Saturday, 30 December 2023

31 December 2023 Current Affairs in Marathi



📘National

▪️स्वच्छ ऊर्जा आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना हरित हायड्रोजन धोरण-2023 धोरण लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

▪️तांदळाच्या वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी, भारत सरकारने भारत ब्रँड नावाने स्वस्त दरात तांदूळ विकण्याचा निर्णय घेतला आहे.

▪️नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तेलंगणा सरकारने प्रजा पालन कार्यक्रम सुरू केला आहे.

▪️आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या डेटावरून आयुष्मान भारत योजनेच्या यशामध्ये महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान दिसून येते, एकूण आयुष्मान कार्डांपैकी सुमारे 49% महिलांनी कार्डस बनवले आहेत.

▪️माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू यांनी वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या युवाजन श्रमिका रायथू काँग्रेस पार्टी (YSRCP) पक्षात प्रवेश केला आहे.

📔Economics

▪️भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ICICI बँक, HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या बँकाना देशांतर्गत प्रणालीगत महत्त्वाच्या बँका (D-SIBs -Domestic Systemically Important Banks) म्हणून जाहीर केले आहे.

📕Technology

▪️इस्रो 1 जानेवारी 2024 रोजी भारताचा पहिला एक्स-रे पोलरीमीटर उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.

▪️इस्रोने आखलेल्या भारताच्या या मोहिमेला XPoSat मिशन नाव देण्यात आले आहे.

▪️सीएनएन बिझनेसच्या ‘सीईओ ऑफ द इयर’ म्हणून सत्या नडेला यांची निवड झाली आहे.

📗Sports

2024 च्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये प्रथमच स्क्वॅश खेळाचा समावेश करण्यात आला आहे.

📒 Awards

अलीकडेच IPS अधिकारी ‘नीना सिंह’ यांची CISF च्या पहिल्या महिला महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

📙Other

नुकतेच जर्मनचे प्रसिद्ध राजकारणी वुल्फगँग शॅकेबल यांचे 81 व्या वर्षी निधन झाले.


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...