Friday, 9 June 2023

तलाठी भरती..

 जाणुन घ्या या परिक्षेच्या तयारी संदर्भात


  शैक्षणिक अर्हता 

तलाठी पदासाठी संवैधानिक विद्यापीठाची पदवी उमेदवाराने धारण करणे आवश्यक असते तसेच शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अन्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठीचे ज्ञान आवश्यक आहे.

संगणक/ माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत ती प्राप्त करणे आवश्यक राहील. माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी/ हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी/ हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

.

 वयोमर्यादा

तलाठी पदाची जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी व 33 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा 38 वर्षे अशी राहील.( याबाबत ऍड मध्ये अधिक माहिती स्पष्ट होईल )

.

 पदभरतीचा कार्यक्रम : जिल्हा निवड समितीने जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून लेखी परीक्षा देण्यापर्यंतचा कालावधी 50 ते 60 दिवसांचा असतो. त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध होण्याची वाट न बघता विद्यार्थ्यांनी अगोदरपासूनच या परीक्षेची चांगली तयारी केल्यास लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीत प्रवेश करता येतो. तलाठी पदाकरिताही आता हजारो विद्यार्थी अर्ज करतात. त्यामुळे साहजिकच स्पर्धा वाढते. शासनाच्या निर्णयानुसार या पदासाठी आता मौखिक परीक्षा घेण्यात येणार नसून फक्त लेखी परीक्षेच्या गुणाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तलाठी पदासाठी गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी एकूण गुणांच्या 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.


 परीक्षेचा दर्जा

शासनाच्या तरतुदीनुसार ज्या पदाकरिता पदवी ही कमीत कमी अर्हता आहे, अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील; परंतु, मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) दर्जाच्या समान राहील.


 अभ्यासक्रम

तलाठी पदाच्या परीक्षेला 

1) मराठी, 

2) इंग्रजी, 

3) सामान्यज्ञान 

4) बौद्धिक चाचणी 


या विषयांवरील प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुण असून, एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल.


 परीक्षेचे स्वरूप

तलाठी पदासाठीची लेखी परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. त्यासाठी 100 प्रश्नांना प्रत्येकी दोन गुण याप्रमाणे एकूण 200 गुण असतील. परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी असेल.


 अभ्यास घटक 

या परीक्षेसाठी जे चार अभ्यासघटक दिलेले आहेत, त्यावर 1) मराठी- 25 प्रश्न, 2) इंग्रजी- 25 प्रश्न, 3) सामान्यज्ञान- 25 प्रश्न, 4) बौद्धिक चाचणी- 25 प्रश्न याप्रमाणे एकूण 100 प्रश्न विचारले जातील.


 परीक्षेची तयारी 

या परीक्षेची तयारी करताना सर्वात महत्वाचे पाठीमागील प्रश्न पत्रीकांचा अभ्यास अत्यंत महत्वाचा ठरतोय. विद्यार्थ्यांना बौद्धिक चाचणी व इंग्रजी हे घटक अवघड वाटतात; परंतु या घटकातील प्रश्नांचा रोज सराव केल्यास पैकीच्या पैकी गुण मिळविता येतात. गुणवत्ता यादीत स्थान पटकावयाचे असेल, तर चारही अभ्यास घटक महत्त्वाचे आहेत, हे लक्षात असू द्या. सामान्यज्ञान या अभ्यासघटकाची व्याप्ती देखील भरपूर आहे, याची जाणीव सतत असू द्या. महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रविषयक सामान्यज्ञान, आधुनिक भारताचा इतिहास, समाजसुधारक, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी, महाराष्ट्रातील जिल्हे अशा अनेक विषयांचा समावेश यात आहे. म्हणूनच या परीक्षेची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.


याप्रमाणे अभ्यास कसून केल्यास आपणास नक्की यश मिळेल...


महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम

🔅विषय अभ्यासक्रम

1.मराठीसमानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार,
शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण,
क्रियाविशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी,
वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द

2.Englishvocabulary Synoms & anytoms, proverbs,
tense & kinds of tense, question tag,
use proper form of verb, spot the error,
verbal comprehension passage etc,
Spelling, Sentence, structure,
one word substitution, phrases.

3.चालू घडामोडी
(Current Affairs)सामाजिक, राजकीय, आर्थिक ,क्रीडा, मनोरंजन.

4.सामान्य ज्ञान
(General Knowledge)महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायतराज व राज्यघटना,
भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र,
महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य,
भारताच्या शेजारील देशांची माहिती.

5.बुद्धिमत्ता
(Aptitude)अंकमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे,
समसंबंध – अंक, अक्षर, आकृती,
वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.

6.अंकगणित
(Arithmetic)गणित – अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार,
काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी,
चलन, मापनाची परिणामी, घड्याळ.

👉(मोठी जाहीरात येण्याची दाट शक्यता आहे चालूद्या जोरदार अभ्यास🔥🔥)

(तलाठी भरती चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा)🙏
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️