Saturday, 1 April 2023

अर्थशास्त्र समित्या


1) रंगराजन समिती ➖️ निर्गुंतवणूक


2) नरसिंहम समिती ➖️ आर्थिक क्षेत्रातील सुधारणा


3) केळकर समिती ➖️ कर सुधारणा


4) मल्होत्रा समिती ➖️  विमा सुधारणा


5) आबिद हुसेन समिती ➖️ लघुउद्योग


6) बेसल समिती ➖️ बँकिंग पर्यवेक्षण


7) चक्रवर्ती समिती ➖️ आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी चलनविषयक धोरणाची परिणामकारकता सुधारण्यासाठी आर्थिक व्यवस्थेवर काम करणे आणि उपाय सुचवणे.


8) दीपक पारेख समिती ➖️  UTI पुनरुज्जीवित करण्यासाठी


9) हनुमंत राव समिती ➖️  खत पारिख समिती पायाभूत सुविधा वित्तपुरवठा


10) राजा चेल्ल्या समिती ➖️ कर सुधारणा 

रेखी समिती  अप्रत्यक्ष कर


11) टंडन समिती ➖️  बँकांद्वारे कार्यरत भांडवल वित्तपुरवठा प्रणाली


12) तारापूर समिती ➖️  भांडवली खाते परिवर्तनीयता


13) वाघुल समिती ➖️  भारतातील मुद्रा बाजार


14) वायव्ही रेड्डी ➖️  आयकर सवलतींचा आढावा


15) अभिजित सेन समिती ➖️   दीर्घकालीन अन्न धोरण


16) अत्रेय समिती ➖️ आयडीबीआयची पुनर्रचना


17) भुरेलाल समिती ➖️ मोटार वाहन करात वाढ


18) बिमल जुल्का समिती ➖️ ATCOs च्या कामकाजाची स्थिती

भारतीय क्रांतिकारी संघटना

(परीक्षेत यावर एक प्रश्न असतो संघटना संस्थापक आणि वर्ष क्रमाने लक्षात ठेवा.)


➡️ संघटना आणि संस्थापक✍️


1️⃣ मित्रमेळा (1900) -  सावरकर बंधू 


2️⃣ अभिनव भारत (1904) -  वि.दा.सावरकर


3️⃣ अनुशिलन समिती (1907) - भूपेंद्रनाथ दत्त


4️⃣ हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (1924) - सचिंद्रनाथ संन्याल 


5️⃣  नवजवान भारत सभा (1927) - भगतसिंग


6️⃣ हिंदुस्तान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (1928) - चंद्रशेखर आझाद भगतसिंग


7️⃣ इंडिया हाऊस (1905) - श्यामजी कृष्ण वर्मा 


8️⃣ गदर पार्टी (1913) - लाला हरदयाळ


9️⃣ आझाद हिंद फौज - (1942) - रासबिहारी बोस

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग


समृद्धी महामार्गात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक आणि ठाणे अशा १० जिल्ह्यांचा समावेश आहे....


📌 असा आहे समृध्दी महामार्ग :


लांबी -701 किलोमीटर

खर्च -55 हजार 335 कोटी

वाहन वेगमर्यादा - 150 किमी प्रतितास (डोंगराळ भागात

120किमी)


✍️ पहिला टप्पा - 520 किलोमीटर

✍️ रस्त्यांची रुंदी - 120 मिटर (डोंगराळ भागात 90 मी)


✍️इंटरचेंज -24

✍️ रस्तालगतचे नवनगरे -18

✍️मोठे पुल - 33

✍️लहान पुल - 274

✍️बोगदे - 6

✍️रेल्वे ओव्हर ब्रिज - 8

✍️फ्लाय ओव्हर - 65

✍️कल्हर्ट - 672


✍️ मार्गक्रमण - 10 जिल्हे, 26 तालुके


महाराष्ट्र थोडक्यात 2022/23 आर्थिक पाहणी नुसार

━━━━━━━━━━━━━━


❇️ एकूण लोकसंख्या -  11,23,72,972

❇️ साक्षरता प्रमाण - 82.3 %

❇️ लोकसंख्या घनता -  365 प्रती चौ. किमी.

❇️ लिंग गुणोत्तर प्रमाण -  929

━━━━━━━━━━━━━━

👆 वरील माहिती ही 2011 च्या जनगणनेनुसार आहे 👆

━━━━━━━━━━━━━━

❇️ एकूण जिल्हे -  36

❇️ एकूण जिल्हा परिषद -  34

❇️ एकूण महानगरपालिका - 28

❇️ एकूण तालुके -  358

❇️ एकूण पंचायत समिती - 351

❇️ एकूण शहरे -  534

❇️ एकूण नगरपरिषद - 244

❇️ एकूण नगर पंचायत - 128

❇️ एकूण ग्रामपंचायत -  27832

❇️ एकूण कटक मंडळ -  7

━━━━━━━━━━━━━━

👆 महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2022/23 नुसार👇

━━━━━━━━━━━━━━

❇️ जन्मदर -  15%

❇️ मृत्युदर -  5.5%

❇️ अर्भक मृत्युदर - 16%

❇️ एकूण लोहमार्ग लांबी -  6242 किमी

❇️ एकूण रस्त्यांची लांबी -  323873 किमी (बदलत असते)

━━━━━━━━━━━━━━

लक्षात ठेवा


🔸१) सन १९३६ मध्ये काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिलेच अधिवेशन 'फैजपूर' येथे भरले होते. फैजपूर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते ....

- पंडित जवाहरलाल नेहरू


🔹२) .... या वर्षी गांधीजींनी भारतात प्रथमच असहकाराचा लढा सुरू केला.

- सन १९२०


🔸३) गांधीजींनी सविनय कायदेभंगाचा लढा सुरू केला ....

- १२ मार्च, १९३०


🔹४) सन १९४२ मधील छोडो भारत आंदोलनादरम्यान पुण्यात स्थापन झालेल्या गुप्त रेडिओ केंद्रात कोणाचा सहभाग होता ?

- शिरूभाऊ लिमये


🔸५) ८ ऑगस्ट, १९४२ रोजी .... येथे झालेल्या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 'चले जाव'चा ठराव संमत केला.

- मुंबई


🔸१) कंपायमान ताऱ्यास .... अशी संज्ञा आहे. 

- पल्सर


🔹२) ताऱ्यांची प्रतवारी लावण्याचा पहिला प्रयत्न ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात .... या शास्त्रज्ञाने केला. 

- हिप्पार्कस


🔸३) हवाई पर्वतरांग आणि अल्बेट्रॉसचे पठार कोणत्या महासागरात आहे ?

- पॅसिफिक


🔹४) नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या ताऱ्यांमध्ये .... हा तारा सर्वाधिक तेजस्वी आहे. ठळकपणे दिसणाऱ्या या ताऱ्यास 'डॉगस्टार' किंवा 'सिरियस' म्हणूनही ओळखले जाते.

- व्याध


🔸५) २१ मार्च व २३ सप्टेंबर हे दिवस .... म्हणून ओळखले जातात.

- विषुव- दिन


🔸१) युरोप व आफ्रिका ही खंडे आणि अमेरिका खंड यांदरम्यान .... हा महासागर पसरलेला आहे. 

- अटलांटिक


🔹२) उत्तर ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव ....

- रॉबर्ट पिअरे, अमेरिका


🔸३) दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव .... 

- एल्ड अमुंडसेन, नॉर्वे


🔹४) इ. स. १४९२ मध्ये वेस्ट इंडीज बेटांचा शोध लावला ....

- ख्रिस्तोफर कोलंबस, इटली


🔸५) इ. स. १४९८ मध्ये .... याने केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताकडे येणारा जलमार्ग शोधून काढला.

- वास्को- द-गामा


०१) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा ?

- सोलापूर.


०२) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

- अहमदनगर.


०३) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

- २१ जून.


०४) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले ?

- १७६१.


०५) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला ?

- २२ जुलै १९४७.


🔸१) कठीण काच तयार करताना सोडिअम कार्बोनेटऐवजी .... वापरले जाते. 

- पोटॅशिअम कार्बोनेट


🔹२) दाढीच्या साबणाचा फेस बराच काळ टिकून राहावा म्हणून त्यात वापरलेले असते ....

- स्टिअरिक अॅसिड 


🔸३) कोठेही घासण्याच्या आगकाड्यांमध्ये .... हा ज्वालाग्राही पदार्थ वापरला जातो. 

- फॉस्फरस सल्फाइड


🔹४) कोठेही घासण्याच्या आगकाड्यांमध्ये .... हे ऑक्सिडीकारक म्हणून वापरतात.

- पोटॅशिअम क्लोरेट


🔸५) साबण तयार करण्यासाठी वापरले जाणारे सामान्य घटक .... 

- वनस्पती तेल किंवा प्राणिज स्निग्ध पदार्थ आणि कॉस्टिक सोडा किंवा कॉस्टिक पोटॅश


🔸१) .... हा वायू गोबर गॅस व नॅचरल गॅस या दोहोंमध्ये आढळतो.

- मिथेन


🔹२) .... हे संयुग कोल गॅसमध्ये आढळते.

- बेन्झीन


🔸३) .... ही काच मोटारीच्या काचा व संरक्षक कवच बनविण्यास वापरतात. 

- स्तरित काच 


🔹४) काच तयार करण्यासाठी सर्वसाधारणत: वापरतात .....

- सोडिअम कार्बोनेट, चुनखडी व वाळू 


🔸५) स्तरित काच तयार करताना काचेच्या तक्त्यात .... चे पातळ पापुद्रे वापरले जातात. 

- व्हायनिल प्लॅस्टिक



भारतातील पहिल्या महिला


◾️ दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती  ➖️  रझिया सुलताना ( १२३६ )



◾️ भारतीय राष्ट्रीय सभेच्या  पहिल्या महिला अध्यक्षा  ➖️ ॲनी बेझंट ( १९१७ कलकत्ता अधिवेशन)



◾️ युनोच्या आमसभेचे अध्यक्ष पद भूषविणारी पहिली भारतीय महिला ➖️ विजयालक्ष्मी पंडित ( १९५३ )



◾️ पहिली महिला राज्यपाल ➖️सरोजिनी  नायडू 



◾️ भारताची परदेशातील पहिली महिला राजदूत ➖️ सी. बी़ मुथाम्मा



◾️ केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद भूषविणारे पहिली महिला ➖️  राजकुमारी अमृत कौर



◾️ भारताच्या रशियातील पहिल्या महिला राजदूत ➖️ विजयालक्ष्मी पंडित



◾️ पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री ➖️  सुषमा स्वराज (२०१४) 



◾️ उच्च न्यायालयात नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला न्यायाधीश  ➖️ ॲनी चंडी ( ६ फेब्रुवारी १९५९)



◾️ भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान ➖️ इंदिरा गांधी 



◾️ भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री➖️  सुचेता कृपलानी (१९६२ – ६७, उत्तर प्रदेश) 



◾️ भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय (महिला) अध्यक्षा  ➖️ सरोजिनी नायडू ( १९२५ )



◾️ लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक  ➖️ अवनी चतुर्वेदी, भावना कंठ, मोहना सिंह



◾️ एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतातील (जगातील) अपंग महिला ➖️  अरुनिमा सिन्हा 



◾️ इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला ➖️ आरती साहा (गुप्ता) 


◾️ पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त ➖️   व्ही एस रामादेवी



◾️ मोनोरेल चालविणारी पहिली महिला ➖️  जुईली भंडारे 



◾️ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषविणारी पहिली महिला ➖️ न्या. लैला शेठ (हिमाचल प्रदेश- 1991) 



◾️ भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर  ➖️  कल्पना चावला (१९९७)



◾️ पहिल्या महिला आयएएस अधिकारी ➖️  अन्ना राजन जॉर्ज 



◾️ एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला ➖️ प्रा. बचेंद्री पाल



◾️ सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश ➖️  न्या. मीरासाहिब फातिमाबिबी (१९८९)



◾️ पहिल्या महिला आयपीएस अधिकारी ➖️ किरण बेदी (१९७२)



◾️ नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या महिला मानकरी  ➖️  मदर तेरेसा (१९७९)



◾️ भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय माहिती आयुक्त ➖️  दीपक संधू



◾️ भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय अध्यक्षा ➖️ सरोजिनी नायडू(1925)



◾️ पहिली महिला राष्ट्रपती ➖️ श्रीमती प्रतिभाताई पाटील

राहुल गांधी यांची खासदारकी का गेली? लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 काय सांगतो?


👉राहुल गांधी यांनी 2019 मध्ये त्यांनी मोदी आडनावावरुन एक टिप्पणी केली होती. यामध्ये दोषी मानून कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.


👉राहुल गांधी हे केरळच्या वायनाड येथून खासदार होते. मात्र, सुरत कोर्टाच्या निकालानंतर आता लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना आपली खासदारकी गमावावी लागणार आहे.


👉भारतीय संविधानातील लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मधील कलम 10 (1) (e) अन्वये राहुल गांधी यांची खासदारकी 23 मार्च 2023 पासून रद्द


👉एखाद्या व्यक्तीला एखाद्या कोणत्याही प्रकरणात दोषी मानलं गेलं आणि त्यामध्ये त्यांना दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा मिळाली, तर तो व्यक्ती संबंधित सभागृहाचा सदस्य म्हणून राहण्यास पात्र ठरत नाही.


👉पण याबाबतचा अंतिम निर्णय सभागृहाच्या अध्यक्षांचा असतो, असं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.


👉यामधील तरतुदीनुसार, खासदार किंवा आमदार दोषी सिद्ध झाल्याच्या तारखेपासूनच अपात्र मानला जातो. शिवाय, शिक्षा भोगल्यानंतर पुढील सहा वर्षं त्याला सभागृहात दाखल होण्यास अपात्रच मानलं जातं.


👉नुकतेच उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांना एका हेट स्पीच प्रकरणात न्यायालयाने 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. कोर्टाच्या निकालानंतर आझम खान यांची आमदारकी रद्द करण्यात आली.


🛑न्यायालयाचे निर्णय जे निर्णायक ठरू शकतात.


👉लिली थॉमस विरुद्ध भारत सरकार (2013)


या प्रकरणात भारताच्या सुप्रीम कोर्टाने आपल्या एका निर्णयात म्हटलं होतं की कोणत्याही खासदाराला किंवा आमदाराला एखाद्या प्रकरणात दोषी मानलं जातं आणि त्यांना दोन वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी तुरुंगवासाची शिक्षा होते, तर अशा स्थितीत त्यांचं सदस्यत्व रद्द होईल.


लीगल सर्व्हीस इंडियानुसार, कोर्टाने या प्रकरणात हेसुद्धा म्हटलं होतं की शिक्षा मिळालेले लोकप्रतिनिधी या काळात निवडणूकही लढवू शकणार नाहीत किंवा पदावरही कायम राहू शकणार नाहीत.


👉मनोज नरूला विरुद्ध भारत सरकार (2014)


लीगल सर्व्हीस इंडियानुसार, या प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने म्हटलं होतं की एखाद्या व्यक्तीला केवळ त्याच्यावर गुन्हेगारीसंदर्भात आरोप आहेत, म्हणून निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवता येऊ शकत नाही.


पण, त्याच वेळी न्यायालयाने हेसुद्धा म्हटलेलं आहे की राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना निवडणुकीत उतरवणं टाळायला हवं.


👉लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना नुकतेच 11 जानेवारी 2023 रोजी आपलं सदस्यत्व गमावावं लागलं होतं. केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमधील एका न्यायालयाने त्यांना खूनाचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचं पद गेलं.

30 April 2023

      

        सामान्य विज्ञान, गणित व बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी हे तीन विषय सोडले तर बाकी विषयांचा अभ्यास हा जवळपास सर्वांचाच सारखा झालेला असतो. म्हणजे या उर्वरित विषयांमध्ये जे मार्क्स येणार आहेत हे जवळपास सर्वांनाच सारखे येतील.त्यामुळे जे मार्क्स आपल्याला लीड मिळवून देतील ते आपल्याला या वरील तीन विषयांमध्ये मिळवायचे असतात. 


        म्हणजे आता आपल्याला फक्त या कंटेम्पररी विषयाचाच अभ्यास न करता वरील उल्लेखित तीन विषयांवर सुद्धा विशेष लक्ष द्यायचे आहे. कारण इतरांपेक्षा सरस किंवा जास्त मार्क्स हे आपल्याला वरील तीन विषय मिळवून देतील.ज्याला या तीन विषयांमध्ये चांगले मार्क्स मिळतील तो मात्र नक्कीच जास्तीत जास्त पदांना पात्र होणार आहे.


       यामधील सामान्य विज्ञान हा विषय सोडला तर गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी मध्ये मात्र अपेक्षित यश मिळू शकते. म्हणजेच यांचा इनपुट आउटपुट Ratio हा खूप चांगला आहे. या कालावधीमध्ये आपण या दोन विषयांकडे विशेष लक्ष देऊ शकतो.


         सामान्य विज्ञान मात्र अभ्यासताना खूप जास्त न वाचता एकच सोर्स मधून त्याचे वाचन करावे कारण कितीही वाचन केले तरी हा विषय मात्र अनिच्छित स्वरूपाचा आहे,त्यामुळे आयोगाच्या मागील प्रश्नांवरून उत्तरापर्यंत जाण्याचा मार्ग शोधावा.


   30 एप्रिल च्या परीक्षेला आता जवळपास 1 महिना बाकी आहे.आता सर्वांनी त्यांचा अभ्यासाचा वेळ वाढवला असेल.काहींनी तर झोप कमी केली असेल.जास्तीत जास्त वाचन चालू असेल.

       पण महत्वाचं आहे ते या 1 महिन्यात आपली मानसिकता व्यवस्थित ठेवणे.या काळात आपल्यावर खूप जास्त pressure येते व आपसूकच आपण कुठे तरी नकारात्मक होतो.

       लक्षात ठेवा, खूप जास्त अभ्यासाने Result येत नसतो.Result येतो तो फक्त आपल्या मानसिकतेने.आपण या कालावधीत जितके सकारात्मक असू,जितके आनंदी असू,तिकाच आपला हा प्रवास सुकर होतो आणि मग त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला रिझल्ट येतांना दिसतो.

       मानसिकता चांगली ठेवण्यासाठी सर्व्यात महत्वाचं म्हणजे झोप नीट घ्यावी.मेंदू ला आराम दिला,त्याला वेळ दिला तर तो तुम्हाला Result देईल.

       या काळात एकांतवासात जाऊ नका.आपले मित्र,मैत्रीण,आपले कुटुंब यांच्यासोबत बोलत चला.थोड्या संभाषण व विनोदाने आपला दिवस चांगला जातो आणि मग अभ्यास करण्यात पण मजा येते.मात्र यात Negative लोकांपासून दूर रहा.

       शरीराला व मेंदूला व्यायामाने, ध्यानधारणाने उत्साही ठेवा.याचा नक्कीच फायदा होतो.एक वेळेस अभ्यास कमी झाला तरी चालेल पण या गोष्टी चुकता कामा नये.

     या काही परीक्षा पास होण्याच्या अभ्यासापलीकडील गोष्टी आहेत.ज्या अत्यावश्यक आहेत.

चालू घडामोडी प्रश्नसराव


Q.1) नुकतेच ट्रीज बियॉन्ड फॉरेस्ट्स उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे?

✅ आसाम


Q.2) अलीकडेच कोणत्या कंपनी युरोपमध्ये सौर आणि पवन प्रकल्प उभारण्यासाठी नवीन गुंतवणूक करणार आहे?

✅ Apple


Q.3) कोणत्या माजी क्रिकेटपटूची अंधांच्या T20 विश्वचषकाचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली?

✅ युवराज सिंग


Q.4) भारत सरकारने CCI च्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

✅ संगीता वर्मा


Q.5) संयुक्त राष्ट्रांच्या हवाई वाहतूक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

✅ शेफाली जुनेजा


Q.6) हवामान पारदर्शकतेच्या नवीन अहवालानुसार, भारताला सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) किती उत्पन्नाचा तोटा सहन करावा लागला आहे?

✅ 5.4%


Q.7) FIPRESCI ने कोणत्या चित्रपटातला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित केले?

✅ ‘पाथेर पांचाली’


Q.8) "फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

✅ डॉ बिमल जालान


Q.9) दरवर्षी संयुक्त राष्ट्र कोणता दिवस जागतिक विकास माहिती दिन म्हणून साजरा करते?

✅ 24 ऑक्टोबर


Q.10) भारतीय सैन्याने 27 ऑक्टोबर रोजी कितवा पायदळ दिवस साजरा केला?

✅ 76 वा


विविध क्षेत्रांचे जनक


◆ राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी


◆ आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय


◆ भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु


◆ राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर


◆ आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे


◆ आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग


◆ विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा


◆ अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई


◆ मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम


◆ कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै


◆ भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल


◆ सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके


◆ शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा


◆ पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी


◆ निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी


◆ हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन


◆ श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन


◆ पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र


◆ नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा


◆ हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी


◆ सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया


◆ सर्जरीचे जनक - सुश्रुत


◆ मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक


◆ मॉर्डन अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस


◆ न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड


◆ कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग


◆ वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस


◆ उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन


◆ आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन


◆ क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस


◆ जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल


◆ इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ


◆ वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता


◆ विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन


◆ इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे


◆ टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ


◆ न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन


◆ नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव


◆ भूमितीचा पिता ⟶ युक्लिड


◆ आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी


◆ आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स


◆ कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज


◆ खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस


◆ अर्थशास्त्रातील जनक - अ‍ॅडम स्मिथ


◆ जीवशास्त्रातील जनक - अ‍ॅरिस्टॉटल


◆ इतिहास पिता ⟶ हेरोडोटस


◆ होमिओपॅथी फादर - हेनेमॅन


◆ प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता


◆ रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर


◆ रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे


◆ बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर

ऑपरेशन

 📌 ऑपरेशन सतर्क :-

◆ रेल्वे पोलीस दलाने 5 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 दरम्यान ट्रेनमधून होणारी तस्करी रोखण्यासाठी 'ऑपरेशन 'सतर्क' राबवले आहे. 

◆ या ऑपरेशनद्वारे मोठ्या प्रमाणात दारू, तंबाखूजन्य पदार्थ, सोने, चांदी आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. 

◆ या संपूर्ण कारवाईत 3.18 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.


━━━━━━━━━━━━━━━━━━━


📌 ऑपरेशन गरुड :-

◆ ऑपरेशन गरुड अंतर्गत, सीबीआयने आठ - राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करांच्या आवारात छापे टाकले. 

◆ इंटरपोलची शाखा म्हणून पहिल्यांदाच सीबीआयने चाईल्ड पोर्नोग्राफी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात दोन कारवाईचे नेतृत्व केले.


━━━━━━━━━━━━━━━━━━━


📌 ऑपरेशन मेघचक्र :-

◆ केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) चाईल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी मोठी कारवाई करताना 19 राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशातील 56 ठिकाणांवर छापे घातले. 

◆ CBI ने या कारवाईला 'ऑपरेशन मेघचक्र' असे नाव दिले होते. 

◆ मध्यंतरी चाईल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्रे व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले होते, याची गंभीर दखल घेत CBI कडून कारवाई करण्यात आली.


━━━━━━━━━━━━━━━━━━━


📌 ऑपरेशन आहट (AAHT) :-

◆ मानवी तस्करी रोखण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. 

◆ 'ऑपरेशन आहट'चा एक भाग म्हणून, सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या/मार्गांवर विशेष पथके तैनात करण्यात आले होते आणि तस्करांच्या तावडीतून पीडितांना, विशेषतः स्त्रिया आणि मुलांची सुटका करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━

भारत बनला जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार देश :-


◆ भारत हा 2022-23 या आर्थिक वर्षात 750 बिलियन डाॅलर्सची निर्यात करुन जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला आहे. मागच्या वर्षी (2021-22) भारताचा निर्यातीत नववा क्रमांक होता.


◆ भारत 2 सप्टेंबर 2022 रोजी ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी या चार देशांनंतर भारताची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानी आहे.


◆ मागच्या वर्षी 2021-22 मध्ये भारताने 600 अब्ज डाॅलर्सची निर्यात केली होती आणि त्यामुळे तो नवव्या क्रमांकावर होता. 


◆ कोरोनानंतर जागतिक संकट, रशिया- युक्रेन युद्ध, जागतिक मंदी, चढे व्याजदर, ऊर्जा संकट, उत्पादन बंद या सर्व गोष्टींचा विचार करता भारताने केलेली कामगिरी ही उल्लेखनीय आहे.

लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये शंभरावा गोल करत इतिहास रचला :-


◆ जागतिक चॅम्पियन फुटबॉल संघ अर्जेंटिनाने आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात कोराकाओचा 7-0 असा धुव्वा उडवला. 


◆ कर्णधार लिओनेल मेस्सीने या सामन्यात तीन गोल करत आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 गोल पूर्ण केले. 


◆ आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 100 गोल पूर्ण करणारा मेस्सी हा तिसरा फुटबॉलपटू आहे, त्याने 174 सामन्यात 102 गोल पूर्ण  केले आहेत.


◆ पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे, त्याने 198 सामन्यात 122 गोल केले असून, इराणचा अली दाई (109) नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.


◆ मेस्सीने 100 गोल पूर्ण करताच एक विशेष कामगिरी केली, विश्वचषक जिंकणारा तसेच 100 गोल पूर्ण करणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू आहे.


◆ रोनाल्डो आणि अली दाई यांनी 100 हून अधिक गोल केले आहेत,परंतु दोघांनाही विश्वचषक जिंकता आलेला नाही.


◆ मिस्सीने 20व्या 33व्या आणि 37व्या मिनिटाला गोल करत 37 मिनिटात हॅट्ट्रिक पूर्ण केली.


◆ मेस्सीच्या कारकिर्दीतील ही 57वी हॅटट्रिक आहे, अर्जेंटिनाकडून खेळताना त्याने नवव्यांदा हॅटट्रिक गोल केला.


चालू घडामोडी :- 31 मार्च 2023


◆ भारत बनला जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार देश.


◆ संचार भवन आणि नवी दिल्लीतील नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर कार्यालयादरम्यान भारतातील पहिला क्वांटम कंप्युटिंग-आधारित दूरसंचार नेटवर्क लिंक कार्यान्वित करण्यात आला आहे.


◆ भारताने पाकिस्तान सरकारचे ट्विटर अकाउंट तिसऱ्यांदा ब्लॉक


◆ पहिली जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची बैठक मुंबईत संपन्न.


◆ नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस 2023 दरम्यान श्री. हरदीप एस. पुरी, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, यांनी जाहीर केले की ऑक्टोबर 2024 पर्यंत 1000 शहरांना 3-स्टार कचरामुक्त रेटिंग प्राप्त करण्याचे लक्ष्य आहे.


◆ जागतिक बँकेने भारतातील कर्नाटक राज्याला USD 363 दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे , जे 20 लाख ग्रामीण कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यास मदत करेल.


◆ UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी त्यांचे भाऊ शेख मन्सूर बिन झायेद अल नाहयान यांची देशाचे उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती केली आहे.


◆ टाटा पॉवरने प्रवीर सिन्हा यांची कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे.


◆ स्टार स्पोर्ट्सने बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगला ब्रँड अँम्बेसेडर म्हणून साइन केले आहे.


◆ Hero MotoCorp च्या बोर्डाने निरंजन गुप्ता यांची कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती जाहीर केली, जी 1 मे पासून लागू होईल. 


◆ सुमिल विकमसे, जे सध्या हिताची पेमेंट सर्व्हिसेसचे कॅश बिझनेसचे सीईओ आहेत, यांची कंपनीचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ फायबर ब्रॉडबँड आणि रिलायन्स जिओचे वर्चस्व यामुळे भारताचे फिक्स्ड ब्रॉडबँड मार्केट 6.4% CAGR ने वाढेल.


◆ पंजाब आणि हरियाणा न्यायालयाने अलीकडेच चॅटजीपीटी नावाच्या AI चॅटबॉटच्या मदतीने फौजदारी खटल्यातील जामीन अर्जाबाबत निर्णय घेण्यासाठी वापरला.


◆ लोकप्रिय भारतीय दुहेरी बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी स्विस ओपन सुपर 300 फायनल जिंकून 2023 चे पहिले दुहेरीचे विजेतेपद मिळवले.


◆ हिंदुस्तान झिंक लिमिटेड (HZL) ने जयपूरजवळ जगातील तिसऱ्या क्रमांकाचे क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी राजस्थान क्रिकेट असोसिएशनसोबत सामंजस्य करार केला आहे.


◆ धावपटू लशिंदा डेमसला एका दशकानंतर ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळाले.


◆ संरक्षण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण शस्त्रास्त्र प्रणालीत उत्पादनाला चालना देण्यासाठी 1,700 कोटी रुपयांचा करार केला.


◆ इंटरनॅशनल ड्रग्स चेकिंग डे 31 मार्च रोजी साजरा केल्या जातो.


◆ जागतिक बॅकअप दिन 31 मार्च रोजी साजरा केला जातो.


◆ ट्रान्सजेंडर डे ऑफ व्हिजिबिलिटी हा 31 मार्च रोजी साजरा केल्या जातो.


◆ ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क यांनी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलोअर्स मिळवले आहे.

'आरोग्याचा अधिकार' विधेयक मंजूर करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य


- चर्चेत का?

- आरोग्य हक्क विधेयक विधानसभेत मंजूर करणारे राजस्थान हे पहिले राज्य ठरले आहे. 

-  हे विधेयक राज्यातील प्रत्येक रहिवाशांना सर्व सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये आउट पेशंट विभाग (OPD) सेवा आणि रुग्ण विभागात (IPD) सेवा मोफत मिळवण्याचा अधिकार देते.  

- याशिवाय, निवडक खाजगी रुग्णालयांमध्येही अशाच प्रकारच्या आरोग्य सेवा मोफत दिल्या जातील.


▪️ विधेयकात काय आहे? 

- राज्यातील रहिवाशांना रुग्णालये आणि दवाखाने मोफत आरोग्य सेवा मिळण्याचा अधिकार देण्याच्या तरतुदी या विधेयकात आहेत.  यामध्ये खासगी रुग्णालयांचाही समावेश करण्यात येणार आहे.  सरकारी आणि खासगी रुग्णालये यापुढे उपचार नाकारू शकणार नाहीत.  येथील प्रत्येक व्यक्तीला खात्रीशीर उपचार मिळेल. 

- आपत्कालीन परिस्थितीत खासगी रुग्णालयांनाही मोफत उपचार द्यावे लागणार आहेत.  खासगी रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत मोफत उपचारांसाठी स्वतंत्र निधी तयार करण्यात येणार आहे.

- अशा प्रकरणांमध्ये, रुग्णालय स्तरावरील कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणासाठी जिल्हा आणि राज्य स्तरावर प्राधिकरण स्थापन केले जाईल.  यावर सुनावणी होणार आहे.

- विधेयकाच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणातील प्राधिकरणाच्या निर्णयाला कोणत्याही दिवाणी न्यायालयात आव्हान देता येणार नाही.  

- दोषी आढळल्यास 10 ते 25 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.  पहिल्यांदा दंड 10 हजार आणि त्यानंतर 25 हजारांपर्यंत असेल.

-  राजस्थान मुख्यमंत्री : अशोक गहलोत

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...