Sunday, 12 March 2023

Headlines Of The Day From The Hindu 12/03/2023


•नागालँडचे मुख्यमंत्री आणि NDPP नेते नेफियू रिओ यांनी पदाची शपथ घेतली.


•इंडोनेशिया आपली राजधानी जकार्ताहून बोर्निओला हलवण्याच्या तयारीत आहे.


• अरुण सुब्रमण्यन हे न्यूयॉर्क न्यायालयात पहिले भारतीय-अमेरिकन न्यायाधीश झाले आहेत.


• भारत आणि अमेरिका सेमीकंडक्टर्सच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.


• 54 वा CISF स्थापना दिवस 10 मार्च रोजी देशभरात साजरा करण्यात आला.


•भारतीय नौदलाने मोठा सराव TROPEX-23 आयोजित केला आहे. 


•भारतीय नौदलाला पाण्याखालील अँटी-सबमरीन वॉरफेअर रॉकेट RGB-60 साठी पहिले पूर्णतः स्वदेशी फ्यूज YDB-60 प्राप्त झाले आहे.


•अमेरिकेने निसार हा उपग्रह इस्रोकडे सुपूर्द केला.


•रिलायन्स लाइफ सायन्सेसला IIT कानपूरकडून जीन थेरपी तंत्रज्ञान परवाना मिळाला आहे.


• 10 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन साजरा केला जातो. 


•शी जिनपिंग यांचा चीनचे अध्यक्ष म्हणून तिसरा कार्यकाळ सुरू झाला.


•लडाखमध्ये कर्नल गीता राणा या आर्मी बटालियनचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला आहेत.

राज्यघटना प्रश्नसच

 1. संसदेच्या दोन्ही सभागृहांसह एकत्र बसणे खालीलप्रमाणे आहे.

 [अ] भारताचे उपाध्यक्ष

 [बी] घटना दुरुस्ती विधेयक स्वीकारणे

 [सी] ज्यावर दोन्ही सभागृहे सहमत नाहीत असे विधेयक विचारात घेण्यासारखे आहे.✅✅

 [डी] भारतीय राष्ट्रपती पदाची निवडणूक


 2.जनरल विधेयकाशी संबंधित गतिरोध दूर करण्यासाठी संसदेच्या दोन सभागृहांची बैठक कोण बोलवते?

 [अ] अध्यक्ष✅✅

 [ब] मंत्रिपरिषद

 [सी] लोकसभा अध्यक्ष

 [डी] राज्यसभेचे अध्यक्ष


 3. भारतीय संसदेच्या दोन सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या संदर्भात होते?

 [अ] संविधान दुरुस्ती विधेयक

 [बी] वित्त विधेयक

 [सी] सामान्य विधेयक✅✅

 [डी] भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक


 4.संसदेच्या सलग दोन अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त वेळ किती?

 [ए] 1 महिना

 [बी] 3 महिने

 [सी] 6 महिने✅✅ 

 [डी] 12 महिने


 5.संसदेची किती अधिवेशने आहेत?

 [अ] बजेट सत्र

 [बी] मॉन्सून सत्र

 [सी] हिवाळी अधिवेशन

 [डी] वरील सर्व✅✅


 6.भारतीय संसदेचे सार्वभौमत्व    प्रतिबंधित आहे.

 [अ] भारतीय राष्ट्रपतींच्या अधिकारांनी

 [बी] न्यायालयीन पुनरावलोकन✅✅

 [सी] विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून

 [पंतप्रधान] भारताच्या पंतप्रधानांच्या अधिकारांची


१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?

१)विजयालक्ष्मी पंडित

२)हंसाबेन मेहता✅✅✅

३)सरोजिनी नायडू

4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही





२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?

१)२६जानेवारी१९५०

२)२६जानेवारी१९४९

३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅

५)२६नोव्हेंबर १९५०




३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?

१)डॉ बाबासाहेब आंबेडकर

२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅ 

३)पंडित नेहरू

४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते




४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?

१)दक्षिण आफ्रिका

२)अमेरिका

३)आयर्लंड ✅✅✅

४)वरीलपैकी एकही नाही 



५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे? 

१)सहावा

२)नववा✅✅✅

३) पाचवा

४)वरीलपैकी नाही




६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?

१)कलम ५१ब

२)कलम५१अ✅✅✅

३)कलम ५१क

४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही




७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?

१)उच्च न्यायालय

२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅

३)जिल्हा न्यायालय

४)कुटुंब न्यायालय




८.खालील पैकी संसद बरोबर काय?

१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा

२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल

३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅

४)मुळात अस काही नसतं




९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार  सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?

१)९ 

२)१०✅✅✅

३)११

४)यापैकी नाही



१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?

१)१०९✅✅✅

२)१०८

३)१०७

४)१०६




 ११.तिन्ही सेनादलाचे सर सेनापती हे असतात? 

१)सवरक्षण मंत्री 

२)गृहमंत्री

३)पंतप्रधान

४)राष्ट्रपती✅✅✅




१२.संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढता येत नाही?

१)हे विधान असत्य आहे

२)हे विधान सत्य आहे✅✅✅कलम 123 नुसार  (राष्ट्रपती काढता)

३)वरीलपैकी दोन्ही बरोबर

४)वरीलपैकी दोन्ही चूक




१३.उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना कोण शपथ देतात?

१)राष्ट्रपती

२)उपराष्ट्रपती

३)राज्यपाल✅✅✅

४)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश



१४.भारताचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (CAG)ची नियुक्ती राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करता?

१)१४७

२)१४८✅✅✅(केंद्राचे व राज्याचे जमाखर्च लेखे तपासणे

३)१४९

४)१५१




१५.सुचीमधील विषययाची क्रमानुसार योग्य पर्याय निवडा?

1.केंद्र सूची 

2.राज्य सूची 

3.समवर्ती सूची

१)५२,६१,१००

२)१००,६१,५२✅✅✅

३)६१,५२,१०० 

४)५२,१००,६१




१६.राज्यसभेच्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो.

हे विधान चूक की बरोबर

१)चूक 

२)बरोबर✅✅✅कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात

३)काही अंशी चूक 

४)वरील वाक्याचा खालील उत्तराशी तिळमात्र सम्बध  नाही




१७.खालील पैकी कोणाचा उल्लेख 'ग्रह मालिकेतील सूर्य 'असा केला जातो?

१)राज्यपाल 

२)राष्ट्रपती

३)पंतप्रधान✅✅✅

४)उपराष्ट्रपती




१८.भारत हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?

१)धर्मनिरपेक्ष

२) गणराज्य

३)समाजवादी

४)साम्यवादी✅✅✅




१९.भारतीय घटनादुरुस्ती चे अधिकार कोणास आहे?

१)सर्वोच्च न्यायालय

२)राष्ट्रपती

३)भारतीय जनता

४)कायदेमंडळ✅✅✅




२०.मतदानासाठी आवश्यक पात्राता वय २१वरून१८वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?

१)६२

२)६१✅✅✅

३)७१

४)८९.

महत्वाचे प्रश्नसंच

 १) भारतीय संविधानात पंतप्रधान या पदाचा उल्लेख कसा आहे ?

उत्तर -- प्रधानमंत्री 

----------------------------------------------------------

२) भारताने कोणत्या शासन पध्दतीचा स्विकार केला आहे ?

उत्तर -- संसदीय

----------------------------------------------------------

३) भारत देशाचा घटनात्मक प्रमुख आहेत ?

उत्तर -- राष्ट्रपती

----------------------------------------------------------

४) भारत देशाचा शासन प्रमुख कोण आहेत ?

उत्तर -- पंतप्रधान

----------------------------------------------------------

५) भारतीय पंतप्रधान यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ?

उत्तर -- राष्ट्रपती

-------------------------------------------------------

६) भारताचा प्रथम नागरिक कोणास म्हणतात ?

उत्तर -- राष्ट्रपती

-------------------------------------------------------

७) भारताच्या तिन्ही सेनादलाचे प्रमुख (सरसेनापती) कोण असतात ?

उत्तर -- राष्ट्रपती

-------------------------------------------------------

८) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

उत्तर -- डाॅ. राजेंद्र प्रसाद

------------------------------------------------------

९) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ?

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

--------------------------------------------------------

१०) भारताच्या राष्ट्रपतींना कोण शपथ देतात ?

उत्तर -- सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश

----------------------------------------------------------

११) भारताचे राष्ट्रपती बनलेले पहिले वैज्ञानिक कोण ?

उत्तर -- डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

-------------------------------------------------------

१२) भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ?

उत्तर -- डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन



लोकपाल


    पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष


गैर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम


 न्यायिक सदस्य:- दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अजयकुमार त्रिपाठी, अभिलाषा कुमारी


🛑 लोकपाल निवड समिती

1)पंतप्रधान

2)सरन्यायाधीश

3)लोकसभा अध्यक्ष

4)लोकसभा विरोधी पक्षनेते

5)कायदेतज्ज्ञ


🛑 लोकपाल पात्रता


1)सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश

2)भ्रष्टाचार विरोधी धोरण,सार्वजनिक प्रशासन,दक्षता,विमा बँकिंग याबाबत किमान 25 वर्षे अनुभव


🛑 अध्यक्ष अपात्रता


 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती संसद व विधिमंडळ सदस्यअपराधी दोषी


🛑 कार्यकाल


5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पर्यंत जो अगोदर  संपेल तो


 🛑 पगार


अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे

सदस्य ला न्यायाधीश प्रमाणे


🛑 लोकपाल कायदा 2013


   राज्यसभा:-17 डिसेंबर 2013

लोकसभा:-18 डिसेंबर 2013

राष्ट्रपती:-1 जानेवारी 2014

अंमलबजावणी :-16 जानेवारी 2014


 रचना: 1 अध्यक्ष व जास्तीत जास्त 8 सदस्य

गल्या दशकातील सर्व घटनादुरुस्तींचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे



◾️95 वी घटनादुरुस्ती (2010) - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच अँग्लो इंडियन समाज यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ.


◾️ 96 वी घटनादुरुस्ती (2011) - ओरिसा राज्याचे नाव ओडिशा तसेच ओरिया भाषेचे नाव ओडिया केले गेले.


◾️ 97 वी घटनादुरुस्ती (2012) - सहकारी संस्था स्थापन करणे आता मूलभूत अधिकार तसेच सहकारी संस्थांबाबत नवीन भाग IX-B चा समावेश.


◾️ 98 वी घटनादुरुस्ती (2013) - कर्नाटक राज्यातील हैद्राबाद-कर्नाटक भागासाठी अनुच्छेद 371-J अन्वये विशेष तरतुदी.


◾️ 99 वी घटनादुरुस्ती (2015) - राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची स्थापना. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरवली.


◾️ 100 वी घटनादुरुस्ती (2015) - भारत व बांगलादेश यांच्यातील सीमावादाचा निपटारा करणे.


◾️ 101 वी घटनादुरुस्ती (2016) - केंद्र तसेच राज्ये यांच्या एकापेक्षा अधिक अप्रत्यक्ष करांऐवजी संपूर्ण देशात एकच वस्तू व सेवा कर.


◾️ 102 वी घटनादुरुस्ती (2017) - राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आयोगास घटनात्मक दर्जा.


◾️ 103 वी घटनादुरुस्ती (2018) - आर्थिक मागासवर्गास शिक्षण तसेच नोकरी यांत 10 टक्के आरक्षण.


◾️ 104 वी घटनादुरुस्ती (2019) - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ परंतु अँग्लो इंडियन आरक्षणास मुदतवाढ नाही.

घटना आणि देशातील पहिले राज्य

◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश


◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू


◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान


◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान  


◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड


◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा


◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश


◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश


◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ 


◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब


◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक


◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक


◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश


◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू


◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)


◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र 


◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून) 


◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड


◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश


भारतातील जंगलाविषयी माहिती



▪️भारत सरकारच्या वन व पर्यावरण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार भारतातील 78 लाख 29 हजार चौ. हेक्टर जमिनक्षेत्र वनाखाली असून भारताच्या एकूण जमिनक्षेत्राच्या 23.81 जमिनक्षेत्र जंगलाखालील आहे.

▪️भारतातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केल्यास काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण कमी झाले असून काही राज्यामध्ये जंगलाचे प्रमाण वाढलेले आहे.
भारतातील जंगलाचे प्रमाण व राज्ये :

● आकारमानानुसार सर्वाधिक जंगल असलेले राज्य -

▪️ भारतात सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण मध्यप्रदेश राज्यात (94,689 चौ.कि.मी.) असून दूसरा क्रमांक आंध्रप्रदेश (63,814 चौ.कि.मी.) राज्याचा आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा (61,939 चौ.कि.मी.) लागतो.

● क्षेत्रफळानुसार जंगलाचे प्रमाण जास्त असलेले राज्य -

▪️ कषेत्रफळानुसार सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण सिक्कीम (82.31%) राज्यात आहे. त्यानंतर अनुक्रमे दूसरा क्रमांक मिझोरम (79.30%) व तिसरा क्रमांक मणीपुर (78.01%) लागतो. केंद्रशासीत प्रदेशात सर्वाधिक जंगले लक्षव्दिप बेटामध्ये आहे.

● सर्वात कमी जंगल नसलेले राज्य -

▪️ हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी जंगले असून हरियाणामधील फक्त 3.53% जमीन जंगलाखाली आहे. त्यानंतर अनुक्रमे पंजाब (6.12%) व बिहार (6.87%) जमीन जंगलाखाली आहे.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...