Monday, 20 March 2023

परश्न सराव



🔶 दशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.

1. गुजरात🔸🔸

2. सिक्किम 

3. आसाम

4. महाराष्ट्र


भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे


 🔶  भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.

1.दिल्ली🔸🔸

2. महाराष्ट्र

3. आंध्र प्रदेश

4. चंदिगढ


 🔶 ............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.

1. मध्य प्रदेश

2. राजस्थान🔸🔸

3. सिक्किम

4. गुजरात


🔶 महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.

1.02

2.06

3.07

4.05🔸🔸

 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री


 🔶 अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.

1. उत्तर

2. दक्षिण

3. मध्य

4. पूर्व🔸🔸


 🔶 भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?

1.  ग्वाल्हेर🔸🔸

2. इंदौर

3.  दिल्ली

4.  या पैकी नाही


 🔶 मबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?

1. अमर शेख

2. अण्णाभाऊ साठे🔸🔸

3. प्र. के.अत्रे

4. द.ना.गव्हाणकर


 🔶 पढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती? 

1. धुळे -गाळणा डोंगर 

2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर 

3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर

4. हिंगोली -हिंगोली डोंगर


अ. सर्वच बरोबर 🔸🔸

ब. 1, 2बरोबर 

क. 3, 4बरोबर 

ड. सर्वच चूक


 🔶  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?

1. महाराष्ट्र 🔸🔸

2. तामिळनाडु 

3. आंध्रप्रदेश 

4. पश्चिमप्रदेश


 🔶  सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?

1. नर्मदा व तापी🔸🔸

2. तापी व गोदावरी

3. कृष्णा व गोदावरी

4. कृष्णा व पंचगंगा


 🔶 कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.

1. महानदी त्रिभुज प्रदेश

2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश🔸🔸

3. गोदावरी त्रिभुज प्रदेश

4. कृष्णा त्रिभुज प्रदेश


 🔶 खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.

1. मुगल ए आझम

2. किसान का नाम🔸🔸

3. आलम आरा

4. राजा हरिश्चंद्र


 🔶 भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.

1. चेन्नई

2. कोलकत्ता🔸🔸

3. चंदिगड

4. मुंबई


 🔶 मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.

1. पैठण

2. सोयगाव

3. औरंगाबाद🔸🔸

4. नांदेड


 🔶 नदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.

1. सह्याद्री

2. गाविलगड

3. सातमाळा

4. सातपुडा🔸🔸

गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती

◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. 


◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. 


◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. 


◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. 


◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. 


◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. 


◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.  


★ गोदावरी नदीचा उगम :-


◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. 


◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो. 


◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.


◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते. 


◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. 


◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे.


◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते :- १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.


★ गोदावरीच्या उपनद्या:-


◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.


★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-


◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.


★ गोदावरी नदीवरील धरणे:-


◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.


◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. 


◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती.

आदिवासी समुह लक्षणे व वैशिष्ट्ये

*🔻- लक्षणे -*---


१) आदिवासी समुह हा निश्चित भूप्रदेशात राहनारा एक सजातीय समुह आहे.


२) प्रत्येक आदिवासी समुहाला व जमातीला एक विशिष्ट असे नाव परंपरेनुल़सार प्राप्त झालेले असते.

उदा- गौंड, कोरकू, भिल्ल इत्यादी.


३) प्रत्येक आदिवासी जमातीची भाषा भिन्न असते. ती बोलीभाषा असु शकते किंवा लिपीबद्ध भाषा सुद्धा असु शकते. भारतात सुमारे ४०० पेक्षा अधिक बोलीभाषा बोलनारे  आदिवासी समुह आहेत.


४) एकाच पुर्वजापासुन आपली निर्मिती झाली असे माननारा हा समुह आहे. म्हनजे तो रक्तबंध आणि विवाह नात्यावर आधारित असनारा समुह आहे.


५) पोषाख पद्धती, विवाह पद्धती, रितीरिवाज, इत्यादी बाबतवएकवआदिवासि समुह दुसऱ्या आदि़वासि समुहापेक्षा वेगळा असतो.


६) निरक्षरता हे आदिवासि समुहाचे ठळक वैशिष्ट्य अाहे.


७) जादूटोना व धर्म यांच्या आचरनाला आदिवीसि समुहात विशेष महत्व दिले जाते.


८) यंत्र सामुग्रीचा उपयोग, औद्योगीक विकास याबाबतित हा समुह अगदी प्राथमिक अवस्थेत असतो.


९) आदिवासी समुहातील लोक उपजिविकेल़साठी सभोवतालच्या नैसर्गिक पर्यावरनावर अवलंबून असतात. साधी अर्थव्यवस्था व सरळ व सोपी समाजव्यवस्था हे आदिवासी समुहाचे महत्वपुर्ण असे सामान्य लक्षन आहे.

=========

*🔻- आदिवासी समुह वैशिष्ट्य-*


१) *विशिष्ट भूप्रदेश*---

   एका आदिवासी जमातीची एका विशिष्ट भूप्रदेशात वस्ती असते. 

उदा - ठाणे जिल्ह्यातील डहानुचा परिसर सोजून अन्यत्र वारली आदिवासी जमातीची वस्ती आढळत नाहि. 

कोरकू, कोलाम व अन्य आदिवासी समुहाची वस्ती एक विशिष्ट भूप्रदेशात असव्याचे दिसुन येते. कोनत्याही अडचनी आल्या तरा ते अापली वस्ती सोडून जान्यास तयार नसतात. 


२) *समूहाचा आकार*---

   आदिवासी समुहाचा आकार लहान असतो. आदिवासींच्या काहू गावांमध्ये वा वस्त्यांमध्ये २०-२५ घरे म्हनजेच १००-१५० लोक रहात असतात . दुर्गम परिसर व समुहाची सदस्य संख्या कमी यामुळे त्यांच्या सामाजिक संपर्काचे क्षेत्र अत्यंत मर्यादित असते.


३) *रक्त संबंधांवर आधारीत सजातीय समुह*---

   आपला पुर्वज एकच आहे अशी धारना आसाऱ्या काही कुटुंबाचा एक गट म्हनजे कुळ होय. एकाच कुळातील सदस्यांमध्ये बंधुत्वाचे नाते असते. एका आदिवासी जमातीत वा समुहात कुळांची संख्या मर्यादित असते. स्वत:चे कुळ सोडून अन्य कुळातील वधुशी किंवा वराशी विवाहसंबंध जोडले जातात. 


४) *विवाहपद्धती*---

   विवाह हे केवळ वधू- वर या देन व्यक्तिंना जोडनारे बंधन नसुन ते देन कुटुंबांना व कुळांना जोडनारे साधन आहे.़,अशी आदिवासी समुहाची धारना आहे. या समुहात वधूपित्याला योग्य ते मुल्य देउन वधू प्राप्त केली जाते. वधूमुल्य देणे ही वधूजवळ असलेल्या पात्रतेची व गुनांची पावता हेय असे मानले जाते. विवाहापुर्वी मुलगी आर्थिक स्वरुपाची कार्य करत असते. यामुळे विवाहानंतर पतिचे आर्थिकनउत्पन्न वाढते व वडिलांचे कमि होते. म्हनुन वधूमुलिय देने योग्य आहे , असे आदिवासी समुहात मानले जाते.


५) *कुटुंबपद्धती*---

   या समुहात सामान्यपने दोन पिढ्यांचे एकत्र कुटुंब असते. या कुटुंबात भावंडांचे एकमेकांवर वि़लक्षन प्रेमव असते. आदिवासी समुहात पितृसत्ताक कुटुंबपद्धती मोठ्या प्रमानावर आहे. तसेच काही मोजक्या समुहात मातृसत्ताक पद्धती आहे. या समुहात कुटुंबप्रमुखांचा अधिकार व नियंत्रण बिनातक्रार मान्य केले जाते. कुटुंबसदस्यांच्या आर्थिक, धार्मिक, राजकिय व सामाजिक वर्तनावर कुटुंबसंस्थेचे बारीक लक्ष असते.


६) *आर्थिक स्थिती*---

   आदिवासींच्या जिवनावश्यक गरजा मर्यादित असुनदेखिल त्या पुर्ण करन्यासाठी त्यांना झगडावे लागते. आदिवासि कंदमुळे गैळा करने, शिकार, मासेमारी, पशुपालन ,शेती, मोलमजुरी यांसारख्या आर्थिक क्रिया करतात. वस्तीच्या सभोवती असनाऱ्या नैसर्गिक बक्यावरनावर त्यांनी कोनत्या आर्थिक क्रिया कराव्यात हे अवसंबुन असते. आर्थिक क्रिया करताना ते परंपरागत अवजारे व पद्धतिंचा वापर करतात. 

उदा - भाला, धनुष्य बान , कोयता यांचा शिकार करन्यासाठी उपयोग करतात. नफा मिळवने हे त्यांचे ध्येय नाही. जीवनाश्यक मुलभूत गरजा भागविता येतिल एवढेच उत्पन मिळविन्याचा ते प्रयत्न करतात. परंतु तेवढे देखिल उत्पन त्यांवा मिळत नाही. यामुळेवजवळ जवळ सर्वच आजटदिवासी दारिद्य्रा खालिल जिवन जगतात.


७) *धर्म व जादूचा प्रभाव*---

   आजिवासींच्या जिवनावर धर्म व जादूचा प्रभाव आहे. निसर्ग पुजा व पुर्वज पुजा हे दोन प्रकार त्यांच्यात दिसुन येतात. तेवस्वत:च्या शरिरावर कुसचिन्ह गौंदवून घेतात. तसेचवघरांवर ही कुलचिन्हांची चित्रे काढतात. यामळे शरिराचे व घराचे संरक्षन होते अशी त्यांची धारना आहे. भूत, पिशाच यांची बाधा झाल्यामळेच रोग होतात, असा त्यांचा विश्वास आहे. म्हनुनच सर्व आदिवासी समुहांमध्ये मात्रिकाला महत्वपुर्ण स्थान प्राप्त झाल्याचे दिसुन येते.


८) *शिक्षण व मनोरंजनाची साधने*---

   दुर्गम भागात राहनाऱ्या आदिल़वासिंचे जिवन खडतर असते. नाचगाणी, नकला, खेळ, देवदेवतांचे उत्सव यामुळे त्यांच्या जिवनात एक वेगळेच चैतन्य निर्माण होते. युवागृहे किंवा शयनगृहे यांना त्यांच्या जिवनात खास महत्व आहे. वयाच्या चौथ्या वर्षी मुलांना व मुलींना युवागृह या संस्थेत दाखल करतात. विवाह होइपर्यंत मुले व मुली युवागृहाचे सदस्य असतात. जमातीचा इतिहास, प्रथा, परंपरा याची माहिती युवागृहे आपल्या सदस्यांना देतात. युवागृहाचे हे शैत्षनिक कार्य आदिवासी समुहासाठी अत्यंत महत्वाचे असते.


९) *स्त्रियांचा दर्जा*---

   आदिवासी समुह आर्थिकदृष्ट्या अप्रगत असले तरीही या समुहांमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीची वागनुक दिली जाते. बहुताश आदिवासी जमातींमध्ये स्त्रियांचा आर्थिक क्रियांनध्ये समावेश असतो. काही समुहांमध्ये स्त्रियांना पुरोहित म्हनुन विधी करन्याचा तसेत मृत कुटुंबसदस्याच्या प्रेताचा अग्निसंस्कार करन्याचा अधिकार आहे.


१०) *जीवनपद्धती*---

   आदिवासी समुह सदस्यांचे परस्पर संबंध हे रक्तसंबंध व दर्जा यावर आधारलेले असतात. रुढी, परंपरा,श्रद्धा इत्यादींनी त्यांचे सामाजिक जिवन नियंत्रित केले जाते. त्यांचेवखाने- पिने, रहानीमान इत्यादींमध्ये एकरुपता असल्याचे दिसुन येते. दऱ्याखोऱ्यातील नैसर्गिक संकटांना तोंड देताना त्यांना परस्पराच्या सहकार्याची गरज लागते. त्यामुळेच त्यांच्या सामाजीक जिवनावर समुहभावनेचा प्रभाव अधिक प्कमानात असतो.

============================================


*🔴- शेतकरी समुह अर्थ व स्थिती -*


*🔻- अर्थ-*---

  शहरी क्षेत्रात श्रीमंत, मध्यम व गरिब असे तिन गट अाढळतात. आर्थिक स्थितीमधिल तफावतीमुळे या तीन्ही गटाची जिवनपद्धती वेगवेगळी असते. ग्रामिन क्षेत्रातही श्रीमंत वा बागायतदार शेतकऱ्यांचे मध्यम शेतकरी, अल्पभुधारक शेतकरी, व भुमिहीन शेतमदुर असे भिन्न गट आहेत. ग्रामीण समुहात जमिनविषयक संबंध अत्यंत महत्ल़वाचे आहेत. या समुहातुनच हे उपसमुह निर्मान झाले आहेत. या सर्व उपगटाची अार्थिक स्थिती भिन्न असली तरी आचार विचारांची पद्धती , जीवनविषयक दृष्टीकोन यांत काही फारसा फरक नसतो. सर्वात महत्वाचे म्हनजे या सर्वांच्या शेती या व्यवसायाचे स्वरुप. समान असते. निसर्गाची अवकृपा झाली की, त्याचा फटका लहान व मोठ्या शेतकऱ्यांना सारख्याच प्रमानात बसतो. शेतमजुरांची उपलब्धता ही मध्यम शेतकऱ्यांप्रमानेच बागायतदारामचीही समस्या होउ लागली आहे. शेतमालाच्या अल्प किंमती व उत्पादन खर्च जास्त याचा ताळेबंद जमत नसल्यामुळे "शेती करने परवडत नाही " ही ओरडवग्रामीन भागात सार्वत्रिक स्वरुपाची बनली आहे.  या दृष्टीनेच आपन ग्रामीनक्षेत्रामधिल शेतकरी या विशाल आकाराच्या समुहाची ओळख करुन घेत आहोत. 

======


*🔻- भारतिय शे़तकऱ्यांची जिवनविषयक स्थिती -*


विभिन्न शास्त्रांनधिल अध्ययन, सर्वेक्षन, नेत्याचे विचार यांसारख्या विविध माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनविषयक स्थितीचे चिन्ह पुढील प्रमाने मांडले जाते.

भारतीय शेतकरी कर्दबाजारी आहेत. तेनअल्पशिक्षित व कर्जबाजारी असून परंपरावादी व सनातनी वृतीचे आहेत. ते शेती व्यवसायाकडे व्यापारी दृष्टीतून पाहन्यापेक्षा पोट भरन्याचा एक मार्ग या दृष्टीने पाहतात. यामुळे शेतीव्यवसायातील उत्पन्न व उत्पादन सिमीत राहिले आहे. ते शासनाने ठरवलेल्या विकास योजनांचा मोकळ्या मवाने स्विकार करत नाहीत. उत्पादन वाढीसाठी खासवप्रयत्न करन्याची प्रेरना व वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अवलंब करन्याची वृत्ती त्यांच्यामध्ये नाही. 

         शेती उत्पादनाची हेतु व उत्पादन तंत्र यांमध्ये सुधारना झाल्याशिवाय त्यांच्या आर्थिक व जीवनविषयक स्थितीमध्ये फारसा बदल घडून येने शक्य नाही.

               

*शेतकरी संघटना*---

      सुमारे ७०% लोक शेतीव्यवसायाशि निगडित आहेत. असे असऩुन देखिल शेतकरी संघटित नाहीत. ब्रिचिश राजवटी पासुनचे चित्र गेल्या २०-२५ वर्षांपासुन बदलु लागले आहे. शेतीव्यवसायासी ल़संबंधित विविध प्रश्नानी ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्मान झाला आहे. शेतकऱ्यांच्या या असंतोषातुनच अनेक राज्यांमध्ये आंदोलने सुरु झाली व त्यांच्या संघटना निर्माण झाल्या.

शासनाचे धोरन व निर्णय यांवर प्रभाव टाकनाऱ्या संघटित गटांना हितसंबंधि गट व दबाव गट संबोधले जाते. शेतकरी संघटनेच्या सामुहिक प्रयत्नातुन प्राप्त झाल़्ल्या अनेक गौष्टींकडे नजर टाकली , की या संघटनेने दबाव गट म्हनुन आपले  स्थान निर्मान करन्यास यश प्राप्त केले आहे. 

औद्योगिक क्षेत्रातिल दबावगटांच्या तुलनेत शेतकरी संघटना या दबावगटाचा प्रभाव फारच कमी आहे. शेतकरी संघटनांची शक्ती व प्रभाव फारसा वृद्धींगत न होन्याची कराने कोनती, हे देखिल तपासुन पाहता येईल. फुमशेती,वनौषधी, जैविक शेति , करन्याकडे शेतकऱ्यांचे मन वळविने , ग्रामीन जीवनात सुधारना घडवून आननाऱ्या चळवळि घडवून आनने, यांसारखी अनेक विधायक काम करन्यास शेतकरी संघटनांना भरपूर वाव आहे असे म्हनता येईल. थोडक्यात , शेतकऱ्यांचे हितसंबंध व त्यांच्या मागन्या शासनासमोर सुस्पष्चपने मांडन्याचे आणि शेतकऱ्यांना संघटित करन्याचे महत्वपुर्ण कार्स शेतकरी संघटनांनी केले आहे. म्हनुनच शेतकरी संघटनेच्या राजकिय, आक्थिक व सामाजिक क्षेत्रामधिल कार्याला तसेच त्याच्या अध्ययनाला महत्व प्राप्तवझाले आहे असे म्हनता येईल.

भारतातील विविध घटनांची पहिली सुरुवात :



पहिले वर्तमान पत्र - द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)

 पहिली टपाल कचेरी - कोलकत्ता (1727)

 पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन - मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)  

 पहिले संग्रहालय - इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)

 पहिले क्षेपणास्त्र - पृथ्वी (1988)

 पहिले रेल्वेस्थानक - बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)

 पहिले रेल्वेस्थानक - जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)

 पहिले राष्ट्रीय उद्यान - सिंद्री (झारखंड) - 1951

 पहिला खत प्रकल्प - मेट्रो रेल्वे कोलकत्ता

 पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे दिल्ली

 पहिले व्यापारी विमानोड्डापण - कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)

 पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)

 पहिले पंचतारांकित हॉटेल - ताजमहाल, मुंबई (1903)

 पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)

 पहिला बोलपट - आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)

 पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा

 पहिले जलविद्युत केंद्र - दार्जिलिंग (1898)

 पहिला तेलशुद्धीकरण कारखाना - दिग्बोई (1901, आसाम)

 पहिला आधुनिक पोलाद कारखाना - कुल्टी, प.बंगाल

 पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली (1959)

 पहिली अनुभट्टी - अप्सरा, तारापूर (1956)

 पहिले अंटार्क्टिका मोहीम - डिसेंबर 1981, मोहीम प्रमुख प्रा. कासीम

 पहिले विद्यापीठ - कोलकत्ता (1957)

 पहिला स्कायबस प्रकल्प - मडगाव, गोवा

 पहिले रासायनिक बंदर - दाहेज, गुजरात

 भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा - विजयंता

 पहिले टेलिफोन एक्सचेंज - कोलकत्ता (1881)

 भारताचे पहिले लढाऊ विमान - नॅट

 पहिला उपग्रह - आर्यभट्ट (1975)

 भारतीय बनावटीची पहिलीपाणबुडी - शाल्की  

 पहिला अणुस्फोट - पोखरण (18 मे, 1974 राजस्थान)

 भारताचे अंटार्क्टिकावरील पहिले स्थानक - दक्षिण गंगोत्री (दुसरे-मैत्री)  

 पहिला सहकारी साखर कारखाना - प्रवरानगर (1949) अहमदनगर  

 भारताची पहिली आण्विक पाणबुडी - आय.एन.एस.चक्र

 पहिली सहकारी सुतगिरणी - कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर

 भारतीय बनावटीची पहिली युद्ध नौका - आय.एन.एस.दिल्ली

 पंचायतराज पद्धतीचा स्विकार करणारे पहिले राज्य - राजस्थान

 भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा - एर्नाकुलम (केरळ)  

 भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर - कोट्टायम (केरळ)

 भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना - कोइंबतुर (1920)

Daily Top 10 News : 20 March 2023


1) चीन आणि भारतातील अरुणाचल प्रदेश यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मॅकमोहन रेषेला औपचारिकपणे मान्यता देऊन अमेरिकेने द्विपक्षीय ठराव मंजूर केला. ठरावाने हे राज्य आपल्या भूभागाचे असल्याचा चीनचा दावा नाकारला आणि त्याऐवजी अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले. शिवाय, ठरावाने भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला पाठिंबा व्यक्त केला.


2) क्रेमलिनने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर मुलांचे सक्तीने रशियाला हस्तांतरण केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केले . युक्रेनियन लोकांनी रशियावर त्यांच्याविरुद्ध नरसंहाराचा प्रयत्न केल्याचा आणि त्यांची ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.


3) भारत-बांग्लादेश मैत्री पाइपलाइनचे उद्घाटन पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना यांच्या हस्ते संयुक्तपणे होणार आहे.


4) 17 मार्च रोजी, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने HDFC Ltd आणि HDFC बँक यांच्या विलीनीकरणास मान्यता दिली, जे कॉर्पोरेट भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे विलीनीकरण मानले जाते. विलीनीकरणामुळे भारतातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण वित्त कंपनीला देशातील सर्वात मोठ्या खाजगी सावकारासह एकत्रित करून एक विशाल बँकिंग संस्था निर्माण होईल.


5) आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने (OECD) आर्थिक वर्ष 2024 साठी भारतासाठी 20 आधार अंकांनी वाढीचा अंदाज 5.9% पर्यंत वाढवला आहे.


6) इराणी चषक 2022-23 च्या फायनलमध्ये टीम रेस्ट ऑफ इंडियाने मध्य प्रदेशचा 238 धावांनी पराभव करून 30 वे विजेतेपद पटकावले. त्याने आपली अधिकृत कामगिरी सुरू ठेवत आपल्या प्रभावी कामगिरीने विजय मिळवला. दोन्ही डावात शानदार फलंदाजी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने दोन्ही डावात द्विशतक आणि एक शतक झळकावून आरओआयच्या विजयात मोलाचे योगदान दिले.


7) महिला आणि बाल विकास मंत्रालय 20 मार्च 2022 ते 3 एप्रिल 2023 या कालावधीत देशभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून पाचवा पोषण पंधरवडा साजरा करणार आहे. जनआंदोलन आणि जन भागीदारीच्या माध्यमातून पौष्टिकतेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि सकस खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे हे पंधरवड्याचे उद्दिष्ट आहे.


8) भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा भाग असलेल्या एल-20 म्हणजे लेबर-20 शी संबंधित गटाची प्रारंभिक बैठक आज पंजाबच्या अमृतसर इथे सुरु झाली.


9) भारत आणि मालदीव दरम्यान चौथा संरक्षण सहकार्य  संवाद माले इथं 19 मार्च 2023 रोजी संपन्न झाला. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि मालदीवचे संरक्षण दल प्रमुख, मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल, मेजर जनरल अब्दुल्ला शमाल यांनी बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवले.


10) जागतिक श्री अन्न परिषदेचा एक भाग म्हणून भरडधान्य  आधारित स्टार्टअपसाठी ऍगलाईव्ह (AgLive ) 2023: द मिलेट चॅलेंज”, हे  सत्र आयोजित.


Headlines Of The Day From The Hindu


• अटल इनोव्हेशन मिशनने ATL सारथी लाँच केले.


•आशियातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय अन्न आणि आदरातिथ्य मेळा दिल्लीत सुरू झाला.


• USGS च्या निवेदनानुसार न्यूझीलंडच्या उत्तरेला असलेल्या केरमाडेक बेटांच्या प्रदेशात 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला.


•उद्योजिका श्रेया घोडावत यांची शी चेंजेस क्लायमेटसाठी भारताची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.


•हनीवेलने विमल कपूर यांची सीईओ म्हणून नियुक्ती केली. 


•अमेरिकेच्या सिनेट समितीने एरिक गार्सेट्टी यांची भारतातील अमेरिकेचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली.


•भारतातील किरकोळ महागाई फेब्रुवारी 2023 मध्ये 6.44% वर घसरली.


• सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने ब्लॉसम महिला बचत खाते सुरू केले.


• भारत आणि जागतिक बँकेने 4 राज्यांमध्ये हरित राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर प्रकल्पाच्या बांधकामासाठी कर्ज करारावर स्वाक्षरी केली.


•आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने फेब्रुवारी 2023 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार प्राप्तकर्त्यांची घोषणा केली आहे.


•फिफाच्या अध्यक्षपदी जियानी इन्फँटिनो यांची पुन्हा एकदा निवड झाली. 


•मायक्रोसॉफ्टने क्लाउड गेमिंग प्रदाता बूस्टरॉइडसह परवाना करार केला.


• SIPRI अहवाल 2023 नुसार भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातकर्ता आहे.


•GPT4, OpenAI च्या मोठ्या भाषेच्या मॉडेलचे सर्वात अलीकडील प्रकाशन, जे ChatGPT आणि नवीन Bing सारख्या लोकप्रिय अँप्सला सामर्थ्य देते.


Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...