Friday, 20 January 2023

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....


◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली❓

   - लॉर्ड हार्डींग्ज पहिला


◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते❓

   - बॉम्बे हेराॅल्ड.


◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती❓

   - मुस्लिम लीग


◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?

   - 1780 ची पाल्लुतुरची लढाई 


◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी❓

   - लॉर्ड कॅनिंग 


◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.

   - बंगाल प्रांतात


◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री❓

   - लॉर्ड स्टैनले


◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये❓

   - 34 वी एन. आय. रजिमेंट 


◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते❓

   - कलकत्ता विद्यालय

महाराष्ट्र प्राथमिक माहिती


🌸लांबी:-


🔴पर्व-पश्चिम:-800 किमी


🔴उत्तर-दक्षिण:-720 किमी


⭕️महाराष्ट्र चा पूर्व पश्चिम विस्तार दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे.


🌸अक्षवृत विस्तार:-


🔴15°46 उत्तर ते 22°06 उत्तर


🌸रखावर्त विस्तार:-


🔴72°45 पूर्व ते 80°54 पूर्व


🌷भारत प्राथमिक माहिती🌷


🌸लांबी:-


🔴पर्व-पश्चिम:-2933 किमी


🔴दक्षिण-उत्तर:-3214 किमी


⭕️भारताचा दक्षिण-उत्तर विस्तार पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा अधिक आहे.


🌸अक्षवृत विस्तार:-


🔴8°28 उत्तर ते 37°53 उत्तर


🌸रखावर्त विस्तार:-


🔴68°33 पूर्व ते 97°47 पूर्व


⭕️अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तारात या दोन्ही मध्ये 29° चा फरक आढळतो.


15 वा वित्त आयोग



📍लक्ष्यात ठेवा 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


अध्यक्ष:एन के सिंग, =  सचिव: अरविंद मेहता 

स्थापना:नोव्हेंबर 2017 =अहवाल : नोव्हेंबर 19

 


» मुख्य शिफारस - राज्यांचा वाटा 42% वरून 41 % करावा


» करातील वाट्यानुसार राज्ये 

१. उत्तरप्रदेश - 17.9%

२. बिहार 10%

३. मध्यप्रदेश 7.9

४. पश्चिम बंगाल 7.5

५. महाराष्ट्र - 6.1( 5.5 वरून 6.1) (0.6 ची वाढ झाली )


» सर्वात शेवटचे राज्य - सिक्कीम - 0.388


» करातील वाटा ठरवण्यासाठी खालील आधार ठरवण्यात आले

१. लोकसंख्या : 15%

२. क्षेत्रफळ     : 15%

३. वने आणि पर्यावरण : 10%

४. उत्पन्न तफावत : 45 %

५. लोकसंख्या कामगिरी : 12.5%

६. कर प्रयत्न : 2.5 %

MPSC गट ब आणि गट क संयुक्त जाहिरात २०२३ प्रसिद्ध.

 ⭕️♦️⚠️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.


👇👇👇


01) PSI :- 374

02) STI :- 159

03) ASO :- 70

04) SR :- 49 

05) Clerk :- 7035

06) Tax asst :- 468

07) Excise:- 05

08) Technical asst :- 01

09) Industrial:- 00

10) AMVI :- 00


🛑 ऐतिहासिक ७,०३५ क्लर्क ची पदे


🛑 एकूण पदे : ८,१६९ पदे


👉 परीक्षा दिनांक:- 30 एप्रिल 2023

घटना आणि देशातील पहिले राज्य

◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश


◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू


◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान


◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान  


◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड


◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा


◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश


◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश


◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ 


◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब


◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक


◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक


◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश


◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू


◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)


◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र 


◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून) 


◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड


◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश

भारतातील पहिल्या महिला

 १ दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती  रझिया सुलताना ( १२३६ )


२ भारतीय राष्ट्रीय सभेच्या  पहिल्या महिला अध्यक्षा  ॲनी बेझंट ( १९१७ कलकत्ता अधिवेशन)


३ युनोच्या आमसभेचे अध्यक्ष पद भूषविणारी पहिली भारतीय महिला विजयालक्ष्मी पंडित ( १९५३ )


४ पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू 


५ भारताची परदेशातील पहिली महिला राजदूत सी. बी़ मुथाम्मा


६ केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद भूषविणारे पहिली महिला राजकुमारी अमृत कौर


७ भारताच्या रशियातील पहिल्या महिला राजदूत विजयालक्ष्मी पंडित


८ पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (२०१४) 


९ उच्च न्यायालयात नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला न्यायाधीश  ॲनी चंडी ( ६ फेब्रुवारी १९५९)


१० भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी 


११ भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी (१९६२ – ६७, उत्तर प्रदेश) 


१२ भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय (महिला) अध्यक्षा  सरोजिनी नायडू ( १९२५ )


१३ लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक  अवनी चतुर्वेदी, भावना कंठ, मोहना सिंह


१४ एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतातील (जगातील) अपंग महिला  अरुनिमा सिन्हा 


१५ इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला आरती साहा (गुप्ता) 


१६ पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त  व्ही एस रामादेवी


१७ मोनोरेल चालविणारी पहिली महिला जुईली भंडारे 


१८ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषविणारी पहिली महिला न्या. लैला शेठ (हिमाचल प्रदेश- 1991) 


१९ भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर  कल्पना चावला (१९९७)


२० पहिल्या महिला आयएएस अधिकारी  अन्ना राजन जॉर्ज 


२१ एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला  प्रा. बचेंद्री पाल


२२ सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश न्या. मीरासाहिब फातिमाबिबी (१९८९)


२३ पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी (१९७२)


२४ नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या महिला मानकरी  Pahili Mahila मदर तेरेसा (१९७९)


२५ भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय माहिती आयुक्त दीपक संधू


२६ भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय अध्यक्षासरोजिनी नायडू(1925)२७पहिली २७ महिला राष्ट्रपतीश्रीमती. प्रतिभाताई पाटील.

महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे

 ◆ दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी

◆ विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी

◆ कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन

◆ त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी

◆ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत

◆ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार

◆ नारायण मुरलीधर गुप्ते - बी

◆ चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू

◆ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम

◆ गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी

◆ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज

◆ माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस

◆ दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी

◆ यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी

◆ सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व

◆ श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व

◆ नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास

◆ बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी

◆ सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार

◆ शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर

◆ ना. धो. महानोर - रानकवी

◆ न. चि. केळकर - साहित्यसम्राट

◆ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन

◆ काशिनाथ हरी मोडक - माधवानुज

◆ हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी

━━━━━━━━━━━━━━━━━━━


महत्वाच्या जागतिक संघटना व त्यांचे प्रमुख :-


◆  संयुक्त राष्ट्रसंघ  —  एंटोनियो गुटेरेस


◆ आंतरराष्ट्रीय न्यायालय — जोआन  दोनोग


◆ जागतिक व्यापार संघटना — न्गोज़ी ओकोंजो-इवेला


◆  जागतिक कामगार संघटना — गिल्बर्ट होंगबो


◆ जागतिक आरोग्य संघटना — टेड्रोस अधानोम गेब्रेयसस


◆ जागतिक बँक — डेव्हिड मालपास


◆ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी — क्रिस्टालिना जॉर्जिव्हा


◆ ओपेक संघटना — हैथम अल-घैसी


◆ आशियाई विकास बँक - मासात्सुगु असाकावा


◆ युरोपियन युनियन — उर्सुला वॉन डेर लेयेन


◆ आशियान संघटना — लिम जॉक होई


◆ सार्क संघटना — एसाला रुवान वीराकून


◆ युनेस्को — ऑड्रे अज़ोले


◆ युनिसेफ — कैथरीन रसेल


◆ आयसीसी — ज्योफ ॲलार्डिस


◆ ऑलिम्पिक समिती  — थॉमस बक


◆ इंटरपोल — अहमद नासर अल-रईसी



ग्रहांविषयी महत्त्वाची माहिती


🔹सर्वात मोठा ग्रह - गुरु


🔸सर्यमालेतील सर्वात लहान ग्रह-  बुध


🔹पर्वेकडून पश्चिमकडे परिवलन करणारे ग्रह- शुक्र व युरेनस


🔸 पश्चिमकडून पूर्वेकडे परिवलन -  बुध, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून


🔹सर्वात प्रकाशमान ग्रह - शुक्र


🔸लाल ग्रह-/धुलीकामय ग्रह -  मंगळ


🔹सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा ग्रह - शुक्र.


🔸पहुडलेला किंवा घरंगळत जाणारा ग्रह - युरेनस 


🔹सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह - गुरु 


🔸सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह - शुक्र 


🔹सूर्यापासून अंतरानुसार ग्रह -  बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून


🔸आकारानुसार उतरत्या क्रमाने - गुरु,शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, शुक्र, मंगळ, बुध.


🔹पृथ्वीपासून अंतरानुसार ग्रहांचा क्रम -  शुक्र, मंगळ, बुध, गुरु, शनी, युरेनस, युरेनस, नेपच्यून

सामान्य ज्ञान


1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?

उत्तर-  सोलापूर


2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?

उत्तर- अहमदनगर


3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर- 21 जून


4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?

उत्तर- 1761


5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?

उत्तर- 22 जुलै 1947


6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?

उत्तर-जेम्स वॅट


7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- तेलंगणा


8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर-औरंगाबाद


9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?

उत्तर- बहिणाबाई चौधरी


10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ?

उत्तर- ध्वनीची तीव्रता

जगातील सर्वात उंच 10 शिखर


(1)......माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) 

🔹8848 मीटर उंच.


(2)..... माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) 

🔹8611 मीटर उंच.


(3).... कांचनगंगा (भारत ) 

🔹8586 मीटर उंच.


(4)...... ल्होत्से (नेपाळ)

🔹8516 मीटर उंच.


(5)...... मकालू (नेपाळ)

🔹8463 मीटर उंच 


(6).......चो ओयू (नेपाळ) 

🔹8201 मीटर उंच.


(7).......धौलागिरी (नेपाळ) 

🔹8167 मीटर उंच.


(8).......मानसलू (पश्चिम नेपाळ) 

🔹8163 मीटर उंच


(9).....नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) 

🔹8125 मीटर उंच.


(10).....अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ)

🔹8091 मीटर उंच.


(11).....गशेरब्रु( हिमालय)

🔹8068 मीटर उंच.


(12).....ब्रॉड पिक (बाल्टिस्तान)

🔹8051 मीटर उंच.


(13)...... गशेरब्रूम --2

🔹(हिमालय) 8035 मीटर उंच


(14)..... शिशापंग्मा (तिबेट)

🔹8027 मीटर उंच.


जगातील 8 हजाराहून उंच अशी 14 हिमशिखरे आहेत ही सर्व शिखरे सर करणारे आज जगात केवळ 27 गिर्यारोहक आहेत.

जनरल नॉलेज (सा.ज्ञान)


🔸१) हवाई बेटे कोणत्या महासागरात आहेत ? 

- उत्तर पॅसिफिक


🔹२) उत्तर समुद्र आणि बाल्टिक समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता ?

- किएल कालवा


🔸३) कोणत्या सामुद्रधुनीमुळे आशिया खंड उत्तर अमेरिकेपासून वेगळे झाले आहे ? 

- बेरिंगची सामुद्रधुनी


🔹४) अल्मा-अटा हे कोणत्या देशाच्या राजधानीचे शहर आहे ?

- कझाकिस्तान


🔸५) पीत समुद्र कोणत्या महासागरात आहे ?

- उत्तर पॅसिफिक




🔸१) न्यूयॉर्क हे बंदराचे शहर आहे असे विधान केल्यास .... ते ठरेल.

- बरोबर


🔹२) कोणत्या धातूला 'मेटल ऑफ होप' म्हणून ओळखले जाते ?

- युरेनिअम 


🔸३) कोणत्या देशास युरोपचे क्रीडांगण म्हणून ओळखले जाते ? 

- स्वित्झर्लंड


🔹४) मुख्यत्वे तिबेटमध्ये आढळणारा प्राणी कोणता?

- याक


🔸५) हरमिट किंग्डम म्हणून कोणता देश ओळखला जातो ?

- कोरिया



🔸१) महाराष्ट्रातील .... हा जिल्हा अलीकडील काळात द्राक्षोत्पादनात अग्रेसर ठरला आहे.

- सांगली


🔹२) .... हा जिल्हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्याचा एक भाग होता.

- गडचिरोली


🔸३) 'महाबळेश्वर' व 'पाचगणी' ही थंड हवेची ठिकाणे सातारा जिल्ह्यात आहेत; तर तितकेच प्रसिद्ध असलेले 'माथेरान' हे थंड हवेचे ठिकाण .... या जिल्ह्यात आहे.

- रायगड


🔹४) औष्णिक विद्युत्केंद्रासाठी प्रसिद्ध असलेली 'कोराडी' व 'खापरखेडा' ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात मोडतात ?

- नागपूर


🔸५) 'कळसूबाई' हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वतशिखर .... या जिल्ह्यांच्या सीमेवर आहे.

- अहमदनगर व नाशिक



🔸१) सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन होत असतानाच मूळच्या द्वैभाषिक राज्यातून .... हेही स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.

- गुजरात


🔹२) .... जिल्ह्यातील तेरेखोलची खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचेही अगदी दक्षिणेकडील टोक होय.

- सिंधुदुर्ग


🔸३) गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यांची सरहद्द... या राज्यास भिडलेली आहे. 

- तेलंगाणा


🔹४) महाराष्ट्राच्या पूर्वेस व काहीशा ईशान्येस .... हे राज्य आहे.

- छत्तीसगढ


🔸५) महाराष्ट्राच्या आग्नेयेस असलेले राज्य ....

- तेलंगाणा



🔸१) कच्च्या फळाची कडू किंवा आंबट चव कशाच्या तीव्रतेमुळे येते ?

- सेंद्रिय आम्ले


🔹२) दुधाचे दही होते तेव्हा कोणते आम्ल तयार होते ?

- लॅक्टिक आम्ल


🔸३) कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे पर्निशिअस अॅनिमिया हा रोग होतो ? 

- 'ब-१२' जीवनसत्त्व


🔹४) 'सायनाईड' हे विष म्हणून थेट कोणत्या घटकावर परिणाम घडवते ? 

- हृदय व श्वसन संस्था


🔸५) डोळ्यांचे आरोग्य नीट राखण्यासाठी कोणत्या जीवनसत्त्वाचा उपयोग होतो ?

- 'अ' जीवनसत्त्व



1) भारताचे संरक्षण, अणुऊर्जा, रेल्वे, खाणी, आयकर हे विषय घटनेच्या परिशिष्ट सातमधील कोणत्या सूचीत नमूद केलेले आहेत ?

- केंद्र सूची


2) शिक्षण, कुटुंबकल्याण, वीज, वने हे विषय घटनेच्या परिशिष्ट सातमधील ------------- मध्ये दिलेले आहेत.

- समवर्ती सूची


3) पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक आरोग्य हे विषय घटनेच्या परिशिष्ट सातमधील ------------------ मध्ये नमूद केलेले आहेत.

- राज्य सूची


4) राष्ट्रपती जेव्हा -------------  या कलमान्वये आणीबाणी पुकारतात तेव्हा घटनेतील एकोणिसावे कलम व त्यात अंतर्भूत असलेली सहा स्वातंत्र्ये आपोआपच रद्दबातल ठरतात.

- 352


5) भारताच्या घटना समितीचे वैधानिक सल्लागार म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल ? 

- डॉ. बी. एन. राव


🔸१) हाडे व दात यांच्या योग्य बांधणीसाठी कोणते जीवनसत्त्व आवश्यक आहे ?

- 'ड' जीवनसत्त्व


🔹२) डोळ्यातील भिंग (नेत्रस्फटिक) धूसर होते, तेव्हा त्या रोगास ..... म्हणतात. 

- मोतीबिंदू


🔸३) जखमा लवकर बऱ्या करण्याचे कार्य .... या जीवनसत्त्वाद्वारे होते.

- 'के' 


🔹४) उतींमध्ये पाण्याचे संचयन कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होते ?

- 'ब' जीवनसत्त्व


🔸५) गोवर होऊन गेल्यावर साधारणतः किती काळ शरीरावर चट्टे दिसतात ? 

- एक दिवस