Sunday, 5 March 2023

मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती


निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

🔸मुख्य निडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक ➖


👉पंतप्रधान,

👉 विरोधी पक्षनेते आणि

👉 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 


यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी,


✅ तसेच विरोधी पक्षनेते नसतील तर, तेव्हा संसदेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते या समितीचे सदस्य असतील असेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

✅ निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तींबाबत सर्वोच्च न्यायालयाने संसदेला नवीन कायदा बनविण्याचे निर्देश दिले आहेत.


तसेच जोपर्यंत हा कायदा बनत नाही तोपर्यंत निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा समावेश असलेल्या समितीद्वारे करण्यात यावी, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.


जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती



०१) 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (NDA) कुठे आहे ?

- खडकवासला.(पुणे)


०२) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय  आहे ?

- मुरलीधर देविदास आमटे. 


०३) जगातील कोणत्या खंडास बर्फाळ खंड असे म्हणतात ?

- अंटार्क्टिका.


०४) शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती  ?

- यकृत.


०५) गोवा या राज्याची राजधानी कोणती आहे ?

- पणजी.


०१) महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्याचे नाव काय होते ?

- यशवंतराव चव्हाण.


०२) महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे नाव काय आहे ?

- नागपूर.


०३) अजिंठा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

- औरंगाबाद.


०४) सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?

- ३६.


०५) महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदीचे नाव काय आहे ?

- गोदावरी.


०१) महाराष्ट्र राज्याची राजभाषेचे नाव काय आहे ?

- मराठी.


०२) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता?

- हरियाल.


०३) महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?

 - आंबा.


०४) महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?

- कबड्डी.


०५) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

- मुंबई.


०१) भारतातील पहिली महिला आयपीएस अधिकारी कोण ?

- किरण बेदी.


०२) छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ?

- पुरंदर किल्ला.


०३) नेपाळची राजधानी कोणती आहे ?

- काठमांडू.


०४) रेबिजची लस कोणी शोधली ?

- लुईस पाश्चर.


०५) सुशीलकुमार हा खेळाडू कोणता खेळ खेळतो ?

- कुस्ती.


०१) १ ते ९ अंकाची बेरीज किती होते ?

- ४५.


०२) इटली या देशाची राजधानी कोणती ?

- रोम.


०३) 'कऱ्हेचे पाणी' हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

- प्र.के.अत्रे.


०४) ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे ?

- उस्मानाबाद.


०५) इराक या देशाची राजधानी कोणती ?

- बगदाद.


१) राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी तयार केली ?

- होन आणि शिवराई.


०२) भारताच्या अणू विज्ञानाचे जनक कोणास म्हणतात ?

- डॉ.होमी भाभा.


०३) अंधासाठीच्या ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला ?

- लुईस ब्रेल.


०४) संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय ?

- डेंबुजी झिंगराजी जानोरकर.


०५) 'स्कर्व्ही' हा रोग कोणत्या जीवनसत्वाभावी होतो ?

- सी जिवनसत्व.


०१) 'इस्रो' (ISRO)चे मुख्यालय भारतात कोठे आहे ?

- बंगळुरू. 


०२) राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ?

- १४ सप्टेंबर.


०३) रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

- कुलाबा.


०४) 'विश्वनाथन आनंद' हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

- बुद्धिबळ.


०५) मराठवाड्याच्या राजधानीचा जिल्हा कोणता ?

- औरंगाबाद.


०१) ज्वारीच्या उत्पादनात कोणत्या राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो ? 

- महाराष्ट्र.


०२) प्रसिद्ध 'शनिवारवाडा ' कोठे आहे ?

- पुणे.


०३) सातारा जिल्ह्यात कोणी प्रतिसरकारची स्थापना केली ?

- क्रांतिसिंह नाना पाटील.


०४) गरीबाचे 'बदाम'असे कशास म्हटले जाते ?

- शेंगदाणे.


०५) पृथ्वीच्या स्वतःच्या आसाभोवती फिरण्याच्या क्रियेस काय म्हणतात ?

- परिवलन.


०१) 'ऊसतोड कामगारांचा जिल्हा' म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?

- बीड.


०२) ऑक्सीजन चा शोध कोणी लावला ?

- जोसेफ प्रिस्टले. 


०३) बांगलादेशची राजधानी कोणती आहे ?

- ढाका.


०४) भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यास किती कालावधी लागला ?

- २ वर्ष ११ महिने १७ दिवस.


०५) 'श्रीमान योगी' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

- रणजित देसाई.



०१) जपान या देशाची राजधानी कोणती ?

- टोकियो.


०२) कोणाचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो ?

- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम.


०३) महाराष्ट्रातील कोणत्या संतांची पदे 'गुरु ग्रंथसाहेब' या शीख धर्मीयांच्या धर्मग्रंथात आहेत ?

- संत नामदेव महाराज.


०४) 'क्ष'(X-ray) किरणांचा शोध कोणी लावला ?

- रॉंन्टजेन.


०५) फ्रान्स या देशाची राजधानी कोणती ?

- पॅरिस.


०१) 'विवेकसिंधू' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?

- मुकुंदराज.


०२) चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

- कर्नाटक.


०३) राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे ?

- त्यागाचे.


०४) मिठाचे रासायनिक नाव काय आहे ?

- सोडियम क्लोराइड.


०५) 'धवलक्रांती' म्हणजे  कशाच्या उत्पादनात वाढ ?

- दूध उत्पादन.


०१) सरदार सरोवर' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

- नर्मदा.


०२) 'आग्रा' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ?

- यमुना.


०३) शिवाजी सागर' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?

- कोयना.


०४) 'संजय गांधी' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

- बोरिवली.(मुंबई)


०५) महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- चंद्रपूर.


०१) महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ?

- ७२० कि.मी.


०२) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- पुणे.


०३) 'भंडारदरा' धरण कोणत्या नदीवर आहे ?

- प्रवरा.


०४) पालघर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र कोणते आहे ?

- सातपाटी.


०५) 'बिहू' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

- आसाम.


१) भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ?

- दादासाहेब फाळके.


०२) डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

- रूडाल्फ डिझेल.


०३) 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

- अनंत भवानीबाबा घोलप.


०४) व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

- २७० ते २८० ग्रॅम.


०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

- ४ सप्टेंबर १९२७.


०१) महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

- पुणे.


०२) वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

- जेम्स वॅट.


०३) 'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?

- प्रल्हाद केशव अत्रे.


०४) ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते आहे ?

- भावार्थ दीपिका.


०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?

- ८ जुलै १९३०.

लक्षात ठेवा



🔸१) पुण्याजवळ .... येथे 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (National Defence Academy) आहे.

- खडकवासला


🔹२) राज्यातील .... या नदीचे खोरे दगडी कोळशाच्या साठ्यांबद्दल प्रसिद्ध आहे.

- वर्धा


🔸३) राज्यातील नियोजित औष्णिक विद्युत केंद्रामुळे अधिक (प्रकाशझोतात आलेले .... हे ठिकाण दगडी कोळशाच्या खाणींबद्दलही प्रसिद्ध आहे. 

- उमरेड (नागपूर)


🔹४) राज्यातील मधुमक्षिकापालन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण .....

- महाबळेश्वर


🔸५) महाराष्ट्र पठारावरील ..... या सर्वांत मोठ्या डोंगररांगेने कृष्णा व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत.

- महादेव डोंगररांगा


🔸१) आणीबाणी जारी असता संसद लोकसभेचा कार्यकाल जास्तीत जास्त .... वाढवू शकते. 

- एक वर्ष


🔹२) संसदेच्या अधिवेशनासंदर्भातील घटनात्मक तरतुदी पाहता संसदेची वर्षातून किमान .... अधिवेशने होणे आवश्यक ठरते.

- दोन


🔸३) लोकसभेतील प्रत्येक राज्याची सदस्यसंख्या लोक संख्येच्या निकषावर निश्चित केलेली आहे. लोकसभेतील प्रत्येक राज्याची सध्याची संख्या निश्चित करताना .... या वर्षीची जनगणना आधारभूत धरण्यात आली आहे.

- १९७१


🔹४) कलम २८०(१) मधील तरतुदींनुसार .... हा अर्थ आयोगाची रचना करतो.

- राष्ट्रपती


🔸५) .... हे संसदेचे स्थायी सभागृह होय. ते कधीही विसर्जित होत नाही.

- राज्यसभा

जगभरातील सर्वात लांब, सर्वात मोठी, सर्वात उंच, सर्वात लहान



1. सौर मंडळामधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

उत्तर: बृहस्पति ग्रह


2. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?

 उत्तर: रशिया


3. लोकसंख्येनुसार सर्वात मोठा देश कोणता आहे?

उत्तर: चीन.


4. लोकसंख्येनुसार सर्वात मोठे शहर कोणते आहे?

उत्तर: टोकियो, जपान.


5. जगातील सर्वात मोठे विमान वाहक कोण आहे?

उत्तर: अँटोनोव्ह अन -225 / Antonov An-225


6. जगातील सर्वात मोठी बँक कोणती आहे?

 उत्तर: Industrial & Commercial Bank of China (ICBC) / आयसीबीसी, चीन


7. जगातील सर्वात मोठी सार्वजनिक कंपनी कोणती आहे?

उत्तर: आयसीबीसी, चीन.


8. जगातील सर्वात मोठे डिस्नेलँड कोणते आहे?

उत्तर: ऑरलँडो, फ्लोरिडा मधील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड रिसॉर्ट.


9. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?

उत्तर: अंटार्क्टिका, अंटार्क्टिका.


10. जगातील सर्वात मोठे इंग्रजी बोलणारे राष्ट्र कोणते आहे?

उत्तर: अमेरिका


11. जगातील सर्वात मोठे फुटबॉल (किंवा सॉकर) स्टेडियम कोणते आहे?

उत्तर: रुंगनाडो मे डे स्टेडियम, उत्तर कोरिया / Rungnado May Day Stadium, North Korea.


12. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे तलाव कोणते आहे?

उत्तर: लेक सुपीरियर, उत्तर अमेरिका.


13. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

उत्तर: आशिया / Asia


14. जगातील सर्वात मोठी हॉटेलची साखळी कोणती आहे?

उत्तर: इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल्स गट / Inter Continental Hotels Group.


15. क्षेत्रानुसार जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?

उत्तर: ग्रीनलँड, उत्तर अटलांटिक


16. जगातील सर्वात मोठे शॉपिंग मॉल कोणते आहे?

उत्तर: न्यू साउथ चायना मॉल.


17. जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?

उत्तर: ग्रीनलँड नॅशनल पार्क.


18. सर्वात मोठा अणुबॉम्ब कोणता आहे?

उत्तर: झार बोंबा / Tsar bomb


19. जगातील सर्वात मोठे महासागर कोणते आहे?

उत्तर: पॅसिफिक महासागर.


20. लोकांच्या संख्येने सर्वात मोठा धर्म कोणता आहे?

उत्तर: ख्रिश्चन

21. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

उत्तर: नाईल – करेगा.


22. जगातील सर्वात मोठे ज्वालामुखी कोणते आहे?

उत्तर: हवाईच्या बिग बेटावरील मौना लोआ.


23. जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय कोणते आहे?

उत्तर: ओमाहा, नेब्रास्का मधील हेनरी डोरली प्राणीसंग्रहालय.


24. जगातील सर्वात लांब माउंटन साखळी कोणती आहे?

उत्तर: अँडीज.


25. जगातील सर्वात लांब रेल्वे पूल कोणता आहे?

उत्तर: दानियांग-कुन्शन ग्रँड ब्रिज, चीन.


26. जगातील सर्वात लांब गुहा कोणती आहे?

उत्तर: अमेरिकेतील केंटकी, ब्राउनस्विलेजवळील, मॅमथ गुहा.


27. सर्वात लांब इंग्रजी शब्द कोणता आहे?

उत्तर: pneumonoultramicroscopicsilicovolcanoconiosis / न्यूमोनॉल्ट्रॅमिकोस्कोपिक्सिलिकोव्होलकेनोकोनिसिस – हा एक फुफ्फुसाचा रोग आहे – 45 अक्षरे


28. जगातील सर्वात लांब महामार्ग कोणता आहे?

उत्तर: ऑस्ट्रेलियाचा हायवे १.


29. सर्वात लांब प्राणी कोणता आहे?

उत्तर: Ocean Quahog


30. जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे?

उत्तर: बुर्ज खलिफा, दुबई


31. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?

उत्तर: माउंट एव्हरेस्ट.


32. जगातील सर्वात उंच लाईटहॉउस कोणते आहे?

उत्तर: जेद्दाह लाइट, जेद्दाह, सौदी अरेबिया – 436 फूट (133 मीटर)


33. जगातील सर्वात उंच कार्यालय इमारत कोणती आहे?

उत्तर: बुर्ज खलिफा, दुबई.


34. जगातील सर्वात उंच / सर्वात मोठे पिरॅमिड कोणते आहे?

उत्तर: गीझाचा ग्रेट पिरॅमिड (ज्याला खुफूचा पिरॅमिड किंवा चॉप्सचा पिरॅमिड देखील म्हणतात).


35. जगातील सर्वात उंच झाड कोणते आहे?

उत्तर: जगातील सर्वात उंच वृक्ष म्हणजे कोस्ट रेडवुड, 115.72 मीटर (379.7 फूट) उंच.



हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2022 (24व्या) :-


◆ स्थळ :- बीजिंग (चीन), 

◆ उद्घाटन स्थळ :- बीजींग नॅशनल स्टेडियम

◆ कालावधी :- 4 ते 20 फेब्रुवारी 2022 (17 दिवस)


➤ उद्घाटन सोहळ्यातील क्रीडाज्योत प्रज्वलन :-

1) डिनीजीर यीलामुजिआंग (चीन)

2) झाओ जिआवेन (चीन) 


उद्घाटन सोहळ्याची मुख्य संकल्पना :- "एक जग एक कुटुंब"


◆ शुभंकर :- बिंग डेवन (एक प्रकारचा पांडा)


➤ एकूण सहभागी देश :- 91

➤ घोषवाक्य :- "सामायिक भविष्यासाठी एकत्र".


➤ भारतातील सहभागी खेळाडू :- 1 (मोहम्मद आरिफ खान)


◆ या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला एकही पदक मिळाले नाही.


◆ उन्हाळी तसेच हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणारे बीजिंग हे पहिले शहर बनले. 


◆ हैती आणि सौदी अरेबिया हे देश हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धामध्ये पहिल्यांदाच सहभागी झाले.

कर्नाटकने बयंदूर येथे देशातील पहिल्या मरीनाची योजना आखली आहे.


◆ कर्नाटकातील किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी कर्नाटक सरकार देशातील पहिले मरीना किंवा डॉकेज देणारे बोट बेसिन, उडुपी जिल्ह्यातील बाइंदूर येथे बांधणार आहे. 


◆ किनारी भागात समुद्रकिनारा पर्यटन आणि तीर्थक्षेत्र पर्यटनासाठी कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) शिथिल करण्यासाठी सरकार केंद्राकडून परवानगी मागणार आहे. 


◆ सरकार पुरातत्व विभागाकडून गंगा, कदंब, राष्ट्रकूट, चालुक्य आणि होयसाळ या महान राजवंशांचा इतिहास संकलित करेल आणि राज्यातील पर्यटनाचा इतिहास विकसित करेल. यामुळे पर्यटनाचा विकास तर होईलच शिवाय लोकांना राज्याचा समृद्ध इतिहास समजण्यास मदत होईल.


➤ कर्नाटक राज्यासंबंधी :-


◆ राजधानी :- बेंगळुरू (कार्यकारी शाखा),

◆ राज्यपाल :- थावर चंद गहलोत,

◆ मुख्यमंत्री :- बसवराज बोम्मई.

कॅच द रेन 2023' मोहीम द्रौपदी मुर्मूने सुरू केली आहे.




🔹राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी असा दावा केला की अनियंत्रित शहरीकरणामुळे जलसंधारणाच्या पारंपारिक पद्धती देशात सोडल्या गेल्या आहेत.


🔸पाण्याची टंचाई आणि ग्लोबल वॉर्मिंग या समस्यांचे परिणाम आहेत यावर राष्ट्रपतींनी भर दिला.


🔹नवीन तंत्रज्ञानाचा वापर करूनही, जुनी जलसंधारण तंत्रे टिकवून ठेवणे आणि पुनर्संचयित करणे अत्यावश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.


🔸जलसंधारण आणि स्वच्छता यांमध्ये महिलांनी बजावलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन राष्ट्रपतींनी स्वच्छ भारत मिशनच्या अनेक श्रेणींमध्ये ग्रामीण, जल जीवन मिशन आणि राष्ट्रीय जल मिशनसह "स्वच्छ सुजल शक्ती सन्मान 2023" प्रदान केले.


-------------------------------------------------------

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...