Tuesday, 7 February 2023

पवन ऊर्जा

पवन ऊर्जानिर्मिती मागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पृथ्वीवरील वातावरण होय. पृथ्वीवर विषुववृत्ताच्या जवळपास चा भाग तापलेला असतो, तर ध्रुवीय भाग थंड असतो यामुळे हवेच्या दाबामध्ये फरक पडतो आणि हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते

पूर्वीपासून या पवन उर्जेचा उपयोग जहाजांना दिशा देण्यासाठी धान्य दळण्यासाठी विहिरीतून पाणी काढण्यासाठी केल्या जात जायचा आता पवन ऊर्जेचे उपयोग वीजनिर्मितीसाठी केला जात आहे लहान मुलांचे आवडते खेळणे म्हणजे फिरकी ही firki पवनचक्की निर्मितीचे निमित्त ठरले एका अंदाजानुसार जगामध्ये पवन ऊर्जेपासून दर वर्षी 1750 ते 2200 हजार अब्ज व्हॉट इतक्या प्रचंड प्रमाणात वीज निर्मिती होऊ शकते हे प्रमाण पृथ्वीवरील आजच्या एकून ऊर्जावापराच्या 2.7 पट आहे

ज्या क्षेत्रामध्ये पवनचक्क्या मोठ्या प्रमाणात असतात त्या क्षेत्राला पवनचक्क्यांची शेती किंवा पवन ऊर्जेची शेती असे म्हटले जाते भारतातील सर्वात मोठे पवन ऊर्जा क्षेत्र तामिळनाडू कण्याकुमारी जवळ आहे मार्च 2017 अखेर भारतातील पवन ऊर्जेचे उत्पादन क्षमता 32.3 GW (32287 मेगावॉट झालेली आहे

पवन ऊर्जा वापरातील मर्यादा

पवन ऊर्जा निर्मितीसाठी ज्या ठिकाणी सातत्याने वारा वहात असेल अशाच ठिकाणी प्रकल्प उभारला उभारता येतो

पवनचक्कीच्या प्रभावी वीज निर्मितीसाठी वाऱ्याची चाल 15 किलोमीटर परावाळ किमान असली पाहिजे परंतु इतकी चाल सातत्याने नसते

एक मेगावॅट इतक्या प्रमाणात वीज निर्मिती करावयाची असेल तर िमान दोन हेक्‍टर एवढे क्षेत्रावर पवन उर्जा शेती असावी

पवन ऊर्जा प्रकल्प उभारणी आर्थिक दृष्ट्या महाग आहे

वादळी पाऊस भूकंप ऊन पाऊस यामुळे पवनचक्कीचे पाती तुटल्यास पुनर्उभारणी खूप महाग असते

पवन ऊर्जा प्रकल्पामुळे पावसावर परिणाम होतो

भारतातील पवन ऊर्जा

31 डिसेंबर 2014 अखेर भारतातील पवन ऊर्जेचे उत्पादन क्षमता 22462 मेगावॉट झालेली आहे पवन ऊर्जा बाबतची अमेरिका जर्मनी स्पेन नंतर भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो परंतु 2017 अखेर ही क्षमता 32 हजार मेगावॅट पेक्षा जास्त आहे
2 पवन ऊर्जेच्या संशोधन व तंत्रज्ञान यासाठी चेन्नई येथे C-WET (Centre for Wind Energy Technology) उभारण्यात आलेले आहे

3 सध्या तामिळनाडू सर्वाधिक पवन ऊर्जानिर्मिती केंद्रे आहेत तामिनाडू पवन ऊर्जा निर्मितीत आघाडीवर असून तेथून 51% पवन ऊर्जानिर्मिती होते अधिक क्षमतेचे पवन ऊर्जा केंद् महाराष्ट्रातील वनकुसवडे  जिल्हा सातारा येथे असून त्याची स्थापित क्षमता 259 मेगावॉट आहे धुळे जिल्ह्यातील ब्राह्मणवेल येथे 545 मेगावॉट क्षमतेचे सर्वात मोठा पवन ऊर्जा केंद्र उभारले जात आहे

4 भारतात पाहणीनुसार 1 0 2 788 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती पवनऊर्जेतून निर्माण होऊ शकते

3 सागरी ऊर्जा लाटांपासून ऊर्जा

चंद्राच्या आकर्षणामुळे समुद्राच्या पृष्ठभागाची उंची कमी-जास्त होते त्यामुळे लाटांची निर्मिती होते या लाटांपासून ऊर्जा निर्मिती करता येते चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा गुरुत्व बलामुळे उंच लाटांची निर्मिती होते तसेच गुरुत्व बल कमी झाल्यावर कमी उंचीच्या लाटा निर्माण होतात लाटांच्या या उसळल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर

मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते ठिकाणी समुद्र रुंद असतो त्याठिकाणी धरणाची उभारणी करून विज निर्मिती करता येते

त्यांची उंचीही नेहमी टर्बाइन्स फिरणे इतपत असेलच असे नाही त्यामुळे काही मर्यादित ठिकाणीच अशा धरणांची उभारणी करता येते यामुळे लाटांपासून वीजनिर्मिती हा खूप मोठा पर्याय ठरत नाही

शेरिफ/नगरपाल



- ब्रिटिशांच्या राज्यव्यवस्थेमधील एक महत्त्वाचे शासकीय पद.
- नॉर्मन लोकांनी इ. स. १०६० मध्ये संपूर्ण इंग्लंड पादाक्रांत करण्याच्या आधीपासून इंग्लंडमध्ये परगणे, महानगरे व इतर शहरांसाठी शेरीफ या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येई व आजतागायत हे पद भारतातही कायम आहे
- पारंपरिक दृष्टीने प्रतिष्ठेचे परंतु दिखाऊ स्वरूपाचे अराजकीय स्वरूपाचे मानद पद आहे.
- सध्या भारतातील तीन शहरात हे पद अस्तित्वात आहे, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता
- शहराच्या महापौरांच्या खालोखाल या पदाचा मान असतो

● मुंबईचा शेरिफ/नगरपाल

- मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालयाची स्थापना लेटर्स पेटंट ॲक्ट 1823 अनुसार झाली. मुंबईचे शेरिफ (नगरपाल) कार्यालयाचे कामकाज लेटर्स पेटंट ॲक्ट, 1823 अनुसार तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई नियम व नगर दिवाणी व सत्र न्यायालय, नियमानुसार चालते.
- मुंबईचे पहिले शेरिफ भाऊ दाजी लाड होते

● नेमणूक & पदावधी

- मुंबईचे नगरपाल (शेरिफ) यांची नियुक्ती महाराष्ट्राचे राज्यपाल मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शिफारसीनुसार करतात. मुंबईचे नगरपाल (शेरिफ) यांचा नगरपाल (शेरिफ) पदाचा कालावधी एक वर्षाचा (20 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत) असतो.

● कर्तव्ये व जबाबदाऱ्या

- मुंबईचे नगरपाल (शेरिफ) हे पद 1897 पासून मानद स्वरुपाचे आहे.
- शेरीफ हे सार्वजनिक समारंभात कार्यशील असल्याने, जेव्हा जेव्हा शासनाकडून विनंती केली जाते, तेव्हा तेव्हा विशेष मान्यवर व्यक्तींचे ते मुंबई विमानतळावर स्वागत करतात व निरोप देतात.
- मुंबईच्या जीवनातील सर्व क्षेत्रातील बहुसंख्य नागरिकांनी जर तशा प्रकारचे निवेदन दिल्यास, प्रमुख नागरिकांच्या झालेल्या निधनाबददल शोक व्यक्त करण्यासाठी मुंबईतील शहरवासियांच्या सार्वजनिक शोकसभासुध्दा बोलावतात.
- मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई यांच्या विनंतीनुसार मुंबईचे नगरपाल (शेरिफ) मुंबईतील तुरुंगाना भेटी देतात.
- मुंबई शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले योगदान देतात.

● नगरपाल कार्यालयाचे कामाचे स्वरुप

- मुंबईच्या शेरिफांचे कार्यालय हे आदेशिका बजाविणारे आणि अंमलबजावणी करणारे खाते असून ते उच्च न्यायालय व शहर दिवाणी न्यायालय, मुंबई, सहकार न्यायालय, मोटार अपघात दावा प्राधिकरण यांनी काढलेली समन्स, नोटीसा आणि अधिपत्रे बेलीफांमार्फत बजावते आणि त्यांची अंमलबजावणी करते.
- डिक्रीधारकांनी दाखल केलेल्या हुकूमनाम्याची अंमलबजावणी करताना स्थावर व जंगम मिळकत जप्त करुन हुकूमनाम्यांची वसुली सार्वजनिक लिलाव करुन करते.
- हे कार्यालय उच्च न्यायालयाने काढलेल्या आदेशिका यावर फी गोळा करते व उच्च न्यायालयाच्या हुकूमनाम्याच्या वसुलीवर 1% वटणावळ वसूल करते.
- मुंबईचे शेरिफ कार्यालयाचे कार्यक्षेत्र कुलाबा ते मुलुंड, कुलाबा ते मानखुर्द, कुलाबा ते दहिसर पर्यंत आहे. परंतु, मा. न्यायालयांच्या आदेशानुसार हया कार्यालयातील बेलिफांना दिवाणी खटल्यांत प्रोसेसची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई बाहेर तसेच राज्याबाहेर सुध्दा जावे लागते.
- नौअधिकरण क्षेत्राखाली शेरीफ, जहाजे व जहाजी मालमत्ता अटकाव व सुटका करण्याच्या मा. उच्च न्यायालयाच्या अधिपत्रांची अंमलबजावणी करतात व विक्रीची अधिपत्रे काढण्यात आली असतील तर ते जहाज किंवा जहाजीमाल यांचा शेरिफ जाहिर लिलाव करतात.
- नौअधिकरण क्षेत्राखाली उच्च न्यायालयाने काढलेल्या आदेशिका यांची बजावणी त्यांच्याकडून होते व त्याकरिता एकूण मिळालेल्या रकमेच्या 1% वटणावळ महसूल स्वरुपी शासनाच्या तिजोरित जमा करतात.

महत्त्वाचे 10 प्रश्न उत्तरे


1) कोणाच्या शिफारशी शिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही.

A) मुख्यमंत्री

B) राज्यपाल✔️✔️

C) राष्ट्रपती

D) विधानसभा अध्यक्ष




2) भारतीय रेल्वे संदर्भात कोणते विधान सत्य आहे.

अ) रेल्वे वाहतुकीचा बाजार हिस्सा  थोडाच वाढला आहे

ब) अपुरे  क्षमता जाळे आणि पायाभूत सुविधा या समस्यांचा रेल्वे सामना करावा लागतो.


पर्याय:-

A) अ, ब दोन्ही बरोबर

B) अ , ब दोन्हीं चुक

C) अ बरोबर

D) ब बरोबर✔️✔️




3) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते.

A) केंद्र शासन

B) राज्य शासन

C) केंद्र आणि राज्य शासन दोन्ही✔️✔️

D) वरीलपैकी नाही.




4 ) सन 2011 मध्ये साक्षरता दरासंदर्भात खालील राज्यांची घटत्या  क्रमाने मांडणी करा.

अ) पश्चिम बंगाल

ब) महाराष्ट्र

क) हिमाचल प्रदेश


A) अ, ब,क

B) क, ब, अ✔️✔️

C) ब, क, अ

D) ब , अ, क




5) कोणते विधान बरोबर आहे.

अ) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिम 2015 मध्ये सुरू करण्यात आली.

ब) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेचा हेतू आणि कुटुंबकल्याण कार्यक्रमाना बळकटी देणे हा आहे.

A) अ बरोबर

B) ब बरोबर ✔️✔️6

C) अ ,ब दोन्ही बरोबर

D) अ, ब दोन्ही चूक




6) पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे.

अ) भारतातील सर्व खेडी सर्व हवामान रस्त्यांनी जोडण्याचे उद्दिष्ट दहाव्या पंचवार्षिक योजनेत होते.

ब) राष्ट्रीय व राज्य रस्ते किमान दुमार्गी श्रेणीचे करायचे हे 12 व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे.

A) अ

B) ब

C) अ , ब दोन्ही बरोबर✔️✔️

D) एक ही नाही





7) भारत निर्माण कार्यक्रम 2005 या ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कोणत्या  आहेत.

अ) जलसिंचन व ग्रामीण रस्ते

ब) ग्रामीण निवारा

क) ग्रामीण पाणीपुरवठा

ड) ग्रामीण विद्युतीकरण

इ) ग्रामीण दूरध्वनी


A) ब ,क, ड

B) अ, ब, क, ड

C) अ, क, ड, इ

D) अ, ब, क, ड, इ✔️✔️





8) सन 2009 साठी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट परिषदे ने 5-15  दशलक्ष प्रवासी वाहतूक हाताळणाऱ्या  विमानतळा मध्ये कोणत्या विमानतळा जगातील उत्कृष्ट म्हणून गौरविले आहे.

A) एअरपोर्ट नवी दिल्ली

B) एअरपोर्ट मुंबई

C) एअरपोर्ट शमशाबाद हैदराबाद

D) एअरपोर्ट बेंगलोर





9 ) सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मितीत खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वीजनिर्मितीचा वाटत सर्वाधिक आहे.

अ) जलविद्युत

ब) औण्विक विद्युत

क) अनुउर्जा

ड) पवन ऊर्जा


A) फक्त अ

B) फक्त ब✔️

C) अ आणि ब

D) अ, ब, ड, क





10) ग्रामीण भागात शहरी सुखसोयी चे प्रावधान हे पुढील पैकी कोणाचे ग्रामीण भारताच्या प्रवक्ता त्यांचे स्वप्न आहे.

A) डॉ. मनमोहन सिंग

B) डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम✔️

C) सी रंगराजन

D) डॉ. अमर्त्य सेन



१) पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रिडा स्पर्धा २०२० मध्ये किती वर्षांखालील खेळाडूंना स्थान देण्यात आले होते ?

अ) २५ वर्षांखालील ✅✅

ब) १७ वर्षांखालील

क) २३ वर्षांखालील

ड) २१ वर्षांखालील


२) शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो ?

अ) ५ मार्च

ब) १ मार्च ✅✅

क) ६ मार्च

ड) २ मार्च


३) खालीलपैकी कोणाची केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?

अ) डॉ. राजीव कुमार

ब) सुनील अरोरा

क) सामंत गोयल

ड) विमल जुल्का ✅✅


४) मिताग नावाचे चक्रीवादळ आॅक्टोबर २०१९ मध्ये कोणत्या देशात आले होते ?

अ) तैवान ✅✅

ब) चीन

क) जपान

ड) रशिया


५) मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

अ) जलसंवर्धन

ब) जलसिंचन

क) लसीकरण ✅✅

ड) कृत्रिम पाऊस


जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत


  🎯  सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.


🔰 1. सत्व – अ  


शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस


🔰 2. सत्व – ब1


शास्त्रीय नांव – थायमिन  

उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – बेरीबेरी

स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,


🔰 3. सत्व – ब2


शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे


🔰 4. सत्व – ब3


शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी


🔰 5. सत्व – ब6  


शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या


🔰 6. सत्व – ब10  


शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत


🔰 7. सत्व – क  


शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  

उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि


🔰 8. सत्व – ड  


शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  

उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे


🔰 9. सत्व – इ  


शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल

उपयोग – योग्य प्रजननासाठी  

अभावी होणारे आजार – वांझपणा

स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या


🔰 10. सत्व – के 

 

शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  

उपयोग – रक्त गोठण्यास मदत

अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही

स्त्रोत – पालेभाज्या व कोबी



गोवा (Goa)


- 19 डिसेंबर 1961 पोर्तुगीज वसाहतीकडून स्वतंत्र. 

- 30 मे 1987 पर्यंत दमण व दीव या केंद्र शासित प्रदेशाचा भाग होते.

- भारतीय संघराज्याचे 25 वे राज्य.

- राजधानी: पणजी

- सर्वात मोठे शहर: वास्को दी गामा

- अधिकृत भाषा: कोंकणी

- क्षेत्रफळ: 3702 चौकिमी (भारत 29 व्या क्रमांकावर)

- दोन महसुली जिल्हे: उत्तर गोवा & दक्षिण गोवा

--------------------------------------------------------------

● लोकसंख्या (2011 नुसार)


- एकूण लोकसंख्या: 1458545 (भारतात 26 व्या क्रमांकावर)

64.68% हिंदू, 

29.86% ख्रिश्चन, 

5.25% मुस्लिम


- लिंग गुणोत्तर: 973

- लोकसंख्या घनता: 364

- साक्षरता: 88.70% (भारतात तिसर्‍या क्रमांकावर)

------------------------------------------------------------

● राजकीय (Political Goa)


- एक सभागृहीय राज्य विधिमंडळ: विधानसभा 40 जागा

- राज्यसभा: 1 जागा

- लोकसभा: 2 जागा

- राजकीय पक्ष: भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फाॅर्वड

-----------------------------------------------------------

● मुख्य व्यवसाय


- शेती: भात, नारळ

- खाणकाम

- पर्यटन


Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...