Monday, 3 April 2023

महानगरपालिका बद्दल संपुर्ण माहिती


🔸3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते.


🔹महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात.


🔸महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक उपमहापौर निवडला जातो.


🔹महापौराचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.

महानगर पालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना ‘नगरसेवक’ म्हणतात.


🔸महापौरास शहरातील प्रथम नागरिक असे संबोधतात.


🔹महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो.


🔸आयुक्त हा भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ सनदी अधिकारी असतो.


🔹महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्यसरकार तीन वर्षासाठी करते.


🔸महानगरपालिकेचे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तयार करतो.


🔹महानगरपालिकेच्या बैठकांना हजर राहण्याचा अधिकार आयुक्तांना असतो.


🔸सध्या महाराष्ट्रात 28 महानगरपालिका आहेत. (28 वी - इचलकरंजी )


🔹पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका देशातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका गणली जाते.

१००% विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क असलेले हरियाणा हे भारतातील पहिले राज्य बनले आहे



◆ भारतातील हरियाणा राज्यातील रेल्वे नेटवर्क भारतीय रेल्वेद्वारे पूर्णपणे विद्युतीकरण करण्यात आले होते, ज्यामुळे ते आपल्या रेल्वे नेटवर्कचे १००% विद्युतीकरण साध्य करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे.


◆ हरियाणाचे विद्यमान ब्रॉडगेज नेटवर्क १,७०१ रूट किलोमीटर असून, जे आता १००% विद्युतीकरण झाले आहे, परिणामी कमी झालेल्या लाईन अंतराच्या खर्चात (सुमारे २.५ पट कमी), जास्त वाहण्याची क्षमता, वाढलेली विभागीय क्षमता, कमी ऑपरेटिंग आणि देखभाल खर्च यामुळे बचत होते.


➤ नवीनतम अद्यतनांनुसार, भारतातील सात विभागीय रेल्वेच्या ब्रॉडगेज मार्गांनी १००% विद्युतीकरणाचे लक्ष्य गाठले आहे.


◆ ईस्ट कोस्ट रेल्वे (ECoR)

◆ उत्तर मध्य रेल्वे (NCR) 

◆ उत्तर पूर्व रेल्वे (NER)

◆ पूर्व रेल्वे (ER)

◆ मध्य रेल्वे (CR)

◆ दक्षिण पूर्व रेल्वे (SER)

◆ पश्चिम मध्य रेल्वे (WCR)


चालू घडामोडी प्रश्नसराव


(1)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(2)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम .


(3)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- 20 फेब्रुवारी .


(4)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी .


(5)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू .


(6)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर .


(7)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा .


(8)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- 23 मार्च .


(9)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस .


(10)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.

━━━━━━━━━━━━━━

Daily Top 10 News : 4 April 2023

- - - - - - - - - - - -  - - - 

1) G20 एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुपची दुसरी बैठक गुवाहाटी इथं सुरू होणार


2) उपराष्ट्रपती यांच्या पत्नी सुदेश धनखड यांचा अर्थशास्त्रातल्या पीएचडी पदवीनं गौरव


3) कार्बन उत्सर्जन आटोक्यात ठेवण्यासाठी हरित हायड्रोजन हा आश्वासक पर्याय ठरेल असा भूपिंदरसिंग भल्ला यांचा विश्वास


4) भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू सलीम अझीझ यांचं निधन


5) आयपीएलमधे राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्स हैद्राबादवर ७२ धावांनी विजय


6) पी. व्ही. सिंधू हिला माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेत उपविजेतेपद


7) इस्रोची पुन्हा वापरता येणाऱ्या प्रक्षेपण यानाची स्वयं अवतरण मोहिम यशस्वी


8) भारतीय नौदलाचे नवे उपप्रमुख म्हणून व्हाइस अॅडमिरल संजय जसजित सिंग यांनी स्विकारला कार्यभार


9) मार्च 2023 मधलं जीएसटी संकलन 1 लाख 60 हजार कोटी रुपयांवर


10) शिक्षण हक्क कायदा अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरच्या प्रवेशाची ऑनलाईन सोडत पुढच्या आठवड्यात

 

भारतातील पहिले


◾️ 10,000 नवीन MSME ची नोंद करणारा पहिला जिल्हा ➖️ अर्नाकुलम


◾️ भारतातील पहिले खाजगीरीत्या तयार केलेले रॉकेट ➖️ Vikram -s ➖️ आंध्र प्रदेश


◾️ जगातील पाम लोफ हस्तलिखित संग्रहालय ➖️ केरळ


◾️ ग्रीन बॉन्ड लॉन्च करणारी देशातील पहिली नागरी संस्था ➖️इंदोर


◾️ ड्रोनसाठी भारतातील पहिली वाहतूक व्यवस्थापन प्रणाली ➖️ स्काय एअर


◾️ पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट ➖️ जम्मू आणि काश्मीर


◾️ कोणत्या केंद्रशासित प्रदेशात 2023 ची प्रथम राष्ट्रीय लोक अदालत  ➖️  जम्मू-काश्मीर


◾️ पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस➖️  मुंबई


◾️ भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर ➖️  दिल्ली 


◾️ भारतातील पहिले फ्रोझर लेक मॅरेथॉन ➖️ लदाख


◾️ प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे पहिले उच्च न्यायालय ➖️  केरळ

प्रिय विद्यार्थी मित्रांनो... येणाऱ्या परीक्षेच्या बाबतीत खालील मुद्दे लक्षात घ्या;

1. 'परीक्षा होईल की नाही' यासारख्या चर्चांमध्ये लक्ष देऊ नका, परीक्षा नक्की होणार असे मनाला कायम सांगा.

2. उपलब्ध प्रत्येक मिनिट अभ्यासासाठी वापरा.

3.  दररोज 5 तासांचा वेळ revision साठी द्या.

4. दररोज 5 तासांचा वेळ CSAT ला द्या.

5. दररोज 2 तास जुन्या प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडी यांना द्या.

6. Tension येत असल्यास सराव पेपर्स आता देऊ नका.

7. परीक्षेत आठवेल का नाही? असा विचार करू नका, आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या नसतात तर उपलब्ध पर्यायातून उत्तर शोधायचे असते.

8. पदांची संख्या , मेरिट यांचा विचार करू नका, ते तुमच्या हातात नाही.

9. पुरेशी झोप घ्या, यामुळे मन शांत राहण्यास मदत होईल.

10. आत्मविश्वास कायम ठेवा. नको त्या लोकांपासून दूर राहा.

11. राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाल्यावर लगेचच Combine पूर्वपरीक्षेवर focus ठेवा.

12.  stick to wicket, runs will come automatically.


combine रणनीती..

नमस्कार मित्रांनो,

आज आपण शेवटच्या 90 दिवसांमध्ये संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी आणि 60 गुण कसे मिळवावेत याबाबत चर्चा करूयात..

♦️ 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल पाहता आता सुरक्षित गुण किती असतील याबाबत कोणीच निश्चित सांगू शकत नाही. पहिल्या उत्तरतालिका नुसार किमान 60 गुण मिळवले तरच मुख्य परीक्षेला असण्याची खात्री राहणार आहे. सर्वांनी पूर्व परीक्षेला ठरवून 60 गुणांच्या वर स्कोर करण्याची आवश्यकता आहे.

♦️ इतिहास -

मागील संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर पाहता असे लक्षात येते की नेहमीच त्रास देणाऱ्या इतिहास या विषयाने विद्यार्थी मित्रांना भरपूर मदत केलेली आहे. 15 पैकी 14 गुण मिळवणारे बरेच विद्यार्थी मी स्वतः पाहिलेले आहेत त्यामुळे यंदा इतिहासामध्ये, जर पेपरचा दर्जा मागील प्रमाणेच राहिला तर, किमान 12 गुण मिळवणे अनिवार्य राहणार आहे. इतिहासाचे तयारी करण्यासाठी कोणतेही एकच आपण वापरू शकता. इतिहासामध्ये ज्ञान मिळवणे मर्यादीत असल्याने लॉजिक डेव्हलपमेंट आणि एलिमिनेशन टेक्निक्स खूप काम करतात.त्याबाबत आपण आवर्जून विचार करावा

♦️भूगोल-

बाबतीत,15 पैकी किमान 10 गुण मिळाले तर आपण पूर्व परीक्षा सहजासहजी पास होऊ शकतो.भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी सौदी सर किंवा खातीब सर किंवा दीपस्तंभ प्रकाशन यांचे पैकी कोणतेही एक महाराष्ट्राच्या भूगोल साठी वापरावे आणि भारताच्या भूगोलासाठी सौदी सरांचे पुस्तक वापरावे.

♦️पॉलिटी-

या विषयांमध्ये पूर्वी 10 पैकी 10 गुण मिळतात मात्र अभ्यासक्रमाचा आवाका व त्या तुलनेमध्ये कमी गुणांचा भारांक आणि आयोगाची प्रश्न विचारण्याची वाढत असलेली खोली पाहता सध्या आपणास 10 पैकी 7 ते 8 गुण मिळवणे आवश्यक असते. लक्ष्मीकांत सरांचे अथवा  कोळंबे सरांचे पुस्तक आपण यासाठी वापरू शकतो तसेच पंचायत राज या घटकावर येणाऱ्या 2 ते 3 प्रश्नांसाठी किशोर लवटे सरांचे पंचायत राज हे पुस्तक उपयुक्त ठरते. त्याचे वारंवार वाचन केले पाहिजे. शॉर्ट नोट्स बनवल्या पाहिजेत व त्याची वारंवार उजळणी झाली पाहिजे तरच प्रचंड डेटा आपल्या लक्षात राहू शकतो.

♦️अर्थशास्त्र-

येणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी सध्या कमी होत आहे म्हणजेच केवळ सर्वसामान्य अभ्यासावर आपण 15 पैकी 10 ते 12 गुण मिळवू शकतो. यासाठी देसले सर किंवा कोळंबे सर पैकी कोणतेही एक पुस्तक वाचण्यास पुरेसे ठरते. अर्थशास्त्राचे आयोगाचे मागील काही वर्षांचे प्रश्न पाहिल्यास आयोग कोणत्या घटकांवर किती आणि कसे प्रश्न विचारतो हे लक्षात येऊ शकते त्यामुळे पूर्वीच्या प्रश्नांना बिलकुल दुर्लक्षित करू नये.

♦️विज्ञान -

हा घटक सर्वसामान्यपणे सर्वच जनतेला किचकट वाटणारा विषय आहे तसेच प्रश्नांचा दर्जा मध्ये आयोगाने सातत्य राखलेले नाही. त्यामुळे कधी अभ्यास करून कमी मार्क तर कधी अभ्यास न करता ही सरासरी मार्क मिळतात मात्र तरीही स्टेट बोर्ड इयत्ता 7 ते 10 वी च्या पुस्तकांवर आपली कमांड असायला हवी किंवा सचिन भस्के सरांच्या पुस्तकाच्या किमान 3 ते 4 उजळण्या व्हायला हव्यात. लक्षात ठेवा की जर विज्ञान विषय अवघड आला तर तो सर्वांसाठी अवघड असेल आणि सोपा ला करतो सर्वांसाठीच सोपा असेल त्यामुळे या विषयावर ती मेरीट ठरण्याची शक्यता फार कमी असते.

♦️चालू घडामोडी-

हा पूर्व परीक्षांमधील सर्वांत अनिश्चित विषय मला वाटतो.यासाठी आयोग नक्की कोणता source वापरतो हे निश्चित समजत नाही. मात्र असे असले तरीही 15 पैकी 8 प्रश्न प्रयत्नपूर्वक अभ्यास केल्याने सुटू शकतात. परिक्रमा हे मासिक किंवा अभिनव अथवा सिंपलिफाईड प्रकाशनाचे वार्षिकी यातून बऱ्याच अंशी घटना कव्हर होतात. त्या पुस्तकांच्या 2 ते 3 उजळण्या केल्यास किमान 7 ते 8 गुण पडण्यास हरकत नाही.

♦️गणित बुद्धिमत्ता -

हा विषय पूर्व परीक्षांमधील मार्क देणारा विषय म्हणून ओळखला जातो मात्र काही विद्यार्थ्यांना हा विषय की  किचकट जातो मात्र दररोज सराव केल्यास या विषयाची भीती मनातून निघू शकते. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका पहा व आयोगाने कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत यावरून बाजारात सापडणारे कोणतेही एक पुस्तक घेऊन त्यातून दररोज दोन ते अडीच तास सराव अपेक्षित आहे.

♦️अशाप्रकारे एकंदरीत आपण 60 गुणांची गोळाबेरीज परीक्षेपूर्वी जमा केली आणि त्यानुसार विषयांना वेळ वाटून दिला आणि उजळणी केली तर निश्‍चितपणे आपण संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये 60 पेक्षा जास्त गुण मिळवू शकतो. जितके जास्त गुण असतील तितकी पूर्व परीक्षा पास होण्याची खात्री अधिक असेल व त्यामुळे पूर्व परीक्षेचा निकाल पर्यंतचा वेळ वाट पाहण्यात जाणार नाही.
त्यामुळे वरील प्रमाणे अभ्यास करून अथवा आपल्या सोयीनुसार त्यामध्ये बदल करून 60 प्लस गुण मिळवणे आवश्यक ठरते.

❇️ तुमच्या अभ्यासासाठी अनेक अनेक शुभेच्छा.

👉The Achievers Mentorship.

Combine पूर्व ची घोडदौड...

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

✳️ आज आपण कम्बाईन पूर्व परीक्षेसंदर्भात सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.

✳️ प्रत्येकाच्या अभ्यासानुसार प्रत्येकाचे स्ट्रॉंगपॉईंट आणि विक पॉईन्ट असतात.
त्यानुसार आपण कुठल्या विषयांमध्ये स्ट्रॉंग आहोत किंवा कुठल्या विषयांमध्ये विक आहोत हे ओळखून आपले स्वतःचे रणनीती असली पाहिजे.
कारण जेव्हा तुम्ही स्वतः नियोजन करताना ते नक्कीच यशस्वी होण्याचे मार्ग असतात.
बस झाले आता सल्ले, बस झाले आता व्हिडिओ पाहून, बस झाले आता फुकटचे सल्ले घेऊन, जरा स्वतःचे डोकं वापरा.
  स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा.
जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल तर निश्चितच मार्क्स येणार.
जो प्रामाणिकपणे करणार नाही त्याचं पुढं काय होतं हे सर्वांनाच ठाऊक आहे.

✳️ त्यामुळे तुम्ही तुमचे स्वतःचे नियोजन करा.
माझ्या माहितीप्रमाणे,
पुढील विषय मार्क मिळवून देणारे आहेत
जसे की राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल आणि विज्ञान.
इतिहासाविषयी पण आपण बोलणार आहोत
आणि शेवटचा उरतो करंट अफेयर्स आणि  गणित आणि बुद्धिमत्ता.

1. राज्यशास्त्र-

राज्यशास्त्र असा विषय, की सर्वजण म्हणतात यामध्ये खूप मार्क मिळतात खूप सोपा आहे
पण मित्रांनो यामध्ये खुप काही गोष्टी फॅक्च्युअल प्लस कन्सेप्ट तुमच्या जोपर्यंत क्लियर होत नाहीत तोपर्यंत मार्क येत नाहीत.
राज्यशास्त्र च्या बाबतीत लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक एक संजीवनी ठरते.
एवढं मोठं पुस्तक पाहून बर्‍याच जणांना घाम फुटतो.
मग काही जणांना अडचण वाटते
त्यांच्यासाठी रंजन कोळंबे सरांचे हे पुस्तक आहे.
यामध्ये खूप पाठांतराचा भाग असल्यामुळे
कन्फ्युजन वाढण्याचे चान्सेस खूप असतात
उदाहरणार्थ आणीबाणीला घ्या
राष्ट्रपती च्या ऐवजी संसद किंवा संसदेच्या ऐवजी राज्य सरकार किंवा राज्य सरकारच्या ऐवजी राज्यपाल अशी शाब्दिक गफलत केली जाते.
ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे
जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित कराल
निश्चितच मार्क मध्ये वाढ होईल.

2.भूगोल-

कम्बाईन पूर्व साठी साधारणता महाराष्ट्राच्या भूगोल वर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात.
हा एक सोपा विषय आणि तुलनेने सर्वात जास्त म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा विषय असं बघून आपण पाहिलं पाहिजे.
स्टेट बोर्डाची पुस्तके पाचवी ते बारावी पर्यंत
आणि सोबत सौदी सरांचे किंवा कुठंलेही एक पुस्तक व्यवस्थित पाठ केले पाहिजेत.
ह्या गोष्टी जरी व्यवस्थित केल्या तर निश्चितपणे 15 पैकी तुम्हाला तेरा ते 11-12 मार्क पडू शकतात.

3.अर्थशास्त्र-

यासंदर्भात देसले सरांचं किंवा कोळंबे सरांचे कुठले एक पुस्तक व्यवस्थित रित्या करणे गरजेचे आहे.
अर्थशास्त्राच्या संदर्भात अनिकेत सरांनी मागील एक पोस्ट शेअर केली होती
ती पुन्हा चाळी तर निश्चितच फायदा होईल.

4.विज्ञान-

इथं score करायला बऱ्याच लोकांना जड जाते.
साधारणता सायन्स बॅकग्राऊंड विद्यार्थी यामध्ये लीड घेऊ शकता, पण बाकीच्यांनी पण घाबरायचं कारण नाही.
कारण विज्ञाना मधले काही ठराविक टॉपिक केले तर निश्चित मार्का मध्ये वाढ होऊ शकते.
जसे की प्राण्यांचे वर्गीकरण etc..
बायलॉजी या विषयावर एक साधारणत जास्तीत जास्त प्रश्नांचा कल दिसतो.
तुलनेने फिजिक्स आणि केमिस्ट्री यावर कमी प्रश्न असतात.
त्या पद्धतीने तुमचं नियोजन असायला हवं.
इथं प्रश्न solving वर जास्त काम करा..

5. इतिहास-

सध्याचा ट्रेंड पाहता इतिहासावर तुलनेने सोपे प्रश्न विचारले जात आहेत.
पण याचा अर्थ असा नव्हे की इतिहास सोपा आहे.
तुम्हांला ठराविक टॉपिक व्यवस्थित रित्या करावे लागतात तर आणि तरच त्यामध्ये मार्गामध्ये वाढ होऊ शकते. अन्यथा सोपे प्रश्नांमध्ये पण तुमची गफलत होऊ शकते.
इतिहासाच्या संदर्भात राम सरांनी एक पीडीएफ शेअर केलेली आहे की कठारे सरांचे पुस्तक कशा संदर्भात कशा पद्धतीने वाचावे.
त्या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर निश्चित इतिहासामध्ये मार्क मिळू शकतात.

6. चालू घडामोडी-

यासंदर्भात एक वार्षीकी पुस्तक किंवा मग परिक्रमा.
वारंवार रिव्हिजन करणे.
आणि पाठांतर करणे.
कारण चालू घडामोडी हा असा विषय आहे
दोन ते तीन वेळा रिविजन केल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो.

अश्या रीतीने प्रत्येक विषयावर startegy आखली तर नक्कीच तुम्ही 60+ मार्क्स घेऊ शकतात..

सर्वाना शुभेच्छा.!

राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या.

💥संयुक्त पूर्व फोकस (Combine Focus)

▪️371 :-  महाराष्ट्र
👉 विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करणे.

▪️371 :- गुजरात
👉 सौराष्ट्र व कच्छसाठी स्वंतत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.

▪️371(A) :- नागालँड
   13 (घटनादुरुस्ती ) 1962
👉 नागाहिल्स व ट्युएनसांग प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी करणे.

▪️371(B) :- आसाम
(22(घटनादुरुस्ती) 1969 हे कलम समाविष्ठ).
👉 आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.

▪️371(B) :- :-मणिपूर
(27 (घटनादुरुस्ती) 1971 ने समाविष्ठ)
👉 राज्यातील डोंगराळ प्रदेशाच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.

▪️371(F) :-  सिक्कीम
(36 घटनादुरुस्ती) 1975 ने समाविष्ठ)
👉  शांतता व जनतेच्या विविध गटांच्या सामाजिक आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी तरतुदी.

▪️371(H) :-अरुणाचल प्रदेश
(55(घटनादुरुस्ती) 1986 ने समाविष्ट)
👉 राज्यातील कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी.

▪️371(D) &(E) :- आंध्रप्रदेश व तेलंगणासाठी विशेष तरतुदी

▪️371(G) :- मिझोरमसाठी
👉 (53 घटनादुरुस्ती 1986 ने समाविष्ठ)

▪️371(I) :-गोव्यासाठी विशेष तरतुदी
👉 (56 घटनादुरुस्ती 1987 ने समाविष्ठ)

▪️371(j) :-कर्नाटक - हैद्राबाद प्रदेशासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.
👉 (98 घटनादुरुस्ती 2012 ने समाविष्ट.

🔵 ट्रिक - NAMA ने SIMI चे नाव  ARUNA व GOKARNA ठेवले😄
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
N- Nagaland( 371-A)
A- Assam( 371-B)
M - Manipur(371-C)
A  - Andhra Pradesh  ( 371-D, (E)
SI-Sikkim( 371-F)
MI- Mizoram (371-G)
ARUNA - Arunachal Pradesh( 371-H)
GO- Goa (371-I)
KARNA- Karnataka (371-J)

एमपीएससी  मंत्र : दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा – अर्थशास्त्र

मागील लेखामध्ये दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या भूगोल घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये अर्थव्यवस्था या घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. या घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहित करण्यात आला आहे.

अ) भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.

ब) शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.

या उपघटकांची तयारी करताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते पाहू.

*  राष्ट्रीय उत्पन्न, परकीय व्यापार, मुद्रा, बँकिंग आणि राजकोषीय नीती.

*  राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. सकल देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी), सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीएनपी) यातील फरक समजून घेणे व त्याबाबतची अद्ययावत आकडेवारी माहीत असणे आवश्यक आहे.

*  भारताच्या परकीय व्यापारातील महत्त्वाचे भागीदार देश, सर्वात जास्त आयात / निर्यात होणारे देश किंवा संघटना, आयातीमधील व निर्यातीमधील सर्वाधिक मूल्य / वाटा असणाऱ्या वस्तू या बाबी सारणी पद्धतीत मांडून त्याचा अभ्यास करता येईल. यातील महत्त्वाच्या बाबींची मागील वर्षांच्या आकडेवारीशी तुलना करता आल्यास उत्तम.

*  चलनविषयक मूलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. त्या आधारे रिझव्‍‌र्ह बँक, तिचे अधिकार, कार्ये, विविध दर यांचा आढावा घ्यावा.

*  बँकिंगविषयक विविध व्याजदर, बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडी यांचा आढावा घ्यायला हवा.

*  राजकोषविषयक संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. राजकोषीय तूट, आधिक्य, त्यांचा अर्थ, कारणे, परिणाम या बाबी परीक्षेत विचारल्या जात नाहीत पण त्या समजून घेतल्याशिवाय आत्मविश्वासाने पेपर सोडविणे सोपे होणार नाही.

*  शेती, उद्योग

*  शेती क्षेत्र याचा अर्थ प्राथमिक क्षेत्र असा घेऊन अभ्यास करायचा आहे. कृषी, पशुपालन, मत्स्यव्यवसाय या सर्व बाबींचा समावेश अभ्यासामध्ये करायला हवा.

* या क्षेत्रातील वृद्धीचे ट्रेंड, कमी उत्पादकतेची कारणे, उत्पादनास चालना देणाऱ्या विविध योजना यांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे.

* आर्थिक विकासामध्ये आर्थिक पाहणी अहवाल, अर्थसंकल्प, विविध आर्थिक निर्देशांक व अहवाल, पायाभूत सुविधा व इतर अर्थविषयक योजना आणि असल्यास नवे कायदे वा तरतुदी यांचा समावेश होतो. या सर्व बाबी चालू घडामोडींचाच एक भाग आहेत.

*  महत्त्वाचे उद्योग व त्यांच्यासाठी प्रसिद्ध शहरे / क्षेत्रे, महारत्न, नवरत्न, मिनीरत्न कंपन्या, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण धोरण, खासगी उद्योगांचे प्रकार, उद्योग क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीच्या मर्यादा यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

*  प्राथमिक व उद्योग क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा, आयात व निर्यातीमधील वाटा माहीत असायला हवा.

*  दारिद्रय़ व बेरोजगारी

*  दारिद्रय़ अभ्यासासाठी नेमलेल्या समित्यांच्या अहवालातील मुख्य शिफारशी माहीत असायला हव्यात.

* रोजगारविषयक संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. रोजगारविषयक निर्देशांक व ठळक अद्ययावत आकडेवारी नेमकेपणाने माहीत असायला हवी.

*    राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेची दारिद्रय़विषयक अहवाल व आकडेवारी अद्ययावत करून घ्यावी.

* पंचवार्षिक तसेच इतर योजनांत दारिद्रय़ निर्मूलनासाठी राबवलेले कार्यक्रम त्याची उद्दिष्टय़े आणि परिणाम यांचा आढावा घ्यावा.

* रोजगारनिर्मितीसाठीच्या तसेच स्वयंरोजगाराबाबतच्या महत्त्वाच्या योजना व त्यातील तरतुदी माहीत करून घ्याव्यात.

* कौशल्य विकासासाठीच्या योजना व त्यातील तरतुदी माहीत करून घ्याव्यात.

* अशा योजनांमधील तरतुदी, लाभार्थ्यांचे निकष, उद्दिष्टे यांचा अभ्यास आवश्यक आहे.

* लोकसंख्या अभ्यास

* सन २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीमधून एकूण लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, साक्षरता, लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर, नागरी व ग्रामीण लोकसंख्या, नागरीकरण अशा घटकांची सारणी पद्धतीत मांडणी करून त्याची टिप्पणे काढून अभ्यास करणे सोपे व व्यवहार्य ठरेल.

* वरील सर्व मुद्दय़ांची सन २०११ व सन २००१मधील आकडेवारी / माहितीशी तुलना करणारी सारणी तयार करता आल्यास तोही उपयुक्त ठरेल.

* राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, धोरणाची उद्दिष्टय़े, दीर्घकालीन आणि अल्पकालीन ध्येय. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग – रचना, उद्दिष्टय़े, कार्यपद्धती हे घटक वस्तुनिष्ठ तयारीमध्ये समाविष्ट करावेत.

* जन्मदर, मृत्यूदर, जननदर, जन्मावेळचे आरोग्यमान यांबाबत ठळक बाबी व आकडेवारीचा आढावा घ्यावा.

*  शासकीय अर्थव्यवस्था

* अर्थसंकल्प मुद्दय़ामध्ये याबाबतची कायदेशीर प्रक्रिया, अर्थसंकल्पातील तूट/आधिक्य व त्याचे परिणाम, यातील संकल्पना समजून घ्यायला हव्यात. त्या त्या वर्षांतील अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी, योजना यांचा अभ्यास गरजेचा आहे.

* महसुली उत्पन्न, करांचे प्रकार व त्यांचा एकूण महसुलातील वाटा माहीत असायला हवेत.

* लेखा व लेखापरीक्षण याबाबत भारताचे नियंत्रक व लेखापरीक्षक यांचे अधिकार व कार्ये समजून घ्यावीत.

* अनुषांगिक तयारी

* व्यापार सुलभता/ दारिद्रय़/ भूक/ लिंगभाव असमानता/ मानव विकास हे जागतिक निर्देशांक व त्यातील भारताची कामगिरी याचा आढावा घ्यायला हवा. याबाबत विशिष्ट उल्लेखनीय मुद्दे माहीत असावेत.

* पंचवार्षिक योजनांमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आखलेल्या धोरणांचा थोडक्यात आढावा घ्यावा व त्याचे यशापयश लक्षात घ्यावे.

My Strategy : संयुक्त पूर्व परीक्षा

1) पेपर सोडवत असतांना जे जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घ्या, ह्यामुळे तुमचे 5 मिनिटे वाचतात व त्याचा शेवटी गणिते सोडवताना उपयोग होतो.

शेवटी गोल काळे करण्यामुळे गोंधळात ते चुकतात आणि वेळ वाया जातो.


2) Avoid YZ Questions : काही प्रश्न हे निव्वळ तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात ,असे काही प्रश्न इतिहास,विज्ञान व गणितात असतात ते Skip करत चला.


3) Attempt किती ठेवावा ? : ज्यांना STI/ASO द्यायचा आहे त्यांनी जरूर Attempt 90+ ठेवावा. PSI फोकस असणाऱ्यांनी 85-90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.


4) आज आणि उद्या महत्वाचे चार्ट/कलमे/आकडेवारी/गणिते सूत्र/current topics बघून घ्यावे


5) Be Positive: काही जणांना पेपर सोडविताना घबराट होते, कृपया मनात आत्मविश्वास बाळगा ,पेपर सुरू होण्याच्या आधी 10 मिनिटे डोळे लावून आपल्या प्रेरणस्थानाचे स्मरण करा.


6) लक्षात ठेवा तुमची लढाई ही "स्व" ची "स्वतःशी" आहे 


7) Avoid Silly Mistakes: प्रश्न नीट वाचत चला ,गोल काळे करतांना आधी option वर टिक करूनच गोल काळे करा,चूक /अचूक इ. शब्दाला underline करून option select करा.


8) केंद्रावर पोहोचल्यावर मित्रांना भेटून फालतू गप्पा करायच्या टाळून ,चालू घडामोडी वाचण्यावर भर दिला तर उत्तम.

संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

🛑इतिहास

1) महाराष्ट्रातील समाजसुधारक
2) क्रांतिकारी चळवळ
3) सामाजिक व सांस्कृतिक बदल
4) क्रांतिकारकांचे कार्य
5) ब्रिटिश गव्हर्नर व व्हाइसरॉय
6) 1857 चा उठाव व भारत
7) सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी
8) मवाळ व जहाल कालखंड
9) गांधीयुग व सत्याग्रह पर्व
10) सशस्त्र क्रांतिकारी चळवळी
11) भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे शेवटचे पर्व
12) ब्रिटिश सत्तेचे प्रारंभीचे स्वरूप
13) समाजसुधारक - महाराष्ट्र
14) राष्ट्रवादाचा उदय व राष्ट्रीय चळवळ
15) प्रारंभिक राष्ट्रीय संघटना
16) महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळ
17) महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ
18) महाराष्ट्र राज्यनिर्मिती व मराठवाडा मुक्तीसंग्राम
19) काँग्रेस व अधिवेशने

🛑भूगोल

1) महाराष्ट्रातील नदया
2)महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल
3) महाराष्ट्रातील वने
4) महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती
5) मृदा व जलसिंचन
6) पर्यटन व वाहतूक
7) महाराष्ट्रातील उद्योगधंदे
8) आर्थिक भूगोल
9) महाराष्ट्रातील हवामान

🛑अर्थशास्त्र

1) Reserve Bank Of India
2) राष्ट्रीय उत्पन्न
3) गरिबी व बेरोजगारी
4) गरीबीचे निर्देशांक व अंदाज
5) अर्थव्यवस्थेतील मूलभूत संकल्पना व भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये
6) दारिद्र्य व बेरोजगारी
7) आर्थिक विकास व मानव विकास, शाश्वत विकास
8) आर्थिक नियोजन
9) दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती योजना
10) भारताची लोकसंख्य
11) भारतीय भांडवल बाजार
12) सार्वजनिक वित्त
13) भारतीय चलन व्यवस्था व किंमती
14) भारतातील आर्थिक सुधारणा
15) भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार
16) भारतीय कर रचना

🛑राज्यशास्त्र

1) भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास
2) राज्य विधानमंडळ
3) केंद्रशासित प्रदेश
4) विशेष राज्य दर्जा ( कलम 370 व 35 A )
5) राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास
6) संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र
7) नागरिकत्व
8) मूलभूत हक्क
9) मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये
10) घटनादुरुस्ती व आणिबाणीविषयक तरतुदी
11) राष्ट्रपती व राज्यपाल, उपराष्ट्रपती
12) पंतप्रधान व मुख्यमंत्री
13) महान्यायवादी व महाधिवक्ता
14) संसद
15) सर्वोच्च व उच्च न्यायालय
16) कनिष्ठ न्यायव्यवस्था
17) केंद्र - राज्य संबंध व आंतरराष्ट्रीय संबंध
18) घटनात्मक व बिगर घटनात्मक संस्था

🛑विज्ञान

1)भौतिकशास्त्र
2)जीवशास्त्र
3)रसायनशास्त्र
4)आरोग्यशास्त्र

🛑अंकगणित व बुद्धिमत्ता

1) कॅलेंडर + घड्याळ
2) नातेसंबंध + ठोकळा
3) दिशाज्ञान + रांगेतील गणित
सांकेतिक भाषा + असमानता तुलना
5) तर्क व अनुमान / तर्क आणि निष्कर्ष
6) खरे - खोटे + समिकरण
7) नळ व टाकी + चलन
8) अंतर वेळ वेग + बोट आणि प्रवाह - भाग
10) काळ - काम
11) शेकडेवारी
12) नफा - तोटा
13) सरळ - चक्रवाढ व्याज
14) गुणोत्तर प्रमाण
15) वयवारी + भागेदारी

🛑चालू घडामोडी

1) राजकीय घडामोडी
2) अंतरिक्ष घडामोडी
3) आर्थिक घडामोडी
4) महत्वाचे अहवाल व निर्देशांक
5) कृषी व पर्यावरण घडामोडी
6) आरोग्य विषयक घडामोडी
7) संरक्षण घडामोडी
8) विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी
9) प्रमुख नेमणुका व निधन वार्ता
10) पुरस्कार
11) राष्ट्रीय घडामोडी
12) आंतरराष्ट्रीय घडामोडी
13) आंतरराष्ट्रीय संस्था आणि करार
14) संमेलने , दिनविशेष , पुस्तके
15) शासकीय योजना , समित्या

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...