Thursday, 23 February 2023

Combine पूर्व 2023 साठी इथून पुढील दिवसातील Strategy काय असावी?

साधारणतः 65 दिवसांवरती आपली Combine पूर्व आहे. Group ब आणि Group C अशा मिळून जवळपास 8000 जागांची मेगाभरती यावर्षी होणार आहे.तर आपल्याला देखील तेवढ्याच जोमाने यासाठी तयार राहावं लागेल.

🔅इथून पुढील आपल अभ्यासाचं नियोजन कस असावं याबद्दल बोलूयात.

1.आपल्याकडे अजून 65 दिवस असं पकडलं तरी आपण 30+35 चा formula यासाठी वापरू शकतो.
30+35 म्हणजे कस? तर पहिले 30 दिवस तुम्ही सर्व विषय एकदा व्यवस्थित वाचून घेऊ शकता म्हणजे तुमचा प्रत्येक विषयावर एक minimum hold तयार होईल. त्यानंतर राहिलेले 35 दिवसात तुम्ही minimun 2 आणि max 3 revisions करू शकता. ज्या तुम्हाला 60+ score साठी उपयोगी ठरु शकतील.

2.Reading करताना एवढं लक्षात ठेवा की फक्त ढोबळमानाने न वाचता minute(reading between the lines)गोष्टी फोकस व्हायला हव्यात कारण दिवसेंदिवस आयोगाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नुकतेच झालेले राज्यसेवा मुख्य चे पेपर पाहिल्यावर तुमच्या हे लक्षात येईलच.

3.आता एक गोष्ट लक्षात घ्या की दिवसेंदिवस cutoff वाढत आहेत.So कोणताच विषय option ला न ठेवता सर्वच विषयांची व्यवस्थित तयारी करण आवश्यक झालं आहे.ही चूक अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांकडून especially math & reasoning च्या बाबतीत होताना दिसते. So be alert 😊.

4.आता फक्त एक एक विषय पुर्ण कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित करा.त्यासाठी तुम्ही एखादी Test series join केली असेल तर त्यानुसार नियोजन करू शकता.Math & current affairs आपण dailly basis वरती read करायला हवं. ( दोन्ही विषयांना min 2.5-3 hrs )

5.आपल्याला test solving, time management, exam temperament building या गोष्टीवरती काम करायचं आहे पण ते revision च्या वेळी आपण जाणीवपूर्वक करू शकतो. आता फक्त आयोगाचे Pyq आणि reading जास्त Imp आहे.

♦️काही सर्वसाधारण सूचना :

1. 2 महिने हा खूप जास्त वेळ नाही त्यामुळे आत्तापासूनच serious व्हा.नाहीतर शेवटी पळता भुई थोडी होते.

2. आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल पाहता अभ्यासासोबतच logic building, approach या गोष्टी मॅटर करत आहे असं दिसतय त्यावरती पण काम होणं आवश्यक आहे.(जे केवळ Pyq मधूनच शक्य आहे.)

3.Science आणि math दुर्लक्षित नको. कारण आपल लीड या 2 विषयावरच ठरत आहे. बाकी विषयात बऱ्यापैकी सर्वांनी एक minimum level गाठली आहे.
आपण math & reasoning + Science असं मिळून min 15 marks च तरी target ठेवायला हवं.

4.एखादा विषय अवघड जातं असेल तर त्याचा तात्काळ Class join करून तो विषय पक्का करून घ्यायला हवा.कारण एकदा वेळ गेल्यावर परत काहीही करता येणार नाही.

5. आज आपण असा संकल्प करूयात की 2023 या वर्षात मी किमान एक तरी पोस्ट मिळवीनच. आणि त्यासाठी आपण आपले सर्वोत्तम द्यायला हवं.

कारण अभी नही तो कभी नही..✌️✌️

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत रुद्रांक्षचा पुन्हा सुवर्णवेध :-


◆ भारताचा जगज्जेता नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने कामगिरीत सातत्य राखताना मंगळवारी विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारातील वैयक्तिक गटात सुवर्णपदक पटकावले. या पदकासह भारताचे स्पर्धेतील वर्चस्वही कायम राहिले.


◆ भारताची आतापर्यंत तीन सुवर्णपदकांसह एकूण चार पदके झाली आहेत. सोमवार 21 फेब्रुवारी 2023 रोजी आर. 


◆ नर्मदा नितीनच्या साथीने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर रुद्रांक्षने मंगळवारी वैयक्तिक गटात आपल्या अव्वल मानांकनास साजेशी कामगिरी करताना पुन्हा सोनेरी यश संपादन केले.

संयुक्त राष्ट्रांच्या पोषण मोहीम समन्वयकपदी भारतीय वंशाच्या अफशान खान :-


◆ भारतीय वंशाच्या अफशान खान यांची संयुक्त राष्ट्रांच्या ‘पोषण वर्धन मोहिमे’च्या समन्वयकपदी नेमणूक केली आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुटेरेस यांनी त्यासंबंधी घोषणा केली.

अफशान खान यांच्याकडे कॅनडा आणि ब्रिटनचे नागरिकत्व आहे.


◆ ‘पोषण वर्धन मोहीम’ कुपोषण असलेल्या 65 देशांमध्ये राबवण्यात येते, त्यामध्ये भारताच्या चार राज्यांचाही समावेश आहे. सर्व प्रकारच्या कुपोषणाचे 2030 पर्यंत उच्चाटन करणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे. 


◆ सर्व संबंधितांना सहभागी करून, जगातील सर्व प्रकारचे कुपोषण थांबवण्यासाठी पोषण वर्धन रणनीतीची अंमलबजावणी करणे हे अफशान खान यांचे काम असेल. ‘विमेन फॉर विमेन इंटरनॅशनल’ या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.


मोठी पर्यावरण हानी झालेल्या 50 विभागांत महाराष्ट्र :-


◆हवामान बदलामुळे जगभरातच पर्यावरणाची हानी होत आहे. या पर्यावरण हानीमध्ये जगभरातील जे 50 विभाग आघाडीवर आहेत, त्यात महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब यासह भारतातील नऊ राज्यांचा समावेश आहे. हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या ‘क्रॉस डिपेंडन्सी इनिशिएटिव्ह’ने हा अभ्यास केला आहे.


◆ या प्रदेशांची तुलना पूर, जंगलातील आग, उष्णतेची लाट आणि समुद्राच्या पाणी पातळीतील वाढीमुळे इमारती आणि मालमत्तेचे नुकसान होण्याच्या मॉडेलच्या अंदाजानुसार केली आहे.


◆ चीन आणि भारतावर विशेष लक्ष केंद्रित करतानाच या प्रदेशातील 2050 मध्ये अव्वल 200 पैकी अर्ध्याहून अधिक जोखीम असलेल्या प्रांतांच्या यादीत आशिया खंड आघाडीवर असल्याचे म्हटले आहे.

विघ्नेश आणि विशाख एनआर हे ग्रँडमास्टर बनणारे भारताचे पहिले भावंड आहेत.



◆ जर्मनीतील बॅड झ्विसचेनाह येथे 24 वा नॉर्डवेस्ट कप 2023 जिंकल्यानंतर आणि जर्मन IM इल्जा श्नाइडरचा पराभव केल्यानंतर, भारतीय बुद्धिबळपटू विघ्नेश एनआर भारताचा 80 वा ग्रँडमास्टर बनला. चेन्नईच्या मुलाने थेट रेटिंगमध्ये 2500 चा टप्पा पार करून हा टप्पा गाठला. 


◆ विघ्नेशचा मोठा भाऊ विशाख एनआर 2019 मध्ये भारताचा 59 वा जीएम बनला होता. अशा प्रकारे, विशाख आणि विघ्नेश हे ग्रँडमास्टर असलेले भारताचे पहिले भावंड बनले आहेत.


━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔷 भारतातील पहिला अँग्री चॅटबॉट Ama KrushAI ओडिशामध्ये लॉन्च झाला.


◆ ओडिशाचे राज्यपाल प्रा. गणेशी लाल यांनी ‘कृषी ओडिशा 2023’ च्या समापन सत्रात कृषी क्षेत्रासाठी भारतातील पहिला AI चॅटबॉट ‘Ama KrushAI’ लाँच केला. 


◆ Ama KrushAI चॅटबॉट शेतकऱ्यांना सर्वोत्तम कृषी पद्धती, सरकारी योजना आणि 40 हून अधिक व्यावसायिक आणि सहकारी बँकांकडून कर्ज उत्पादनांबद्दल माहिती देण्यास मदत करेल.


━━━━━━━━━━━━━━━━━━━

ओला भारतात उभारणार जगातील सर्वात मोठे EV HUB :-


◆ इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Ola इलेक्ट्रिक भारतातील तामिळनाडू राज्यामध्ये एक ईव्ही हब स्थापन करणार आहे. ज्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे सेल, ईव्ही तयार करण्याच्या सुविधा आणि डीलर – सप्लायर असतील. ईव्ही हब हे एकाच ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी सर्वात मोठे सपोर्टींग इकोसिस्टीम बनेल असे कंपनीचे म्हणणे आहे.


◆ ओलचे ईव्ही हब संपूर्ण ईव्ही इकोसिस्टीमला एका छताखाली आणेल. ज्यामध्ये आम्ही टू-व्हिलर , फोर-व्हिलर आणि सेलमध्ये एक मजबूत वर्टिकल इंटिग्रेटेड मोबिलिटी कंपनी होईल असे त्यांनी कंपनीच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.


संसद रत्न पुरस्कार 2023 साठी 13 संसद सदस्य (MP) नामांकित करण्यात आले आहेत.


◆ संसद रत्न पुरस्कार 2023 साठी 13 संसद सदस्यांची (एमपी) नामांकन करण्यात आली आहे. अर्जुन राम मेघवाल (संसदीय कामकाज राज्यमंत्री) यांच्या अध्यक्षतेखाली आणि टीएस कृष्णमूर्ती (माजी मुख्य निवडणूक) यांच्या सह-अध्यक्षपदी प्रख्यात संसदपटू आणि नागरी समाजाची ज्युरी समिती भारताचे आयुक्त) यांनी संसद रत्न पुरस्कार 2023 साठी लोकसभेतील आठ आणि राज्यसभेतील पाच खासदारांचे नामनिर्देशन केले आहे. 


◆ हे नामांकन प्रश्न, खाजगी सदस्यांची विधेयके आणि 17 व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून सदस्यांच्या वादविवादांवर आधारित आहेत.


➤ संसद रत्न पुरस्कार 2023 (लोकसभा)


◆ अधीर रंजन चौधरी (INC, पश्चिम बंगाल)

◆ गोपाळ चिनय्या शेट्टी (भाजप, महाराष्ट्र)

◆ सुधीर गुप्ता (भाजप, मध्य प्रदेश)

◆ डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र)

◆ विद्युत बरन महतो (भाजप, झारखंड)

◆ डॉ. सुकांता मजुमदार (भाजप, पश्चिम बंगाल)

◆ कुलदीप राय शर्मा (INC, अंदमान निकोबार बेटे)

◆ डॉ हिना विजयकुमार गावित (भाजप, महाराष्ट्र)


➤ संसद रत्न पुरस्कार 2023 (राज्यसभा)


◆ श्रीमती फौजिया तहसीन अहमद खान (राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र)

◆ डॉ. ए.एस. जॉन ब्रिटास (सीपीआय-एम, केरळ);

◆ डॉ. मनोज कुमार झा (राजद, बिहार),

◆ विशंभर प्रसाद निषाद (समाजवादी पार्टी, उत्तर प्रदेश)

◆ श्रीमती छाया वर्मा (कॉंग्रेस, छत्तीसगड)


━━━━━━━━━━━━━━━━━━━

चालू घडामोडी : 23 फेब्रुवारी 2023


◆ पशुपती कुमार पारस यांनी दुबईमध्ये इंडिया पॅव्हिलियन गल्फफूड 2023 चे उद्घाटन केले.


◆ शिवसेना मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड झाली आहे.


◆ केरळ हायकोर्टाने प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित केला.


◆ दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन व्हर्च्युअल शॉपिंग अँप लाँच करण्याच्या तयारीत आहे.


◆ जातिभेदावर बंदी घालणारे सिएटल हे अमेरिकेतील पहिले शहर ठरले आहे.


◆ राजीव रघुवंशी यांची भारताचे नवीन औषध नियंत्रक जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली.


◆ यूकेने भारताला मागे टाकून जगातील सहाव्या क्रमांकाची इक्विटी मार्केट बनवली आहे.


◆ स्टेट बँक ऑफ इंडियाने सिंगापूरसह रिअल-टाइम भीम पेमेंटला परवानगी दिली.


◆ कोटक महिंद्रा बँक कॉर्पोरेट डिजिटल बँकिंग पोर्टल ‘कोटक फायन’ सुरु केले.


◆ भारत आणि सेशेल्स यांनी सागरी सुरक्षेमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.


◆ ऑकलंड विद्यापीठ, टाटा मेमोरियल हॉस्पिटलने कॅन्सर सेवेसाठी सामंजस्य करार केला.


◆ अबू धाबी संरक्षण कंपनीने UAE च्या संरक्षण प्रदर्शनात भारताच्या HAL सोबत सामंजस्य करार केला.


◆ संसद रत्न पुरस्कार 2023 साठी 13 संसद सदस्य (MP) नामांकित करण्यात आले आहेत.


◆ ढाका येथे डॉ.महेंद्र मिश्रा यांना आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


◆ बचाव कार्यासाठी नौदल प्रमुखांना ऑन-द-स्पॉट युनिट सन्मानपत्र आयएनएस निरक्षक प्रदान करण्यात आले.


◆ तिलोत्तमा सेनने ISSF विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक जिंकले.


◆ टेलीफोनिका जर्मनीने भविष्यासाठी तयार ऑपरेशन्स सपोर्ट तयार करण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन पार्टनर म्हणून TCS ची निवड केली.


◆ भारतातील पहिले हायब्रिड रॉकेट चेंगलपट्टू येथे प्रक्षेपित करण्यात आले.


◆ माजी आयकर मुख्य आयुक्त टीसीए रामानुजम यांचे निधन झाले.


◆ जेपी नड्डा यांनी ‘मोदी: शेपिंग अ ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.


━━━━━━━━━━━━━━━━━━━

राज्यांना सर्व थकबाकी तातडीने अदा केली जाईल :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण


◆ अप्रत्यक्ष करप्रणालीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्यांना 16,982 कोटींची थकबाकी त्वरित अदा केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.


◆ 18 फेब्रुवारी 2023 रोजी येथे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची बैठक झाल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली.


◆ या बैठकीत द्रवरूप गूळ, पेन्सिल शार्पनर यावरील कर घटविण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षेतेखाली जीएसटी परिषदेची 49 वी बैठक पार पडली.


🔷 पर्यटन मंत्रालयाने प्रसाद योजनेअंतर्गत चार तीर्थक्षेत्रांची निवड केली.


◆ पर्यटन मंत्रालयाने 'स्वदेश दर्शन' आणि 'नॅशनल मिशन ऑन पिलग्रिमेज रिजुवनेशन अँड स्पिरिच्युअल, हेरिटेज ऑगमेंटेशन ड्राइव्ह (प्रसाद)' या योजनांअंतर्गत विकासासाठी चार तीर्थक्षेत्रे ओळखली आहेत. 


◆ ते देशातील पर्यटन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासन इत्यादींना आर्थिक सहाय्य देतात.

राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरू होईल: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 राज्यातील तलाठी भरतीसंदर्भात (Talathi Bharti 2023) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं ते म्हणाले. ते अहमदनगरमधील लोणी येथे महसूल परिषदेत बोलत होते.

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे दोन दिवसीय महसूल परिषद संपन्न झाली आहे. या परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनीही उपस्थिती लावली. दोन दिवस चाललेल्या या महसूल परिषदेत अनेक धोरण निश्चित करण्यात आली असून या धोरणांपैकी वाळू लिलावाचे महत्त्वाचे धोरणाचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. लवकरच ते कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patill) यांनी दिली आहे. प्रथमच अशी परिषद यशदाच्या बाहेर ग्रामीण भागात घेण्यात आली आणि यापुढे सुद्धा पुण्याच्या बाहेर परिषद घेण्याचा मानस महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला.

केरळ उच्च न्यायालय - प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे देशातील पहिले




🔹केरळ उच्च न्यायालयाने 21 फेब्रुवारी 2023 रोजी मल्याळममध्ये अलीकडील दोन निकाल प्रकाशित केले आहेत.


🔸हा दिवस (२१ फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणूनही साजरा केला जातो.


🔹यासह, केरळ उच्च न्यायालय हे प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय ठरले.


🔸मल्याळममधील निकाल न्यायालयाच्या वेबसाइटवर इंग्रजी आवृत्तीच्या खाली अपलोड करण्यात आले होते.


नवी दिल्ली येथे जीएसटी परिषदेची 49 वी बैठक झाली.



▪️18 फेब्रुवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 49 वी GST परिषदेची बैठक झाली. 


▪️केंद्रीय अर्थसंकल्प 2023 पासून तीन आठवड्यांच्या कालावधीत ही बैठक आयोजित केली जात आहे. 


▪️केंद्रीय अर्थमंत्री, 

▪️केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, 

▪️याशिवाय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री (विधानमंडळासह) आणि 

▪️केंद्रातील वरिष्ठ अधिकारी अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत हँडलनुसार, सरकार आणि राज्ये या बैठकीत उपस्थित होते.

आयुष्मान खुराना यांची बालहक्कांचा राष्ट्रीय दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे



▪️भारतात, आयुष्मान खुराना युनिसेफ (युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड) चे प्रतिनिधित्व करेल. 


▪️युनिसेफने या अभिनेत्याचे राष्ट्रीय राजदूत म्हणून नाव जाहीर केले. 


▪️त्याच्या कर्तव्याचा एक भाग म्हणून, आयुष्मान प्रत्येक मुलाच्या जीवन, 


▪️आरोग्य आणि संरक्षणाच्या हक्कांची हमी देण्यासाठी UNICEF सोबत काम करेल.


▪️तसेच त्यांच्यावर परिणाम करणाऱ्या बाबींमध्ये त्यांचा आवाज आणि एजन्सी वाढवेल.


खजुराहो नृत्य महोत्सव मध्य प्रदेशात आयोजित



▪️सात दिवस चालणाऱ्या 49 व्या खजुराहो नृत्य महोत्सवाची सुरुवात युनेस्को वारसा म्हणून घोषित केलेल्या मंदिरात भरतनाट्यम आणि कथ्थकने होईल. 


▪️खजुराहो नृत्य महोत्सवाचा वार्षिक कार्यक्रम 


- उस्ताद अल्लाउद्दीन खान संगीत एवम कला अकादमी आणि 


- संस्कृती संचालनालय 


▪️यांनी पर्यटन विभाग आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे.

उत्तर भारतातील पहिला अणु प्रकल्प हरियाणामध्ये बांधला जाणार आहे.

  

▪️केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हरियाणातील गोरखपूर येथे बांधला जाईल. 


▪️त्यांनी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील प्रमुख यशांपैकी एक म्हणजे देशभरात अणु आणि अणुऊर्जा प्रकल्पांची स्थापना करणे, 


▪️जे पूर्वी दक्षिणेकडील तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश तसेच पश्चिम महाराष्ट्र या राज्यांपुरते मर्यादित होते.

MPSC अध्यक्ष ठाम; हवा तर राजीनामा घ्या… पण तो निर्णय घेणार नाही

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सर्व अभ्यासक्रम नियमांनुसार तयार केला आहे. हवा तर तुम्ही माझा राजीनामा (Resignation) घ्या. पण २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम (New Syllabus) लागू करण्याचा निर्णय मान्य होणार नाही, अशी आयोगाचे अध्यक्ष किशोर राजेनिंबाळकर (Kishor Rajenimabalkar) यांनी भूमिका घेतल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्य सरकार यांच्या वतीने होणारी एमपीएससी सोबतची बैठक रद्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा नवीन अभ्यासक्रम आतापासून लागू न करता २०२५ पसून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्याविरोधात विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. प्रामुख्याने नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी विद्यार्थी सातत्याने मागणी करत आहे. त्यासाठी आंदोलन देखील करत आहे. मात्र, याबाबत केवळ आश्वासन दिले जात आहे. अद्याप ठोस निर्णय जाहीर केलेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
एमपीएससीने नवीन अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यभरातील विद्यार्थी सातत्याने आंदोलन करत आहेत. या संदर्भात विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष किशोर राजेनिंबाळकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन दिले आहेत. त्यावेळी या प्रश्नाची दखल घेत आम्ही २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम लागू करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना दिले.
मात्र, त्यानंतर या संदर्भात आयोगाने कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन काढले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. राज्यभर विद्यार्थ्यांनी सातत्याने आंदोलन केले. त्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आंदोलनात भाग घेऊन विद्यार्थ्यांच्या बाजूने आम्ही आहोत, अशी आश्वासने दिले. परंतु, त्यानंतरही काहीच फरक पडलेला नाही. तर विद्यार्थी मात्र, नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे आयोगाचे अध्यक्ष किशोर राजेंनिंबाळकर हे सन २०२३ पासून अभ्यासक्रम लागू करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सुत्रांची माहिती आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने याबाबत तातडीने दखल घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, एमपीएससीने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नाही. एमपीएससीने निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास‌ राज्य सरकार त्या विरोधात न्यायालयात‌ जाणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

सीबीआयने 'ऑपरेशन कनक-2' अंतर्गत पंजाबमधील 50 ठिकाणी छापे टाकले.



🔹केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने ऑपरेशन कनक-2 अंतर्गत पंजाबमधील सुमारे 50 ठिकाणी भारतीय अन्न महामंडळ, FCI अधिकारी आणि खाजगी राईस मिलर्सच्या आवारात एका प्रकरणाच्या चालू तपासात शोध घेतला आहे.


🔸झडतीदरम्यान दोषी कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.


🔹एफसीआयमधील भ्रष्टाचाराची नाळ तोडण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

दक्षिण कोरियाच्या कोर्टाने पहिल्यांदाच समलिंगी जोडप्याच्या अधिकारांना मान्यता दिली आहे



🔹दक्षिण कोरियातील एका न्यायालयाने पहिल्यांदाच देशातील समलिंगी जोडप्याच्या हक्कांना मान्यता दिली आहे.


🔸न्यायालयाने निर्णय दिला आहे की देशातील समलैंगिक जोडप्यांना विषमलैंगिक जोडप्यांना राष्ट्रीय आरोग्य विमा सेवेअंतर्गत परवानगी असलेल्या समान प्रकारच्या पती-पत्नी कव्हरेजचा हक्क आहे.


🔹21 फेब्रुवारी 2023 रोजी सोल उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.


तुर्की-सीरिया सीमावर्ती भागात पुन्हा 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला




🔹20 फेब्रुवारी 2023 रोजी सीरियाच्या सीमेजवळ दक्षिण तुर्कीला 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला.


🔸उत्तरेकडील 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या डेफने, अंताक्या आणि अडाना या शहरांना भूकंपाचा धक्का बसला.


🔹तीन मिनिटांनंतर आणखी 5.8-रिश्टर स्केलचा धक्का बसला आणि त्याचा केंद्रबिंदू हाते येथील समंदग जिल्हा होता.


🔸यापूर्वी 6 फेब्रुवारी 2023 रोजी तुर्की आणि सीरियामध्ये 7.8 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला होता.


-----------------------------------------------------------

लडाखमधील देशातील पहिल्या फ्रोझन लेक मॅरेथॉनने जागतिक विक्रम केला



🔹लडाखमध्ये, पॅंगॉन्ग त्सोवरील देशातील पहिल्या गोठलेल्या लेक मॅरेथॉनची अधिकृतपणे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात उंच गोठलेली लेक मॅरेथॉन म्हणून नोंद झाली आहे.


🔸20 फेब्रुवारी'23 रोजी आयोजित


🔹लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल आणि अॅडव्हेंचर स्पोर्ट्स फाउंडेशन ऑफ लडाख द्वारे आयोजित.


🔸मॅरेथॉनची थीम: द लास्ट रन


🔹ग्रामस्थ उपक्रमाचा एक भाग म्हणून याचे आयोजन करण्यात आले होते.


माजी IAS बी. व्ही. आर सुब्रह्मण्यम यांची NITI आयोगाचे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली.



माजी IAS अधिकारी BVR सुब्रह्मण्यम यांची निती आयोगाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


▪️माजी वाणिज्य सचिवांनी परमेश्वरन लायर यांच्याकडून पदभार स्वीकारला, ज्यांना जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नाव देण्यात आले आहे. 


▪️सुब्रह्मण्यम हे सध्याचे सीईओ परमेश्वरन अय्यर यांच्याकडून पदभार स्वीकारतील जे वॉशिंग्टन डीसीमध्ये जागतिक बँकेत कार्यकारी संचालक म्हणून रुजू होतील. 


▪️सुब्रह्मण्यम यांची NITI आयोगाचे CEO म्हणून नियुक्ती मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने जाहीर केली. 


▪️श्री. सुब्रह्मण्यम यांची नियुक्ती या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून दोन वर्षांसाठी आहे.


Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...