Saturday 23 December 2023

लेक लाडली योजना


महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना अधिक्रमित करून 1 एप्रिल 2023 पासून लेक लाडकी या नावाने नवीन योजना सुरु केली आहे


योजनेचे उद्दिष्ट –


मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे.

मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, मुलींमधील कुपोषण कमी करणे.

शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे.


योजनेचा लाभ


या योजनेत मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये आणि लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये याप्रमाणे 1 लाख 1 हजार रुपयांची रक्कम देण्यात येई


अटी व शर्ती


गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना शासकीय योजनेचा लाभ मिळेल.

ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका आहे.

1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेचा लाभ मिळेल.

जर कोणाला मुलगा आणि मुलगी असेल तर फक्त मुलीलाच लाभ मिळेल.


दुसऱ्या प्रसुतीच्यावेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास व एक मुलगा, एक मुलगी किंवा दोन्ही मुली झाल्यास त्या मुलींना योजनेचा लाभ मिळू शकेल. 

त्यानंतर माता/ पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.

लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक

लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.



माझी कन्या भाग्यश्री योजना


सुरुवात - एप्रिल 2016 (महाराष्ट्र शासन)


उद्देश - मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी तसेच सुधारणा करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली.

लाभ - या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार मुलींच्या जन्मानंतर 50,000 रुपये दिले जात होते.


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...