Friday, 17 March 2023

काही महत्वपूर्ण चालू घडामोडी सराव प्रश्न


प्रश्न 1 – कोणत्या राज्य सरकारने ‘द व्हिजन फॉर ऑल स्कूल आय हेल्थ’ कार्यक्रम सुरू केला आहे?

उत्तर – गोवा


प्रश्न 2 – ‘हर गाव हरियाली’ उपक्रमाद्वारे 90 लाख रोपे लावण्याचा विक्रम कोणत्या राज्याने केला आहे?

उत्तर – जम्मू आणि काश्मीर


प्रश्न 3 – ‘शेन वॉर्न मेन्स टेस्ट प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कार कोणी जिंकला आहे?

उत्तर – उस्मान ख्वाजा


प्रश्न 4 – ‘गुजरात मेरिटाइम क्लस्टर’चे पहिले CEO कोण बनले आहे?

उत्तर – माधवेंद्र सिंह


प्रश्न 5 – भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर – अमनप्रीत सिंग


प्रश्न 6 – PUMA India ने नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

उत्तर – हरमनप्रीत कौर


प्रश्न 7 – देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या झांकीला प्रथम पारितोषिक मिळाले आहे?

उत्तर – उत्तराखंड


प्रश्न 8 – कोणत्या भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?

उत्तर – मुरली विजय


प्रश्न 9 – ‘BioAsia 2023’ साठी भागीदार देश म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे?

उत्तर – युनायटेड किंगडम (यूके)


प्रश्न 10 – ‘टाटा स्टील मास्टर्स 2023’ कोणी जिंकला आहे?

उत्तर – अनिश गिरी

95 व्या ऑस्कर सोहळ्यात,भारताला पहिल्यांदाच 2 पुरस्कार


1.'नाटू-नाटू' सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉंग.

2.'द एलिफंट व्हिस्पर्स' ठरली 'बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म.


1. नाटू- नाटू song-

Composer-M. M. Keeravani

Language- Telugu

Lyricist- Chandrabose

(यापूर्वी सुद्धा famous golden glob पुरस्कार मिळाला होता)


2.The Elephant Whisperers

भाषा - तेलगू

डायरेक्टर -कार्तिकी गोन्साल्विस.

निर्माती -गुनीत मोंगा 



🏆ऑस्कर पुरस्कार कोण देतं?


1927मध्ये अमेरिकेच्या सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या काही कालाकारांनी Academy of Motion Picture Arts and Sciences ही संस्था सुरू केली. आणि 1928 साली पहिल्यांदा त्यांनी त्यांचे अकादमी पुरस्कार दिले.


🟢आता या अकादमी पुरस्कारांना ऑस्कर्स का म्हटलं जातं?👉 तर जी ट्रॉफी विजेत्यांना दिली जाते, तिला ऑस्कर म्हटलं जातं.


👉ऑस्करच्या नामांकनासाठी पात्र ठरायच्या काही अटी -


1.तो सिनेमा किमान 40 मिनिटांचा असावा.

2.लॉस एंजेलिसमधल्या कुठल्याही थिएटरमध्ये तो किमान सात दिवस दाखवण्यात आलेला असावा.

3.तो जानेवारी 1-डिसेंबर 31 या दरम्यान चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला असावा, आणि त्याआधी तो कुठल्याही OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला नसावा.


🛑फॉरेन लँग्वेज कॅटेगरीसाठी जाणार सिनेमे, जसं की भारताकडून यापूर्वी गेलेले मदर इंडिया, सलाम बाँबे, लगान हे हिंदी सिनेमे किंवा मराठीतले श्वास, हरिशचंद्राची फॅक्ट्री आणि कोर्ट. या कॅटेगरीसाठी प्रत्येक देश एकच सिनेमा पाठवू शकतो.हे लक्षात असू द्या.


✅अनेकदा अकादमीवर श्वेतवर्णीयांना झुकतं माप देण्याचा आरोप झाला आहे. #Oscars SoWhite हा सोशल मीडियावरचा हॅशटॅग एक चळवळ म्हणून अनेक वर्षांपासून सुरू आहे, ज्याचा परिणाम म्हणून आज अकादमीतच नव्हे तर नामांकनांमध्येही बरंच वैविध्य पाहायला मिळतंय 


🏆भारताची ऑस्करमधली कामगिरी👉


2009 साली स्लमडॉग करोडपती या सिनेमानं  एकाच वर्षात तब्बल 4 ऑस्कर ट्रॉफी जिंकल्यात.


यापैकी दोन ए आर रहमान यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत आणि सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी, अर्थात जय हो. याच गाण्यासाठी गुलझार यांनाही सहपुरस्कार देण्यात आला.


याशिवाय बेस्ट साउंड मिक्सिंगसाठी रसूल पुकुट्टी यांना मिळाला.


✅भानू अथय्या या ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय होत्या – 1983 साली आलेल्या रिचर्ड ॲटनबरो यांच्या गांधी या सिनेमासाठी. 


सत्यजित रे यांनाही 1992 साली त्यांच्या सिनेक्षेत्राला योगदानासाठी ऑस्करने सन्मानित करण्यात आलं होतं.

विशेष पहिल्या महिला 👸

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔆 पहिली महिला राष्ट्रपती -  प्रतिभाताई पाटील

🔆 पहिली महिला पंतप्रधान -  इंदिरा गांधी

🔆 पहिली महिला राज्यपाल -  सरोजिनी नायडू

🔆 पहिली महिला राज्यपाल -  विजयालक्ष्मी पंडित (MH)

🔅 पहिली महिला मुख्यमंत्री -  सुचेता कृपलानी

🔅 पहिले आदिवासी महिला राष्ट्रपती -  द्रौपदी मुर्म

🔅 पहिली महिला लोकसभा सभापती -  मीरा कुमार

🔅 भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला -  इंदिरा गांधी

🔅 नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला -  मदर तेरेसा

🔅 पहिली महिला मुख्यमंत्री न्यायाधीश -  लीला सेठ

🔅 पहिली महिला निवडणूक आयुक्त -  व्ही. एस. रमादेवी

🔅 सर्वोच्च न्यायालयातील पहिली न्यायाधीश -  फातिमा बीबी

🔅 रा काँग्रेसच्या अधिवेशनात भाषण देणाऱ्या -  कादंबिनी गांगुली

🔅 भारताच्या पहिल्या महिला पदवीधर -  कादंबिनी गांगुली

🔅 भारताची पहिली महिला शिक्षिका -  सावित्रीबाई फुले

🔅 भारताची पहिली महिला डॉक्टर -  आनंदीबाई जोशी

🔅 भारताची पहिली महिला आयपीएस -  किरण बेदी

🔅 भारताची पहिली महिला आयएएस -  अन्ना राजन जॉर्ज

🔅 संयुक्त राष्ट्रसंघ महासभा महिला अध्यक्ष -  विजयालक्ष्मी पंडित

🔅 भारताची पहिली महिला लोको पायलट -  सुरेखा यादव

🔅 मनोरेल चालक पहिली महिला -  जुईली भंडारे

🔅 मुंबई बेस्ट ची पहिली महिला चालक -  लक्ष्मी जाधव

🔅 पहिली महिला मिस युनिव्हर्स -  सुश्मिता सेन

🔅 पहीली महिला मिस वर्ल्ड -  रिटा फारीया

🔅 पहिली महिला मिस अर्थ - निकोल फारिया

🔅 पहिली महिला मिस इंडिया -  एस्थर व्हिक्टोरिया अब्राहम

🔅 ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली महिला -  आशापूर्ण देवी

🔅 दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती अभिनेत्री -  देविका राणी

🔅 साहित्य अकादमी पुरस्कार विजेती -  अमृता प्रीतम

🔅 एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला -  बचेंद्री पाल

🔅 एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला -  अरुणिमा सिन्हा

🔅 इंग्लिश खाडी पार करणारी पहिली महिला -  आरती सहा

🔅 राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष -  एनी बेझंट

🔅 रा. सभेचे पहिली भारतीय महिला अध्यक्ष -  सरोजिनी नायडू

🔅 भारताची पहिली महिला राजदूत -  सी. बी. मुथम्मा

🔅 पहिली केंद्रीय कॅबिनेट मंत्री -  राजकुमारी अमृता कौर

🔅 पहिली पूर्ण वेळ महिला परराष्ट्रमंत्री -  सुषमा स्वराज

🔅 पहिली महिला फायटर पायलट -  अवनी चतुर्वेदी

🔅 पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट -  अभिलाषा बराक

🔅 भारतीय नौ सेनेची पहिली महिला पहिला -  शुभांगी स्वरूपा

🔅 जम्मू-काश्मीरमधील पहिली फ्लाईंग ऑफिसर - माव्या सुदान

🔅 पहिली महिला मुस्लिम राज्यकर्ती -  रझिया सुलतान

🔅 पहिली महिला रुग्णवाहिका चालक -  विषया लोणारे

🔅 राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष -  जयंती पटनायक

🔅 भारतीय वंशाची पहिली अंतरिक्ष यात्री -  कल्पना चावला

चालू घडामोडी :- 2022 IMP (नेमणूका 2022)


◆ सुरेंद्र पाल राठोड :- कॅनडामधील सिटी ऑफ विलियम लेकचे महापौर 


◆ प्रकाश जावडेकर :- राज्यसभेच्या नीती समितीचे अध्यक्ष


◆ विवेक जोशी :- वित्तीय सेवा सचिव


◆ आकाश त्रिपाठी :- MyGov चे मुख्य कार्यकारी अधिकारी


◆ हसन शेख मोहमुद :- सोमालियाचे राष्ट्रपती


◆ शेफाली दुग्गल :- नेदरलँड्समधील अमेरिकेच्या राजदूत


◆ अजय भादू :- निवडणुक उपायुक्त 


◆ ललित भसीन :- इंडियन अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष 


◆ भरतसिंह चौहान :- आशियाई बुद्धिबळ महासंघाचे (ACF) उपाध्यक्ष


◆ संदीप कुमार गुप्ता :- गेल (इंडिया) लिमिटेडचे अध्यक्ष


◆ संजीव किशोर :- भारतीय ऑर्डिनन्स फॅक्टरीचे महासंचालक


◆ प्रतापराव जाधव :- संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष


◆ विनय गानू :- पोस्ट पेमेंट बँकेचे संचालक


◆ सिबी जॉर्ज :- भारताचे जपानमधील राजदूत


◆ सत्येंद्र प्रकाश :- प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे (PIB) प्रधान महासंचालक


◆ सुनीलकुमार गुप्ता :- उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचे सचिव


◆ मनोज प्रभाकर :- नेपाळ क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक


◆ मुनीश्वर नाथ भंडारी :- मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा (PMLA) अंतर्गत अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष


◆ रोजा ओटुनबायेवा :- अफगाणिस्तानसाठी संयुक्त राष्ट्राचे विशेष दूत (किर्गिझस्तानचे माजी अध्यक्ष)


◆ राजेश वर्मा :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सचिव


◆ देवासीसा मोहंती :- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीचे संचालक 


◆ प्रणय कुमार वर्मा :- बांग्लादेशमधील भारताचे उच्चायुक्त


◆ डॉ. अपूर्वा पालकर :- महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरु


◆ राजेश गेरा :- राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे (NIC) महासंचालक


◆ नितीन गुप्ता :- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष


◆ सुरंजन दास :- असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अध्यक्ष


◆ झुल्फिकार हसन :- नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे महासंचालक  


◆ राजेंद्र प्रसाद :- नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (NHSRCL) व्यवस्थापकीय संचालक 


◆ सुधाकर दलेला :- भूतानमधील भारताचे राजदूत


◆ दिनेश गुणवर्धने :- श्रीलंकेचे पंतप्रधान


◆ राज सुब्रमण्यम :- फेडएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी


◆ शंकर प्रसाद शर्मा :- नेपाळचे भारतातील राजदूत


◆ प्रदीप कुमार रावत :- चीनमधील भारताचे नवे राजदूत 


◆ डॉ. एस राजू :- भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे (GSI) महासंचालक


◆ शेख मुहम्मद झायेद अल नाह्यान बिन :- संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती


◆ विवेक दिवांगेन कुमार :- ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक


◆ मिया अमोर मोटली :- बार्बाडोसच्या दुसऱ्यांदा पंतप्रधान (पहिल्या महिला)


◆ शिओमारा कॅस्ट्रो :- होंडुरासच्या पहिल्या महिला राष्ट्रपती


◆ एस. किशोर :- स्टाफ सिलेक्शन कमिशनचे (SSC) अध्यक्ष 


◆ रघुवेंद्र तन्वर :- भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष


◆ सुभ्रकांत पांडा :- फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (FICCI) अध्यक्ष


लक्षात ठेवा

🔸१) लोकसभेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे?

- लोकसभा उपाध्यक्ष 


🔹२) लोकसभेच्या उपाध्यक्षांना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे आवश्यक आहे?

- लोकसभा अध्यक्ष


🔸३) धन विधेयक ....च्या शिफारशीशिवाय विधानसभेत मांडता येत नाही.

- राज्यपाल


🔹४) घटक राज्याचे मंत्रिमंडळ सामुदायिकरीत्या .... ला जबाबदार असते.

- विधानसभा


🔸५) उपराष्ट्रपतीस आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो .... कडे सादर करावा लागतो.

- राष्ट्रपती


🔸१) भारतातील स्वतंत्र अशा न्याययंत्रणेस न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आहे. हा अधिकार म्हणजे....

- "कायदेमंडळाने केलेल्या कायद्यांची व कार्यकारी सत्तेने केलेल्या कृतींची घटनात्मकता तपासून पाहण्याचा अधिकार होय"


🔹२) .... हा पंतप्रधानाचा सर्वांत महत्त्वाचा अधिकार होय; नव्हे ते त्याच्या हातातील एक अत्यंत प्रभावी असे अस्त्रच होय. 

- 'राष्ट्रपतींना लोकसभा बरखास्तीचा सल्ला देणे'


🔸३) लोकलेखा समितीची (Public Accounts Committee)सदस्यसंख्या बावीस इतकी असते, तर अंदाज समितीची (Estimates Committee) सदस्यसंख्या .... इतकी असते.

- तीस


🔹४) लोकलेखा समितीच्या सदस्यांपैकी .... सदस्य लोकसभा सदस्यांमधून घेतले जातात.

- पंधरा


🔸५) घटनात्मक तरतुदींचा भंग केल्याच्या कारणावरून .... द्वारे मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून कमी करता येते. 

- महाअभियोग


🔸१) .... प्रदेशात सहा महिने रात्र, तर सहा महिने दिवस असतो. 

- टुंड्रा (ध्रुवीय)


🔹२) आपला भारत देश .... या प्रकारच्या प्रदेशात मोडतो. 

- मोसमी हवामानाचा प्रदेश


🔸३) ध्रुवीय किंवा टुंड्रा प्रदेशात उत्तर कॅनडा व ग्रीनलंडच्या किनारपट्टीत .... हे लोक राहतात..

- एस्किमो


🔹४) एस्किमो लोक देवमाशांच्या हाडांच्या सांगाड्यापासून बनविलेली विशिष्ट प्रकारची होडी मासेमारीसाठी वापरतात. या होडीचे नाव .... 

- कयाक


🔸५) उलट्या टोपलीच्या आकाराचे एस्किमोंचे हिवाळ्यातील बर्फाचे घर ....

- इग्लू

Current Affairs :- 16 March 2023

★ | #World | #India | #State | ★


➤ भारत आणि जागतिक बँकेने अलीकडेच भारतातील चार राज्यांमध्ये 781 किलोमीटरचे हरित महामार्ग बांधण्यासाठी कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे.


➤“क्रीडा आणि शारीरिक तंदुरुस्तीमध्ये सहयोग” या विषयावर नुकत्याच संपन्न झालेल्या तीन दिवसीय शिखर परिषदेत आठ शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) राष्ट्रांचे प्रतिनिधी नवी दिल्लीत एकत्र आले.


➤ भारताचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंग ठाकूर यांनी 13व्या IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे नवी दिल्ली येथे उद्घाटन केले, ज्याने बॉक्सिंगच्या जगातील बहुप्रतिक्षित कार्यक्रमाची सुरुवात केली.


➤ फेब्रुवारी आणि मार्च 2023 मध्ये, जगाने फ्रेडी नावाच्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाचा विलक्षण चिकाटी पाहिला. (https://t.me/Vidyarthipoint)


➤ जून 2023 मध्ये स्मार्ट सिटी मिशनची अंतिम मुदत जवळ येत असताना, केंद्र सरकारने खराब कामगिरी करणाऱ्या शहरांना त्यांच्या प्रकल्पांना गती देण्याचे आवाहन केले आहे.


➤ अलीकडेच, दोन युनायटेड स्टेट्स सिनेटर्स, एक रिपब्लिकन आणि एक डेमोक्रॅट, यांनी काँग्रेसमध्ये द्विपक्षीय ठराव मांडला, ज्याने अमेरिकेने अरुणाचल प्रदेशमध्ये चीन आणि भारत यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मॅकमोहन रेषेला मान्यता दिल्याची पुष्टी केली.


➤ IQAir च्या पाचव्या जागतिक वायु गुणवत्ता अहवालात असे दिसून आले आहे की भारत अजूनही वायू प्रदूषणाच्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. हवेतील पीएम 2.5 पातळीच्या आधारे जगातील 50 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये 39 भारतीय शहरे असल्याचे अहवालात समोर आले आहे.


➤ बेन अँड कंपनीच्या वार्षिक इंडिया व्हेंचर कॅपिटल रिपोर्ट 2023 मध्ये असे दिसून आले आहे की भारतातील व्हेंचर कॅपिटल गुंतवणूक 2022 मध्ये $38.5 बिलियन वरून $25. (https://t.me/Vidyarthipoint)7 बिलियन पर्यंत $33% कमी झाली आहे.


➤ एम्बेरिझिडे कुटुंबात शंकूच्या आकाराचे बील असलेले सीडेटर असतात आणि ते जगभर पसरलेले आहे. Godlewski’s bunting ही एम्बेरिझिडे कुटुंबातील एक प्रजाती आहे ज्यामध्ये चीन, पाकिस्तान, भारत, कझाकस्तान, मंगोलिया, म्यानमार आणि सायबेरिया यांचा समावेश आहे.


चालू घडामोडी :- 16 मार्च 2023


◆ अटल इनोव्हेशन मिशनने ATL सारथी लाँच केले.


◆ आशियातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय अन्न आणि आदरातिथ्य मेळा दिल्लीत सुरू झाला.


◆ उत्तराखंड सरकारने राज्यत्वाच्या कार्यकर्त्यांसाठी 10% क्षैतिज आरक्षण मंजूर केले.


◆ USGS च्या निवेदनानुसार न्यूझीलंडच्या उत्तरेला असलेल्या केरमाडेक बेटांच्या प्रदेशात 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला.


◆ हवामान उद्योजिका श्रेया घोडावत यांची शी चेंजेस क्लायमेटसाठी भारताची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ अमेरिकेच्या सिनेट समितीने एरिक गार्सेट्टी यांची भारतातील अमेरिकेचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.


◆ हनीवेल इंटरनॅशनल HON ने जाहीर केले की कंपनीचे विद्यमान अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, विमल कपूर, नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून डॅरियस अँडमझिक यांच्या जागी 1 जूनपासून लागू होतील.


◆ 13 मार्च रोजी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2023 मध्ये भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर 6.52 टक्क्यांवरून 6.44 टक्क्यांवर घसरला आहे.


◆ 18 देशांतील बँकांना रुपयामध्ये व्यापार करण्यासाठी रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी मिळाली.


◆ भारत आणि जागतिक बँकेने 4 राज्यांमध्ये हरित राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर प्रकल्पाच्या बांधकामासाठी कर्ज करारावर स्वाक्षरी केली.


◆ सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने ब्लॉसम महिला बचत खाते सुरू केले.


◆ भारत आणि जागतिक बँकेने 4 राज्यांमध्ये हरित राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर प्रकल्पाच्या बांधकामासाठी कर्ज करारावर स्वाक्षरी केली.


◆ जियानी इन्फँटिनो यांची 2027 पर्यंत FIFA चे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड करण्यात आली.


◆ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने फेब्रुवारी 2023 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार प्राप्तकर्त्यांची घोषणा केली आहे.


◆ GPT4, OpenAI च्या मोठ्या भाषेच्या मॉडेलचे सर्वात अलीकडील प्रकाशन, जे ChatGPT आणि नवीन Bing सारख्या लोकप्रिय अँप्सला सामर्थ्य देते.


◆ स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (सिप्री) च्या अभ्यासानुसार, 2013-17 आणि 2018-22 दरम्यान शस्त्रास्त्र खरेदीत 11% घट होऊनही, भारत अजूनही लष्करी उपकरणांचा जगातील सर्वात मोठा आयातदार आहे.

माता मृत्यू अहवालातील ट्रेंड


◆ युनायटेड नेशन्स मॅटर्नल मॉर्टॅलिटी एस्टिमेशन इंटर-एजन्सी ग्रुप, ज्याला MMEIG म्हटले जाते, नुकताच माता मृत्यू दरावर एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. 


◆ अहवाल 2000 ते 2020 मधील माता मृत्यू दर दर्शवितो. MMEIG मध्ये WHO, UNFPA, UNICEF आणि WB यांचा समावेश आहे. 


◆ हा अहवाल जागतिक स्तरावर, प्रादेशिक स्तरावर आणि देशाच्या पातळीवरील माता मृत्यूच्या ट्रेंडची आकडेवारी सादर करतो.


➤ या अहवालातील प्रमुख निष्कर्ष :-


2020 मध्ये, सुमारे 800 महिलांचा गर्भधारणा आणि बाळंतपणादरम्यान मृत्यू झाला. याचा अर्थ दर दोन मिनिटांनी दोन महिलांचा मृत्यू झाला. शाश्वत विकास लक्ष्य 3.1 माता मृत्यू दर 100,000 जिवंत जन्मांमागे 70 पेक्षा कमी माता मृत्यू कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. आणि हे 2030 पर्यंत साध्य करायचे आहे.


➤ देशपातळीवर :-


◆ दक्षिण सुदान, चाड व नायजेरिया या तीन देशांनी सर्वाधिक MMR नोंदवले. त्यांचे MMR 1000 पेक्षा जास्त होते.


◆ उत्तर आफ्रिका, उप-सहारा आफ्रिका, पश्चिम आशिया व आग्नेय आशियामध्ये मातृत्व दरात घट झाली.


◆ सुमारे 46 अल्प विकसित देशांमध्ये उच्च एचआयव्ही-संबंधित अप्रत्यक्ष माता मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 33 आफ्रिकेत, तीन पॅसिफिक झोनमध्ये, एक कॅरिबियन व नऊ आशिया खंडात होते.


◆ 2005 मध्ये एचआयव्ही संसर्ग सर्वाधिक होता. 2005 पासून एचआयव्ही संसर्गामुळे होणाऱ्या माता मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विशेषतः

🔹 सिंधू संस्कृती:


०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.


०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती. 


०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.


०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.


०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.


०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही. 


०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.

आर्य



◾️जवळपास 4000 वर्षापूर्वी वायव्येकडील खैबर खिंडीमधून अनेक टोळ्या भारतात सप्तसिंधुच्या प्रदेशात आल्या.

◾️या टोळ्या आग्नेय युरोपातील कॉकेशस पर्वतच्या भागातून भारतात आल्या असाव्यात असे म्हटले जाते.

◾️आर्यांनी सिंधू / हडप्पा संस्कृतीवर हल्ला करून नवी आर्य संस्कृती स्थापन केली

◾️या लोकांना आर्य म्हणून ओळखले जात असे. या लोकांना गुरांना चारण्याकरिता मोठमोठी कुरणे हवी असत.

◾️गरे ही त्यांची संपत्ती होती.

◾️ सिंधु नदी ही त्याच्या इच्छेला पूरक अशी होती म्हणून त्यांनी तेथेच वसाहत स्थापन केली.

◾️तयानंतरच्या काळात आलेल्या टोळ्या गंगा-यमुनेच्या परिसरात स्थिर झाल्या.

◾️आर्य लोकांनी उत्तर भारतात आपल्या वसाहती स्थापन केल्या.

◾️आर्य लोक निसर्गप्रेमी होते. त्यांनी वेगवेगळ्या देवतांना प्रसन्न करण्याकरिता अनेक कवणे रचली.

◾️तयांच्या कवनाचा संग्रह म्हणजे वेद होय.

◾️आर्यांनी चार वेद लिहिले
1)........
2)........
3)........
4)........

◾️आर्यांनी वेदांची रचना केली म्हणून ही संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती म्हणून ओळखली जाते.

◾️ वदिक वाड्मय जगातील सर्वात प्राचीन वाड्मय म्हणून ओळखले जाते.

◾️ आर्य हे शस्त्रधारक असून त्यांनी टोळ्यांच्या रूपाने भारतात प्रवेश केला.

◾️ जनावरे  ही त्यांची प्रमुख संपत्ती होती. गुरांना आवश्यक असलेली कुरणे आणि पाण्याची सोईमुळे हे लोक सिंधुच्या खोर्‍यात स्थायिक झाले.

◾️ ह टोळ्याच्या रूपाने राहत असे आणि आपआपसात लढाया करीत असे.

◾️यापैकी भरत नावाची टोळी सर्वात पराक्रमी होती. या टोळीच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे नाव पडले.

◾️सिंधुचा प्रदेश अपूर्ण पडल्यामुळे, यापैकी काही टोळ्या लोक गंगा-यमुनेच्या खोर्‍यात सरकल्या. व त्यांनी त्या भागात वस्ती केली.

◾️महणून या प्रदेशाला आर्यवर्त असे नांव पडले.

◾️दशाला सद्या 4 नावांनी ओळखले जाते.
भारत, India, आर्यावर्त, हिंदुस्थान

एकाच घरातल्या दोन बहिणी झाल्या IAS, एकच नोट्स वापरून केलं अभ्यास, महिलासाठी बनलेत प्रेरणा !


भारतात घेतल्या जाणाऱ्या युपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा या सगळ्यात कठिण परीक्षा मानल्या जातात. अभ्यास आणि मेहनतीसोबतच भाग्य असेल तर या परीक्षा क्लिअर होणे शक्य असते. त्यामुळे एखादा विद्य़ार्थी जर त्यात पास झालाच आणि तोही आपल्या शहरातील असेल तर सर्वत्र त्याचे कौतुक आणि अभिनंदन करणारे फलक लावले जातात. त्याचे कौडकौतुक केले जाते. पण एक भलतीच घटना समोर आली आहे. ती म्हणजे एकाच घरातील दोघंजण एकाचवर्षी यूपी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच यूपीएससीने सिव्हिल सेवा परीक्षेचा निकाल जाहिर केला. त्या परीक्षेत बिहारचा शुभम कुमार टॉपर होता तर दिल्लीची अंकिता जैन हिने ऑल इंडिया थर्ड रॅंक मिळवला. त्यामुळे तिचा संपूर्ण परिवार खूप खुश आहे. पण जैन कुटुंबात हा आनंद केवळ अंकितासाठीच नसून तिची बहिण वैशाली जैनसाठीसुद्धा झाला आहे. कारण वैशालीनेसुद्धा आपल्या बहिणीप्रमाणेच ऑल इंडिया 21वा रॅंक मिळवला आहे. या यशामुळे एकाच घरातील दोघी बहिणी आयएएस ऑफिसर झाल्या आहेत. या बहिणींची खास गोष्ट म्हणजे दोघींनी एकाच नोट्समधून परीक्षेचा अभ्यास केला होता. दोघांची रॅंक वेगवेगळी आली असली तरी दोघींनीही मेहनत सारखीच केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता जैन आणि वैशाली जैन यांचे वडील सुशील जैन हे बिझनेसमन आहेत आणि त्यांची आई गृहिणी आहे. दोघी बहिणींच्या अभ्यासासाठी त्यांच्या पालकांनी खूप तयारी करुन घेतली होती. अंकिताने 12 वी झाल्यावर दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केले.
त्यानंतर तिला एका खाजगी कंपनीत जॉब मिळाला. पुढे तिने युपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरु केली. अंकिताने 2017 पासून या परीक्षेची तयारी सुरु केली होती. पहिल्याच प्रयत्नात तिला यश मिळाले नाही. म्हणून तिने दुसऱ्यांदा परीक्षा दिली. त्यात ती पास तर झाली मात्र आयएएस होण्यासाठी मुबलक गुण तिला मिळाले नाहीत.