Tuesday, 28 March 2023

बंगालची फाळणी



🖍7 जुलै :- लॉर्ड कर्झनच्या नेतृत्वात सिमल्याहुन बंगालच्या फाळणीची घोषणा करण्यात आली.

🖍19 जुलै :- सरकारने अधिकृतरित्या बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतला.

🖍कर्झनने विल्यम वाॅर्ड याच्या योजनेनुसार बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतला होता.तसेच सदरील फाळणीची योजना ही विल्यम वाॅर्डच्या कल्पनेनुसार बंगालचा ले. गव्हर्नर सर ॲड्रयुव 
फेझर याने आखली होती.

🖍20 जुलै :- बंगालचे विभाजन 2 भागांत करण्यात आले.

🖍16 ऑक्टोबर :- फाळणी अंमलात आली. 

🖍फाळणीचे कारण :- ‘प्रशासकीय सीमांचे पुनर्निर्धारण’ असे सांगण्यात आले.

🖍16 ऑक्टोबर हा दिवस बंगालमध्ये ‘राष्ट्रीय शोक दिवस’ म्हणून मानला गेला.

🖍परारंभी या फाळणीला तेथील मुसलमानांनी विरोधच केला होता, परंतु योजना घोषीत झाल्यानंतर कर्झनने पुर्व बंगालचा दौरा केला असता त्या दौऱ्यात त्याने म्हटले होते की, फाळणीचा उद्देश मुस्लिम प्रांत बनविणे हा आहे जेथे इस्लाम हा मुख्य धर्म असेल आणि त्याच्या अनुयायांचे वर्चस्व असेल. 
(यामागील कर्झनच्या हेतू म्हणजे मुसलमान बहुसंख्येचा मुस्लिम प्रांत तयार करुन त्यांना ब्रिटिश 
सत्तेविरुध्द लढा देणाऱ्या राष्ट्रीय चळवळीपासून दूर ठेवणे हा होता.)
  यामुळे पूर्व बंगालमध्ये मुसलमान स्वाभाविकच खुश झाले.

🖍या फाळणीच्या विरोधात संपूर्ण देशभरात वंग भंग व स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आल्या.

🖍सरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी वंग भंग चळवळीचे नेतृत्व पत्करले.

🖍फाळणी अंमलात येण्याच्या आधीच 7 ऑगस्ट रोजी या चळवळीला सुरूवात झाली.

🖍दादाभाई तसेच गो. कृ. गोखलेंनी देखील या आंदोलनास आपला पाठींबा दर्शविला होता.

🖍ही चळवळ बंगालमधील संपूर्ण राष्ट्रीय नेतृत्वाची चळवळ होती.
🖍या चळवळीचे प्रथम नेतृत्व सुरेंद्रनाथ 
बॅनर्जी व कृष्णकुमार मित्रा या मवाळ नेत्यांनी केले तर नंतरच्या टप्प्यात चळवळीचे नेतृत्व जहाल व
क्रांतिकारकांच्या हातात गेले.

🖍जहालवाद्यांनी वंग भंग चळवळीचे रूपांतर जणचळवळीत करण्याचा प्रयत्न केला.

🖍वगभंग/स्वदेशी चळवळीत जहाल व मवाळांनी परस्परांच्या सहाकार्याने कार्य केले होते.

🖍टिळकांचा चतु:सुत्री कार्यक्रम :- बहिष्कार, स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण.

🖍यावेळी वि.दा. सावरकर यांनी पुण्यात पहिली परदेशी कपड्यांची होळी केली.

ध्वनी



'ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना'.
ध्वनीचे स्वरूप :'ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते'.

ध्वनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते.

प्रत्येक उदाहरणात कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.

कंपन : वस्तूची जलद गतीने पुढे-मागे होणारी हालचाल म्हणजे कंपन होय.

उदा. तंतुवाद्यातील तारेची कंपने



ध्वनी हे तरंगाच्या स्वरुपात प्रसारित होतो.

वस्तु विक्षोभित होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो.

ध्वनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो त्याला माध्यम म्हणतात. ते घन, द्रव किंवा वायु असू शकते.

ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही.

प्रत्येक्षात कंपित वस्तूपासून ऐकणार्‍यापर्यंत कण प्रवास करीत नाहीत.
ध्वनी तरंगाची वैशिष्ट्ये :

जेव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो.

संपीडने : कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संपीडने होय.

संपीडनांपाशी घनता तसेच दाब उच्च असतो.

विरलने : कमी दाबाचे असे भाग की जेथे कण विखुरलेले असतात त्याला विरलने म्हणतात.

विरलनापाशी घनता तसेच दाब कमी असतो.

दोन लगतच्या संपीडनातील किंवा दोन लगतच्या विरलनातील अंतरास तरंगलांबी म्हणतात.

त्याचे SI पद्धतीत एकक मीटर तर तरंगलांबी ग्रीक अक्षर लॅम्डा ने दर्शवतात.

वारंवारता :

घनतेचे उच्चतम किंमतीपासून कमीत कमी किंमतीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम किंमतीपर्यंत होणारा बदल एक आंदोलन घडवितो.

एकक कालावधीत होणारी आंदोलनाची संख्या म्हणजे तरंगाची वारंवारता होय.

ध्वनी तरंगाची वारंवारता ग्रीक अक्षर न्यू ने दर्शवितात.

त्याचे SI पद्धतीत एकक हर्टझ असून ते Hz ने दर्शवितात.

(note- हर्टंझ (1857-1894) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. सर्वप्रथम त्यांनी बिनतारी संदेशवहनाचे प्रसारण व तरंगांची स्वीकृत केली. )
तरंगकाल :

लगतची दोन संपीडणे किंवा विरलने यांना ठराविक बिंदु पार करून जाण्यास लागणारा वेळ म्हणजे 'तरंगकाल' होय.

माध्यमाच्या घनतेमध्ये एक संपूर्ण आंदोलन होण्यास लागणारा वेळ हा ध्वनी लहरीचा तरंगकाल असतो.

तो 'T'ने दर्शविला जातो.

SI पद्धतीत तरंगकालाचे एकक सेकंद आहे.

u=1/t


ध्वनीचा वेग :

तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदुने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय.

वेग=अंतर/काल

एका तरंगकालात कापलेले अंतर,

वेग= तरंगलांबी/तरंगकाल

वेग= वारंवारता*तरंगलांबी

मानवी श्रवण मर्यादा :

मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा सुमारे 20 हर्टझ ते 20,000 हर्टझ आहे.

पाच वर्षाच्या आतील मुले आणि कुत्र्यांसारखे काही प्राणी 25000 हर्टझ पर्यंत ध्वनी एकू शकतात.


श्रव्यातील ध्वनी :

20000 हर्टझ पेक्षा अधिक वारंवारता असणार्‍या ध्वनीला श्रव्यातील ध्वनी असे म्हणतात.

निसर्गात डॉल्फिन्स, वटवाघुळे, उंदीर वगैरे तो निर्माण करू शकतात.

उपयोग :

जहाजावरून जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातील ध्वनी उपयोगी ठरते.
ध्वनीचे परिवर्तन :

ध्वनी तरंगांचे घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते.

ध्वनीच्या परावर्तनासाठी फक्त मोठ्या आकाराचा खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते.

प्रतिध्वनी :

मूल ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय.

अंतर= वेग*काल

निनाद :

एखाद्या ठिकाणाहून ध्वनी तरंगांचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन, ध्वनीतरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो.त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो त्यालाच निनाद म्हणतात.


सोनार (SONAR):

Sound Navigation And Ranging याचे लघुरूप म्हणजे SONAR होय.

पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्यातील ध्वनी तरंगाच्या उपयोग करून SONAR मोजते.

इतिहासातील महत्वाच्या घटना


👉 कर_घटनेचे नाव_वर्ष विशेष 👈


 1) प्लासीची लढाई 1757 सिराज उधौला व इंग्रज


 2) भारताकडे येण्याचा सागरी मार्ग 1498 वास्को-द-गामा


 3) वसईचा तह 1802 इंगज व पेशवे


 4) बस्कारची लढाई 1764 शुजा उधौला, मिर कासीम, मुघल बादशाह, शहा आलम व इंग्रज


5) सालबाईचा तह 1782 इंग्रज व मराठे


6) तिसरे इंग्रज-मराठा युद्ध 1818 दुसर्‍या बाजीरावचा पराभव, मराठेशाहीचा शेवट


7) अलाहाबादचा तह 1765 बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेलल्सी


8) तैनाती फौज (सुरवात) 1797 गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलल्सी


9) दुहेरी राज्यव्यवस्था 1765 रॉबर्ट क्लाईव्ह (बंगाल)


10) रेग्युलेटिंग अॅक्ट 1773 बंगालच्या गव्हर्नरला 'गव्हर्नर जनरल' हा किताब देण्यात आला.


11) सतीबंदीचा कायदा 1829 बेटिंग


12) भारतात इंग्रज सत्तेची सुरवात 1835 लॉर्ड बेटिंग, लॉर्ड मेकॉले


13) रेल्वेचा प्रारंभा (मुंबई ते ठाणे) 1853 लॉर्ड डलहौसी


14) भारतातील पहिली कापड गिरणी 1853-54 काउसजी


15) पहिली ताग गिरणी 1855 बंगालमधील रिश्रा


16) विधवा पुनर्विवाह कायदा 1856 लॉर्ड डलहौसी


17) विद्यापीठांची स्थापना 1857 मुंबई,मद्रास,कोलकाता


18) 1857 चा कायदा 1857 भारतमंत्री पदाची निर्मिती


19) राणीचा जाहिरनामा 1 नोव्हेंबर 1858 लॉर्ड कॅनिगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला


20) वुडचा खलिता 1854 वुड समितीने शिक्षणविषयक शिफारशी केल्या म्हणून त्यास भारतीय शिक्षणाची सनद असे म्हणतात


21) 1861 चा कायदा 1861 भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्याची परवानगी


22) दख्खनचे दंगे 1875 महाराष्ट्रातील नगर व पुणे जिल्ह्यातील सावकरांविरुद्ध केलेले आंदोलन


23) शेतकर्‍याचा उठाव 1763 ते 1857 बंगालमध्ये सन्याशांच्या व फकिरांच्या नेतृत्वाखाली झाला



24) हिंदी शिपायांचा उठाव 1806 वेल्लोर येथे झाला


25) हिंदी शिपायांचा उठाव 1824 बराकपूर


26) उमाजी नाईकांना फाशी 1832 


 

27) संस्थाने खालसा 1848 ते 1856 डलहौसी (संबळपुर, झाशी, अयोध्या इ.)


28) मंगल पांडे याने मेजर हडसनवर गोळी झाडली 29 मार्च 1857 बराकपूरच्या छावणीत


29) 1857 च्या उठावाची सुरवात 10 मे 1857 'हर हर महादेव, मारो फिरंगी का' अशी घोषणा मेरटच्या छावणीतून सुरू


30) भिल्लाचा उठाव 1857 खानदेशात कझागसिंग यांच्या नेतृत्वाखाली


31) गोंड जमातीचा उठाव - ओडिशा


32) संथाळांचा उठाव - बिहार


33) रामोशांचा उठाव - उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली


34) गडकर्‍याचा उठाव - कोल्हापूर


35) कोळी व भिल्लाचा उठाव - महाराष्ट्र


36) 1857 च्या उठावाचे नेतृत्व - बहादुरशाह


37) भारतातील पहिली कामगार संघटना 1890 नारायण मेघाजी लोखंडे


38) स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 1882 लॉर्ड रिपन


39) हंटर कमिशन 1882 भारतीय शिक्षणविषयक आयोग


40) भारतीय वर्तमानपत्रावर बंदी घातली 1878 लॉर्ड लिटन


41) भारतीय वर्तमान पत्रावरील बंदी उठवली 1882 लॉर्ड रिपन.


राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे


1885 - मुंबई - ओमेशचंद्र बॅनर्जी - राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 



1886 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी 



1887 - मद्रास - बद्रुद्दीन तय्यबजी - पहिले मुस्लिम अध्यक्ष 



1888 - अलाहाबाद - सर जॉर्ज युल - पहिले स्काटिश अध्यक्ष



1889 - मुंबई - सर विल्यम वेडरबर्ग - पहिले इंग्रज अध्यक्ष



1896 - कलकत्ता - रहेमतुल्ला सयानी - या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले. 



1905 - बनारस - गोपाल कृष्ण गोखले - हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले. 



1906 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी - या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला. 



1907 - सूरत - राशबिहारी बोस - राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली. 



1915 - मुंबई - लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा - या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला. 



1916 - लखनौ - अंबिकाचरण मुजूमदार - या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला. 



1917 - कलकत्ता - डॉ. अॅनी बेझंट - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.



1920 - कलकत्ता(विशेष) - लाला लजपत रॉय - या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला. 



1920 - नागपूर - सी. राघवाचारी - या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 



1922 - गया - चित्तरंजन दास - कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले. 



1924 - बेळगांव - महात्मा गांधी - महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले. 



1925 - कानपूर - सरोजिनी नायडू - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा. 



1927 - मद्रास - एम.ए. अंसारी - सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

इतिहास : सराव प्रश्नसंच


१) भारतात सती प्रथा बंद आंदोलन कोणी सुरु केले?

A. जगन्नाथ शंकरशेठ✅

B. राजा राममोहन रॉय 

C. ईश्वरचंद्र विघासागर

D. केशवचंद्र सेन


२) इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते?

A. शिवराज परांजपे 

B. सेनापती बापट

C. महंमद इकबाल

D. महात्मा गांधी✅


३) ज्ञानेश्रर महाराजांनी भगवदगीतेवर कोणता ग्रंथ लिहिला?

A. भावार्थदिपिका 

B. अमॄतानुभव

C. ज्ञानेश्वरी✅

D. हरिपाठ


४) इ.स १३५० मध्ये संत नामदेवांनी कोठे समाधी घेतली?

A. देहू 

B. आळंदी

C. पैठण

D. पंढरपूर✅


५) दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?

A. रामदास स्वामी✅ 

B. चांगदेव

C. संत तुकाराम

D. संत सावता माळी


६) शाळेत शिक्षण घेत असतानाच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिणारे?

A. विष्णूशास्त्री पंडित 

B. लोकहितवादी

C. दादोबा पांडुरंग तर्खडकर✅

D. बाळशास्त्री जांभेकर


७) महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठाने एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?

A. बनारस विद्यापीठ 

B. पुणे विद्यापीठ

C. श्रीमती ना.दा.ठाकरसी महिला विद्यापीठ

D. मुंबर्इ विद्यापीठ✅


८) १९५० मध्ये जगदंब कुष्ठ निवासाची स्थापना कोणी केली?

A. डॉ. शिवाजीराव पटवर्धन✅ 

B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

C. बाबा आमटे

D. छत्रपती शाहू महाराज


९) ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत कोण होते?

A. संत रामदास 

B. संत नामदेव✅

C. संत तुकाराम

D. संत एकनाथ


१०) स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोणी केला?

A. रिपन✅

B. लिटन

C. डफरीन 

D. कॉर्नवॉलिस.


आजची प्रश्नमंजुषा

 🔷 पुढील वैशिष्ट्ये कोणत्या शहराची किंवा गावाची आहे ते ओळखा.

अ. येथे भद्रा मारुतीचे पुरातन मंदिर आहे.

ब. येथे औरंगजेब बादशहाची कबर आहे.

क. येथून जवळच म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण आहे.

ड. दर सोमवती अमावस्येला या ठिकाणी मोठी यात्रा भरते.


पर्याय..👇

1] दौलताबाद

2] खुलताबाद✅✅ 

3] वेरूळ

4] अजिंठा


🔶. हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित pH (सामू) संकल्पना कोणी मांडली

 A) सोन्स

 B) अँड सब्ज़सन्स. 

 C) जॉन लोहनस्ल. 

 D) सोरेन्सन.✅✅ 

 E) यापैकी नाही.


🔷. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?

 A) औष्णिक विद्युत ऊर्जा ✅✅

 B) आण्विक ऊर्जा  

 C) जल विद्युत ऊर्जा 

 D) यापैकी नाही


🔶. सन 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते शहर दशलक्षी शहर नाही

A. नांदेड✅✅

B. कल्याण-डोंबिवली

C. ठाणे

D. नाशिक


🔷. भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 

 A) 1961 

 B) 1974 

 C) 1985 ✅✅

 D) 2010


🔷 भारतीय राष्ट्रीय विज्ञान ॲकॅडमी च्या अध्यक्षपदी नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत?

1)उत्कर्ष सिन्हा 

2)प्रिती पटेल 

3)चंद्रमा शहा ✅✅ 

4)गीता सिंग


🔶 'लिगसी ऑफ लर्निंग' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली कादंबरी कोणी लिहिली?

(A) सविता छाबरा ✅✅

(B) तवलीन सिंग

(C) भालचंद्र मुणगेकर

(D) सलमान रश्दी


🔷 कोणत्या व्यक्तीच्या स्मृतीत मानवी हक्क उल्लंघनाची सत्यता जाणण्याचा हक्क आणि पीडितांचा सन्मान विषयक आंतरराष्ट्रीय दिन पाळतात?

(A) लियू झियाबो

(B) अर्नल्फो रोमेरो ✅✅ 

(C) मार्टिन एन्नाल्स

(D) नटालिया एस्टेमिरोव्हा


🔴 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे? 

१) ३ वेळा

२) ४ वेळा ✔️✔️

३) २ वेळा

४) ५ वेळा

________________________________

🟤 घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका 

२) ऑस्ट्रेलिया

३) चीन

४) ब्रिटेन  ✔️✔️

________________________________

⚫️ भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई 

२) दिल्ली 

३) अलाहाबाद  ✔️✔️

४) कलकत्ता

________________________________

🔵 विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे 

२) ५ वे 

३) ६ वे 

४) ७ वे ✔️✔️

________________________________

🟢 महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे 

२) प्रज्ञा पासून 

३) राहीबाई पोपरे ✔️✔️

४) स्मिता कोल्हे

________________________________

🟡 संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला? 

१) २४ जानेवारी १९५०  ✔️✔️

२) २५ जानेवारी१९५०

३) १४ ऑगस्ट १९४७

४) १५ ऑगस्ट १९४७

________________________________

🟠 ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ?  

१) पुष्पा भावे

२) राम लक्ष्मण

३) फ्रान्सिस दिब्रिटो ✔️✔️

४) शरद पवार

________________________________

🔴 बुद्धचरित पुस्तकाचे लेखक कोण होते ? 

१) अश्वघोष 🚔

२) नागार्जुन 

३) वलुनिय

४) नागसेन

सामान्य ज्ञान

१-कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) - स्थापना: 04 मार्च 1952; मुख्यालय: नवी दिल्ली.

२-वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (WWF) - स्थापना: 29 एप्रिल 1961; मुख्यालय: ग्लॅंड, स्वित्झर्लंड.

३-जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) - स्थापना: 14 जुलै 1967; मुख्यालय: जिनेव्हा, स्वित्झर्लंड.

४- युक्रेन - राजधानी: कीव; राष्ट्रीय चलन: रिव्निया.

५-विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) - स्थापना: 28 डिसेंबर 1953; मुख्यालय: नवी दिल्ली; संस्थापक: अबुल कलाम आझाद.

६-कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) - स्थापना: 24 फेब्रुवारी 1952; मुख्यालय: नवी दिल्ली.

७- फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) - स्थापना: वर्ष 1927; संस्थापक: जी. डी. बिर्ला आणि पी. ठाकुरदास; मुख्यालय: नवी दिल्ली.

८- भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) - स्थापना: 16 जुलै 1929; मुख्यालय: नवी दिल्ली.

९- भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) - स्थापना: वर्ष 1988; वैधानिक दर्जा: 30 जानेवारी 1992; मुख्यालय: मुंबई.

१०- उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) याची स्थापना - वर्ष 1995.

११- औद्योगिक विकास विभागाच्या विलीनीकरणासह या साली DPIITची पुनर्रचना केली गेली - वर्ष 2000.
———————————————————

आंतरराज्यीय परिषद (Interstate Counsil)

🔶योजना आयोग व राष्ट्रीय विकास परिषद (NDC) या सल्लागारी स्वरुपाच्या संस्था असल्यामुळे राष्ट्रपती घटनेच्या.

🔶कलम २६३ नुसार आंतरराज्यीय परिषद स्थापन करु शकता. ( यास घटनात्मक दर्जा आहे.)


कार्ये –

१. राज्य व केंद्र सरकारच्या विवादांची चौकशी करणे व सल्ला देणे.

२. राज्य व केंद्र सरकार यांच्यातील परस्पर हितसंबधांवर संशोधन करणे.


🔶भारताच्या एकूण नियोजन खर्चापैकी राज्यांच्या योजनांवर ५०% खर्च होतो.


🔶नियोजीत वेळे आगोदर २ ते ३ वर्षे योजनेची प्रक्रिया सुरु होते.


🔶 नियोजीत प्रस्ताव संपूर्ण माहितीसह NDC कडे पाठविली जातात.


🔶राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना १९४९ मध्ये झाली.


🔶योजनांमध्ये सरासरी अंतर्गत वित्त पुरवठा ९०% होता.


🔶सथिर किंमतीनुसार ५० वर्षात राष्ट्रीय उत्पन्नात ३.५ पट वाढ झाली.


🔶भारताच्या विकास खर्चाचे प्रमाण ५० वर्षात ३२% वरुन ६४% पर्यंत वाढविण्यात आले.


🔶नियोजन आयोगाच्या हाती फार मोठ्या प्रमाणावर सत्ता व राष्ट्रीय नियंत्रण आहे.


🔶राष्ट्रीय योजना आयोग आपला अहवाल अर्थ आयोग / वित्त आयोग यांना सादर करते.


🔶नियोजन आयोगाची पुर्नरचना १९६७ मध्ये करण्यात आली.


🔶भारतात आर्थिक नियोजनाचा प्रथम उल्लेख सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९३१ मध्ये काँग्रेसच्या कराची येथे झालेल्या अधिवेशनात केला.


🔶नियोजन मंडळाचे सदस्य जे. सी. घोष (शास्त्रज्ञ) हे होते.


🔶भारताची आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट्ये बी. एस. मिन्हास यांनी स्पष्ट केली.


आधुनिक भारताचा इतिहास


भारतीय राष्ट्रीय चळवळ एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शवते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१८८५) च्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात होते. या चळवळीची तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली जाते- मवाळ राजकारणाचा काळ (१८८५-१९०५); जहाल राजकारण्यांचा काळ (१९०५-१९२०); गांधी युग (१९२०-१९४७).


१८५७ चा उठाव दडपला गेल्यानंतर भारतीय समाज निपचित पडला होता. या निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे काम दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दिनशॉ वाच्छा, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या भारतीयांनी केले. त्यांनी राष्ट्रीय संघटनेच्या राजकारणाला निश्चित दिशा दिली. या संपूर्ण नेतृत्वाचा विश्वास उदारमतवाद, सांविधानिक मार्ग व क्रांतीपेक्षा उत्क्रांतीतून बदल या तत्त्वांवर होता. म्हणूनच मवाळांनी राजकीय सुधारणांसाठी अर्ज, विनंत्यांचा मार्ग अवलंबला. आíथक निस्सारणाचा सिद्धांत मवाळांचे सर्वात मोठे योगदान ठरते. मवाळांनी भारताच्या वसाहतवादी आíथक शोषणावर प्रकाश टाकून जी जनजागृती घडवून आणली ती राष्ट्रीय चळवळीच्या पुढील टप्प्याची आवश्यक पाश्र्वभूमी ठरते. तद्वतच, या सिद्धांताच्या माध्यमातून मवाळांनी भारताच्या आíथक राष्ट्रवादाचा भक्कम पाया घातला यात शंका नाही.


२०१४ च्या मुख्य परीक्षेमधील ब्रिटिश आíथक धोरणाच्या विविध अंगांच्या विश्लेषणाची अपेक्षा ठेवणारा प्रश्न याच आíथक शोषणाच्या व आíथक राष्ट्रवादाच्या आकलनाची अपेक्षा ठेवतो. या प्रश्नामध्ये ब्रिटिश कालखंडामधील समग्र आíथक धोरण, त्या धोरणाची उत्क्रांती यांचे विश्लेषण केंद्रस्थानी आहे.


लॉर्ड कर्झनने १९०५ साली केलेल्या बंगालच्या फाळणीतून मवाळ राजकारणाच्या मर्यादा तर स्पष्ट केल्याच, पण त्याही पुढे जाऊन ब्रिटिश सत्ता भारताच्या हितासाठी असल्याच्या मवाळांच्या मूलभूत विश्वासाला तडा गेला. म्हणूनच बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व जहालांच्या हाती येते. अर्थात, १९१५ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेवर मवाळांचेच वर्चस्व होते. जहालांनी काँग्रेसबाहेर राहून राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय चळवळीच्या या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश ‘स्वराज’ हा होता व चळवळीच्या पद्धती स्वयंभू होत्या. मवाळांच्या पद्धती ब्रिटिश शासनाच्या प्रतिसादावर अवलंबून होत्या. जहालांनी परकीय मालावर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व असहकार या चतु:सूत्रीवर आधारित चळवळींचा मार्ग अवलंबून शासनावर दबाव निर्माण केला. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन चंद्र पाल, अरिबदो घोष यांनी या टप्प्यातील चळवळीचे नेतृत्व केले.


लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर एका युगाचा अस्त होतो. तद्वतच, एका दुसऱ्या युगाची सुरुवात महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीतील सहभागाने होते. गांधीयुगामध्ये ‘अिहसक पद्धतीने केलेल्या असहकारातून स्वराज्य’ हा राष्ट्रीय चळवळीचा उद्देश होता. सत्याग्रह, अन्यायाचा उघड व सक्रिय प्रतिकार, अिहसक असहकार, भारतीय समाजाचा सर्वागीण विकास यांतून गांधींनी राष्ट्रीय चळवळीला वेगळी दिशा दिली व तिला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले.


भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या तीन टप्प्यांमधील घटनांचा सखोल अभ्यास आवश्यक ठरतो. मवाळांनी घडवून आणलेल्या राजकीय सुधारणा, वंगभंग चळवळ, होमरूल चळवळ, असहकार चळवळ, स्वराज पार्टी, नेहरू रिपोर्ट, सविनय कायदेभंगाची चळवळ, ‘चलेजाव’ चळवळ, गोलमेज परिषद यांसारख्या घटकांचा यात अंतर्भाव होतो. याव्यतिरिक्त भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे ठरते.

आजची प्रश्नमंजुषा

🔷 पुढील वैशिष्ट्ये कोणत्या शहराची किंवा गावाची आहे ते ओळखा.

अ. येथे भद्रा मारुतीचे पुरातन मंदिर आहे.

ब. येथे औरंगजेब बादशहाची कबर आहे.

क. येथून जवळच म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण आहे.

ड. दर सोमवती अमावस्येला या ठिकाणी मोठी यात्रा भरते.


पर्याय..👇

1] दौलताबाद

2] खुलताबाद✅✅ 

3] वेरूळ

4] अजिंठा


🔶. हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित pH (सामू) संकल्पना कोणी मांडली

 A) सोन्स

 B) अँड सब्ज़सन्स. 

 C) जॉन लोहनस्ल. 

 D) सोरेन्सन.✅✅ 

 E) यापैकी नाही.


🔷. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?

 A) औष्णिक विद्युत ऊर्जा ✅✅

 B) आण्विक ऊर्जा  

 C) जल विद्युत ऊर्जा 

 D) यापैकी नाही


🔶. सन 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते शहर दशलक्षी शहर नाही

A. नांदेड✅✅

B. कल्याण-डोंबिवली

C. ठाणे

D. नाशिक


🔷. भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 

 A) 1961 

 B) 1974 

 C) 1985 ✅✅

 D) 2010


🔷 भारतीय राष्ट्रीय विज्ञान ॲकॅडमी च्या अध्यक्षपदी नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत?

1)उत्कर्ष सिन्हा 

2)प्रिती पटेल 

3)चंद्रमा शहा ✅✅ 

4)गीता सिंग


🔶 'लिगसी ऑफ लर्निंग' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली कादंबरी कोणी लिहिली?

(A) सविता छाबरा ✅✅

(B) तवलीन सिंग

(C) भालचंद्र मुणगेकर

(D) सलमान रश्दी


🔷 कोणत्या व्यक्तीच्या स्मृतीत मानवी हक्क उल्लंघनाची सत्यता जाणण्याचा हक्क आणि पीडितांचा सन्मान विषयक आंतरराष्ट्रीय दिन पाळतात?

(A) लियू झियाबो

(B) अर्नल्फो रोमेरो ✅✅ 

(C) मार्टिन एन्नाल्स

(D) नटालिया एस्टेमिरोव्हा


🔴"जय जवान जय किसान' ही घोषणा

ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)

A. लालबहादूर शास्त्री ✔️✔️

C. गुलजारीलाल नंदा

B. जवाहरलाल नेहरू

D. मोरारजी देसाई

_____________________________________

🟠 भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?

(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)

A. 1937

B. 1939

C. 1941

D. 1942 ✔️✔️

____________________________________

🟡आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)

B. स्वामी विवेकानंद

D. स्वामी दयानंद सरस्वती ✔️✔️

A. लाला लजपत राय

C. श्री ओरबिंदो

____________________________________

🔵"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बद्रुदीन तैय्यबजी

C. विनायक दामोदर सावरकर

B. बाळ गंगाधर टिळक ✔️✔️

D. दादाभाई नौरोजी

____________________________________

🟤 खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)

A. कुचीपुडी ✔️✔️

B. लावणी

C. तमाशा

D. पोवाडा

__________________________________