Tuesday, 21 February 2023

आयुष्मान खुराना यांची युनिसेफच्या बाल हक्कांसाठी राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे



🔹बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना याची 19 फेब्रुवारी 2023 रोजी संयुक्त राष्ट्र बाल निधी (UNICEF) भारताचे राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


🔸आयुष्मानची सप्टेंबर 2020 मध्ये युनिसेफ इंडियाचे सेलिब्रेटी अॅडव्होकेट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती ज्यामुळे मुलांवरील हिंसाचार संपुष्टात आणण्यासाठी आणि बाल हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी वकिली करण्यात आली होती.


🔹राष्ट्रीय राजदूत म्हणून ते सर्व मुलांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी युनिसेफला मदत करतील.

बेन स्टोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम मोडला.



🔹इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स 18 फेब्रुवारी 2023 रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला.


🔸त्याने इंग्लंडचे प्रशिक्षक आणि न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलमचा मागील विक्रम मागे टाकला.


🔹स्ट्रोक्सने 90 कसोटीत 109 षटकार मारून हा विक्रम केला.


🔸मॅक्युलमच्या नावावर 101 कसोटीत 107 षटकारांचा विक्रम होता.


-----------------------------------------------------------

अनिमिया म्हणजे काय?


🔴रक्ताचा लालपणा कमी होणे म्हणजे अॅनिमिया. यालाच रक्तक्षय किंवा रक्तपांढरी असे हि म्हणतात.


🔘रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी लोहाची गरज असते. आपल्या शरीरात हिमोग्लोबीन लाल रक्तकणात असते. यांचे कार्य छातीतून शरीराच्या विविध भागात प्राणवायु पोहोचविणे हे आहे. प्राणवायुमुळे शरीरातील चयापचयाची क्रिया व्यवस्थित पार पाडली जाते.


🔰अनिमियाची कारणे

लोहयुक्त आहाराची कमतरता

सकस आहाराची कमतरता

मानसिक तणाव

मासीक पाळीतील रक्तस्राव

जास्तीची बाळंतपणे (२ पेक्षा जास्त )

वारंवार गर्भपात

मलेरिया

जंत

मुळव्याध


🛑अनिमिया आजाराचे चिन्ह/ लक्षणे

आहारातील लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताचा रंग फिका पडतो.

नखे, डोळे, जीभ फिके दिसायला लागतात.

चक्कर येणे

भूक मंद होणे

चालताना दम लागणे

थोडे श्रम केले तरी थकवा जाणवणे

निरुत्साह वाढतो

चिडचिडेपणा वाढतो.


✅लोहाच्या कमतरतेमुळे महिला व बालकांमधील काही दुष्परिणाम

अ) महिलांमध्ये रक्ताची कमी असल्यास होणारे दुष्परिणाम कमी वजनाचे बालक जन्माला येते. वेळेच्या अगोदर बाळंत होणे. गरोदरपणात रक्तस्राव होणे. बाळंतपणानंतर जास्त रक्तस्राव होणे बाळंतपणातच महिलेचा मृत्यू होणे जन्माच्या अगोदरच बाळाचा मृत्यू होणे. किशोरींमध्ये पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे.


ब) बाळामध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम बाळामध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे सारखे आजारी पडतात.कुठल्याही कामात लक्ष न देणे. त्यामुळे अशा प्रकारची मुले खेळात, अभ्यासात, इतर बालकांपेक्षा मागे राहतात.

आत्मविश्वास कमी होणे.बाळ चिडचिडे होते. सतत रडते.


 

स्त्रोत : पोषण आणि आहार : माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

भारतीय अर्थव्यवस्था

🔲 भारतीय अर्थव्यवस्था 🔲:
रुपयाची परिवर्तंनियता (Convertibility of Rupee) :

अर्थ: जगातील चलने परस्परांमध्ये विनिमयक्षम (Exchangeable) असतात. म्हणजे एका चलनाची अदलाबदल इतर चलनांमध्ये करता येते.

मात्र विविध सरकारे चलनाच्या विनिमयावर विविध बंधने/नियंत्रणे/मर्यादा(Exchange Control) टाकत असतात.

मात्र जेंव्हा एखादे चलन इतर देशाच्या चलनाच्या संदर्भात मुक्तपणे विनिमयक्षम असते व अशा विनिमयासाठी कोणत्याही प्रकारची सरकारी नियंत्रणे/मर्यादा नसते तेंव्हा ते चलन परिवर्तनीय आहे असे म्हंटले जाते.

उदा.
1) विनिमय करायच्या चलनाच्या संख्येवर बंधन नसते, म्हणजेच हवे तेवढया चलनाचा विनिमय करता येऊ शकेल.

 

2) विनिमय दर सरकार ठरविणार नाही. तर तो दोन्ही चालनाच्या मागणी आणि पुरवठयाच्या परस्पर संयोगाने परकीय चलन बाजारात ठरेल.

 

3) सर्व व्यवहारांसाठी असा बाजारात ठरलेला (Market Determined) एकच दर असेल म्हणूनच या व्यवस्थेला पूर्ण परिवर्तनीय व्यवस्था (Fully-Convertible System) असे म्हणतात.

पूर्ण परिवर्तनीय व्यवस्थेवर कोणत्याही प्रकारची नियंत्रणे/मर्यादा टाकल्यास ती अंशत: परिवर्तनीय व्यवस्था (Partially Convertible System) ठरते.

उदा.
1) चलन फक्त काही व्यवहारांसाठी मुक्तपणे परिवर्तनीय असेल. उदा. फक्त वस्तूंच्या आयाती-निर्यातीसाठी किंवा फक्त सेवांच्या देवाण-घेवाणसाठी किंवा फक्त भांडवली व्यवहारांसाठी किंवा फक्त विशिष्ट वस्तु व सेवांच्या देवाण-घेवाणीसाठी.

2) एका पेक्षा अधिक विनिमय दरांचा वापर केला असेल तर. उदा. परदेशात मौजमजा ट्रिप्ससाठी परकीय चलन हवे असल्यास विनिमयाचा अधिक दर आकाराला जाऊ शकेल, याउलट अन्नधान्याच्या आयातीसाठी कमी दर आकाराला जाईल.

3) दुहेरी विनिमय दराचा (Dual Exchange Rate) वापर केला जाऊ शकतो. म्हणजेच काही सरकारी किंवा सरकार पुरस्कृत व्यवहारांसाठी सरकारी दर (Official Rate) तर इतर बिगर-सरकारी व सरकारने नियंत्रित न केलेल्या व्यवहारांसाठी बाजार दर (Market-Rate)..

एन.सी.सक्सेना समिती :

केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने ही एन.सी.सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती (Committee for Estimation of BPL Families in Rural Areas) स्थापन केली होती.
या समितीने सप्टेंबर 2009 मध्ये अहवाल सादर केली होती.
या समितीने सध्याची दारिद्रय रेषा अपूर्ण असून त्यात वाढ सुचविली, जेणे करून आवश्यक कॅलरीज उपलब्ध होऊ शकतील. तसेच समितीच्या मते दारिद्रय रेषेखालील लोकसंख्या 50 टक्के इतकी उच्च आहे.
मात्र या शिफारशी नियोजन मंडळाने फेटाळून लावल्या.

दारिद्रय निर्मूलनासाठी धोरणे व कार्यक्रम (Policies and programmers towards poverty alleviation) :

भारताच्या घटनेत तसेच पंचवार्षिक योजनांमध्ये सामाजिक न्याय हे सरकारच्या विकास धोरणांचे प्राथमिक उद्दीष्टय असल्याचे सांगण्यात आले आहे.
बहुतेक सर्व धोरणांमध्ये दारिद्रय निर्मूलनावर भर देण्यात आलेला आहे व त्या अनुषंगाने सरकारने विविध डावपेचांचा स्विकार करण्यात आलेला आहे.
दारिद्रय निर्मूलनासाठी सरकारने त्री-आयामी दृष्टीकोनाचा स्विकार केला आहे.

अ) वृद्धीधारीत दृष्टिकोन,

ब) दारिद्रय निर्मूलन कार्यक्रम, आणि

क) किमान मूलभूत सुविधांची तरतूद.

अ) वृद्धीधारित दृष्टिकोन (Growth-oriented Approach) –

हा दृष्टिकोन अशा अपेक्षेवर आधारलेला आहे की, आर्थिक वृद्धीचे परिणाम (जिडीपी व दर डोई जीडीपीतील वेगवान वृद्धी) समाजाच्या सर्व गटांपर्यंत पसरतील, तसेच गरीब जनतेपर्यंत झिरपत जातील.
1950 च्या दशकात व 1960 कया दहकाच्या सुरुवातीपर्यंत नियोजनाचा मुख्य भर याच दृष्टीकोनावर आधारित होता. त्यामागे असा विचार होता की, निवडक प्रदेशांमध्ये वेगवान औधौगिक विकास आणि हरित क्रांतीच्या माधमातून कृषि विकास घडवून आणल्यास न्यून-विकसित प्रदेशांना तसेच समाजातील मागास आणल्यास गटांना त्याचा फायदा प्राप्त होईल.
मात्र, एकंदरीत वृद्धी आणि कृषि व उधोग क्षेत्रातील वृद्धी अपेक्षित वेगाने होऊ शकली नाही. दुसर्‍या बाजूला, लोकसंख्येच्या विस्फोटामुळे दर डोई उत्पन्नातील वाढ अत्यल्प ठरली. हरित क्रांतीमुळे प्रादेशिक तसेच वैयक्तिक विषमतेत भरच पडली. भू-सुधारणा यशस्वी होऊ शकल्या नाही. त्यामुळे आर्थिक वृद्धीचे फायदे गरीब जनतेपर्यंत झिरपून पोहचले नाहीत.

ब) दारिद्रय निर्मूलन कार्यक्रम (Poverty Alleviation Programmers PAPs) –

वृद्धीधारीत दृष्टीकोनाला पर्याय म्हणून धोरण निर्मात्यांनी दारिद्र्यावर प्रत्यक्ष हल्ला करण्यासाठी दारिद्रय निर्मुलन कार्यक्रमांच्या राबवणुकीचार भर देण्यास सुरुवात केली. सामाजिक मालमत्ता निर्माण करण्याच्या प्रक्रियेदरम्यान कामाची निर्मिती करून गरीब जनतेसाठी उत्पन्नसृजक रोजगार निर्माण करता येईल, हा मागील विचार होता.
या दृष्टीकोनाचा अवलंब अल्प प्रमाणात तिसर्याच योजनेदरम्यान करण्यात आला, व त्यानंतर टप्प्याटप्याने त्याचा विस्तार करण्यात आला. अशा दारिद्रय निर्मुलन कार्यक्रमांचे तीन प्रकार पडतात-
स्वयंरोजगाराचे कार्यक्रम: उदा. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना.
मजुरी रोजगार कार्यक्रम: उदा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.
स्वयंरोजगार व मजुरी रोजगारांचे एकत्रीकरण असलेल्या योजना: उदा. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना.

क) किमान मूलभूत सुविधांची तरतूद (Provision of minimum basic amenities) –

या दृष्टिकोनात जनतेला किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन दरिद्रयाचा प्रश्न हाताळण्याचा समावेश होतो.

सामाजिक उपभोगाच्या गरजांवर (उदा. अनुदानित दराने अन्नधान्य पुरवठा, शिक्षण व आरोग्य सोयी, पाणी पुरवठा व स्वच्छता इ.) सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून जनतेचे राहणीमान उंचवता येऊ शकते, या कल्पनेचा भारत हा जगात अग्रेसर देश असल्याचे मानले जाते.

या दृष्टीकोना अंतर्गत कार्यक्रमांच्या आधारे रोजगार निर्मिती करणे, गरिबांच्या उपभोगात भर घालणे व शिक्षण-आरोग्यात सुधारणा होणे, या बाबी अपेक्षित आहेत.

गरिबांच्या अन्न व पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी पुढील तीन प्रमुख कार्यक्रम राबविले जात आहेत.
सार्वजनिक वितरण व्यवस्था
एकात्मिक बाल विकास योजना
राष्ट्रीय मध्यान्न आहार योजना
वरील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राबविण्यात येणार्यान योजनांमध्ये पुढील योजनांचा समावेश होतो-

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना
प्रधानमंत्री ग्रामोदय योजना
भारत निर्माण योजना
इंदिरा आवास योजना
ग्रामीण गरीबांना शहरी सेवांचा पुरवठा (PURA)

तसेच, सरकारने काही विशिष्ट गटांना मदत करण्यासाठी विशेष सामाजिक सुरक्षेच्या योजना सुरू केल्या आहेत.
उदा. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP), ज्यांतर्गत ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना’ चालविली जाते.

MPSC राज्यसेवा पुर्व मधील #Economy चे प्रश्न Solve करत असताना आपला Approach काय असावा?


राज्यसेवा पुर्व साठी Economy चे साधारणता 15 प्रश्न विचारले जातात. त्यातील 12-13 प्रश्न आपण Read करत असलेल्या regular Sources मधून येत असतात. राहिलेले 2-3 प्रश्न Out of Box च असतात. पण जे Basic Books मधून येतात त्या प्रश्नांना कस Deal करता येईल याविषयी आपण बघूयात.


🔴 Topicwise आपण याविषयी माहिती घेऊ.


❇️ गरिबी व बेरोजगारी -


यामध्ये दारिद्र्य आणि बेरोजगारीचे प्रकार Conceptually माहिती हवेत. त्यानंतर दारिद्र्याच्या समित्याच्या Facts पाठ करून टाका. बेरोजगारी मोजण्याच्या पद्धती चांगल्या करून ठेवा. राज्यसेवेला प्रश्न जास्त deep ला जातं नाही. So या Basic गोष्टीच चांगल्या करा.यापुढे जर प्रश्न आला तर तुम्ही केलेल्या Basic गोष्टींवरती Cover होईल.


❇️ लोकसंख्या-


यामध्ये Pyq हा सर्वात महत्वाचा Factor आहे. तुम्ही Pyq जरी तोंडपाठ केले तरी लोकसंख्येचे तुमचे 60-70% प्रश्न Cover होतात. यामध्ये Factual Angle नेच तयारी करा. उगीचच जास्त Analysis करण्यात काही अर्थ नाही.अलीकडे आयोग लोकसंख्या या घटकावर Deep level ला प्रश्न विचारत आहे. E.g. राज्यसेवा पुर्व 2020 औरंगाबाद घनतेचा प्रश्न.


❇️ 3.शाश्वत विकास -


 या घटकावर आयोग Mdg, Sdg,1972 च्या Stockholm परिषदेपासून ते SDG पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यांचा अभ्यास करावा लागेल. या घटकावर आयोगाने 2019 च्या पुर्व ला SDG आणि MDG च्या Main Targets मधील Subtargets वरती प्रश्न विचारले होते. तेवढी depth आपल्याला गाठावी लागेल.8 MDG आणि 17 SDG काही Tricks करून लक्षात ठेवा. सोबतच त्यामधील Subtargets सुद्धा.


❇️ 4 सामाजिक क्षेत्र सुधारणा -


 यामध्ये महिला, बालक, वृद्ध, अपंग, सामाजिकदृष्ट्या Weaker Sections वरच्या योजना चांगल्या कराव्या  लागतील.तसेच अन्न, वस्त्र, निवारा, पाणीपुरवठा यासंबधीच्या 2014 च्या पुढील योजनानावर आयोग प्रकर्षाने प्रश्न विचारताना दिसत आहे. देसले सर भाग -2 मधून हा घटक चांगला करून घ्या.योजना अभ्यासताना ती कधी सुरु झाली, तिचे उद्देश काय होते, तिचे लक्ष गट आणि कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते या गोष्टी करून ठेवा. पुर्व मध्ये 3-4 प्रश्न योजना, धोरणे यावरती विचारले जातात.


❇️ 5. समावेशन -


यामध्ये प्रादेशिक, वित्तीय व वैश्विक समावेशन असे घटक येतात. यामधील आर्थिक समावेशनावरती आयोग दरवर्षी प्रश्न विचारतो आहे. त्यामध्ये जनधन योजना,Pप्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, अटल पेन्शन योजना  चांगल्या करून ठेवा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे.


❇️ 6. नियोजन व जमीन सुधारणा -


 यामध्ये पहिल्या ते बाराव्या पंचवार्षिक योजनांचा एक चांगला Overview आपल्याकडे असावा. त्यासोबत जमीनसुधारणा या घटकाच्या basic Facts बघून घ्या. त्यावरतीच आयोग सारखं प्रश्न विचारतो आहे. त्या राज्यसेवा Mains Hrd च्या कोणत्याही book मध्ये HR या Topic मध्ये तुम्हाला भेटून जातील.


🛑 आणखी एक आणि तितकाच महत्वाचा मुद्दा म्हणजे Out of Box questions च करायचं काय? तर त्यासाठी मला असं वाटत की काही Logic लागलं तर ठीक नाहीतर आपण असे प्रश्न Skip करू शकतो.


एकंदरीत वरती सांगितल्याप्रमाणे प्रत्येक Topic आणि Subtopic चा प्रश्नांचा Trend लक्षात घेतला तर राज्यसेवा पुर्व मध्ये Economy या विषयात 12-13 प्रश्न आपले बरोबर येऊ शकतात.


महत्वाचे खटले


🌻कशवानंद भारती खटला 1973:-

👉भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही तर सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सार्वभौम नाही तर दोघांच्या अधिकारामध्ये पर्याप्त संतुलन निर्माण करण्यात आले आहे

👉परास्ताविक घटनेचा भाग असल्याचं स्पष्ट केले

👉मलभूत हक्काचं उल्लंघन करणाऱ्या कायदयला आव्हान देता येऊ शकेल


🌻मिनर्व्हा मिल खटला 1980:-

👉भारताची घटना मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यामधील संतुलन च्या आधारशिलेवर आधारलेली आहे

👉घटनेने संसद ला घटनादुरुस्ती चा मर्यादित अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करून संसद अमर्यादित अधिकारात बदलू शकत नाही

👉राष्ट्रीय आणीबाणीच्या उद्घोषणेला दूषप्रवृत्ती च्या आधारावर आव्हान देत येऊ शकेल


🌻बरुबारी युनियन खटला 1960:-

👉परास्ताविक घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले


🌻ए के गोपालन खटला 1950:-

👉कलम 21 अंतर्गत संरक्षण केवळ असंगत कार्यकारी कृती च्या विरुद्ध उपलब्ध आहे ,असंगत कायदेशीर कृती विरुद्ध नाही


🌻मनका गांधी खटला1978:-

👉कलम 21 ला कायद्याची उचित प्रक्रिया हे तत्व लागू केले


🌻आय आर कोहेल्लो खटला 2007:-

👉नवव्या अनुसुचितील कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकन पासून संरक्षण प्राप्त नाही.


🌻एस आर बोंमई खटला 1994:-

👉घटना संघत्मक असल्याचे स्पष्ट केले तसेच संघराज्यवाद घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे स्पष्ट केले.


ग्रामपंचायत

– “खेड्याकडे चला” असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. खेडे हि सक्षम व स्वयंपूर्ण झाली पाहिजे यासाठी ‘ग्रामस्वराज्य’ संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली.


– त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात शेवटचा स्टार म्हणजे ग्रामपंचचायत  हा होय.


– भारतातीतील राज्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो


– महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ५ नुसार गावस्तरावर ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते.


– एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायत निर्माण करण्याच्या किंवा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो.


– पंचायत राज हा विषय राज्यसूची मध्ये येतो.


– देशातील पहिली ग्रामपंचायात२ ऑक्टोबर १९५९ ला राजस्थानातील नागोरी येथे स्थापन करण्यात आली.


– ग्रामपंचायत हि ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे.


– संपूर्ण देशात सर्वात सक्षम ग्रामपंचायती राजस्थान राज्यात आहे.


– महाराष्ट्रामध्ये २८,००० पेक्षा अधिक ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत.


– महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर.


– महाराष्ट्रातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत सोलापूर जिल्हातील ‘अकलूज’ हि आहे.


– महाराष्ट्रातील विविध विकासयोजना राबविणारी पहिली ग्रामपंचायत अहमदनगर जिल्ह्यातील ‘हिवरे बाजार हि होय.


– महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती सातारा जिल्ह्या मध्ये आहे. ( १४०० पेक्षा अधिक )


– भारतामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती उत्तरप्रदेशा मध्ये आहे.


– ७३ व्य घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज ला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.


– ७३ व्या घटना दुरुस्तीमध्ये अव्यये पहिल्या ग्रामपंचायत निवडणुका एप्रिल १९९५ ला पार पडल्या.


गेल्या दशकातील सर्व घटनादुरुस्तींचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे

◾️95 वी घटनादुरुस्ती (2010) - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच अँग्लो इंडियन समाज यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ.

◾️ 96 वी घटनादुरुस्ती (2011) - ओरिसा राज्याचे नाव ओडिशा तसेच ओरिया भाषेचे नाव ओडिया केले गेले.

◾️ 97 वी घटनादुरुस्ती (2012) - सहकारी संस्था स्थापन करणे आता मूलभूत अधिकार तसेच सहकारी संस्थांबाबत नवीन भाग IX-B चा समावेश.

◾️ 98 वी घटनादुरुस्ती (2013) - कर्नाटक राज्यातील हैद्राबाद-कर्नाटक भागासाठी अनुच्छेद 371-J अन्वये विशेष तरतुदी.

◾️ 99 वी घटनादुरुस्ती (2015) - राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची स्थापना. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरवली.

◾️ 100 वी घटनादुरुस्ती (2015) - भारत व बांगलादेश यांच्यातील सीमावादाचा निपटारा करणे.

◾️ 101 वी घटनादुरुस्ती (2016) - केंद्र तसेच राज्ये यांच्या एकापेक्षा अधिक अप्रत्यक्ष करांऐवजी संपूर्ण देशात एकच वस्तू व सेवा कर.

◾️ 102 वी घटनादुरुस्ती (2017) - राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आयोगास घटनात्मक दर्जा.

◾️ 103 वी घटनादुरुस्ती (2018) - आर्थिक मागासवर्गास शिक्षण तसेच नोकरी यांत 10 टक्के आरक्षण.

◾️ 104 वी घटनादुरुस्ती (2019) - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ परंतु अँग्लो इंडियन आरक्षणास मुदतवाढ नाही.

गेल्या दशकातील सर्व घटनादुरुस्तींचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे

◾️95 वी घटनादुरुस्ती (2010) - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच अँग्लो इंडियन समाज यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ.

◾️ 96 वी घटनादुरुस्ती (2011) - ओरिसा राज्याचे नाव ओडिशा तसेच ओरिया भाषेचे नाव ओडिया केले गेले.

◾️ 97 वी घटनादुरुस्ती (2012) - सहकारी संस्था स्थापन करणे आता मूलभूत अधिकार तसेच सहकारी संस्थांबाबत नवीन भाग IX-B चा समावेश.

◾️ 98 वी घटनादुरुस्ती (2013) - कर्नाटक राज्यातील हैद्राबाद-कर्नाटक भागासाठी अनुच्छेद 371-J अन्वये विशेष तरतुदी.

◾️ 99 वी घटनादुरुस्ती (2015) - राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची स्थापना. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरवली.

◾️ 100 वी घटनादुरुस्ती (2015) - भारत व बांगलादेश यांच्यातील सीमावादाचा निपटारा करणे.

◾️ 101 वी घटनादुरुस्ती (2016) - केंद्र तसेच राज्ये यांच्या एकापेक्षा अधिक अप्रत्यक्ष करांऐवजी संपूर्ण देशात एकच वस्तू व सेवा कर.

◾️ 102 वी घटनादुरुस्ती (2017) - राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आयोगास घटनात्मक दर्जा.

◾️ 103 वी घटनादुरुस्ती (2018) - आर्थिक मागासवर्गास शिक्षण तसेच नोकरी यांत 10 टक्के आरक्षण.

◾️ 104 वी घटनादुरुस्ती (2019) - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ परंतु अँग्लो इंडियन आरक्षणास मुदतवाढ नाही.

इतिहास प्रश्नोत्तरे



1) सरदार पटेल यांची तुलना खालीलपैकी कोणाशी केली जाते?

अ) जोसेफ मॅझीन 

ब) नेपोलियन 

क) बिस्मार्क ✅

ड) चर्चिल


2)’अ‍ॅट द फिट ऑफ महात्मा गांधी’ या पुस्तकाचे लेखक कोण?

अ) जवाहरलाल नेहरू 

ब) मौलाना आझाद 

क) वल्लभभाई पटेल 

ड) डॉ. राजेंद्र प्रसाद✅


3) अरब-इस्त्रायल संघर्षात भारताची भूमिका नेहमी कशी राहिली?

अ) अरब राष्ट्रांना अनुकूल✅

 ब) अमेरिकेच्या भूमिकेप्रमाणे 

क) रशियाच्या भूमिकेप्रमाणे 

ड) इस्त्रायलला अनुकूल


4) पाकिस्तानचे पहिले गर्व्हनर जनरल कोण होते?

अ) लॉर्ड माऊंट बॅटन 

ब) लियाकत अली 

क) बॅ. महम्मद अली जिना ✅

ड) महम्मद इकबाल


5) इंदिरा गांधी सर्वप्रथम किती साली पंतप्रधान म्हणून सत्तेवर आल्या?

अ) 1964 

ब) 1965 

क) 1966 ✅

ड) 1967


6) खालीलपैकी कोणाचे नाव गरीब हटाव या घोषणेशी जोडता येईल?

अ) मोरारजी देसाई 

ब) इंदिरा गांधी ✅

क) राजीव गांधी 

ड) लाल बहादूर शास्त्री


7) चले जावच्या चळवळीत महात्मा गांधींनी भारतातील जनतेस कोणता मंत्र दिला होता?

अ) मरा किंवा जिंका 

ब) करा किंवा मरा ✅

क) जिंका किंवा मरा 

ड) मारा किंवा जिंका


8) खालीलपैकी कोणास मुस्लिम लिगचे संस्थापक म्हणून ओळखतो?

अ) नवाब सलिमुल्ला ✅

ब) बॅ. मोहम्मद अली जिना 

क) आगा खान 

ड) सर सय्यद अहमद खान


9) गांधी आणि लेनीन या पुस्तकाचे लेखक कोण?

अ) वसंतराव तुळपुळे 

ब) नारायणराव लोखंडे 

क) राममनोहर लोहिया 

ड) श्रीपाद अमृत डांगे✅


10) बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला होता?

अ) दापोलीजवळ आंबावडे 

ब) इंदुरजवळ महू ✅

क) मराठवाड्यात औरंगाबाद 

ड) रत्नागिरीजवळ चिखली

प्रश्नसंच


1. कोणत्या राज्याला 28 ऑगस्ट 2018 पासून आणखी सहा महिन्यासाठी "अशांत शेत्र" म्हणून घोषित करण्यात आले आहे?

A) बिहार      

B) आसाम 💬      

C) अरुणाचल प्रदेश        

D) सिक्किम


2. मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींना 27 टक्के आरक्षण देताना कोणत्या सालच्या जनगणनेचा आधार घेण्यात आला होता?

A) 1931💬      

B) 1971          

C) 1951        

D) 1961


3. यावर्षीचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार कोणास देण्यात आला आहे?

A) फ्रान्सिस दिब्रिटो                  

B) रामकृष्ण महाराज लहवितकर    

C) किसन महाराज साखरे💬    

D) रामकृष्ण महाराज बोधले


4. जगात सर्वाधिक इंटरनेट ग्राहकांच्या बाबतीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

A) चीन 💬        

B) ब्राझील          

C) भारत          

D) अमेरिका


5. BIMSTEC या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A) 1991          

B) 1996        

C) 1997💬      

D) 1998


6. कोणता देश 29व्या " अबू धाबी आंतरराष्ट्रीय पुस्तक " मेळाव्याचा (ADIBF) " सन्माननीय पाहुणा " आहे?

A) बांग्लादेश        

B)  इराण          

C) भारत 💬        

D) पाकिस्तान


7. कोणत्या भारतीयास UN च्या सहाय्यक महासचिव तसेच संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमाच्या (UNEP) न्यूयॉर्क येथील कार्यालयाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केले गेले आहे?

A) सत्या त्रिपाठी💬        

B) प्रज्ञा झा        

C) शशी थरूर        

D) यापैकी नाही


8. भारतातील किती राज्यांमध्ये सध्या विधानपरिषद अस्तित्वात आहे?

A) पाच          

B) सहा          

C) सात💬        

D) आठ


9. कोणत्या हवाई वाहतूक कंपनीने नुकताच जैवइंधनावर विमान वाहतुकीचा  प्रयोग यशस्वी केला आहे?

A) इंडिगो        

B) स्पाइस जेट 💬    

C) एअर इंडिया        

D) गो एअर


10.  "अटल जी ने कहा" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A) नरेंद्र मोदी      

B) ब्रिजेंद्रा रेही 💬      

C) व्ही एस नाईक        

D) सत्येन्द्र अगरवाल



11. चर्चेत असलेली नाओमी ओसाका ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या देशाची आहे?

A) जपान 💬    

B) अमेरिका      

C) इंग्लंड      

D) सर्बिया


12. "अभयम-181" या नावाचे मोबाईल अॅप हे महिलांना सुरक्षा देण्याच्या हेतूने कोणत्या राज्य सरकारने लॉंच केले आहे?

A) गुजरात💬      

B) महाराष्ट्र      

C) मध्य प्रदेश    

D) तामिळनाडू


13. कम्युनिशंस कम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी एग्रीमेंट(COMCASA) हा करार खालील कोणत्या दोन देशात झाला?

A) भारत - फ्रान्स    

B) भारत - जपान      

C) जपान - अमेरिका    

D) भारत - अमेरिका💬


14. रंजन गोगोई हे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश असून ते सर्वोच्च न्यायालयाचे कितवी सरन्यायाधीश आहे?

A) 44      

B) 45      

C) 46💬    

D) 47


15. खालीलपैकी कोणत्या देशाने ' NOPE ' या मंगळ मोहिमेची घोषणा केली आहे?

A) इस्राईल      

B) यूएई 💬      

C) सौदी अरेबिया          

D) इराण


16. नुकताच निवृत्त झालेला क्रिकेटपटू ऍलिस्टर कुक हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

A) दक्षिण आफ्रिका        

B) ऑस्ट्रेलिया      

C) वेस्ट इंडिज      

D) इंग्लंड💬


17. भारतात प्रथमच भरविण्यात आलेल्या 'FIBA 3×3 world tour master' ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

A) बास्केटबॉल 💬      

B) बॉक्सिंग    

C) ब्रिज      

D) बॅटमिंटन


18.  भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये कोणत्या संघाला नमवत ब्राँझ पदक मिळविले?

A) जपान      

B) दक्षिण कोरिया    

C) पाकिस्तान💬    

D) फिलिपिन्स


19. "Moving on, moving forward : A year in office" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A) व्यंकय्या नायडू 💬    

B) रामनाथ कोविंद    

C) सुमित्रा महाजन    

D) अरुण जेटली


20. नुकतेच निधन झालेले आर्थर परेरा हे कोणत्या खेळाशी संबंधित होते?

A) बुद्धिबळ      

B) बॅटमिंटन      

C) फुटबॉल💬      

D) टेनिस


21. राज्य शासनातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत देण्यात येणारा 2016- 17 चा " तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम " या पुरस्कारात प्रथम क्रमांक कोणत्या ग्रामपंचायतीस मिळाला?

A) शेळगाव गौरी    

B) मन्याचीवाडी      

C) हिवरे बाजार 💬    

D) खाटाव


22. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी कोणास देण्यात आला?

A) विजय भटकर      

B) गिरीश प्रभुणे      

C)सुहास बहुळकर 💬        

D) यापैकी नाही


23. दुसरी "जागतिक हिंदू परिषद" कुठे पार पडली?

A) नवी दिल्ली        

B) लंडन        

C) शिकागो 💬      

D) न्यूयॉर्क



 1. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?

अ) ती प्रौढ मताधिकारावर आधारित न्हवती

ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती.

क) ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या

ड) ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे.

1.अ आणि ब

2. ब आणि क

3. अ आणि ड✅

4  वरील सर्व


2.खालीलपैकी कोणती सेवा अखिल भारतीय सेवा म्हणून गणली जात नाही

1. भारतीय प्रशासकीय सेवा 

2. भारतीय पोलीस सेवा

3. भारतीय विदेश सेवा✅

4. भारतीय वन सेवा


3.घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली?

1. सिमला परिषद

2. कॅबिनेट मशीन✅

3. क्रिप्स योजना

4.यापैकी नाही



4.राज्यपालांची नेमणूक कोण करतात?

1. पंतप्रधान

2. मुख्यमंत्री

3. राष्ट्रपती✅

4. उपराष्ट्रपती


5.खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

1.लोकसभेपेक्षा राज्यसभेला व्यापक अधिकार आहेत

2.राज्यसभेपेक्षा लोकसभेला व्यापक अधिकार आहेत✅

3. राज्यसभेचा कालावधी 6 वर्ष असतो

4. लोकसभा हे स्थायी सभागृह आहे.


6.राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?

1. राष्ट्रपती

2. पंतप्रधान

3 उपराष्ट्रपती✅

4. गृहमंत्री


7.भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यामागील मुख्य संकल्पना म्हणजे ......

1. कल्याणकारी राज्याची निर्मिती✅

2. समाजवादी व निधर्मी समाज रचना

3. व्यक्तीस्वातंत्र्याची हमी

4. मूलभूत हक्कांना बाधा पोहोचविण्यास प्रतिरोध


8.भारतीय राज्यघटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे?

1. भारतीय नियोजन आयोग

2. भारतीय निवडणूक आयोग

3. संघ लोकसेवा आयोग

4. भारतीय वित्त आयोग✅


9.वन हा विषय कोणत्या सुचितील आहे?

1. केंद्र

2. राज्य✅

3. समवर्ती

4. यापैकी सर्व


10.वार्षिक केंद्रीय आर्थिक अंदाजपत्रकाला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास ....

1. अंदाजपत्रक दुरुस्त करून फेरसादर केले जाते 

2. राज्यसभेचा अभिप्राय घेण्याकरिता पाठविले जाते 

3. राष्ट्रपतींचे अभिप्रायासाठी पाठविले जाते

4. पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.


प्रश्न 1 मातृत्व वंदना योजना महाराष्ट्रात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकचा ठरला आहे?

A  कोल्हापूर 

B  सातारा  

C  पुणे 

D  नाशिक 

उत्तर  2


प्रश्न 2  इम्रान खान हे पाकिस्तान या देशाचे 22 वे पंतप्रधान ठरले आहेत त्यांनी जो पक्ष स्थापन केला होता तेहरिक-ए-इन्साफ याची स्थापना पुढील पैकी केव्हा करण्यात आली होती?

A  14 ऑगस्ट 1993

B  16  जुलै  1996

C  22 एप्रिल 1996

D  16 ऑक्टोबर 1998

उत्तर  C


प्रश्न 3  पुढील विधाने अभ्यासा?

अ  इस्रोने 23 नोवेंबर 2018 रोजी तीस उपग्रह अवकाशात सोडले

ब 30 पैकी पंचवीस उपग्रह हे अमेरिकेचे आहेत

क या मोहिमेत भारतासह एकूण दहा देश सहभागी आहेत

वरीलपैकी कोणती विधान/ने सत्य आहे

1  फक्त अ

2  ब आणि  क

3  फक्त  क

4  अ आणि  ब

उत्तर  4


प्र 4  इसरो ने जे 30 उपग्रह सोडले त्यामध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही?

1  अमेरिका

2   जपान

3   स्पेन

4   नेदरलँड

उत्तर  2


प्र  5 हाइपर सपेक्ट्रल इमेजिंग सॅटॅलाइट हा उपग्रह कोणत्या  कोणत्या देशाने विकसित केला आहे?

1  फ्रांस

2  रशिया

3  भारत

4   चीन

उत्तर  3


प्र  6  इंडियन पोस्टल पेमेंट बँक ची सुरुवात प्रायोगिक तत्वावर खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू करण्यात आली होती?

1   पुणे

2   रांची

3  अलाहाबाद

4  लखनऊ

उत्तर  2


प्र  7   पुढील पैकी कोणती बँक ही ग्राहकांना क्रेडिट कार्ड सेवा पुरवत नाही?

1  बंधन बँक

2  देना बँक

3  महाराष्ट्र ग्रामीण बँक

4  पोस्टल पेमेंट बँक

उत्तर 4


8  वारसा यादीत पुढिलपैकी कोणत्या रेल्वेचा समावेश होत नाही?

1  निलगिरी

2  दार्जिलिंग

3  पठाणकोट

4  कलका

उत्तर  3


प्र  9  नुकतेच भारतीय रेल्वे ने कोणत्या देशाच्या रेल्वे सोबत करारावर हस्ताक्षर केले? 

1  चीन

2  रशिया

3  नेपाळ

4  म्यानमार

उत्तर  3


प्र  10  महाराष्ट्रत पहिला समलिंगी विवाह कोठे पार पडला?

1  नाशिक

2  नागपूर

3  यवतमाळ

4  पुणे

उत्तर 3 


१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?

१)विजयालक्ष्मी पंडित

२)हंसाबेन मेहता✅✅✅

३)सरोजिनी नायडू

4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही





२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?

१)२६जानेवारी१९५०

२)२६जानेवारी१९४९

३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅

५)२६नोव्हेंबर १९५०




३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?

१)डॉ बाबासाहेब आंबेडकर

२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅ 

३)पंडित नेहरू

४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते




४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?

१)दक्षिण आफ्रिका

२)अमेरिका

३)आयर्लंड ✅✅✅

४)वरीलपैकी एकही नाही 



५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे? 

१)सहावा

२)नववा✅✅✅

३) पाचवा

४)वरीलपैकी नाही




६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?

१)कलम ५१ब

२)कलम५१अ✅✅✅

३)कलम ५१क

४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही




७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?

१)उच्च न्यायालय

२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅

३)जिल्हा न्यायालय

४)कुटुंब न्यायालय




८.खालील पैकी संसद बरोबर काय?

१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा

२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल

३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅

४)मुळात अस काही नसतं




९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार  सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?

१)९ 

२)१०✅✅✅

३)११

४)यापैकी नाही



१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?

१)१०९✅✅✅

२)१०८

३)१०७

४)१०६




 ११.तिन्ही सेनादलाचे सर सेनापती हे असतात? 

१)सवरक्षण मंत्री 

२)गृहमंत्री

३)पंतप्रधान

४)राष्ट्रपती✅✅✅




१२.संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढता येत नाही?

१)हे विधान असत्य आहे

२)हे विधान सत्य आहे✅✅✅कलम 123 नुसार  (राष्ट्रपती काढता)

३)वरीलपैकी दोन्ही बरोबर

४)वरीलपैकी दोन्ही चूक




१३.उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना कोण शपथ देतात?

१)राष्ट्रपती

२)उपराष्ट्रपती

३)राज्यपाल✅✅✅

४)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश



१४.भारताचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (CAG)ची नियुक्ती राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करता?

१)१४७

२)१४८✅✅✅(केंद्राचे व राज्याचे जमाखर्च लेखे तपासणे

३)१४९

४)१५१




१५.सुचीमधील विषययाची क्रमानुसार योग्य पर्याय निवडा?

1.केंद्र सूची 

2.राज्य सूची 

3.समवर्ती सूची

१)५२,६१,१००

२)१००,६१,५२✅✅✅

३)६१,५२,१०० 

४)५२,१००,६१




१६.राज्यसभेच्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो.

हे विधान चूक की बरोबर

१)चूक 

२)बरोबर✅✅✅कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात

३)काही अंशी चूक 

४)वरील वाक्याचा खालील उत्तराशी तिळमात्र सम्बध  नाही




१७.खालील पैकी कोणाचा उल्लेख 'ग्रह मालिकेतील सूर्य 'असा केला जातो?

१)राज्यपाल 

२)राष्ट्रपती

३)पंतप्रधान✅✅✅

४)उपराष्ट्रपती




१८.भारत हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?

१)धर्मनिरपेक्ष

२) गणराज्य

३)समाजवादी

४)साम्यवादी✅✅✅




१९.भारतीय घटनादुरुस्ती चे अधिकार कोणास आहे?

१)सर्वोच्च न्यायालय

२)राष्ट्रपती

३)भारतीय जनता

४)कायदेमंडळ✅✅✅




२०.मतदानासाठी आवश्यक पात्राता वय २१वरून१८वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?

१)६२

२)६१✅✅✅

३)७१

४)८९

गाडगे महाराज




गाडगे महाराज (जन्म: फेब्रुवारी २३, १८७६- मृत्यु: २० डिंसेंबर १९५६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

बालपण :
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते.
डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

सामाजिक सुधारणा :
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्‍यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.

महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.

अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.
"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश "
गाडगेबाबा प्रबोधन काव्य
भुकेलेल्यांना = अन्न
तहानलेल्यांना = पाणी
उघड्यानागड्यांना = वस्त्र
गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
बेघरांना = आसरा
अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
बेकारांना = रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
दुःखी व निराशांना = हिंमत
गोरगरिबांना = शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!

संक्षिप्त चरित्र :-
गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले.
१९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.
१९२५- मुर्तिजापूर येथे गोरक्षण कार्य केले आणि धर्मशाळा व विद्यालय बांधले.
१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.
"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले.[१]
आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'
१९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
१९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.
गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत.
२० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.

गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते.

गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर :
१४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."
तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.

गाडगेबाबांचे विचार :
एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना...समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, " बिचार्‍या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ?

त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून ?"
पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते.. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज काय बी करा पण आम्हालाबी ब्राह्मण करा."

गाडगे महाराज यांच्यावरील पुस्तके :
The Wandering Saint (वसंत शिरवाडकर) - श्री गाडगे बाबा प्रकाशन समिती, मुंबई
आपले संत (एस.ए. कुलकर्णी) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९३)
कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे) -लोकवाड्मय गृह, मुंबई (१९९२)
गाडगेबाबा (वसंत पोतदार) -अक्षर प्रकाशन, मुंबई (१९९९)
गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी) - विजयश्री प्रकाशन, अमरावती (१९९३)
गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार) -योगेश प्रकाशन, पुणे (१९९३)
दिव्याला गाडगे महाराज (गो. भट) -नवलवय मुद्रणालय, अहमदाबाद (१९८२)
मानवता के पुजारी संत श्री गाडगे बाबा (स्यमंत सुधाकर) -गाडगेबाबा प्रकाशन समिती, मुंबई (१९९०)
मुलांचे गाडगेबाबा (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला कोल्हापूर (१९९२)
लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
लोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य (द.ता. भोसले) -ग्रंथाली, मुंबई (२००७)
श्री. संत गाडगे महाराज (मधुकर केचे) -साकेत प्रकाशन, औरंगाबाद (२००४)
श्री. संत गाडगे महाराज (गो.नी. दांडेकर) -मॅजेस्टिक, प्रकाशन मुंबई (१९९५)
श्री. संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पा.बा. कवडे) -अण्णासाहेब कोरपे चॉरिटेबल ट्रस्ट, अकोला (१९९४)
श्री. गाडगे महाराज गौरव ग्रंथ (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
श्री. गाडगे महाराज शेवटचे कीर्तन (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९५)
श्री. गाडगेबाबांचे विचार (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला, कोल्हापूर (१९९६)
श्री. गाडगेबाबांची पत्रे (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९१)
श्री. संत गाडगेबाबा विचार धन (ह.रा. हिवरे) -नारायणराव अमृतराव लभडे प्रकाशन (१९९९)
संत गाडगे महाराज (डॉ. श्याम दयार्णव कोपर्डेकर) - (१९९६)
संत गाडगे बाबांच्या आठवणी (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)

संकीर्ण :
डेबू हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.
देवकीनंदन गोपाळा हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.

पुरस्कार :
गाडगेबाबा यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान चालवले जाते. त्यांच्या नावाने काही पुरस्कारही देण्यात येतात.
१. महाराष्ट्र सरकारतर्फे गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार
२. पिंपरी शहर लॉन्ड्री संघटनेचे (अ) राष्ट्रसंत गाडगेबाबा सामाजिक जाणीव पुरस्कार.(ब) राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...