जाणवून येत नाही. याला दृष्टिसातत्य असे म्हणतात. त्यामुळेच सिनेमाच्या पडद्यावर हलणारी चित्रे पाहणे शक्य होते.


दृष्टिदोष (Defects Of Vision):


दृष्टिदोष हे प्रामुख्याने नेत्रभिंगातील संरचनात्मक दोषामुळे निर्माण होत असतात.


१) निकटदृष्टिता / हृस्वदृष्टी (Myopia/ Short-sightedness):


जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. तर लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.


डोळ्याचा आकार मोठा, लांबट व चपटा होतो, त्यामुळे वस्तूची प्रतिमा पडद्याच्या अलीकडेच पडते. प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्याच्या अलीकडेच काही अंतरावर होते. अर्थात, प्रकाशकिरण ज्यावेळी पडद्यावर पोहोचतात त्यावेळी ते विकेंद्रित झालेले असतात.


उपाय: अंतर्गोल भिंगाचा चष्मा.



२) दूरदृष्टिता/ दीर्घदृष्टी (Hypermetropia/Longsightedness):


दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, तर जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.

डोळ्याचा आकार मोठा व उभट होतो. त्यामुळे प्रतिमा पडद्याच्या मागे पडते.

उपाय: बहिर्गोल भिंगाचा चष्मा


३) विष्मदृष्टी / अबिंदूकता (Astigmatism):


बुबुळाच्या किंवा भिंगाच्या किंवा दोघांच्या वक्रतेमध्ये कमी -जास्तपणा निर्माण झाल्यास हा दोष निर्माण होतो.

त्यामुळे वस्तूपासून येणाऱ्या प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्यावर एकाच ठिकाणी न होता दोन किंवा अधिक ठिकाणी होते. त्यामुळे वस्तू अस्पष्ट दिसतात.

हा दोष ह्रस्व व दीर्घदृष्टी या दोन्हींमध्ये आढळू शकतो.

 उपाय: दंडगोलाकार भिंगाचा चष्मा.


४) वृध्ददृष्टिता/ चाळीसी (Presbyopia):


वाढत्या वयामुळे होणार दोष

दूरदृष्टीतेचा एक प्रकार

समायोजी स्नायू दुर्बल बनल्याने भिंगाच्या समायोजन शक्तीमध्ये हळूहळू होणाऱ्या कमतरतेमुळे निर्माण होतो, त्यामुळे जवळच्या वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत.

उपाय: वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे.


PH VALUE



 🔰जल का Ph मान = 7

🔰 दध का ph मान = 6.4

🔰 सिरके का ph मान = 3

🔰 मानव रक्त का ph मान =7.4

🔰 नीबू का ph मान = 2.4

🔰 NaCl का ph मान = 7

🔰 शराब का ph मान = 2.8

🔰 मानव मूत्र का ph मान = 4.8-8.4

🔰 समुद्री जल का ph मान =8.5

🔰 आसू का ph मान =7.4

🔰मानव लार का ph मान =6.5-7.5

 अन्य एसिडिक सूची
HCL का PH मान = 0

🔰 H2SO4 का PH मान = 1.0

🔰 सब, सोडा का pH मान(pH Value) =3.0

🔰 अचार का pH मान(pH Value) =3.5-3.9

🔰 टमाटर का pH मान(pH Value) =4.5

🔰 कले का pH मान(pH Value) =4.5-5.2

🔰 एसिड वर्षा का pH मान(pH Value) =5.0 के आसपास

🔰 रोटी का pH मान(pH Value) =5.3-5.8

🔰 लाल मांस का pH मान(pH Value) =5.4 से 6.2

🔰 चारेदार पनीर का pH मान(pH Value) =5.9

🔰मक्खन का pH मान(pH Value) =6.1 से 6.4

🔰 मछली का pH मान(pH Value) =6.6 से 6.8

🔰 अन्य क्षारकता सूची:🔰

🔰 शम्पू का pH मान(pH Value) = 7.0 से 10

🔰 बकिंग सोडा (सोडियम बाइकार्बोनेट) का pH मान(pH Value) = 8.3

🔰 टथपेस्ट का pH मान(pH Value) = लगभग 9

🔰 मग्नेशिया के दूध का pH मान(pH Value) =10.5

🔰 अमोनिया का pH मान(pH Value) =11.0

🔰 हयर स्ट्रोकिंग केमिकल्स का pH मान(pH Value) =11.5 से 14

🔰 लाइम (कैल्शियम हाइड्रोक्साइड) का pH मान(pH Value) =12.4


🔰 सोडियम हाइड्रोक्साइड (NaOH) का pH मान(pH Value) =14.0