Friday, 3 March 2023

सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे

* *१८२९ : सती बंदीचा कायदा
* *१८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.
* *१८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.
* *१८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना
* *१८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव
* *१८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.
* *१८९१ : विवाह संती वयाचा कायदा.
* *१८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.
* *१८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत
* *१९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.
* *१९०४ : अभिनव भारतची स्थापना*
* *१९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.
* *१९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.
* *१९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.
* *१९०६ : बारींद्रकुमार घोष-भूपेन्द्रनाथांचे युगांतर वृत्तपत्र.
* *१९०६ : गांधीजीचा द. आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध सत्याग्रह
* *१९०७ : भारतीय राष्ट्रीय सभेत फूट.
* *१९०८ : लो. टिळकांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा.
* *१९०९ : मोर्ले- मंटो सुधारणा.
* *१९०९ : नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून.
* १९१५ : होरूल लीगची चळवळ.
* *१९१५ : गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले.
* *१९१६ : लखनौ करार.
* *१९१७ : भारतमंत्री माँटेग्यू यांची घोषणा.
* *१९१९ : माँटफर्ड कायदा.
* *१९१९ : रौलट कायदा, जालियनवाला बागेतील हत्याकांड.
* *१९२० : नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीस मंजुरी.
* *१९२१ : ब्रिटनचे राजपुत्र भारतात आले.
* *१९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत हिंसा
* *१९२२: राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना.
* *१९२३ : झेंडा सत्याग्रह.
* *१९२४ : हदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनङ्कची स्थापना.
* *१९२७ : बार्डोली सत्याग्रह
* *१९२७ मार्च : महाड सत्याग्रह
* *१९२८ : हिन्दुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
* *१९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू  रिपोर्ट
* *१९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना.
* *१९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला.
* *१९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला.
* *१९३० एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.
* *१९३१ : गांधी-आयर्विन करार.
* *१९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन.
* *१९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले.
* *१९३१ : भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.
* *१९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
* *१९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित
* *१९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.
* *१९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार
* *१९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.
* *१९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट मंजूर.
* *१९३६ ऑगस्ट : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन
* *१९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.
* *१९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.
* *१९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.
* *१९३९ सप्टेंबर ३ : दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात.
* *१९३९ नोव्हेंबर १ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.
* *१९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना
* *१९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला.
* *१९४० ऑगस्ट १७ : वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात.
* *१९४० मार्च : राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन.
* *१९४० मार्च : क्रिप्स मिशन भारतात आले.
* *१९४२ ऑगस्ट ८ : भारत छोडो ठराव सम्मत
* *१९४३ ऑक्टोबर २१ : आझाद हिंद सरकार स्थापन.
* *१९४३ नोव्हेंबर : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.
* *१९४४ मे : आझाद हिन्द सेनेने ङ्कमॉवडॉकङ्क हे आसाममधील ठाणे जिंकले व भारतीय भूमीवर पाय ठेवला.
* *१९४५ ऑगस्ट १८ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू.
* *१९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक.
* *१९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना.
* *१९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
* *१९४६ मार्च १५ : लॉर्ड अ‍ॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.
* *१९४६ जुलै : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.
* *१९४६ ऑगस्ट १६ : बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना प्रत्यक्ष कृतिदिन पाळण्याचा आदेश.
* *१९४६ सप्टेंबर २ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार
* *१९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.
* *१९४६ फेब्रुवारी १८ : मुंबई येथील ङ्कतलवारङ्क या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.
* *१९४७ फेब्रुवारी २८ : पंतप्रधान अ‍ॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले.
* *१९४७ जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा.
* *१९४७ जुलै१८ः भारतीय स्वातंत्र्य कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सम्मत
* *१९४७ ऑगस्ट १५ : भारत स्वतंत्र झाला
* *१९४७ ऑक्टोबर २७ : भारतीय सेना काश्मीरकडे निघाली.
* *१९४८ फेब्रुवारी २० : जुनागड संस्थान भारतीय संघराज्यात
* *१९४८ सप्टेंबर १३ : हैद्राबादमधील पोलीस कारवाई सुरू.
* *१९४८ सप्टेंबर १७ : हैद्राबाद भारतीय संघराज्यात विलीन.
* *१९४८ : डॉ. राममनोहर लोहिया यांनी बंदी हुकूम मोडून मडगाव येथे भाषण केले. मोहन रानडे यांनी (गोवा) जनतेला पोर्तुगीज राजवटीविरुद्ध संघटित केले.
* *१९४९ जानेवारी १ : काश्मीरमध्ये युद्धबंदी लागू.
* *१९४९ नोव्हेंबर २६ : घटना समिती- संविधान स्वीकृत
* *१९५० जानेवारी २६ : भारतीय संविधानाची अंलबजावणी
* १९५४ : आझाद गोंतक दलाने दादरा-नगरहवेलीचा प्रदेश मुक्त केला.
* *१९५५ : गोव्यात सत्याग्रह सुरू
* *१९५६ ऑक्टोबर १४ : डॉ. आंबेडकर-बौद्ध धर्माचा स्वीकार.
* *१९६१ डिसेंबर १९ : भारतीय सेनेने गोव्यात प्रवेश करून गोवा काबीज केला. गोवा स्वतंत्र भारतात विलीन.

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे


१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर


२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी


३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी


४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल


५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट


६) यंग इंडिया - महात्मा गांधी


७) इंडियन मिरर - डी. डी. सेन


८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो


९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी


१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू


११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू


१२) अल-हिलाल - मौलाना आझाद


१३) अल-बलाघ - मौलाना आझाद


१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट


१५) भारतमाता - अजित सिंग


१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर


१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद


१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर


१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय


२०) गंभीर इशारा - वि. दा. सावरकर


२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन रॉय


२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता


२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी


२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय


२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा


२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल


२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा


२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार 


२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार 


३०) गदर - लाला हरदयाल


३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय


३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय


३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद


३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर


३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल


३६) किर्ती - संतोषसिह


३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त


३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन


३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस


४०) इंडिया - सुब्रण्यम भारती


४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी


४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र


४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली


४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास


४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल


४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या


४७) मुंबई समाचार - फरदुनजी 


४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय


४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय


५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान


५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)


५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)


५३) वंदे मातरम् - अरविंद घोष (कोलकता)


५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)


५५) वंदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)


५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)


५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष


५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय


५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष


६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू


६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे



६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)


६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर 


६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर 


६५) जनता - डाॅ. आंबेडकर 


६६) केसरी - लोकमान्य टिळक 


६७) मराठा - लोकमान्य टिळक 


६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलू


६९) शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर 


७०) प्रभाकर - भाऊ महाजन 


७१) धुमकेतू - भाऊ महाजन 


७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन 


७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर 


७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर 


७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर


७६) हरिजन - महात्मा गांधी.


कर्मवीर भाऊराव पाटील



बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे आधुनिक भगीरथ आणि वटवृक्ष-रूप धारण केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक!

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहीरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.


पुढील काळात ते सातार्‍यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मद्वान्नामास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदी मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातीधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.


दिनांक ४ ऑक्टोबर, १९१९ रोजी कर्मवीरांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. संस्थेची काही उद्दिष्टे होती -

मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना शक्यतो मोफत शिक्षण देणे.
निरनिराळ्या जातीधर्मातील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.
संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.
सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान, उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल, तेव्हा संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी आयुष्यभर अमाप कष्ट केले. केवळ क्रमिक शिक्षण नव्हे तर, समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.


सातार्‍यात त्यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांना आपल्या पत्नीचे दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. १६ जून, १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली सातार्‍यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.


भाऊरावांनी देशातलं ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वानुसार चालणारे पहिले ‘फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. १९४७ साली कर्मवीरांनी सातार्‍यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर १९५४ साली कर्‍हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली.  शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची वानवा पडू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावानं ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे कर्मवीरांच्या डोळ्यासामेर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.


१९५९ साली त्यांना पुणे विद्यापीठाकडून ‘डी.लिट्’ पदवी बहाल करण्यात आली. भारत सरकारनेही ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला. श्री. ह. रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृती भवन - यांच्या माध्यमातून कर्मवीरांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या -शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणार्‍या- आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, १९५९ रोजी मालवली.

महाराष्ट्र पोलिस भरती-प्रश्नमंजुषा

Online Test Series

MPSC च्या अभ्यासावरती मी अजून कोणत्या परीक्षा देऊ शकतो?

  दिवसेंदिवस MPSC स्पर्धा परीक्षा क्षेत्र आव्हानात्मक बनत चालले असून विद्यार्थी आयुष्याची 5-10 वर्ष फक्त MPSC चाच अभ्यास करत असतात.

माहितीचा अभाव आणि अनाठायी भीती यामुळे विद्यार्थी इतर स्पर्धा परीक्षांचा विचार करताना दिसत नाहीत.( मी पण )

तर आज आपण MPSC चाच अभ्यास ( चांगला अभ्यास असलेला विद्यार्थी )इतर परीक्षासाठी कसा उपयोगी ठरु शकतो अशा 2 परीक्षा विचारात घेऊ.

या दोनही परीक्षेच्या अंतिम टप्प्यापर्यंत मी पोहचलो असल्याने त्याविषयी विस्तृत माहिती घेऊ.

1)UPSC CDS- 
                   
-वयोमर्यादा -19-25

-प्रत्येक वर्षी वर्षातून दोनदा UPSC ही परीक्षा Indian Army, Navy आणि Airforce यामध्ये उच्चपदस्थ अधिकारी निवडण्यासाठी ही परीक्षा होते. (जर तुम्ही वयाच्या 21-22 वर्षी Select झालात तर तुम्ही या तिन्ही दलातील सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकता.)
-या परीक्षेचे 2 टप्पे असतात. 
 
पहिला टप्पा MPSC सारखाच Objective व MPSC चाच 90% अभ्यासक्रम असतो. (अभ्यासक्रम Website वरती Check करा.)

- दुसरा टप्पा आपल्या MPSC मुलाखत सारखा असतो. पण त्यामध्ये 3-4 दिवस जवळजवळ 25-30 Obstacles पार करावे लागतात. हा टप्पा सर्वात आव्हानात्मक असतो. व्यक्तिमत्वची सर्वांगीण तपासणी केली जाते.

  त्यामुळे, Defence Forces मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढवण्यासाठी जास्तीत जास्त तरुण विद्यार्थ्यांनी या परीक्षाचा नक्की विचार करावा.

2. UPSC CAPF-

-वयोमर्यादा -19-25(OBC+ALL NT-28 Yrs, SC&ST- 30 Yrs)

- दरवर्षी UPSC भारताच्या PARAMILITARY Forces मध्ये (CRPF,BSF, CISF, SSB, ITBP) Assistant Commandent(Central Dysp)पदासाठी परीक्षा घेते.

-  परीक्षेचे तीन टप्पे असतात.

पहिला टप्पा - यामध्ये 2 Papers असतात.
यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 चा Syllabus असलेला एक 250 Marks चा पेपर असतो व दुसरा पेपर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक पेपर सारखा 200 Marks cha असतो.

- दुसरा टप्पा -

Physical आणि Medical(विशेष तयारीची गरज नसते )

तिसरा टप्पा -

मुलाखत -150 marks.
  UPSC द्वारा उमेदवाराची पदासाठी असलेली योग्यता तपासण्यासाठी 150 Marks ची मुलाखत असते.

        तर मित्रांनो, माझे बरेच मित्र जे राज्यसेवा / Combine मध्ये अपयशी ठरलेले (पण आशा न हरलेले )आज CDS/CAPF मध्ये चांगल्या पदावर काम करत आहेत.
     
जर MPSC मध्ये वारंवार अपयश येत असेल तर या परीक्षांना कठीण न मानता(न लाजता)आपणदेखील या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी या परीक्षांना Seriously घ्यायला हवे.

-टीप-
-UPSC CAPF 2021 form भरण्याची शेवटची तारीख 10 May 2022 आहे.

- CDS ची पुढची जाहिरात May -2022 मध्ये येणार आहे.

या परीक्षाची माहिती जास्तीतजास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ही पोस्ट share करा.

महाराष्ट्र भूगोल


❣महाराष्ट्र स्थान, विस्तार, सीमा आणि प्रादेशिक/ राजकीय भूगोल
(२ मार्क - Combine २०२3)❣

महाराष्ट्र स्थान आणि विस्तार

१. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आणि त्यातील फरक पाठच करणे.( रेखावृतीय विस्तार मधील फरक  (8°14') या वरती प्रश्न येणे बाकी)

२.महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी

३.महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी (या वरती प्रश्न येणे बकी आहे)

४.महाराष्ट्राचे क्षेत्रफळ

५.महाराष्ट्राच्या इतर राज्यांशी असलेल्या सीमा
-MH ची सीमा सर्वाधिक किंवा सर्वात कमी कोणत्या राज्यांना लागून आहे.
-इतर राज्यांच्या सीमेलगत असणारे जिल्हे -दोन राज्यांची सीमा करणारी जिल्हे.

६.महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग
-विभागांचा क्षेत्रफळ,लोकसंख्या, तालुके जिल्हा नुसार क्रम (प्रश्न येणे बाकी आहे)

७.सर्वाधिक जिल्हे असणारा विभाग

८. सर्वात कमी जिल्हे असणारा
विभाग(प्रश्न येणे बाकी आहे)

९. सर्वाधिक तालुके असणारा विभाग

१०.सर्वात कमी तालुके असणारा विभाग(प्रश्न येणे बाकी आहे)

११.विभागांच्या नकाशाचा अभ्यास आणि त्यांचे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर बाजूचे तालुके (new trend-२०१९ पासून)

१२.एका जिल्ह्याच्या सीमा इतर जिल्ह्यांशी लागून आसणे व त्यांचे नकाशे

१३.जिल्हा निर्मिती

१४.जिल्ह्याचा क्षेत्रफळानुसार क्रम(सर्वात मोठा/सर्वात लहान)(१ ते ३ पाठ करा)

१५.सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे

१६.सर्वाधिक कमी तालुके असणारे जिल्हे(प्रश्न येणे बाकी)

(येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेत-२ मार्क वरील एका टॉपिक मधून असतील)..

Opposite words



absent × present

accept × decline, refuse

accurate × inaccurate

admit × deny

advantage × disadvantage

agree × disagree

alive × dead

all × none, nothing

always × never

ancient × modern

answer × question

apart × together

appear × disappear, vanish

approve × disapprove

arrive × depart

artificial × natural

ascend × descend

attractive × repulsive

awake × asleep

backward × forward

bad × good

beautiful × ugly

before × after

begin × end

below × above

bent × straight

best × worst

better × worse, worst

big × little, small

black × white

blame × praise

bless × curse

bitter × sweet

borrow × lend

bottom × top

boy × girl

brave × cowardly

build × destroy

bold × meek, timid

bound × free

bright × dim, dull

brighten × fade

broad × narrow

calm × windy, troubled

capable × incapable

careful × careless

cheap × expensive

cheerful × sad, discouraged, dreary

clear × cloudy, opaque

clever × stupid

clockwise × counterclockwise

close × far, distant

closed × open

cold × hot

combine × separate

come × go

comfort × discomfort

common × rare

contract × expand

cool × warm

correct × incorrect, wrong

courage × cowardice

create × destroy

crooked × straight

cruel × kind

compulsory × voluntary

courteous × discourteous, rude

dangerous × safe

dark × light

day × night

dead × alive

decline × accept, increase

decrease × increase

deep × shallow

definite × indefinite

demand × supply

despair × hope

disappear × appear

diseased × healthy

down × up

downwards × upwards

dry × moist, wet

dull × bright, shiny

early × late

east × west

easy × hard, difficult

empty × full

encourage × discourage

end × begin, start

enter × exit

even × odd

export × import

external × internal

fade × brighten

fail × succeed

false × true

famous × unknown

far × near

fast × slow

fat × thin

few × many

find × lose

first × last

foolish × wise

fold × unfold

forget × remember

found × lost

friend × enemy

generous × stingy

gentle × rough

get × give

girl × boy

glad × sad, sorry

gloomy × cheerful

good × bad

great × tiny, small, unimportant

guest × host

guilty × innocent

happy × sad

hard × easy

hard × soft

harmful × harmless

hate × love

healthy × diseased, ill, sick

heaven × hell

heavy × light

here × there

high × low

hill × valley

horizontal × vertical

hot × cold

humble × proud

in × out

include × exclude

inhale × exhale

inner × outer

inside × outside

intelligent × stupid, unintelligent

interior × exterior

join × separate

junior × senior

knowledge × ignorance

known × unknown

landlord × tenant

large × small

last × first

laugh × cry

lawful × illegal

leader × follower

left × right

less × more

like × dislike, hate

limited – boundless

little × big

long × short

loose × tight

loss × win

loud × quiet

low × high

major × minor

many × few

mature × immature

maximum × minimum

melt × freeze

narrow × wide

near × far, distant

never × always

new × old

no × yes

noisy × quiet

none × some

north × south

odd × even

offer × refuse

old × young

on × off

open × closed, shut

opposite × same, similar

out × in

over × under

past × present

peace × war

permanent × temporary

plural × singular

polite × rude, impolite

possible × impossible

powerful × weak

pretty × ugly

private × public

pure × impure, contaminated

push × pull

qualified × unqualified

quiet × loud, noisy

raise × lower

rapid × slow

rare × common

regular × irregular

real × fake

rich × poor

right × left, wrong

rough × smooth

safe × unsafe

secure × insecure

scatter × collect

separate × join, together

shallow × deep

shrink × grow

sick × healthy, ill

simple × complex, hard

singular × plural

sink × float

slim × fat, thick

sorrow × joy

start – finish

strong × weak

success × failure

sunny × cloudy

डोळा




♦️शरीराचा एक अवयव.पाच इंद्रीयांपैकी एक आहे व आतिशय संवेदनशीलअवयवय असून त्याला प्रकाशाची जाणीव होते .

 डोळ्यांचा उपयोग वस्तूचे रंगरूप पहाण्यासाठी होतो.

 जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडतो तेव्हा त्यावरून प्रकाश परीवर्तीती होऊन आपल्या डोळ्यामध्ये पडतो त्यावेळी ती वस्तू आपल्याला दिसते.

 माणसाला दोन डोळे असतात. त्यामुळे आपल्याला खोलीची जाणीव होते. निसर्गाने माणसाचे डोळे आपल्या कवटीच्या खोबणीत बसवले आहेत.त्यामुळे ते आकस्मिक आघातापासून बऱ्यापैकी सुरक्षित असता डोळा हा खूप महत्वाचा अवयव आहे, कारण डोळे नसले तर आपण काहीच पाहु शकणार नाही व त्याचे अनुभव सुध्दा घेऊ शकत नाही.

तसेच डोळे हे खूप नाजूक असतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक असते.


🍂डोळ्यांचे रंग व वर्णन🍂

डोळे काळे, निळे, घारे, हिरवे व लाल रंगाचे असू शकतात. नेत्र हे तेजस्वी असतात. त्यांना कफ ह्या दोषापासून भीती असते. त्यामुळे डोळ्यांमध्ये सात दिवसातून एकदा तरी अंजन करावे.


नेत्र रोग :- आयुर्वेदामध्ये नेत्राचे विविध रोग ( संख्या: ७६) वर्णन केले आहे.

त्याचप्रमाणे त्यावरील उत्तम चिकित्सा देखील सांगितलेल्या आहेत. ( नेत्र तर्पण, सेक, इ.)


👁तम्ही ओळखता?👁

हानी किंवा दृश्यमान प्रणाली कोणत्याही भाग खराबी आढळली व्हिज्युअल काम च्या लक्षणीय नुकसान होऊ शकते. उदाहरणार्थ, प्रकाश प्रसारित सहभागी संरचना कोणत्याही तर, डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा, छात्र, डोळ्यांचे लेन्स, पाण्यासारखा विनोदी आणि काचेचा विनोदी किंवा अगदी डोळयातील पडदा जसे विद्युत प्रेरणा करण्यासाठी प्रकाशाच्या रूपांतरण जबाबदार आहे, किंवा प्रसारित डोळयासंबधीचा मज्जातंतू जसे मेंदूच्या या impulses, नुकसान होऊ शकते, ते आपण मंद प्रकाश एक रूममध्ये तेजस्वी प्रकाश पासून दाखल करा काही काळ वस्तू स्पष्टपणे पाहण्यास सक्षम नाहीत व्हिज्युअल impairment.You अनुभवल्या आहेत, कदाचित होईल. कधीतरी नंतर, तथापि, आपण मंद-लिटर खोलीत गोष्टी पाहण्यास सक्षम असू शकते. एक डोळ्याची छात्र ज्यांचे आकार बुबुळ मदतीने निरनिराळया प्रकारचे येऊ शकते परिवर्तनशील एपर्चर सारख्या क्रिया करतो. प्रकाश अतिशय हुशार आहे, तेव्हा बुबुळ डोळा दाखल करण्यास कमी प्रकाश परवानगी देण्यासाठी छात्र करार. तथापि, मंद प्रकाश मध्ये बुबुळ छात्र डोळा दाखल करण्यास अधिक प्रकाश परवानगी देण्यासाठी विस्तृत. त्यामुळे छात्र बुबुळ च्या विश्रांती माध्यमातून पूर्णपणे उघडते.


तुम्ही ओळखता?

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

का आम्ही दृष्टी दोन डोळे आहेत आणि फक्त एक नाही?


♦️आमच्या येत दोन डोळे ऐवजी एक अनेक फायदे आहेत. तो पहा एक विस्तीर्ण क्षेत्रात देते. मानवी सर्वांगीण एक डोळा आणि दोन डोळे असलेल्या सुमारे 180 ° 150 ° बद्दल च्या पहा एक आडव्या फील्ड आहे. कमजोर वस्तू शोधण्यात क्षमता, नक्कीच, त्याऐवजी एक दोन डिटेक्टर सह उन्नत केला आहे.

♦️काही प्राणी, सहसा भक्ष्य प्राणी, दृश्याचे widest शक्य फील्ड देण्यासाठी त्यांच्या डोक्यांवर विरुद्ध बाजूंच्या केले त्यांचे दोन डोळे. पण आमच्या दोन डोळे आमच्या डोक्यावर समोर वर केले, आणि अशा प्रकारे stereopsis म्हणतात काय नावे पहा आमच्या क्षेत्रात कमी आहेत.

♦️ एक डोळा बंद होतात आणि जग सपाट दिसते - द्विमितीय. दोन्ही डोळे उघडे ठेवा आणि जागतिक खोली तिसऱ्या आकारमान वर घेते. आमच्या डोळे काही सेंटीमीटर विभक्त केले कारण, प्रत्येक डोळा एक वेगळी प्रतिमा पाहता येत नाहीत.

♦️आमच्या मेंदू गोष्टी किती जवळचे किंवा लांब दूर आम्हाला सांगण्यासाठी अतिरिक्त माहितीचा वापर करून, एक दोन प्रतिमा combines.

⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️


♦️दष्टी होणे दोष आणि त्यांची सुधारणा♦️

कधी कधी डोळा हळूहळू निवास त्याच्या शक्ती गमवाल. अशा परिस्थितीमध्ये, व्यक्ती distinctly आणि आरामात वस्तू पाहू शकत नाही. दृष्टी डोळ्याची refractive दोष संपुष्टात धूसर होते.

दृष्टी तीन सामान्य refractive दोष प्रामुख्याने आहेत. या (मी) लघुदृष्टिदोष किंवा जवळ-sightedness, (II) दूरदृष्टिता किंवा farsightedness, (iii) नेत्रमण्याची समायोजन शक्ती नष्ट झाल्याने वृद्धापकाळात येणारे दृष्टिमांघ आहेत. हे दोष योग्य गोलाच्या आकाराचा (गोलाकार) लेन्सच्या वापर करून दुरुस्त करता येते. आम्ही हे दोष आणि त्यांचे सुधारणा खाली चर्चा.


🌺🌺लघुदृष्टिता🌺🌺

दृष्टी असलेला डोळ्यात, एक distant ऑब्जेक्ट प्रतिमा डोळयातील पडदा [अंजीर समोर तयार होतो. 2 (ब)] आणि नाही डोळयातील पडदा स्वतः वाजता. हा दोष (मला) जास्त डोळा लेन्स च्या वक्रीभवन, किंवा बुबुळ च्या (II) विस्तार मुळे उद्भवू शकतात. ही उणीव योग्य शक्ती एक अंतर्गोल लेन्स वापरून दुरुस्त करता येते. या अंजीर मध्ये illustrated आहे. 2 (क). योग्य शक्ती एक अंतर्गोल लेन्स डोळयातील पडदा वर परत प्रतिमा येईल आणि अशा प्रकारे दोष दुरुस्त आहे.

♦️♦️दरदृष्टिता♦️♦️

दूरदृष्टिता देखील दूरगामी sightedness म्हणून ओळखले जाते. दूरदृष्टिता असणारा व्यक्ती स्पष्टपणे distant वस्तू पाहू शकता परंतु distinctly जवळील वस्तू पाहू शकत नाही. जवळ बिंदू, व्यक्ती साठी, कवडी किंमतीची वस्तू दूर सामान्य जवळ बिंदू (25 सें.मी.) पासून आहे. अशी व्यक्ती खूपच आरामदायक वाचन साठी डोळा पासून 25 सें.मी. पलीकडे एक वाचनाचे साहित्य ठेवणे. अंजीर मध्ये दर्शविल्याप्रमाणे एक closeby ऑब्जेक्ट पासून प्रकाश किरण डोळयातील पडदा मागे एका वेळी focussed कारण हे आहे. 3 (ब). (मी) डोळा लेन्स च्या फोकल लांबी खूप लांब आहे, किंवा (ब) बुबुळ खूप लहान आहे कारण हा दोष एकतर अ. ही उणीव योग्य शक्ती एक बहिर्वक्र लेन्स वापरून दुरुस्त करता येते. या अंजीर मध्ये illustrated आहे. 3 (क). मिळणारा लेन्सच्या सह डोळे ग्लासेस डोळयातील पडदा वर प्रतिमा लागत आवश्यक अतिरिक्त केंद्रीकरण शक्ती प्रदान.

संयुक्त गट - ब जाहिरातीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा

● जाहिरात पडताच बऱ्याच विध्यार्थी मित्रांच्या चर्चा रंगल्या आहेत.

● काही विध्यार्थी मित्रांचा मनात आनंद आहे की ऍड पडली व काही विध्यार्थी चिंतेत आहेत की कोणत्या परिक्षेवर फोकस करायचा....

● या पोस्ट साठी एवढ्या जागा पडल्या, त्या पोस्ट साठी तेवढ्या जागा पडल्या.....

● या वेळेला या पोस्टचा कमी जागा पडल्या, त्या पोस्ट साठी जास्त जागा आहेत....

● राज्यसेवाची तयारी करायची का Combine ची तयारी करायची....

● यावेळेस पेपर सोपा असेल का अवघड... कोणत्या Subject ला जास्त लक्ष दिले जावे....

❇️ या सर्वा प्रश्नचे किंवा चिंतेचे खूप सोपे उत्तरे आहेत...

❌ सर्वात पहिले जाहिराती बद्दल चिंता करणे सोडा....

✅ जाहिरातीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा...

❌ कोणत्या पोस्ट साठी किती जागा आहेत याचा विचार करणे सोडा...

🥳 असा विचार करा की, कमीत कमी MPSC जागा तर काढत आहे, महापोर्टल प्रमाणे भ्रष्टाचार तर नाही करत....

🧐 काही आगावू विध्यार्थी दुसऱ्यास भेडवण्यासाठी, तुम्हास अभ्यासापासून दूर करत असतात.... हे समजून घ्या.... (आगावू विद्यार्थी स्वतः अभ्यास करतात व इतरांना अभ्यासापासून दूर ठेवतात)

⏰ अभ्यासाचे वेळापत्रक बनवा व प्रामाणिक पणे अभ्यास करा ( प्रामाणिक हे स्वतः शी असले पाहिजे)

😎 स्मार्ट प्रकारे अभ्यास करा, जेणेकरून तुम्ही इतरांपेक्षा लवकर पोस्ट काढू शकाल ( शॉर्ट ट्रिक्स प्रमाणे अभ्यास केल्यास लवकर यश मिळेल)

♻️ राज्यसेवा व combine चे काही subject समान आहेत त्यामुळे तुम्ही दोन्ही परीक्षा वेवस्थित रित्या उत्तीर्ण होऊ शकतात....

🎁 सर्वात महत्त्वाचे :- 800 जागा आहेत का 900 या कडे लक्ष न देता, "यातील एक जागा फिक्स माझी आहे...!" असा दृष्टिकोन ठेवा....

१८५७ च्या उठावाची ठिकाणे



* दिल्ली - मीरत पासून दिल्ली ३० मैल अंतरावर आहे. ते अंतर काटून बंडवाले शिपाई दुसऱ्या दिवशी दिल्लीस आले. बहादुरशहा यास सिंहासनावर बसवून त्याची राजवट सुरु झाल्याची घोषणा त्यांना करावयाची होती. बादशहा हा नावाचाच बादशहा बनला होता. २४ तासात दिल्ली बंडवाल्यांच्या हाती आली. कालपर्यंत गुलाम असलेला बहादुरशहा त्यांनी हिंदूस्थानचा सम्राट बनवला. वास्तविक उत्तर हिंदुस्तानातील वेळची इंग्रजांची अवस्था मोठी नाजूक होती. परंतु इंग्रजांनी पंजाब वगैरे प्रदेशातून दिल्ली कडे फौजा गोळा केल्या. दिल्ली म्हणजे हिंदुस्तानची पूर्वापारची राजधानी आणि ती आपण काबीज केली. असा इंग्रजांचा अंदाज होता.


* प्रसिद्ध इतिहासकार थॉमसन व गरेट म्हणतात ' बंडाचा प्रारंभ तर यशस्वी झाला, पण उत्तर हिंदुस्तानातील इंग्रजांच्या नाजूक अवस्थेचा फायदा उठवणारा एकही कार्यक्षम नेता बंडवाल्याजवळ नव्हता हे लवकरच स्पष्ट झाले. १५ सप्टेंबर १८५७ रोजी इंग्रज व बंडवाले यांच्यातील लढाईस तोंड फुटले. बंडवाल्यांनी इंग्रजी फौजांशी १० दिवस घेतले.


* कानपूर - कानपूर शहराचा विकास कंपनीच्या कारकिर्दीत झाला होता. कानपूर येथे इंग्रजी कंपनीच्या छावण्या असत. जवळच ब्राम्हवर्त येथे मराठ्यांचा पदच्युत पेशवा दुसरा बाजीराव याचे निवासस्थान होते. मृत्यूपूर्वी त्याने धोंडोपंत उर्फ नानासाहेब याला दत्तक घेतले. पण बाजीरावानंतर त्यास मिळणारा आठ लाखाचा तनखा, छोटी जहागीर, व पदव्या नानासाहेबास बहाल करण्यास इंग्रजी राज्यकर्त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे नानासाहेबाच्या हृदयात सुडाच्या अग्नी धुमसत होत्या पण इंग्रजांच्या सामर्थ्यापुढे तूर्त त्याने नमते घेतले होते. आता सूड उगवण्याची आयती संधी चालून आली होती.


* १ जुलै रोजी नानासाहेब पेशवा बनल्याचा व कंपनी राज्य नष्ट झाल्याचा जाहीरनामा काढण्यात आला. परंतु कानपूर हातातून गेल्याचे कळताच इंग्रजांनी तिकडे फौजा पाठविल्या होत्या. आणि या फौजांचा पराभव केल्याशिवाय नानासाहेबाची कानपूरमधील नवी राजवट सुरक्षित राहणार नव्हती. इंग्रज फौजा कानपुरावर नवी राजवट सुरक्षित राहणार नव्हती. इंग्रज फौजा कानपूरावर येण्यापुर्वीच नानासाहेबाने फौजेनिशी कूच करून त्याच्याशी लढाई दिली. पण नानासाहेब यांचा पराभव झाला.


* पुढे सैन्याची जमवाजमव करून नानासाहेब व त्याचा सेनापती तात्या टोपे यांनी कानपुरवर चाल केली व पुन्हा ताब्यात घेतले. त्यानंतर ६ डिसेंबर १८५७ ला पळ काढावा लागला.


१८५७ च्या उठावाचे परिणाम 


* कंपनीची राजवट बरखास्त झाली : स १८५७ चा कायदा - रेग्युलेटिंग अक्ट हा कायदा इंग्लिश पार्लमेंटने पास केल्यापासून सरकारचे कंपनीच्या कारभारावरील कंपनीच्या कारभारावरील नियंत्रण वाढतच गेले होते.सरकारने १८५७ साली खास कायदा मंजूर करून कंपनीची राजवट बरखास्त केली व तेथून पुढे हिंदुस्तानात इंग्लंडच्या राणीची राजवट सुरु झाल्याचे घोषित करण्यात आला. कंपनीचे सर्व भूदल व आरमार राणी सरकारकडे घेण्यात आले. राणीच्या वतीने हिंदुस्तानचा व्हाईसराय हा हिंदुस्तान सरकारचा कारभार पाहणार होता. पूर्वीची बोर्ड ऑफ कंट्रोल व बोर्ड ऑफ डायरेक्टर हि मंडळे बरखास्त करून त्यांच्या जागी भारत मंत्री आणि त्यांचे मंडळ [ The secretary of state in council ] हा भारतमंत्री पार्लमेंटचा व ब्रिटीश मंत्रिमंडळाचा सभासद असे.


* राणीचा जाहीरनामा : राज्यकर्त्यांचे उदार धोरण - १८५७ च्या उठवातून इंग्रज राज्यकर्त्यांनी अनेक धडे घेतले. हिंदुस्तानातील असंतोषाची तीव्र जाणीव त्यांना उठावाने झाली. त्यामुळे त्यांनी हिंदुस्तान विषयक आपले धोरण बदलले. हे  धोरण १ नोव्हेंबर १८५८ रोजी अलाहाबाद येथे दरबार भरवून व तेथे दरबार भरवून व तेथे राणीचा जाहीरनामा घोषित करून स्पस्ष्ट केले. राणीचा जाहीरनामा असा - [ आम्ही आता राज्यवृद्धीच्या उद्योगाला हात घालणार नाही, देशी संस्थानिकांचे हक्क, मानमरातब आणि प्रतिष्ठा यांचा आमच्याप्रमाणे मान राखू, त्यांनी व आमच्या प्रजेने समृद्धीत राहावे अशीच आमची इच्छा आहे. अंतर्गत शांतता व चांगले सरकार यामुळेच हिंदुस्तानात सामाजिक प्रगती घडून येईल. तसेच आम्ही जाहीर करतो की, देशी संस्थानिकांचे कंपनीशी जे करारदार झाले असतील ते येथून आम्ही पाळू. संस्थानिकांना आपल्या इच्छेनुसार दत्तक घेता येईल. त्यांची राज्ये विलीन केली जाणार नाहीत. धर्मासाठी कोणावर कृपा व अन्याय केला जाणार नाही. सरकार धर्माच्या बाबतीत ढवळाढवळ करणार नाही. सरकारी नोकऱ्या लायकी पाहून दिल्या जातील. धर्म, वर्ग, किंवा जात त्यांच्या मार्गात येणार नाहीत.


* हिंदी लष्कराची पुनरचना करण्यात आली - १८५७ चा उठाव प्रथम हिंदी लष्करात झाला, त्यामुळे इंग्रजांनी या लष्कराची पुनरचना करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले.


* संस्थानांसंबंधीच्या आक्रमक धोरणाचा त्याग


* इंग्रजांचे सामाजिक सुधारनासंबंधीचे धोरण बदलले


* इंग्रजी राजवटीबद्दल दहशत व तिरस्कार


 * उठवपासून हिंदी लोकांनी घेतलेला धडा


* हिंदू मुसलमानमधील दरी वाढत गेली


* हिंदूस्थानचे परराष्ट्रीय धोरण इंग्लंडशी बद्ध झाले


* इंग्रजांची हिंदुस्तानवरील पकड घट्ट झाली


44वी घटनादुरुस्ती 1978


1)  लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल (५ वर्षे) पुनर्स्थापित केला.


2) लोकसभा आणि राज्यविधिमंडळाच्या गंपूर्तीची तरतूद पुनर्स्थापित केली.


3) संसदीय विशेषाधिकाराबाबद ब्रिटिशांच्या सामान्य ग्रहाचा संदर्भ वगळण्यात आला.


4) संसद आणि राज्यविधिमंडळामध्ये चालणाऱ्या कार्यपध्द्तीचे खरे वार्तांकन वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यास घटनात्मक संरक्षण दिले.


5) मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ केवळ एकदा परत पाठविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला. परंतु पुनर्विचार करून दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला.


6) अध्यादेश काढण्यासाठी राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांच्या समाधानाची तरतूद रद्द केली.


7) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे काही अधिकार पुनर्स्थापित केले.


8) राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात ‘अंतर्गत अशांतता’ या शब्दा ऐवजी ‘सशस्त्र बंडाळी’ हा शब्द योजण्यात आला.


9) कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती ‘राष्ट्रीय आणीबाणी’ घोषित करू शकतात. अशी तरतूद केली.


10) राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवटीबाबत काही ठराविक प्रक्रियात्मक संरक्षण तरतुदी केल्या.


11) मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून रद्द केला आणि तो केवळ कायदेशीर हक्क केला.


12) कलम २० आणि कलम २१ अन्वये हमी दिलेले मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तहकूब करता येणार नाहीत.


13) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि लोकसभेचा सभापती यांच्या निवडणूकवादाबाबत न्यायालये निर्णय देऊ शकत नाहीत ही तरतूद वगळण्यात आली.

99 वी घटनादुरूस्ती :



ही सर्वात अलिकडील संमत झालेल्या घटनादुरूस्तींपैकी महत्वाची घटनादुरुस्ती आहे. (100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगलादेश यांच्यात भूभागांच्या आदानप्रदान संदर्भात आहे. तर GST चा उल्लेख असलेले 121 वे घटनादुरुस्ती विधेयक केवळ लोकसभेने संमत केलेले असल्याने अद्यापही विधेयक (प्रस्तावित घटनादुरुस्ती) या स्वरूपातच आहे.)


  वास्तविक पाहता हे 121वे घटनादुरूस्ती विधेयक होते. परंतु, काही विधेयके संमत न होता रद्द(Lapsed)होतात, पण संमत झालेली घटनादुरूस्ती ही क्रमाने पुढील क्रमांक धारण करते, म्हणून ही 99 वी घटनादुरूस्ती.


  राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली 31 डिसेंबर 2014 रोजी. मात्र कायदा अंमलात आला 13 एप्रिल 2015 पासून.

  ही घटनादुरूस्ती National Judicial Appointment Commission(NJAC) अर्थात राष्ट्रीय न्यायीक नियुक्ती कमिशन च्या संदर्भातील आहे.


  ह्या घटनादुरूस्ती द्वारा राज्यघटनेत 124अ, 124ब, 124क या तीन नवीन कलमांचा समावेश करण्यात आला, तर राज्यघटनेच्या कलम 127, 128, 217, 222, 224अ,231 या कलमांमध्ये दुरुस्ती करण्यात आली.

  ही घटनादुरूस्ती वास्तवात येण्यापूर्वी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील न्यायाधीशांच्या समितीकडून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूका, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूका तसेच बदल्यांबद्दल शिफारशी राष्ट्रपतींकडे केल्या जात व त्या आधारे निर्णय घेतला जाई. कार्यकारी मंडळाला त्यात स्थान नव्हते.मात्र आता घटनादुरूस्तीने हे अधिकार NJAC मिळाले आहेत.


  124अ या कलमात NJAC ची रचना (Composition) , 124ब या कलमात NJACची कार्ये (Functions) तर 124क मध्ये NJAC च्या कार्यपद्धती (Power of Parliament to make law on procedures) समावेश करण्यात आला आहे.

मार्गदर्शक तत्वांची उपयुक्ततता

📌डॉ. आंबेडकर - राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. घटनेचे आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये. ही तत्वे अमलात न आणणाऱ्या सरकारला न्यायालयांमध्ये नसला तरी जनतेच्या दरबारात जाब द्यावाच लागेल.


📌B.N. राव - राज्यसंस्थेच्या प्राधिकारांसाठी नैतिक तत्वे, त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.


.📌N.M. सिंघवी - घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतूदी.


📌M.C. छगला (माजी सरन्यायाधीश) - मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वी वरील स्वर्ग बनेल. त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.


📌M.C. सेटलवाड - न्यायालयास उपयुक्त beacon-light व प्रस्ताविकेचे विस्तारण करणारी तत्वे. 


📌ग्रॅनव्हिल ऑस्टिन - मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीद्वारे देशातील सामाजिक क्रांती ची उद्दिष्टे साध्य होतील.


📌ईवोर जेनिंग्ज - Pious aspiration.


📌अनंत नारायण - अ-वादयोग्य आणि अमूर्त.


📌 ग्लॅडहिल - "इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधायक सूचना.'


📌K.V.राव - “या मागील खरा हेतू भारताला पोलिस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनविण्याचा आहे."


🎯मार्गदर्शक तत्वांवरील टिका :


📌K.T. शहा - Pious Superfluities, बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक.


📌नसिरोद्दीन - नववर्षाचा निश्चय जो 2 जानेवारीला मोडला जातो.


📌T.T. कृष्णमाचारी - भावनांची खरी केराची टोपली.


📌K.C. व्हेअर - कंटाळवाणा नैतिक उपदेश, जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचन मानावयाचे ठरले तरीही

त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकिर्ती प्राप्त होईल.


📌K. संथानम - या तत्वांनी केंद्र विरुद्ध राज्य, राष्ट्रपती विरुद्ध पंतप्रधान, राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा घटनात्मक संघर्ष निर्माण केला.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...