Wednesday, 1 March 2023

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


📕 पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. – पाचावर धारण बसणे.

1) मनात संख्या मोजणे    

2) पंचप्राण धारण करणे    

3) खूप भयभीत होणे    

4) ऐसपैस बसणे


उत्तर :- 3

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📗 तिथी, वार, नक्षत्र, योग, करणा-या पाच घटकांनी युक्त अशा दिनी – वैशिष्टयांची माहिती असणारी पुस्तिका कोणती ?

1) पंचीकरण    

2) पंचांग      

3) पंचशील    

4) पंचीकृती


उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📕 पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता ?

1) मनस्थीती    

2) मनस्थिति:    

3) मन्हस्थिती    

4) मन:स्थिती


उत्तर :- 4

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📗 ट, ठ, ड, ढ, ण हे वर्ण ..................आहेत.

1) तालव्य    

2) अनुनासिक    

3) दन्त्य      

4) मूर्धन्य


उत्तर :- 4

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📕 ‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

1) पूर्वरूप संधी    

2) पररुप संधी    

3) व्यंजन संधी    

4) विसर्ग संधी


उत्तर :- 4

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📗 कुत्र्याने चावा घेतला ? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते ?

1) कुत्र्या    

2) कुत्रा      

3) कुत्र्याने    

4) कुत्र्याचा


उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📕 वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

1) चार      

2) पाच      

3) सहा      

4) सात


उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📗 पुढीलपैकी अव्ययसाधीत विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?

1) बोलकी बाहुली    

2) पुढची गल्ली    

3) कापड – दुकान    

4) माझे – पुस्तक


उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📕 वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ...................

1) क्रियापद    

2) धातू      

3) कर्म      

4) कर्ता


उत्तर :- 1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📗  खालील विधानातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा.


तो इतका मोठयाने बोलला, की त्याचा आवाज बसला.

1) उद्देशदर्शक    

2) कारणदर्शक    

3) रीतिदर्शक    

4) कालदर्शक


उत्तर :- 2


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Headlines Of The Day From The Hindu


• भारत अँग्रीकल्चर इनोव्हेशन मिशनमध्ये सामील झाला. 


•पिलग्रिमने त्याची पहिली ESOP योजना जाहीर केली.


• आसामच्या मुख्यमंत्र्यांनी नॉर्थ ईस्टच्या पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांटचे अनावरण केले


• 2022-23 मध्ये आउटबाउंड शिपमेंट USD 300 अब्ज पार करेल.


• वित्तीय वर्ष 2023 मध्ये आतापर्यंत एकूण रु. 5.5 ट्रिलियन थेट लाभ हस्तांतरित झाले आहेत.


•शैलेश पाठक यांची FICCI सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. 


•पेप्सीने रणवीर सिंगला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले


• जपान उत्तर प्रदेशमध्ये ₹7,200 कोटींची गुंतवणूक करणार आहे. 


•लिओनेल मेस्सीने पॅरिस सेंट जर्मेनच्या मार्सेलीवर 3-0 असा विजय मिळवत कारकिर्दीतील 700 वा क्लब गोल केला आहे.


•अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला 2022 चा सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.


•इंडिया टुडे टुरिझम सर्हेने सर्वोत्कृष्ट साहसी पर्यटन पुरस्कारासाठी जम्मू आणि काश्मीर पर्यटनाची निवड केली आहे.


•राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.


• संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती 26 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली.


• पाकिस्तान सरकारने IMF बेलआउटसाठी धोरणात्मक व्याजदर 200 bps ने वाढवले.

सयाजीराव खंडेराव गायकवाड


◾️स्मृतिदिन: 6 फेब्रुवारी 1939


◾️जन्म: 11 मार्च 1863 कौळाणे मालेगांव नाशिक


◾️1875 ते 1939 दरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते


◾️1893सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू, 1906 साली संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान देशातील पहिले राज्य ठरले


◾️औद्योगिक कलाशिक्षणासाठी ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली


◾️सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली


◾️भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते


◾️पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह सुधारणा अंमलात आणल्या घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच जारी केला


◾️लडनमधील पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही हजर होते. टिळक, अरविंद घोष नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता राष्ट्रीय आंदोलनाला अप्रत्यक्ष पाठिंबा


◾️"हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा" या शब्दांत त्यांचे वर्णन पं मदनमोहन मालवीय यांनी केले


Online Test Series

पोलीस भरती प्रश्नसंच

 ♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.

1) ६

२) ४

३) ५

४) ९

उत्तर :१


♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?

१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान

उत्तर : २



♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?

१) सांगली २) सातारा

३) रायगड ४) रत्नागिरी

उत्तर : ३


महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?

१) पुणे

२) अहमदनगर

3) औरंगावाद

४) लातूर

उतर : ३


पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.

1) नाशिक

2) पुणे

3) कोल्हापूर

4) सोतापूर

उतर:3



देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.

1) गगनबावडा

2) कुंडी

3) कोळंबा

4) वरंध

उतर: 2


महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.

1) विदर्भ

2) कोकण

3) मराठवाडा✅✅

4) नाशिक


महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?

1) भीमा

2) गोदावरी

3) क्रष्णा

4) वर्धा

उतर: २



भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)

1) 04

2) 03

3) 02✅✅

4) 05


भाषा म्हणजे काय?

1) बोलणे

2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅

3) लिहिणे

4) संभाषणाची कला


पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)

1) य्

2) र्

3) अ✅✅

4) व्


विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)

1) हातवारे

2) लिपी

3) भाषा✅✅

4) संवाद


खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) असहकार चळबळ-१९२४✅✅

२) सविनय कारदेभंग - १९३०

३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३

४) चलेजाब चळवळ -१९४२



गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने या साप्ताहिकातून लिखाण केले ?

१) दर्पण

२) सुधाकर

३) दिनमित्र

४) प्रभाकर✅✅


वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी

कोणाला मिळालेला नाही?

1) बॉब डीलन

2) बेंट होमस्ट्राम

3) जॉन बारडींग ✅✅

4) योशिमोरी ओसुरी


उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?

1) नामदेव ढसाळ

2) लक्ष्मण माने ✅✅

3) केशव मेश्राम

4 ) नरेंद्र जाध


मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?

1) शिवाजीराव भोसले

2) रणजित देसाई

3) विश्वास पाटिल

4)शिवाजी सावंत✅✅


खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) असहकार चळबळ-१९२४✅✅

२) सविनय कारदेभंग - १९३०

३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३

४) चलेजाब चळवळ -१९४२


वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी

कोणाला मिळालेला नाही?

1) बॉब डीलन

2) बेंट होमस्ट्राम

3) जॉन बारडींग ✅✅

4) योशिमोरी ओसुरी


71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे

प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.

1. अमेरिका

2. फ्रान्स

3. ब्राझील✅✅

4. ऑस्ट्रेलिया


♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?

1) इच

2) इंग्रज✅✅

3) पोर्तुगीज

4) फ्रेंच


♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?

1) अमेरिका

2) इंग्लंड✅✅

3) फ्रांन्स

4) रशिया


♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

1) सुषमा स्वराज✅✅

2) सुचेता कृपलानी

3) शिला दिक्षीत

4) मिरा कुमार


♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .

1) बेळगाव

2) फैजपूर✅✅

3) वर्धा

4) नागपूर


♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?


1) आसाम✅✅

2) अरूणालच प्रदेश

3) मध्यप्रदेश

4) उत्तराखंड


♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?

1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅

2) सिलिका व मॅग्नेशियम

3) सिलीका व फेरस

4) फेरस व निकेल


♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.

1) पाच

2) सात

3) सहा

4) आठ✅✅


♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?

1) विभागीय आयुक्त

2) महालेखापाल

3) वित्त लेखा अधिकारी

4) जिल्हाधिकारी✅✅


♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?

1) 11

2) 14✅✅

3) 9

4) 8


सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?

1) केशवचंद्र सेन

2) स्वामी दयानंद

3) अॅनी बेझंट✅✅

4)स्वामी विवेकानंद


मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?

1) अलिगड

2)ढाका✅✅

3) इस्लामाबाद

4)अलाहाबाद


सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता करण्यात आली होती?

1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅

2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन

करण्यासाठी.

3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या

सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.

4) वरीलपैकी कशासाठीही नाही.


महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?

1) पुणे

2)गोरखपुर

3) खेडा✅✅

4)सोलापुर

महालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती

· केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांचे हिशोब तपासण्यासाठी उद्देशाने भारतीय घटना कलम 148 ते 151 नुसार महालेखा परीक्षकाचे पद निर्माण केलेले आहे. 

· या महालेखापालाचे पद देखील महत्वाचे व जबाबदारीचे पद असते.



1. नेमणूक

· महालेखापरीक्षकाची नेमणूक देशाचे राष्ट्रपती करतात. 

· महालेखापरीक्षकाला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीसमोर विशिष्ट स्वरुपात शपथ घ्यावी लागत असते. 

· राष्ट्रपतीच्या मते अनुभवी व तज्ञ व्यक्तीचीच नेमणूक महालेखापालासाठी केली जाते.



2. कार्यकाल

· भारतीय राज्यघटनेत महालेखापालाचा तसा कार्यकाल ठरवून दिलेला नाही. 

· परंतु त्याचे निवृत्ती वय 65 वर्षे ठरवून दिलेले आहे. याचाच अर्थ असा की, महालेखापाल वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत आपल्या अधिकारपदावर कार्य करू शकते असे असले तरी महालेखापाल मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. 

· याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल तरच त्याच्यावर संसदेमध्ये महाभियोगाचा खटला चालवून राष्ट्रपती त्याला पदच्युत करू शकतात.



3. वेतन व भत्ते


· महालेखापालाला दरमहा रुपये 90,000/- वेतन प्राप्त होते. याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त त्याला निवासस्थान मोफत दिले जाते. 

· शासकीय कामासाठी देशीविदेशी प्रवास त्याला मोफत असतो. 

· एकदा निश्चित झालेले त्यांचे वेतन कोणीही कपात करू शकत नाही. परंतु आणीबाणी लागू केली तर मात्र त्याच्या वेतनात कपात केली जाते.

· महालेखापालाचे वेतन हे देशाच्या संचित निधीतून दिले जाते. 

· निवृत्त झाल्यांनंतर निवृत्तीवेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.



4. अधिकार व कार्ये


1. केंद्र सरकारच्या व घटक राज्य सरकारच्या जमाखर्चाचे हिशेब तपासणे.

2. केंद्र सरकारच्या व घटक राज्य सरकारच्या लेखा पुस्तकाच्या नोंदी कशा ठेवाव्यात हे ठरविणे.

3. शासनामार्फत खर्च होणार्‍या रकमा नियमानुसार खर्च होत आहे किंवा नाही हे पाहणे.

4. घटक राज्य सरकारच्या लेखा संबंधीचा अहवाल घटक राज्याच्या राज्यपालाला पाठविणे.

5. शासनाच्या वेगवेगळ्या महामंडळांचे हिशोब तपासणे.

6. राष्ट्रपतीचे आर्थिक बाबीसंबंधी माहिती मागविल्यास ती पुरविणे.

7. एखदया खात्याचा अनाठायी अथवा जास्तीचा खर्च झाला असेल तर तो वसूल करणे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका



🎯सवरूप -


जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते व जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते.प्रकार - जि.म.स. बँकेचे दोन प्रकार आहेत - शुद्ध सहकारी संघ (Co-Op. Banking Union) :- या प्रकारात जि.म.स. बँकेचे सदस्यत्व फक्त प्राथमिक सहकारी संस्थांनाच देण्यात येते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओरिसा आणि केरळ या राज्यांमध्ये असा प्रकार आहे.मिश्र मध्य. सहकारी बँका (Mixed Central Co-Op-erative Banks) :- या प्रकारच्या बँकेचे सदस्यत्व सहकारी संस्था तसेच, व्यक्तींना सुद्धा खुले असते. इतर सर्व राज्यातील जि.म.स. बँका या प्रकारच्या आहेत. 


🎯कार्ये -


जिल्हा मध्य. सह. बँकेचे प्राथमिक कार्य जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्जपुरावठा करणे हे आहे. मात्र काही कर्जे व्यक्तींना सुद्धा दिली जाऊ शकतात.नियमांनुसार, या बँका व्यापारी कारणांसाठी (Commercial Purposes) कर्जपुरवठा करीत नाही. मात्र सध्या (फेब्रुवारी 2010) 372 जि.म.सह. बँकांपैकी 75 बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.या बँका शहरी भागातून ठेवी गोळा करून त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. 


🎯भांडवल उभारणी -


स्वस्वामित्व निधी - यात सहकारी संस्थांनी पुरविलेले भागभांडवल व राखीव निधीचा समावेश होतो.ठेवी - सहकारी संस्था तसेच व्यक्तींच्या.कर्जे - शिखर बँक, इतर बँका यांकडून मिळालेली.प्राथमिक सह. संस्थांनी जिल्हा म.स. बँकेमध्ये ठेवलेला आपल्याकडील अतिरिक्त निधी. 


🎯विस्तार -


भारतात मार्च 2010 मध्ये 370 जि.म.स. बँका होत्या. त्यांच्या एकूण ठेवी त्यावेळी 1,27,600 कोटी रुपये इतक्या होत्या.महाराष्ट्रात मार्च 2010 अखेर 31 जि.म.स. बँका होत्या. त्यांचे सभासद एकूण 1,48,360 इतके होत्या, तर ठेवी 44,278 कोटी रुपये इतक्या होत्या.

मुद्रा बँक योजना



1.भारताची ओळख ‘तरुणांचा देश’ अशी आहे. देशामध्ये होतकरु, बुद्धिमान आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे लाखो तरुण आहेत. त्यांना रोजगार मिळावा यासाठी केंद्र सरकारने ‘स्कील इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ सारख्या योजनांची सुरूवात करण्यात आली आहे.


2.अनेकांना कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे एखादा लहान उद्योग/ व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी अनंत अडचणी येतात. मुख्य अडचण ही भांडवलाची असते. ती दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘मुद्रा बँक योजना’ आणली आहे.


3.कोणताही उद्योग, व्यापार आणि व्यवसाय उभारावयाचा असेल तर कमी व्याजदरामध्ये पतपुरवठा ही मुलभूत गरज आहे.


4.या सर्वांचा विचार करुन अशा तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून उद्योजक निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँक योजना (Micro Units Development and Refinance Agency) 8 एप्रिल 2015 रोजी कार्यान्वित केली.


5.योजनेसाठी 20 हजार कोटींचा निधी निश्चित करण्यात आला आहे तर तीन हजार कोटींचा क्रेडीट गॅरंटी निधी नव्या उद्योजकांना प्रोत्साहित करणारा ठरणार आहे.


6.या योजनेनुसार कुठल्याही प्रकारची तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार यांना कर्ज पुरवठा करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनाअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते.


7.बेरोजगारांना कर्ज पुरवठा करुन त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित केले जाते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या तरुणांना योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे.


8.योजनेंतर्गत कर्ज मिळण्यासाठी तीन गटातील वर्गीकरण :


शिशु गट

10,000 ते रु. 50,000

किशोर गट


50,000ते 5 लक्ष

तरुण गट


5 लक्ष ते 10 लक्ष


9.योजनेअंतर्गत संबंधित व्यक्तींना जिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीय बॅंका, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँक वित्तीय संस्था इत्यादीमार्फत कर्ज देणे अपेक्षित आहे.

10.यामध्ये सुतार, गवंडीकाम, कुंभार, शिंपी, धोबी, भाजीपाला व फळविक्रेते व्यावसायिक इ. लहान स्वरुपाचे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनादेखील कर्ज देण्याची तरतुद आहे. कर्जाचा व्याजदर केंद्र शासन वेळोवेळी ठरवेल त्याप्रमाणे राहणार आहे.

______________________________________

नरसिंघम समिती.



🅾️भारतीय अर्थव्यवस्थेच्या 1991 च्या आर्थिक संकटानंतर जून 1991 मध्ये समितीची स्थापना केली.

🅾️भारतीय अर्थव्यवस्थेच्या १९९१ च्या आर्थिक संकटाच्या नंतर, जून  1991  मध्ये नरसिंहम समिती किंवा वित्तीय क्षेत्रीय सुधार समितीची स्थापना एम. नरसिम्हाम यांच्या अध्यक्षतेखाली केली गेली , ज्याने डिसेंबर 1991 मध्ये आपल्या शिफारसी सादर केल्या. नरसिंहम समितीची स्थापना 1998 मध्ये दुसर्‍या वर्षी झाली.

🅾️नरसिंहम समितीच्या शिफारशींमुळे भारतातील बँकिंग क्षमता वाढविण्यात मदत झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी व्यापक स्वायत्ततेचा प्रस्ताव आहे. मोठ्या भारतीय बँकांच्या विलीनीकरणाची समितीने शिफारसही केली होती. त्याच समितीने नवीन खासगी बँका सुरू करण्याचे सुचविले, त्या आधारे सरकारने 1993 मध्ये परवानगी दिली. रिझर्व्हबँक ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली बँकेच्या मंडळाला राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त ठेवण्याचा सल्लाही नरसिंहम समितीला देण्यात आला.

💠💠1998  मध्ये स्थापन झालेल्या नरसिंहम समितीच्या मुख्य.💠💠

🧩शिफारसी खालीलप्रमाणेः

1. मजबूत व्यावसायिक बँकांचे मजबूत विलीनीकरण जास्तीत जास्त आर्थिक आणि व्यावसायिक वातावरण निर्माण करेल आणि उद्योगांच्या विकासास कारणीभूत ठरेल.

२. मजबूत व्यावसायिक बँक कमकुवत व्यावसायिक बँकांमध्ये विलीन होऊ नयेत.

🅾️The. देशातील मोठ्या बँकांना आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यात यावे.

🅾️2000. धोकादायक मालमत्तेचे भांडवलाचे गुणोत्तर २००० पर्यंत percent टक्के आणि २००२ पर्यंत दहा टक्क्यांपर्यंत खाली आणले पाहिजे.

🅾️Government. सरकारी सिक्युरिटीजद्वारे कव्हर केलेल्या अपुष्ट कर्जांना नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता समजले पाहिजे

🅾️2,. २,००,००० लाख रुपयांपेक्षा कमी कर्जावरील व्याज नियंत्रित करण्यासाठी बँकांना सक्षम केले पाहिजे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका.


🧩सवरूप -

🅾️जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते व जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते.प्रकार - जि.म.स. बँकेचे दोन प्रकार आहेत - शुद्ध सहकारी संघ (Co-Op. Banking Union) :- या प्रकारात जि.म.स. बँकेचे सदस्यत्व फक्त प्राथमिक सहकारी संस्थांनाच देण्यात येते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओरिसा आणि केरळ या राज्यांमध्ये असा प्रकार आहे.मिश्र मध्य. सहकारी बँका (Mixed Central Co-Op-erative Banks) :- या प्रकारच्या बँकेचे सदस्यत्व सहकारी संस्था तसेच, व्यक्तींना सुद्धा खुले असते. इतर सर्व राज्यातील जि.म.स. बँका या प्रकारच्या आहेत. 


🧩कार्ये -

🅾️जिल्हा मध्य. सह. बँकेचे प्राथमिक कार्य जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्जपुरावठा करणे हे आहे. मात्र काही कर्जे व्यक्तींना सुद्धा दिली जाऊ शकतात.नियमांनुसार, या बँका व्यापारी कारणांसाठी (Commercial Purposes) कर्जपुरवठा करीत नाही. मात्र सध्या (फेब्रुवारी 2010) 372 जि.म.सह. बँकांपैकी 75 बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.या बँका शहरी भागातून ठेवी गोळा करून त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. 


🧩भांडवल उभारणी -

🅾️सवस्वामित्व निधी - यात सहकारी संस्थांनी पुरविलेले भागभांडवल व राखीव निधीचा समावेश होतो.ठेवी - सहकारी संस्था तसेच व्यक्तींच्या.कर्जे - शिखर बँक, इतर बँका यांकडून मिळालेली.प्राथमिक सह. संस्थांनी जिल्हा म.स. बँकेमध्ये ठेवलेला आपल्याकडील अतिरिक्त निधी. 


🧩विस्तार -

🅾️भारतात मार्च 2010 मध्ये 370 जि.म.स. बँका होत्या. त्यांच्या एकूण ठेवी त्यावेळी 1,27,600 कोटी रुपये इतक्या होत्या.महाराष्ट्रात मार्च 2010 अखेर 31 जि.म.स. बँका होत्या. त्यांचे सभासद एकूण 1,48,360 इतके होत्या, तर ठेवी 44,278 कोटी रुपये इतक्या होत्या.


Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...