Saturday, 23 December 2023

एस. पी. गुप्ता कार्यदल-१९९९


▪️नियोजन आयोगाचे तत्कालीन सदस्य एस. पी. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली २० मे १९९९ ला लघुउद्योगांच्या विकासासाठी या अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली.


✍️शिफारसी  पुढीलप्रमाणे -


१) लघुउद्योगांची रचना ही त्रिस्तरीय म्हणजेच यामध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम अशी रचना असावी, तसेच लघुउद्योग क्षेत्राकरिता एकच वैश्विक कायदा असावा अशी शिफारस केली.


२) लघुउद्योगांना त्यांच्या उत्पादनामध्ये ५० लाख रुपयांपर्यंतच्या उत्पादनावरील उत्पादन शुल्कामध्ये सूट देण्यात येते. यामध्ये वाढ करून ती सूट मर्यादा एक कोटी रुपयांपर्यंत करण्यात यावी.


३) लघुउद्योगांचे तंत्रज्ञानावर्धन व आधुनिकीकरण करण्याकरिता ५००० कोटी रुपयांचा Technology upgradation And Modernisation Fund उभारण्यात यावा, तसेच ५०० कोटी रुपयांचा लघुउद्योग निर्माण निधी उभारण्यात यावा.


No comments:

Post a Comment