Thursday, 14 December 2023

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


०१) महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या ठिकाणी आहे ?

- सातारा.


०२) "गीताई" हा ग्रंथ कोणी लिहिला ?

- विनोबा भावे.


०३) महाराष्ट्रातील पहिली भारतरत्न व्यक्ती कोण ?

- धोंडो केशव कर्वे.


०४) महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण ?

- आनंदीबाई जोशी.


०५) एव्हरेस्ट शिखर सर करणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण ?

- सुरेंद्र चव्हाण.


०१) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ?

- कोल्हापूर.


०२) भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे ?

- मुंबई.


०३) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणत्या साली सुरू झाले ?

- १९७२.


०४) श्रीमती विजयालक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या कोण होत्या ?

- राज्यपाल.


०५) महाराष्ट्रातील पहिली कवयित्री कोण ?

- महादंबा.


०१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

- पांढ-या पेशी.


०२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात?

- मुत्रपिंडाचे आजार.


०३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

- मांडीचे हाड.


०४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

- कान.


०५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

- सूर्यप्रकाश.


०१) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

- टंगस्टन.


०२) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

- ८ मिनिटे २० सेकंद.


०३) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

- न्यूटन.


०४) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

- सूर्य.


०५) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

- नायट्रोजन.


०१) महाराष्ट्रातील नेहरू स्टेडियम कोठे आहे ?

- पुणे.


०२) अँल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजापासून तयार केला जातो ?

- बाॅक्साईट.


०३) डाॅ.पंजाबराव कृषी विद्यापीठ कोठे आहे ?

- अकोला.


०४) कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे कोणी केले ?

- बॅरिस्टर अंतुले.


०५) तानसा धरण कोणत्या नदीवर आहे ?

- तानसा नदी.(ठाणे)


०१) बेळगावचा वाद हा कोणत्या दोन राज्यात आहे ?

- महाराष्ट्र व कर्नाटक.


 ०२) दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश कोणता ?

- ब्राझील.


०३) कपिल देव हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

- क्रिकेट.


०४) 'कोकणचा राजा' असे कोणत्या फळाला म्हणतात ?

- हापूस आंबा.


०५) पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे ?

- भीमा.


०१) महाराष्ट्रातील नेहरू स्टेडियम कोठे आहे ?

- पुणे.


०२) अँल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजापासून तयार केला जातो ?

- बाॅक्साईट.


०३) डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे ?

- अकोला.


०४) कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे कोणी केले ?

- बॅरिस्टर अंतुले.


०५) तानसा धरण कोणत्या नदीवर आहे ?

- तानसा नदी.(ठाणे)



०१) प्रवरा नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे ?

- भंडारदरा(विल्सन धरण). 


०२) पांडवांच्या वडिलांचे नाव काय होते ?

- पंडू राजा.


०३) राधानगरी हे प्रसिद्ध अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे ?

- कोल्हापूर.


०४) बाल शिवाजीने वयाच्या कितव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला ?

- सोळाव्या वर्षी.


०५) महाराष्ट्रात पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले ?

- गोदावरी.


०१) पंढरपूर मधील पवित्र नदीचे नाव कोणते ?

- चंद्रभागा.


०२) महाराष्ट्रात "श्रीमंत मंदिर "कोणास म्हटले आहे ?

- शिर्डी साईबाबा मंदिर.


०३) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे ?

- तिसरा.


०४) महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ?

- मध्य प्रदेश.


०५) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता ?

- भंडारा.


०१) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरणाचे नाव काय ?

- गंगापूर धरण.


०२) महाभारतातील कौरवांच्या वडिलांचे नाव काय ?

- धृतराष्ट्र.


०३) भारताच्या कोणत्या भागात महाराष्ट्र राज्य आहे ?

- पश्चिम.


०४) महाडच्या गणपतीचे नाव काय आहे ?

- वरदविनायक.


०५) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

- मोर.


०१) महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे आहे ?

- तारापूर.


०२) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?

- मुंबई शहर.


०३) छावा या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण ?

- शिवाजी सावंत.


०४) महाराष्ट्र राज्याचे एकूण प्राकृतिक विभाग किती व कोणते ?

- तीन,१) सह्याद्री किंवा पश्चिम घाट २) सातपुडा रांगा महाराष्ट्र पठार (दख्खन पठार) ३) कोकण किनारपट्टी.


०५) महाराष्ट्र राज्याचे एकूण प्रशासकीय विभाग किती व कोणते ?

- सहा,कोकण,छत्रपती संभाजीनगर

(औरंगाबाद),पुणे,नाशिक,नागपूर व अमरावती.



०१) भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे ?

- भारतरत्न.


०२) भारत देशातील सर्वोच्च लष्करी पदक कोणते ?

- परमवीर चक्र.


०३) ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहे ?

- वि.स.खांडेकर.


०४) भारतातील पहिल्या महिला आय.पी.एस.अधिकारी कोण आहे ?

- किरण बेदी.


०५) व्हॉलीबॉल च्या खेळात दोन्ही बाजूकडे प्रत्येकी किती खेळाडू असतात ?

- सहा.


०१) कांदा मुळा भाजी,अवघी विठाई माझी ! असे कोणते संत म्हणाले ?

- संत सावता माळी.


०२) महाराष्ट्रात प्रसिद्ध विठ्ठलाचे मंदिर कुठे आहेत ?

- पंढरपूर.


०३) मराठा तितुका मेळवावा,महाराष्ट्र धर्म वाढवावा ! हा संदेश कोणी दिला ?

- रामदास स्वामी.


०४) शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते ?

- शहाजी भोसले.


०५) शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते ?

 - जिजामाता.


०१) स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ?

- राजगड.


०२) सह्याद्री पर्वत कोणत्या राज्यात आहे ?

- महाराष्ट्र.


०३) ग्रामसभेचे अध्यक्ष पद कोण भूषविते ?

- सरपंच.


०४) ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

- पाच वर्ष.


०५) ग्रामपंचायत व शासन यामधील दुवा कोणती व्यक्ती असते ?

- ग्रामसेवक.


०१) श्रध्दानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली ?

- डॉ.पंजाबराव देशमुख.


०२) महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- नाशिक.


०३) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

- महात्मा ज्योतिबा फुले.


०४) नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर.


०५) भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे ?

- बंगालचा उपसागर.


०१) भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे ?

- जन-गण-मन.


०२) भारतातील सर्वात उंच मिनार कोणता आहे ?

- कुतुब मिनार.


०३) भारतातील सर्वात मोठे (क्षेत्रफळाच्या दृस्टीने) राज्य कोणते आहे ?

- राज्यस्थान.


०४) न संपणारे ऊर्जा स्त्रोत कोणते आहे ?

- सौरऊर्जा.


०५) भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

- गंगा नदी.


०१) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

- श्रीमती प्रतिभाताई पाटील.


०२) नासिक जिल्ह्यात विपश्यना ध्यान केंद्र कुठे आहे ?

- इगतपुरी.


०३) भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली ?

- डॉ.पंजाबराव देशमुख.


०४) नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा किती वर्षांनी भरतो ?

- दर बारा वर्षानी.


०५) नाशिक जिल्ह्यातील पक्षी अभयारण्य कोठे आहे ?

- नांदूर मधमेश्वर.


०१) कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?

- अलिबाग.


०२) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?

- कमळ.


०३) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?

- मोर.


०४) आपल्या राष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

- राष्ट्रपती.


०५) सात बेटांचे शहर कोणते ?

- मुंबई.


०१) पाठीच्या मणक्यात तेहतीस मणके असतात,त्यापैकी  किती मणके मानेत असतात ?

- सात.


०२) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- अमरावती.


०३) महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?

- ७२० किलोमीटर.


०४) एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- नाशिक.


०५) कोकणातील सर्वात लांब नदी कोणती ?

 - उल्हास नदी.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...